The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आईच्या मृत्यूनंतर मुलाने काढलेल्या आईच्या चित्राला मिळालाय आंतरराष्ट्रीय पुरस्कार !

by द पोस्टमन टीम
23 February 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ajunath feature
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


एक पांढरा टॉप आणि लाल स्कर्ट घातलेली एक महिला आपल्या व्हरांड्यात झाडू मारतेय, तिच्यापासून काही अंतरावर दुसरी महिला आपल्या गुरांचा ताबा मिळवू बघत आहे, तर दुसऱ्या एका भागात दोन-चार महिला आपल्या शेताची मशागत करत आहेत.

हे वर्णन आहे एका चित्राचे, हे चित्र साधारण नसून या चित्राला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या चित्राचे नाव ‘माय मदर अँड नेबरिंग मदर्स’ असं असून एका खेडे गावाची पार्श्वभूमी त्या सुंदर चित्रात दाखवण्यात आली आहे. त्यात पसरलेले रंग त्या चित्राच्या सुंदरतेला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन सोडतात.

यात चित्रकाराने त्याची आई आणि आसपासच्या आईपण जगत असलेल्या स्त्रियांचे चित्रण केलं आहे.

चार वर्षांपूर्वी केरळच्या थ्रिसूर जिल्ह्यातल्या कुंडुवारा गावात राहणाऱ्या अनुजाथ सिंधू विनयलाल चित्र काढायला सुरवात केली होती. पण त्याला याची अजिबात कल्पना नव्हती की एक दिवस त्याने काढलेल्या चित्राला आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळेल.

त्यावेळी फक्त नऊ वर्षाच्या असलेल्या अनुजाथला आपलं चित्र कुठल्याही स्पर्धेसाठी पाठवण्याची अजिबात इच्छा नव्हती, तो विचार देखील त्याच्या डोक्यात त्यावेळी आला नव्हता. त्याने ते चित्र फक्त आपल्या आईवर असलेल्या प्रेमापोटी काढले होते.



 

my mother the postman

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

 

परंतु २०१९ साली त्याच्या वडिलांनी त्याला शंकरा अकॅडेमी ऑफ आर्ट अँड बुक पब्लिशिंग, दिल्ली यांच्याद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत त्याची नोंदणी केली आणि त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला तेव्हा त्याला पुरस्कार मिळाला होता.

जेव्हा या पुरस्काराची घोषणा करण्यात आली तेव्हा अनुजाथची आई हयात होती पण पुरस्कार मिळेपर्यंत आक्रित घडलं होतं.

त्याच्या आईला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे दुर्दैवी निधन झाले. पुरस्कार जिंकल्याचा आनंद काहीच काळ टिकला. 

आपल्या आईने आपल्याला सदैव चित्रकलेसाठी प्रोत्साहनच दिलं असं अनुजाथ सांगतो.

आई मला नेहमी आधीपेक्षा चांगलं चित्र काढायला प्रोत्साहित करायची. आज वडिलांच्या आणि आईच्या त्या पाठिंब्यामुळे मी माझी चित्रकलेची आवड जोपासू शकलो आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर देखील अनुजाथ थांबला नाही. त्याने आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रकलेतच करियर घडवण्याचा निर्धार केलेला आहे. आईच्या मृत्यूनंतर त्याला वेगळीच प्रेरणा मिळाली असून त्याने स्वतःला अजून चित्रकलेसाठी झोकून दिले आहे.

 

my mother 2 the postman

 

वयाच्या चौथ्या वर्षी अनुजाथ चित्रकला करायला लागला होता. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण करून तो चित्र काढत असे, त्याच्या चित्रात एक जिवंतपणा होता, त्याची चित्रकला ही उत्तरोत्तर बहरत गेली आहे.

त्याच्या चित्रांचे विषय एखाद्या बेसिंगच्या बाजूने चालत जाणारी मुंगी पासून एखाद्या पुस्तकांच्या कपाटात ठेवलेली पुस्तके अशी होती. अनुजाथचे वडील विनयलाल हे व्यवसायाने एक ग्राफिक डिझायनर आहेत. त्यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने मुलांचं संगोपन केलं आहे.

