The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चर्चिलच्या एका पुस्तकामुळं ब्रिटनसाठी दुसरं महायु*द्ध अवघड होऊन बसलं होतं

by Heramb
16 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


रक्त*रंजित पहिले महायु*द्ध संपले होते. महायु*द्धातील विजेत्यांना त्यांनी वापरलेल्या तंत्रज्ञानावर आणि विविध युक्त्यांबद्दल प्रचंड गर्व होता. त्यांपैकी काही तंत्रज्ञान आणि युक्त्या हे महायु*द्धातील विजयाच्या गुरुकिल्ल्या होत्या, पण एका माणसाने लिहिलेल्या उपद्व्यापी पुस्तकामुळे हे सगळं ‘कॉन्फेडेन्शियल’ मटेरियल बाहेर आलं.

हा माणूस कोणी सामान्य नागरिक किंवा सैनिक नव्हता.  सर विन्स्टन एस. चर्चिल आणि त्याने केलेल्या गुप्त माहितीच्या प्रकटीकरणामुळे जर्मनीने दुसऱ्या महायु*द्धात आपली लढण्याची पद्धत बदलली किंबहुना अधिक आधुनिक केली. ‘द वर्ल्ड क्रायसिस’ या पुस्तकांमध्ये विन्स्टन चर्चिलने पहिल्या महायु*द्धाबद्दल दिलेली माहिती आहे. हे पुस्तक १९२३ ते १९३१ दरम्यान सहा खंडांमध्ये प्रसिद्ध झाले. दुसऱ्या महायु*द्धाच्या फाईल्स अजूनही “क्लासिफाईड” का आहेत याचे हे उत्तर.

पहिले महायु/द्ध हे दुसऱ्या महायु*द्धापर्यंत मानवाला ज्ञात असलेले सर्वात रक्त*रंजित यु*द्ध होते. हे महायु*द्ध जगभरात लढले गेलेले पहिले आधुनिक यु*द्ध होते आणि सैन्याच्या वेगवान हालचालींमुळे स्पॅनिश फ्लूचा वेगाने प्रसार झाला. दोन्ही बाजूंनी प्रथमच यु*द्धात विमान, पाणबुड्या, रण*गाडे, विषारी वायू, रेडिओ आणि स्वयंचलित शस्त्रे यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला.

आज आपल्या व्हाट्सॲप आणि प्रत्येक सोशल मीडिया मेसेंजरमध्ये प्रामुख्याने असतं असं म्हणतात, ते म्हणजे एन्क्रिप्शन! दुसऱ्या महायु*द्धाच्या काळातील सर्वांत महत्वाचा शोध म्हणजे एन्क्रिप्शन. कारण यावेळी गुप्तहेर आणि हेरगिरीच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल झाले होते आणि कोणतेही संदेश गुप्त ठेवणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया बनली. त्यामुळे एनक्रिप्शन हे यु*द्धातील एक महत्त्वाचे शस्त्र बनले.

पहिल्या महायु*द्धाच्या सुरुवातीला, रशियन लोकांनी हस्तगत केलेल्या एका जर्मन जहाजातून ‘जर्मन नौदल कोड’ची पुस्तके हस्तगत केली गेली. त्यांनी त्याची एक प्रत ब्रिटीश गुप्तचरांना दिली. ब्रिटनमध्ये, ‘जीसीएचक्यू’च्या नावाखाली बनलेल्या ब्रिटिश इंटेलिजन्स युनिटने या जर्मन कोडबुकचे विश्लेषण केले आणि जर्मन एन्क्रिप्शन डिकोड केले. ब्रिटीशांनी डिकोडिंग केल्याने त्यांनी जर्मन गुप्त संदेश वाचले आणि यामुळेच हे यु*द्ध जिंकले.

विन्स्टन चर्चिल पहिल्या महायु*द्धाच्या वेळी “लॉर्ड ऑफ ॲडमिरॅलिटी” म्हणजेच नौदल मंत्री बनला. यु*द्धानंतर त्याने आपल्या सामरिक अनुभवांवर आधारित ‘द वर्ल्ड क्रायसिस’ हे पुस्तक लिहिले. ब्रिटिशांनी जर्मन कोडबुक कसे हस्तगत केले आणि त्यातील गुप्त-संदेश कसे वाचले याबद्दल सविस्तरपणे माहिती दिली आहे. हीच माहिती कालांतराने यु*द्धाची तयारी करणाऱ्या जर्मन हाय कमांडपर्यंत पोहोचली.



परिणामी, जर्मन लोकांनी आधीपेक्षा कित्येक पटीने मजबूत आणि अवघड ‘एनिग्मा’ नावाचा एन्क्रिप्शन कोड कार्यान्वित केला. हा कोड सर्वप्रथम बँकांमधील संवादासाठी वापरण्यात आला. एनिग्मा कोडची यानंतर तो क्रॅक होणे अशक्य असेल अशाप्रकारे सेटिंग केली होती, ही सेटिंग रोज बदलली जात असे.

या कोडचे लाखो कॉम्बिनेशन्स होते. म्हणजेच जरी कोणी आज तो कोड डिकोड करू शकला तरी त्याच्या सेटिंग्स पुढच्या दिवशी बदलणार. ‘नेव्हल एनिग्मा’ ही गुंतागुंत वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या केबल्स आणि वायर्स वापरून अतिशय क्लिष्ट स्वरूपात तयार केली गेली होती.

ॲलन ट्युरिंगच्या नेतृत्वाखालील ब्लेचले पार्कच्या अभियंत्यांनी ‘BOMB’ नावाची इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टीम तयार केली होती. ही सिस्टीम जर्मन एन्क्रिप्टेड संदेशांना डिकोड करण्याचं काम करीत असे. ब्लेचले पार्क संघाने यु*द्ध चार वर्षांनी कमी केले असे विन्स्टन चर्चिलचे मत होते.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

ब्रिटनला इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची आहे. म्हणूनच, दुसऱ्या महायु*द्धानंतर, ब्रिटीश सरकारने यु*द्धादरम्यान पार पडलेल्या अनेक ऑपरेशन्स संबंधित संवेदनशील माहिती आर्काइव्हजमध्ये सीलबंद केली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

बंडखोरांनी लहान मुलांच्या हातात शस्त्रं देऊन त्यांचं आयुष्य उ*ध्वस्त करून टाकलं होतं

Next Post

‘स्टार वॉर्स’च्या फॅन्सनी एकत्र येऊन सुरु केलेला मर्चन्डाईझ ब्रँड म्हणजे ‘द सोल्ड स्टोअर’

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

'स्टार वॉर्स'च्या फॅन्सनी एकत्र येऊन सुरु केलेला मर्चन्डाईझ ब्रँड म्हणजे 'द सोल्ड स्टोअर'

या स्त्रीने तिच्या मुलीचं अपहरण करून ह*त्या करणाऱ्या दहा गुंडांना शोधून त्यांना संपवलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.