The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या दंगलीत अर्ध्या कॉन्स्टॅन्टिनोपलची राख झाली आणि १० हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला होता

by द पोस्टमन टीम
27 September 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आजवर इतिहासामध्ये अनेक दं*गली झाल्या आहेत. हजारो लोकांनी या दं*गलींमध्ये आपला जीव गमावलेला आहे. कधी राजकीय, कधी धार्मिक तर कधी जातीय कारणांमुळं दं*गली होतात. एकेकाळी अशीच एक दं*गल ‘कॉन्स्टँटिनोपल’ शहरात उसळली होती. इसवी सन ५३२ साली संपूर्ण आठवडाभर कॉन्स्टँटिनोपलमध्ये ही दं*गल चालली.

ही दंग*ल म्हणजे सम्राट जस्टिनियन पहिला याच्याविरुद्ध एक प्रकारचं बंड होतं. शहराच्या आणि जगाच्या इतिहासातील सर्वांत हिं*सक दंग*लींमध्ये या घटनेचा समावेश होतो. आठवडाभरात जवळजवळ अर्धं कॉन्स्टँटिनोपल शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं आणि १० हजारपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला होता. ही हिं*सक दं*गल ‘निका दंग*ल’ किंवा ‘निका बंड’ या नावानं ओळखली जाते. सम्राट जस्टिनियनला विरोध करण्यासाठी ही निका दं*गल कशी आणि का सुरू झाली, यामागे मोठी पार्श्वभूमी आहे.

पश्चिम रोमन साम्राज्याच्या ऱ्हासानंतर साधारण ५० वर्षांनी इसवी सन ५२७ साली जस्टिनियन सत्तेवर आला. जस्टिनियननं कॉन्स्टँटिनोपलमधून पूर्व रोमन (ज्याला बायझन्टाईन असंही म्हटलं जातं) साम्राज्यावर राज्य केलं. तो सत्तेवर येण्याअगोदर रोमन साम्राज्यानं खूप मोठा झटका सहन केला होता. त्यामुळं त्याला पूर्व वैभव मिळवून देणं, हे एक सम्राट म्हणून आपलं कर्तव्य आहे, अशी धारणा जस्टिनियनची होती.

मात्र, एका कृत्यामुळं त्यानं राज्यातील जनतेची नाराजी ओढून घेतली होती. त्यानं एका वेश्येसोबत विवाह केला होता. ही महिला फक्त एक वेश्याच नव्हती तर कपटी स्त्री होती. तिचं नाव थियोडोरा होते आणि ती एका मदाऱ्याची मुलगी होती. तत्कालीन इतिहासकार प्रोकोपियसनं तिच्याबद्दल काही माहिती लिहून ठेवलेली आहे. वडीलांच्या अकाली मृत्यूनंतर थिओडोरा एक अभिनेत्री झाली.

त्याकाळी अभिनेत्री हा शब्द वेगळ्या अर्थानं वापरला जाई. अभिनेत्री म्हणजेच ती एक वेश्या बनली. ती आपल्या सौंदर्याच्या बळावर कुणालाही आपल्या नियंत्रणात आणू शकत होती. अगदी सम्राट जस्टिनियनसुद्धा तिच्या तावडीतून सुटू शकला नव्हता. प्रोकोपियसच्या शब्दात सांगायचं झाल्यास, ‘त्या मुलीमध्ये कोणतीही लाज नव्हती आणि कोणीही तिला कधीही निराश झालेलं पाहिलं नव्हतं.’ हे तर झालं निका दंगलीचं पहिलं कारण. मात्र, आणखी देखील गोष्टी आहेत. ज्यांनी लोकांच्या असंतोषाला हवा दिली.