त्याने कधीच अनुजाथला कुठल्याही प्रकारच्या चित्रकलेच्या क्लासला पाठवले नव्हते, त्यांचे असे मत होते की कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण त्याच्या चित्रकलेला बहार येऊ देणार नाही, उलट त्याच्या कलेतील वैशिष्ट्यपूर्णता हिरावून घेईल.

शाळेत असताना अनुजाथ वेगवेगळ्या शालेय स्पर्धात सहभागी होत होता. देवमाथा सीएमआय असे त्याच्या शाळेचे नाव होते आणि लहान होता तेव्हापासूनच शाळेच्या स्पर्धांमध्ये मोठे यश मिळवत होता.

२०१३ साली त्याला आशिया खंडातील सर्वात मोठ्या चित्रकला स्पर्धेत सर्वोत्तम चित्रकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या स्पर्धेचे आयोजन केरळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले होते.

अनुजाथ केवळ ९ वर्षांचा होता ज्यावेळी त्याने २०१४ साली केरळाच्या पर्यटन विभागाकडून घेण्यात आलेल्या क्लिंट मेमोरियल आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश कमावलं होतं.

 

clint memorial the postman

 

याच्यानंतर अगदी वर्षभरातच त्याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या आशिया पॅसिफिक पट्ट्यातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत त्याच्या ‘वि हॅव दि पॉवर’ या चित्रासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

याच वर्षी भारताच्या आंतराराष्ट्रीय केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आफ्रिका फोरमच्या चित्रकला प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्याला परराष्ट्र मंत्रालयाकडून २०१५ साली पारितोषिक देखील प्रदान करण्यात आले.

इतकंच नाही त्याच्या कुटुंबियांसाठी सर्वात आनंदाचा क्षण तो होता ज्यावेळी त्याला भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता.

अनुजाथचा संपूर्ण परिवार या प्रसंगी दिल्लीला गेला होता. त्याला २०१६ सालचा, असामान्य कौशल्य दाखवणाऱ्या मुलांना दिला जाणारा राष्ट्रीय बाल पुरस्कार देखील मिळाला होता.

त्याला राष्ट्र्पतींकडून १० हजारांची रक्कम, ३ हजारांची पुस्तके आणि पारितोषिक प्रदान करण्यात आलं होतं. त्याच्यामुळे आमच्या संपूर्ण परिवाराला महामहिम राष्ट्रपतींची भेट घेता आली, हे सर्वस्वी त्याचं यश असल्याची भावना त्याच्या पित्याने बोलून दाखवली आहे.

आम्ही त्याच्यावर कधीच कुठल्याही स्पर्धेत यश मिळव म्हणून दबाव टाकलेला नाही. त्याला यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे, मी आधीपासूनच त्याला शक्य तितकी जास्त मोकळीक देण्याचा प्रयत्न करतोय असं त्याच्या पित्याचे म्हणणे आहे.

 

ajunath the postman

 

२०१९ साली शंकरा अकॅडेमीच्या स्पर्धेत त्याने मिळवलेल्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला न विचारता मी त्याचे चित्र त्या स्पर्धेसाठी पाठवले होते आणि त्यामुळेच माझा मुलगा हे यश कमावू शकला आहे.

अनुजाथच्या आईच्या अचानक जाण्याने देखील त्याच्यावर विशेष परिणाम झाला नसून त्याने उलट आपल्या  चित्रकलेच्या विकासाला ध्येय बनवले आहे. पुढे जाऊन अनुजाथ चित्रकलेच्या क्षेत्रात चमत्कार घडवणार इतकं नक्कीच !


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Drawing
ShareTweet
Previous Post

सी.बी. मुथम्मा – भारताच्या पहिल्या महिला राजदूत

Next Post

भारतात पहिली लस विकसित करून लाखोंचे प्राण वाचवणारा ध्येयवेडा अवलिया

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

भारतात पहिली लस विकसित करून लाखोंचे प्राण वाचवणारा ध्येयवेडा अवलिया

काम मिळत नव्हतं म्हणून उदित नारायण शेती करायला निघाला होता पण..

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.