The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी बँक असलेल्या लेहमन ब्रदर्सचे एकाएकी दिवाळे कसे निघाले ?

by द पोस्टमन टीम
15 September 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


लेहमन ब्रदर्स ही बँक एकेकाळी जगातील चौथ्या क्रमांकाची बँक होती. पण २००८ साली आलेल्या महामंदीमध्ये या बँकेचे अब्जावधी डॉलर्सचे साम्राज्य कोसळले आणि या बँकेचे दिवाळे निघाले. या वित्तीय संकटाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा अमेरिकन सरकारने नागरिकांची कर्ज फेडण्याची क्षमता जाणून न घेता, त्यांना मोठ्या प्रमाणात कर्जवाटप करण्यास सुरुवात केली. बँकांना कर्ज देताना याची अजिबात कल्पना नव्हती की त्यांची फसवणूक केली जात आहे आणि यामुळे शेअर बाजार कोसळून लेहमन ब्रदर्स मातीत मिसळणार आहे.

हे सगळे कसे घडले ते आपण जाणून घेऊ..

१८४४ साली अमेरिकेतील अल्बामा येथील मॉन्टगोमरी येथे लेहमन ब्रदर्सची सुरुवात झाली. जर्मनीच्या रिमप्र शहरातील हेन्री लेहमन याला याचे संपूर्ण श्रेय जाते. त्यांनी सर्व प्रथम एक छोटेसे स्टोअर उघडले. ज्यात ते लहान शेतकऱ्यांना किराणा मालाची विक्री करत होते. १८५० साली त्यांचे दोन्ही भाऊ मेयर लेहमन आणि इम्यानुएल लेहमन देखील या व्यवसायात उतरले. तिन्ही भाऊ एकत्रितपणे व्यवसाय करू लागले आणि त्यांनी कंपनीचे लेहमन ब्रदर्स असे नामकरण केले. काही वर्षांनी हेन्री लेहमनचा मृत्यू झाला आणि इतर दोन भावानी कंपनीची धुरा सांभाळली.

लेहमन ब्रदर्सने कंपनीसाठी एक नीती आखली होती, ज्यानुसार फक्त लेहमन परिवाराचे सदस्य या कंपनीत काम करू शकत होते. १९२० पर्यंत असेच सुरु होते, दुसऱ्या व्यक्तीला कंपनीत नोकरी नाकारण्यात आली. यानंतर कंपनीने आपला विस्तार करण्यास सुरुवात केली.

पुढे या कंपनीने कॉफी, पेट्रोलियम एक्स्चेंज आणि सरकारी बॉंडच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केले. सरकारने त्यांच्या कामावर प्रसन्न होऊन त्यांच्याकडे वित्तीय प्रबंधनाची जबाबदारी सोपविली. यानंतर कंपनीच्या भाग्याचे दरवाजे आपोआप उघडण्यास सुरुवात झाली.



अमेरिकन अर्थव्यवस्था उभी राहत होती. आर्थिक वृद्धीसाठी रेल्वे लाईन निर्माण करण्याचे काम सुरु होते. या आणि इतर कामासाठी पैशांची आवश्यकता होती. लेहमन ब्रदर्सची नजर त्या बाजूला गेली. बघता बघता कंपनीला मोठा फायदा मिळण्यास सुरुवात झाली. याच काळात कंपनीने आपले समभाग विक्री करण्यास सुरुवात केली आणि १८८७ साली ते न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर एका बँकिंग फर्मच्या नावाने रजिस्टर झाले. त्यांच्या १५०व्या स्थापना दिनी लेहमन ब्रदर्सचे वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील कार्यालय ९ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात पूर्णपणे उध्वस्त झाले होते.

वैश्विक वित्तीय व्यवस्थेत अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या बँकेच्या अडचणीत १९९७ सालापासून सुरुवात झाली. ज्यावेळी अमेरिकन घरांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. लोक मोठ्या घरांच्या खरेदीवर लक्ष केंद्रित करत राहिले आणि २००४ साली त्या क्षेत्रात तेजी आली. या काळात अमेरिकन लोक त्यांच्या खर्चाला लगाम लावू शकत नव्हते, यामुळे त्यांनी बऱ्यापैकी पैसा घर खरेदीवर खर्च केला. घर खरेदीमुळे त्यांना नियमित कर्जाची मोठी आवश्यकता निर्माण झाली. ज्या परिवारांना घर खर्च परवडत नव्हता ते बँकेचे दार ठोठावू लागले. ज्या लोकांनी आपला खर्च नियंत्रित केला होता, त्यांनी देखील घर घेण्याच्या उद्देशाने बँकेकडूनच कर्जाची अपेक्षा ठेवली.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

हळूहळू लोक मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊ लागले, यामुळे वित्तीय संस्थांची परीस्थिती आधीसारखी उरली नव्हती. त्यांच्याकडे नगदी चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे अमेरिकन सरकारच्या होम लोन बाजारात हिस्सेदारी असणाऱ्या संघीय राष्ट्रीय बंधक असोसिएशन आणि संघीय राष्ट्रीय बंधक असोसिएशन या दोन सरकार-प्रणित संस्थांची स्थिती ढासळू लागली.

