The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुसऱ्या महायु*द्धात स्त्रियासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने सहभागी झाल्या होत्या..!

by Heramb
19 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दुसरे महायु*द्ध ही विनाशकारी घटना तर होतीच, पण जागतिकीकरणाची आणि जागतिक सुधारणांची काही बीजंसुद्धा याच घटनेत होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याच काळात जग एकत्र यायला सुरुवात झाली होती, याच काळात विज्ञान तंत्रज्ञान आणि विशेषतः शस्त्र तंत्रज्ञानात बरंच संशोधन होऊन प्रगती झाली होती.

अनेकांच्या हातात ऑटोमॅटिक रायफल्स किंवा रॉकेट लाँचर्स आले होते आणि त्यांना अमरत्वाचा, अजिंक्य असण्याचा भास होऊ लागला. जगभर निरर्थक यु*द्ध लढण्याशिवाय हे कथित अमरत्व दाखवण्याचा उत्तम मार्ग कोणता असेल? प्रत्येकाने आपल्या अहंकाराच्या पूर्ततेसाठी यु*द्धात सहभाग घेतला आणि याच यु*द्धामुळे सुमारे साडेसात करोड लोकांचा मृत्यू झाला.

कोणत्याही यु*द्धात स्त्रियांचा पहिला मोठा आणि जागतिक सहभाग असलेले दुसरे महायु*द्ध ही पहिलीच यु*द्धाची घटना होती. रक्तपाती आणि हिं*सात्मक मार्गाने का होईना पण या यु*द्धामुळे स्त्रियांच्या मुक्तीचे मार्ग मोकळे झाले. या यु*द्धात सोव्हिएटतर्फे लढलेल्या मारियाचा इतिहास आपण जाणतोच. त्या व्यतिरिक्त, दुसऱ्या महायु*द्धात विविध देशांतील महिलांनी कसे योगदान दिले याचा हा थोडक्यात आढावा..

१. भारत:

१९३९ ते १९४७ या काळात भारतीय महिलांनी दुसऱ्या महायु*द्धात भाग घेतला होता. त्या वेळी भारत ब्रिटनची वसाहत असल्याने, ब्रिटनच्या वतीने यु*द्धात भाग घेणे त्यांना बंधनकारक होते. पण भारतीयांवर प्रचंड प्रभाव असलेल्या भारतीय नेत्यांनी लोकांना सैन्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे यासाठी ब्रिटिश सरकारने प्रयत्न केले होते. त्यांनी दुसरे महायु*द्ध सम्पल्यानन्तर लगेचच या ‘मनुष्यबळाच्या’ बदल्यात ‘स्वातंत्र्याचे’ आश्वासन दिले होते.



यामुळे सुमारे सात हजार दोनशे भारतीय महिलांनी यु*द्धात सहभाग घेतला तर रॉयल इंडियन नेव्हीमध्ये भारतीय महिलांची एक तुकडीसुद्धा कार्यरत होती. पण भारतीयांनी फक्त ब्रिटिशांच्याच वतीने आणि त्यांच्या कदाचित खोट्या आश्वासनाच्या आधारावर सैन्यात सहभाग घेतला नाही तर सुभाष बाबूंच्या नेतृत्वाखाली अनेकांनी आझाद हिंद फौजेद्वारे जपान आणि ना*झी जर्मनीसोबत हातमिळवणी करून ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्यलढा उभारला.

आझाद हिंद फौजेच्या महिला रेजिमेंटला ‘झाशी रेजिमेंटची राणी’ असे संबोधले जात असे. सुभाषबाबूंनी महिलांना राष्ट्रवादी, ऐतिहासिक आणि धार्मिक आदर्शांवर सैन्यात भरती होण्यास प्रवृत्त केले. बहुतेक भारतीय महिलांनी लॉजिस्टिक आणि वैद्यकीय सेवेमध्ये काम केले, पण रणभूमीच्या दोन्ही बाजूंना शेकडो रणरागिणी होत्या.

२. इटली:

इटलीच्या महिला या फॅसिस्टविरोधी चळवळीतही उपस्थित होत्या तर काही मुसोलिनीच्या फॅसिस्ट सैन्यातही उपस्थित होत्या. इटालियन महिलांनी इटलीच्या अधिकृत सैन्यात भाग घेतला नाही. त्यांना मुख्यत: सैन्यासाठी ‘सपोर्टिव्ह’ कामे असलेल्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. यांमध्ये कपडे धुणे, स्वयंपाक, नर्सिंग यांचा समावेश होता. पण त्यांची सैन्यसेवा इतकी मर्यादित नव्हती. जवळजवळ ६५० इटालियन स्त्रिया एकतर लढाईत मरण पावल्या किंवा जर्मन सैनिकांनी त्यांची ह*त्या केली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

