The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या चीनी राणीने परीक्षा घेऊन अधिकारी नेमायची सुरुवात केली होती

by द पोस्टमन टीम
9 December 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आपल्या भारताला लाभलेले शेजारी फार अद्भुत आहेत. पाकिस्तानसारख्या प्रेमळ सुहृद शेजाऱ्याकडून आपणास गेली अनेक दशके बॉ*म्बस्फो*ट आणि जि*हाद्यांचे प्रेम मिळत आहेच. बांग्लादेशासारख्या शेजाऱ्याकडून बांग्लादेशी घुसखोर देखील फुकटची भेट मिळाल्यासारखे आपल्या देशात त्यांचा रतीब चालू असतो. पण या दोन शेजाऱ्यांपेक्षा तिसरा शेजारी अर्थात चीन. याचे कौतुक जास्त आहे. १९६२ साली “हिंदी चीनी, भाई भाई” म्हणत याचं शेजाऱ्याने आपल्यावर पाठीमागून वार केला होता.

आज जागतिक बाजारपेठेत याच शेजाऱ्याच्या स्वस्त वस्तू आपल्या बाजारपेठेला टक्कर देत राहतात. अमेरिका, रशिया आणि भारतापाठोपाठ महासत्ता होण्याच्या स्पर्धेत चीनची चर्चा जास्त चालू असते. आपल्याकडून यांनी भले बुद्धिझमसारखा शांतताप्रिय धर्म  घेतला असेल पण यांचे कारनामे मात्र अशांतीप्रिय असतात. त्यामुळे चीन आणि बौद्ध धर्म यासारखे दुसरे विडंबन नाही.

thepostman

आजचे साम्यवादी सरकार सत्तेत येण्यापूर्वी चीनने अनेक राजघराणी पाहिली. एक वैशिष्ट्य म्हणजे या देशावर ज्या ज्या राजांनी राज्य केले त्यात एक महिलादेखील होवून गेली. जसे आपल्याकडे एकमेव महिला मुघल शासक म्हणून रझिया सुलताना हिचे नाव घेतले जाते तसे चीनच्या इतिहासामध्येसुद्धा एक महिला शासक होउन गेली, जिने संपूर्ण देश चालवला होता.



३००० वर्षाच्या कार्यकाळात चीनवर एका महिलेने राज्य केले. तिचे नाव सम्राज्ञी ‘वु झेशियन’.

ती चीनची एकमेव महिला हुकुमशहा होवून गेली. इतिहासकार तिच्याबद्दल फार चांगल बोलत नाहीत मात्र तिच्या काळात चीनने प्रगती केली ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे.

वु झेशियनच्या अगोदर हान राजवंश सत्तेत होता. त्यांच्या काळात स्त्रियांना कसलेही अधिकार नव्हते, राजकीय बाबींमध्ये भाग घेण्याचा अधिकार त्यांना नव्हता. तसेच स्वत: कमावलेली संपत्तीसुद्धा त्यांना घरातल्या पुरुषाच्या हातावर ठेवावी लागत असे. उच्चकुलीन बायकांच्या पायाला घट्ट कपडे गुंडाळून ठेवून  त्यांचे पाय अत्यंत  लहान करण्याची घाणेरडी  क्रू*र प्रथा  त्यावेळी देशात होती. या हान राजघराण्यानंतर टांग राजघराणे सत्तेत आले. या घराण्याच्या कालखंडात बायकांचे पाय लहान करण्याची प्रथा बंद झाली होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

वु झेशियन एका श्रीमंत घरात जन्माला आली होती. तिच्या वडिलांनी तिला शिक्षणासाठी पाठींबा दिला. ती लिहिणे, वाचणे, विणकाम याबरोबर घोडेस्वारी, शस्त्र चालवणे या विद्यासुद्धा तिच्या वडिलांच्या मदतीने शिकली. वु १४ वर्षाची असताना टांग घराण्याचा तत्कालीन सम्राट ताईझोंग याची नजर तिच्यावर पडली आणि त्याने तिची रवानगी आपल्या जनानखान्यात केली. १४ व्या वर्षी वु ला सम्राटची ऑफिशियल रखेल अशी पदवी मिळाली. या सम्राटाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गओझोंग सत्तेत आला.

त्यावेळच्या प्रथेप्रमाणे वु झेशियन आता नवीन सम्राटाची रखेल म्हणून ओळखली जाऊ लागली. त्या काळात चीनमध्ये स्त्रियांचा सामाजिक दर्जा किती खालावला होता आणि राजे लोक स्वार्थासाठी स्त्रियांना कसे वापरून घेत असतं हे या वु झेशियनच्या कथेवरून चांगलेच कळते.