कॉन्स्टँटिनोपलमधील प्रसिद्ध रथांच्या शर्यतीमध्ये दं*गलीची पहिली ठिणगी पडली होती. रोमन साम्राज्यामध्ये या शर्यती प्रचंड प्रसिद्ध होत्या. लोकांना अशा स्पर्धांचं मोठ्या प्रमाणात वेड होतं. रोमन साम्राज्याच्या काळात राजे लोक अशा खेळांचं आयोजन करून लोकांची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न करायचे. साम्राज्यातील बहुतेक शहरांमध्ये रथांच्या शर्यतींसाठी स्टेडियम होते.

कॉन्स्टँटिनोपलमध्ये तर सर्वांत मोठं स्टेडियम होतं. त्याला ‘हिप्पोड्रोम’ म्हटलं जात. हे स्टेडियम एका फुटबॉल स्टेडियमच्या आकारापेक्षा चारपट मोठं होतं. त्याचा आकार घोड्याच्या नालासारखा होता. यात एकाच वेळी लाखभर लोक बसू शकत होते. स्टेडियममधून एक गुप्त मार्ग थेट इम्पीरियल पॅलेसला जोडला गेलेला होता. त्याद्वारे सम्राट रथांची शर्यत पाहाण्यासाठी येत असे. खाली, एकाचवेळी प्रत्येकी चार घोडे जुंपलेले १२ रथ शर्यतीमध्ये धावायचे. त्यांना धावण्यासाठी १५० फूट रुंदीचा ट्रॅक होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

प्रेक्षक या शर्यतींवर पैसै लावायचे. अशा रथांच्या शर्यतीमध्ये स्पर्धकांचे मृत्यू होणं तर अतिशय किरकोळ गोष्ट समजली जात असे. जस्टिनियनच्या साम्राज्यामध्ये दोन प्रतिस्पर्धी संघ होते, ब्लूज आणि ग्रीन्स. कॉन्स्टँटिनोपलमध्ये या दोन्ही गटांचे असंख्य अनुयायी होते. इतिहासकारांच्या अभ्यासानुसार ब्लूज आणि ग्रीन्स राजकीय पक्षांप्रमाणेच गट होते. ब्लूज हा अधिकाऱ्यांचा गट होता. सम्राट जस्टिनियनसुद्धा या गटाच्या बाजूनं होता. तर ग्रीन्स हा सामान्य लोकांचा गट होता. परिणामी खेळ आणि राजकारण एकमेकांशी जोडले गेले होते. या शर्यतीची दं*गली होण्यामध्ये मोठी भूमिका होती.

आपल्या साम्राज्याचं वैभव परत मिळवण्याचा निश्चय सम्राट जस्टिनियननं केला होता. त्यासाठी शेजारील राज्यांवर चढाई करणं आवश्यक होतं. मात्र, यामुळं नुकसान होण्याची देखील शक्यता होती. म्हणून, थियोडोराच्या सल्ल्यानं त्यानं जनतेवरील कर वाढवले. अगदी श्रीमंत लोकसुद्धा (ब्लुज्) त्याच्या या निर्णयाला विरोध करत होते. जनतेमध्ये असंतोष वाढला होता.

इसवी सन ५३२ साली रथांच्या शर्यती दरम्यान हिप्पोड्रोममध्ये ब्लूज आणि ग्रीन्सच्या लोकांमध्ये मारामारी झाली. स्थानिक पोलीस दलानं (इम्पीरियल गार्ड) दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये मध्यस्थी केली. या मारामारीच्या प्रकरणात सात जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. काही दिवसांनंतर बॉसफोरसच्या काठावर त्यांना फाशी देण्याचं ठरलं होतं.

पहिल्या पाच जणांना यशस्वीरित्या फाशी देण्यात आलं. मात्र, शेवटच्या दोघांना फाशी देण्या अगोदर फाशीचा खांब अचानक कोसळला. ब्लूज आणि ग्रीन्सनी हा देवाचा संकेत मानला. शेवटच्या दोन (एक ब्लू होता तर दुसरा ग्रीन) लोकांचा मृत्यू होऊ नये, अशी देवाची इच्छा असल्याचा अर्थ त्यांनी काढला. त्यांनी आत शिरून त्या दोघांना सोडवलं आणि जवळच्या चर्चमध्ये हलवलं. हीचं ती वेळ होती जेव्हा ब्लूज आणि ग्रीन्स अप्रत्यक्षपणे सरकारच्या विरोधात एकवटले गेले होते.