३. इंग्लंड:

जेव्हा बहुतेक पुरुष सैन्यात भरती झाले होते आणि लढण्यासाठी परदेशात पाठवले गेले, तेव्हा इंग्लंडला मोठ्या प्रमाणात कामगारांच्या कमतरतेचा सामना करावा लागला. यामुळे ब्रिटिशांना याआधी दुर्लक्षित असलेल्या समाजघटकांकडे लक्ष देणे महत्वाचे ठरले. कामगारांच्या कमतरतेमुळे बर्‍याच महिलांना शस्त्रास्त्रे आणि यु*द्धसामग्री उद्योगांमध्ये काम करण्यास भाग पाडले गेले. या उद्योगावर महायुद्धाच्या आधी पुरुषांचे वर्चस्व होते.

इंग्लंडमधील स्त्री मुक्तीच्या दिशेने हे कदाचित सर्वात मोठे पाऊल असल्याचे आपल्याला दिसून येईल. शस्त्रास्त्र उद्योगात मजूर म्हणून काम करणाऱ्या महिलांनी इतर महिलांसाठी अनेक मार्ग मोकळे केले, कारण त्यावेळी कामगार क्षेत्रातील लिंग पृथक्करण कमी होऊ लागले होते. यु*द्ध संपल्यानंतर हेच पुढे सुरु राहिले आणि आज सबंध जगामध्ये त्याला आकार आलेला आहे.

४. जर्मनी:

यु*द्ध सुरू होण्या आधीच जर्मन स्त्रिया जगभरातील स्त्रियांपेक्षा मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रात सक्रिय होत्या. महिला या जर्मनीच्या कृषी अर्थव्यवस्थेचा सर्वांत महत्वाचा भाग होत्या. यु*द्ध सुरू होण्यापूर्वी १४.६ दशलक्ष महिला विविध उद्योगांत काम करीत होत्या. जेव्हा महिला सैन्यात भरती झाल्या तेव्हा ही संख्या आणखी वाढली.

संपूर्ण जर्मन सैन्यात लाखो महिलांनी परिचारिका म्हणून काम केले. तेथे चार मुख्य नर्सिंग गट होते: कॅथोलिक, प्रोटेस्टंट, रेड क्रॉस आणि विवाहित परिचारिका युनिट. यु*द्ध आघाडीवर काम केलेले नसले तरी त्यांचे काम अतिशय महत्वपूर्ण होते, कारण जर्मन सैन्याच्या मुख्य सपोर्ट युनिट्समध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश होता.

५. कॅनडा: 

कॅनडियन महिलासुद्धा यात मागे राहिल्या नाहीत. त्यांच्या घोषवाक्यातच त्यांच्या यु*द्धातील सहभागामागचे कारण स्पष्ट होते.  त्यांचे घोषवाक्य होते, “पती, भाऊ, वडील, प्रियकर सर्व यु*द्धात सामील आहेत, ते यु*द्ध जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत तर नक्कीच स्त्रिया देखील त्यांना मदत करू शकतात!”.

त्यांचे हे घोषवाक्य १९३० च्या दशकात लोकप्रिय झाले होते. लवकरच ‘महिला स्वयंसेवक सेवा’ तयार करण्यात आली आणि या सेवेला अधिकृतपणे मान्यता देण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलांच्या योगदानाच्या स्वेच्छेमुळे १९४१ साली ‘कॅनेडियन वूमन आर्मी कॉर्प्स’ची स्थापना झाली. नोंदणीकृत महिला हलक्या वाहनांच्या चालक, स्वयंपाकी, लिपिक, टायपिस्ट, संदेशवाहक आणि कॅन्टीन हेल्पर बनल्या.

दुसऱ्या महायु*द्धात स्त्रियांना बहुतेक क्षुल्लक कामे दिली गेली होती, तरीही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या उद्योगात भाग घेण्याचे अनेक मार्ग आपोआपच त्यांना खुले झाले. यामुळे जगाचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. स्त्रियांना त्यांच्या मुक्तीसाठी त्या उभ्या राहू शकतात याची जाणीव महायु*द्धाने आणि त्यातील घटनांनी करून दिली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

फक्त आपल्याच नाही, तर अमेरिकन अर्थव्यवस्थेला पण बेवड्यांनीच आधार दिला होता..!

Next Post

भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर चिनी ड्रॅगनची वक्रदृष्टी आता भूतानवर पडली आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर चिनी ड्रॅगनची वक्रदृष्टी आता भूतानवर पडली आहे

पराक्रमी सम्राट ललितादित्य होता म्हणून मुघल काश्मीरपासून ३०० वर्षे लांब राहिले..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.