The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बालपणी अनौरस आपत्य म्हणून हिणवला गेलेला विल्यम इंग्लंडचा सम्राट बनला होता

by द पोस्टमन टीम
15 March 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


विलियम-द कॉन्करर हा इंग्लंडमधील एक असा शासक होता, जो वयाच्या आठव्या वर्षी नामर्डीचा ड्यूक बनला होता आणि पुढे जाऊन आपल्या शौर्याच्या बळावर तो इंग्लंडचा शासक बनला. तो स्वतः अशिक्षित होता पण त्याने संपूर्ण इंग्लंडमध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी अनेक प्रयत्न केले होते. यामुळे इंग्लंड युरोपातील एक बलशाली राष्ट्र म्हणून उदयास आले होते.

विल्यमचा जन्म १०२८ मध्ये झाला होता. पण त्याचं आयुष्य इतकं सहज नव्हतं. तो एका  कुमारिका मातेचा मुलगा होता. नॉमर्डीच्या रॉबर्ट ड्यूकचा तो अनौरस पुत्र होत. यामुळेच त्याला बालपणापासून टोमणे ऐकावे लागले होते. त्याला सगळे “विल्यम-द बास्टर्ड” म्हणून हाक मारायचे. विल्यमला हे अजिबात पसंत पडत नव्हते. तो या लोकांचा द्वेष करायचा. याचमुळे हळूहळू त्याचा स्वभाव क्रूर बनत गेला. या दरम्यान त्याच्या पित्याचे निधन झाले. यानंतर त्याच्या शत्रूंनी त्याला संपविण्याचे कारस्थान आखण्यास सुरुवात केली. पण ते सफल होऊ शकले नाहीत.

फ्रान्सचा राजा पहिला हेन्री विल्यमचा आश्रयदाता व संरक्षणदाता होता. त्यांच्यामुळेच तो जिवंत राहू शकला.

विल्यम ८ वर्षांचा होता, त्यावेळी नॉमर्डीच्या ड्यूकपदी त्याची नेमणूक करण्यात आली. तो निर्दयी तर बनलाच होता. शत्रूला मृत्युदंड देण्यात क्षणभर देखील विचार करायचा नाही. यासाठी त्याची आलोचना देखील केली जात होती. पण त्याने तिकडे लक्ष दिले नाही. त्याच्यावर सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांचासुद्धा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. तो द्या बेधुंद हत्तीप्रमाणे पुढे जात राहिला.

काही काळातच राजकीय हालचालींना वेग आला. त्याने आपली ताकद वाढवण्यासाठी आसपासच्या प्रदेशावर विजय मिळवून तो आपल्या राज्यात समाविष्ट करण्यास सुरुवात केली. १०६४साली तो शेजारील प्रांतांवर विजय मिळवण्यात आणि ब्रिटनी व मेनच्या भागावर वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरला. त्याच्या विजयाचे किस्से सर्वत्र प्रसिद्ध झाले.



त्याचा पराक्रम बघून इंग्लंडचा राजा एडवर्ड कॉन्फनसरने त्याला इंग्लंडचा उत्तराधिकारी होण्यासाठी तयार केले. एडवर्ड हा विल्यमचा जवळचा नातेवाईक होता.

विल्यम हे राजगादीवर बसणार इतक्यात बातमी आली की, एडवर्डचे निधन झाले आहे. ही बातमी विल्यमसाठी धक्कादायक होती. हे काय कमी होतं म्हणून अजून एक बातमी येऊन धडकली की, इंग्लंडचा एक शक्तिशाली सरदार हेरॉल्ड गुडवीन हा एडवर्डच्या भावाला हाताशी धरून स्वतःला एडवर्डचा उत्तराधिकारी घोषित करू पाहत आहेत आणि इंग्लंडच्या मंत्रिमंडळाने हेराल्डच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

विल्यम विश्वासघाताने पेटून उठला. त्याला आता कुठल्याही परिस्थितीत इंग्लंडचा राजा व्हायचं होतं, त्यादृष्टीने त्याने प्रयत्न सुरु केले. त्याने मोठ्या संख्येने सेनेला घेऊन इंग्लंडवर हल्ला चढवला.