ज्यावेळी सरकारला आपल्या संस्था कोसळण्याचा धोका जाणवू लागला त्यांनी त्या संस्थांना सरकारी नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेतला. सरकारने या संस्थांमधे २०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. सरकारला फक्त या दोन संस्थांना ताब्यात घेऊन चालणार नव्हते, त्यांनी या कामात लेहमन ब्रदर्सची मदत घेतली होती. अमेरिकन सरकारने मदत घेतली पण वित्तीय बाजारात एवढे महत्व असलेल्या आणि आर्थिक मदतीच्या अभावाने संकटग्रस्त असलेल्या लेहमन ब्रदर्सला संकट काळात कुठलीच मदत केली नाही, याचा परिणाम फार गंभीर झाला. लेहमन ब्रदर्सची आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे १४ सप्टेंबरला लेहमन ब्रदर्सने आर्थिक दिवाळखोरी जाहीर केली.

१५ सप्टेंबर २००८ रोजी लेहमन ब्रदर्सने दिवाळखोरीचा अर्ज अमेरिकन कोर्टात दाखल केला होता. अमेरिकेच्या इतिहासातील दिवाळं निघालेली ही पहिली बँक होती. याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आणि बाजार कोसळला. धारातीर्थी पडलेल्या बाजाराला संजीवनी देण्यासाठी सरकारने लेहमन ब्रदर्सला उभारी देण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण यात सरकारला अपयश आले.

डाऊ जोंस स्टॉक मार्केट त्यावेळी ४४ टक्क्याने म्हणजे ५०४ अंकाने कोसळले होते. अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यानंतर ही अमेरिकन बाजाराची सर्वात मोठी पडझड होती. २४ मार्च २००३ नंतरची सर्वांत मोठी पडझड अमेरिकन स्टॉक एक्स्चेंज ‘नॅसडॅक’ने नोंदवली होती. याबरोबर पॅरिसचे सीएसी-40, यूरोपचे एफटीएसई इंडेक्स, ऑस्ट्रेलिया, तैवान, सिंगापुर आणि इतर आशियाई देशातील स्टॉक मार्केट यानंतर धडाधड कोसळले होते.

भारताच्या बाजारपेठेवर देखील याचा परिणाम झाला होता. लेहमन ब्रदर्स दिवाळखोर घोषित झाल्यानंतर सेन्सेक्स ५२ टक्क्यांनी कोसळला होता. परंतु तत्काळ सरकारी हस्तक्षेप करण्यात आल्यामुळे याचा तितकासा परिणाम झाला नव्हता आणि भारतीय बँकिंग क्षेत्राची पडझड रोखता आली होती.

लेहमन ब्रदर्स आपटले आणि त्यामुळे सरकारी मदतीच्या आभावी भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. लेहमन ब्रदर्सने दिवाळखोर घोषित करण्याच्या ६ दिवसांआधी घोषित करण्यात आलेल्या एका रेटिंग रिपोर्टनुसार लेहमन ब्रदर्सला ‘अ’ दर्जा प्रदान करण्यात आला होता. काही दिवसातच संस्थेचे दिवाळे कसे निघाले, याचे उत्तर कोणाकडे नाही. आर्थिक मॉडेलवर प्रश्नचिन्ह यामुळे उपस्थित राहिले होते.

एका वृत्तपत्राने जाहीर केलेल्या एका अहवालात असे म्हटले होते की, वित्तीय मानांकन करणाऱ्या संस्था देखील या आर्थिक संकटाला तितक्याच कारणीभूत होत्या. लेहमन ब्रदर्समुळे भांडवली व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. लोकांनी डोळे बंद करून लेहमन ब्रदर्सवर विश्वास ठेवला होता, त्यांच्या आयुष्यात यामुळे मोठा भूकंप आला होता. जर वित्तीय मानांकन देणाऱ्या संस्थांनी योग्य काम केले असते तर ही वेळ त्यांच्यावर ओढवली नसती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

दुर्बिणीचा शोध गॅलिलिओने नाहीतर एका चष्मा बनवणाऱ्या डच माणसाने लावला होता

Next Post

महाराजा रणजितसिंहाच्या बॅटींगपुढे इंग्रज गोलंदाज अक्षरशः नांग्या टाकायचे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

महाराजा रणजितसिंहाच्या बॅटींगपुढे इंग्रज गोलंदाज अक्षरशः नांग्या टाकायचे

इंटरनॅशनल चॅम्पियन बनायला घर सोडून गेलेला विक्की गौंडर पंजाबचा मोस्ट वॉन्टेड गुंड बनला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.