बापाने पकडून राजमहालात आणली, तिला जबरदस्तीने स्वत:च्या शारीरिक आनंदासाठी वापरले आणि त्यानंतर त्याच्या मुलाची पण ती ऑफिशियल मिस्ट्रेस झाली. कदाचित जीवनाने दाखवलेल्या या कठीण प्रसंगांमुळे वु झेशियन पूर्णपणे कोरडी, पाषाणहृदयी झाली. जर माणसाच्या हातात सत्ता असेल तर माणूस काहीही प्राप्त करू शकतो हे सत्य तिने पाहिल्यामुळे आपल्या हातात सत्ता कशी येईल याचा विचार तिने केला.

लवकरच नवीन सम्राट गओझेंगची ती सगळ्यात प्रिय अशी मिस्ट्रेस झाली. तो तिच्याकडून प्रत्येक बाबतीत सल्ले घेवू लागला. राज्यकारभारामध्ये तिचा हस्तक्षेप वाढू लागला. हे दरबारातील लोकांना पटेना, परंतु ही गोष्ट सम्राटाच्या कानावर घालण्याचे धाडस कुणाचेच नव्हते.

वु झेशियनने दुसरीकडे सम्राटची बायको आणि आई या दोघींचा काटा काढण्यासाठी एक कारस्थान रचले. इतिहास असे सांगतो वु झेशियनने स्वत:च्या मुलीचा खू*न केला आणि सम्राट गओझेंगला पटवून दिले की सम्राटाची बायको वांग आणि आई दोघींनी वु झेशियनला राज महालातून बाहेर काढण्यासाठी तिच्या मुलीचा खू*न केला. त्यावेळी वु झेशियनच्या सौंदर्याच्या जाळ्यात सापडलेल्या सम्राट गओझेंगने या गोष्टीवर विश्वास ठेवला.

वु झेशियनला सम्राज्ञी वांग हिची जागा घ्यायची होती त्यामुळे तिने आपले कट कारस्थान चालू ठेवले. शेवटी तिला सम्राट गओझेंगला हे पटवून देण्यात यश आले की त्याचे स्वत:ची बायको आणि आई वु झेशियनवर जादूटोणा करून तिला सम्राटापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खुद्द सम्राटाला विष घालून ठा*र मारण्याचा प्रयत्न करत आहेत. हे ऐकून गओझेंगने स्वत:च्या आईला  कारागृहात टाकण्याचे आदेश दिले. सम्राटाने आपल्या बायकोलाही आपल्यापासून दूर केले. तिला आणि तिच्या काकाला त्याने तुरुंगात टाकण्याची व्यवस्था केली.

thepostman

असं म्हणतात यानंतर सम्राट अचानक आजारी पडला आणि त्याच्या रोगाचे निदान कुणालाही करता आले नाही. राज्यकारभार करण्याची त्याची ताकद राहिली नाही त्यामुळे त्याने शेवटी आपली उत्तराधिकारी म्हणून वु झेशियनची निवड केली. त्यावेळी दरबारातील अनेक लोक या निर्णयाच्या विरोधात होते मात्र सम्राटाचा निर्णय कोणीही टाळू शकत नसल्यामुळे या निर्णयाला मान्यता दिली गेली आणि वु झेशियन सत्तेत आली.

सत्तेत आल्यावर पहिल्यांदा तिने सम्राटाच्या कैदेत असलेल्या आईचा आणि बायकोचा शिर*च्छेद करवला. आपल्या शत्रूंना धडे शिकवले, स्वत:विरुद्धचे बंड चिरडून टाकले.

पण इतक सगळं करत असताना वु झेशियनने राज्यकारभार मात्र न्यायाने केला. तिने राज्यात परीक्षा पद्धती आणली. लोकांना नोकऱ्या देताना मर्जीतली माणसे न निवडता कठोर परीक्षा घेऊन माणसे निवडण्याचे आदेश दिले त्यामुळे संपूर्ण देशात योग्य व्यक्तींच्या नेमणुकांसाठी परीक्षा पद्धती आणली गेली.

तिने शेतकऱ्यांवर लादलेले जुलुमी कर माफ केले, वु झेशियनने चीनमध्ये चालत आलेला सगळ्यात जुना धर्म ताओइझम काढून टाकला. तिने भारतात उगम पावलेला बौद्ध धर्म हा चीनचा अधिकृत धर्म म्हणून स्वीकारला.

अशी आहे चीनच्या एकमेव महिला सम्राज्ञीची कहाणी.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: chinese empresswu zetian
ShareTweet
Previous Post

असं म्हणतात की इथं मृत्यू आल्यावर जन्म मृत्युच्या फेऱ्यातून सुटका होते..!

Next Post

भारतातील याठिकाणी आजही पंतप्रधान, राष्ट्रपती यांना मानवंदना दिली जात नाही

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

भारतातील याठिकाणी आजही पंतप्रधान, राष्ट्रपती यांना मानवंदना दिली जात नाही

kalpana saroj story in marathi

बालविवाहानंतर सासूरवास भोगल्यानंतर या ताई आता एक यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.