त्याने सर्वप्रथम पेव्हेन्सीला आपला निशाणा बनवले. पेव्हेन्सीवर विजय मिळवायला त्याला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. हेराल्डला ज्यावेळी याची माहिती मिळाली त्याने हेस्टिंग्सला येऊन विल्यमला यु*द्धासाठी आव्हान दिले. विल्यमने या युद्धात आपल्या सैन्यदलाचे नेतृत्व केले आणि पहिल्याच दिवशीच यु*द्धात विजय मिळवला.

हेस्टिंग्सच्या यु*द्धात विजय मिळवल्यानंतर तो थांबला नाही. त्याने इंग्लंडवर दिग्विजय मिळवला. याचाच भाग म्हणून त्याने लंडनवर विजय मिळवला. फक्त दोन आठवड्यात त्याने संपूर्ण इंग्लंडवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्याने सिंहासनावर आपला अधिकार सिद्ध केला होता. हेस्टिंग्सच्या यु*द्धानंतर हेराल्ड आणि त्याचे दोन भाऊ मृत्युमुखी पडले होते, कुठलाच प्रतिस्पर्धी न उरल्यामुळे ख्रिसमसच्या दिवशी विल्यमने स्वतःचा राज्यारोहण सोहळा पार पाडला.

वेस्टमिन्स्टर ऍबीमधे त्याने पहिला नॉर्मन राजा म्हणून कार्यभार स्वीकारला आणि अशाप्रकारे इंग्रजी इतिहासातील अँग्लो सॅक्सन पर्व समाप्त झाले होते. फ्रेंच ही न्यायदानाची भाषा बनली होती.

विल्यम स्वतः अशिक्षित होता, त्याला इंग्रजीसुद्धा येत नव्हतं पण, त्याने इंग्रजीच्या प्रसारासाठी आणि शिक्षणासाठी बरेच प्रयत्न केले.

राजा बनल्यावर त्याने इंग्लंडच्या मोठ्या भूभागाला आपल्या ताब्यात घेतले आणि आपल्या नॉर्मन अनुयायी वर्गात त्या जमिनीचे वाटप केले. सरकारच्या मुख्य पदांवर नॉर्मन्सची नियुक्ती करण्यात आली. सरकार आणि संघटनांवर देखील त्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याची वागणूक लोकांना रुचली नव्हती. परिणामी त्याला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता.

आपल्या नेतृत्वाच्या बळावर त्याला आपले प्रस्थ निर्माण करण्यात यश आले होते आणि हळूहळू त्याने लोकांची मने जिंकली.

तो लोकांना असा विश्वास देण्यात यशस्वी ठरला होता की तो इंग्लंडचे कल्याण करतो आहे. त्याने यानंतर इंग्लंडच्या जनगणनेचे देखील आदेश दिले होते. असे म्हणतात की, विल्यमचे हे पाऊल त्याच्या कारकीर्दीतील एक मोठे यश ठरले होते.

एकेकाळी विल्यम-द बास्टर्ड म्हणून ओळखला जाणारा नॉमर्डीचा बालक विल्यम-द कॉन्करर बनण्यात यशस्वी ठरला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

युगांडाच्या विमानतळावर घुसून मोसादने आतं*कवाद्यांचा खा*त्मा केला होता!

Next Post

एका जहाजावर स्थापन करण्यात आला आहे जगातील सर्वात छोटा देश !

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

एका जहाजावर स्थापन करण्यात आला आहे जगातील सर्वात छोटा देश !

भारतीय क्रांतिकारकांना घाबरून काँग्रेस पक्षाचा संस्थापक महिलेचा वेश घेऊन पळाला होता !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.