दुसऱ्या शर्यतीसाठी ब्लूज आणि ग्रीन्सचे स्पर्धक हिप्पोड्रोमला परतले तेव्हा त्यांनी एकमेकांशी लढण्याऐवजी अचानक एकाच बाजूला झाले. उपस्थित असलेल्या लोकांनीसुद्धा त्यांना ‘निक!’ ‘निक!'(विन) म्हणून प्रोत्साहित केलं. याचा अर्थ स्पष्ट होता. जनता सम्राटाच्या विरोधात एकवटली होती. सम्राटानं शर्यत आणि हिप्पोड्रोम बंद करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे आदेश सैन्याला दिले.

तेव्हा संतप्त जनता कॉन्स्टँटिनोपलच्या रस्त्यावर आली आणि त्यांनी शहर जाळण्यास सुरुवात केली. कॉन्स्टँटिनोपल असं जळत होतं जणू काही शत्रूंनीं आग लावली होती. शहर जळत असताना सम्राट जस्टिनियन इम्पीरियल पॅलेसमध्ये लपला होता. दोन दिवस शहरात गोंधळ घातल्यानंतर जनता पुन्हा हिप्पोड्रोममध्ये परतली. त्याठिकाणाला त्यांनी त्यांचं मुख्यालय बनवलं. यामुळे सम्राट चिंताग्रस्त झाला कारण हिप्पोड्रोम थेट इम्पीरियल पॅलेसशी जोडलं गेलेलं होतं. लोकांना शांत करण्यासाठी सम्राटानं कर गोळा करणारा अधिकारी निलंबित केला. मात्र, याचा काहीही फायदा झाला नाही.

एक वेळी अशी आली की, सम्राट जस्टिनियननं पळून जाण्याचा विचार केला. याक्षणी महाराणी असलेल्या थिओडोरानं आपल्या हातात सूत्रं घेतली. पळून गेल्यानंतर कदाचित आपला जीव वाचेलही मात्र, नंतर परिस्थिती शांत झाल्यानंतर या कृत्याचा नक्कीच पश्चाताप वाटेल, असं तीनं आपल्या पतीला म्हटलं. तिनं सम्राटाला जनतेविरोधात यु*द्ध करण्यास प्रवृत्त केलं.

सैन्यानं प्रतिह*ल्ला केल्यानंतर एकाच दिवसात हिप्पोड्रोममध्ये ३० हजार लोक मारले गेले. यानंतर लोकांचा विरोध मावळला आणि जस्टिनियनची सत्ता सुरक्षित झाली. कॉन्स्टँटिनोपलच्या लोकांसाठी शिक्षा म्हणून, सम्राटानं भयानक कर संकलकाची पुन्हा नियुक्ती केली. जस्टिनियननं आपल्या मृत्यूपर्यंत (इसवी सन ५६५) आणखी तीन दशकं राज्य केलं. कालांतरानं शहर या घटनेत झालेल्या नुकसानीतून उभं राहिलं. रथांची शर्यत मात्र, निका दंगलीमध्ये आपलं अस्तित्त्व कायमचं हरवून बसली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एलिअन्सच नाही तर अमेरिकेने झॉम्बीशी लढण्याची तयारीसुद्धा पूर्ण केलीये..!

Next Post

जर्मनीने १९१६ साली केलेल्या ह*ल्ल्याची भरपाई अमेरिकेने १९७९ मध्ये व्याजासकट वसूल केली

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

जर्मनीने १९१६ साली केलेल्या ह*ल्ल्याची भरपाई अमेरिकेने १९७९ मध्ये व्याजासकट वसूल केली

कम्प्युटरचा शोध नेमका कोणी लावला यावरून पण बरेच मतभेद आहेत..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.