The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात बुद्धिबळाची क्रेज निर्माण झाली ती विश्वनाथन आनंद मुळेच

by द पोस्टमन टीम
10 December 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


‘बुद्धिबळ’ हा खेळ एकदम हुशार आणि शांत लोकांचा खेळ ओळखला जातो. कारण त्यातील डावपेच आणि चाली योग्य पद्धतीनं खेळण्यासाठी कमालीचं डोकं वापरावं लागतं. त्यामुळंच ज्यांना बुद्धिबळ खेळता येतं, त्यांना हुशार म्हटलं जातं. माझ्या शाळेत तर चेस प्लेयर्सचा एक वेगळाच ‘ऑरा’ असायचा. एकदम फोकस्ड असलेली ही पोरं-पोरी प्रत्येक गोष्टीमध्ये एकदम परफेक्ट असायची, जे आमच्या सारख्या टारगट पोरा-पोरींना कधीच आवडायचं नाही.

असो, तर सांगायचा मुद्दा हा की, चेस हा खेळ फार हुशारीनं खेळावं लागतो. शिवाय कधी-कधी तासन् तास वेळ देऊनही डाव सुटत नाही. म्हणून काही बोटावर मोजण्याइतकेच लोक हा खेळ खेळतात. कुस्ती, क्रिकेट आणि कबड्डीसारखे मैदानी क्रीडा प्रकार आवडणाऱ्या भारतीयांना चेसची खरी ओळख ‘विश्वनाथन आनंद’ नावाच्या व्यक्तीनं करून दिली. ६४ घरांवर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या आनंदशिवाय आपल्या देशात चेसची कल्पना करणंही कठीण आहे.

आग लागण्यासाठी एखाद्या ठिणगीची गरज असते, त्याचप्रमाणं भारतामध्ये चेसचा वणवा पेटवण्याचं काम पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या आनंदनं केलं. भारतामध्ये चेस संस्कृती रुजण्याचं सर्वांत जास्त श्रेय मिळालेल्या विश्वनाथन आनंदच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडणारा हा विशेष लेख..

आई ही आपली पहिली गुरू असते, हे एक वैश्विक सत्य आहे. एका मांसाच्या गोळ्याला माणसात आणण्याच्या कामाची सुरुवात आईच करते. विश्वनाथन आनंदच्याबाबतीत देखील हेच झालं. ११ डिसेंबर १९६९ रोजी तामिळनाडूतील मायिलादुथुराई येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील, विश्वनाथन अय्यर हे दक्षिण रेल्वेचे प्रमुख होते तर आई सुशीला या बुद्धिबळपटू होत्या. तीन भावंडांमध्ये आनंद सर्वांत धाकटा होता. त्यामुळं साहजिकच तो सर्वांचा लाडका होता.



आनंदची आई सुशीला उत्कृष्ट चेस खेळायच्या. आपल्या आईला खेळताना पाहून लहानग्या आनंदला चेसबद्दल कुतुहल वाटू लागलं. वयाच्या सहाव्या वर्षापासून आनंदनं आपल्या आईकडून चेसचे धडे घेण्यास सुरुवात केली. यामध्ये त्याच्या आईची मैत्रीण असलेल्या दीपा रामकृष्णन् यांचा देखील मोठा वाटा आहे.

आनंद चेन्नईतील डॉन बॉस्को मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्यानं चेस स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. त्यानं आपली ही सवय लोयोला कॉलेजमधून ‘बॅचलर ऑफ कॉमर्स’ची पदवी घेत असतानाही कायम ठेवली. वयाच्या चौदाव्या वर्षी, १९८३ साली नॅशनल सब-ज्युनियर चेस चॅम्पियनशिप जिंकून त्यानं राष्ट्रीय स्तरावर आपलं पहिलं वहिलं यश मिळवलं. पुढच्याच वर्षी तो इंटरनॅशनल मास्टरचा किताब जिंकणारा सर्वांत तरुण भारतीय बनला.

आनंद आपल्या आईला आपली गुरू मानतो. मात्र, त्याबरोबरच बॉबी फिशरला देखील तो आपला आदर्श मानतो. आनंदच्या मते बॉबी हे चेसचे सर्वकालीन महान खेळाडू आहेत. चेसमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करणाऱ्या आनंदला त्याचे चाहते ‘टायगर ऑफ मद्रास’ नावानं ओळखतात. १९८७ मध्ये त्यानं वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशीप जिंकली होती. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

एका वर्षानंतर भारतात आयोजित करण्यात आलेली ‘शक्ती फायनान्स इंटरनॅशनल चेस टूर्नामेंट’ जिंकून तो भारताचा पहिला ग्रँडमास्टर बनला. मात्र, त्याची सर्वोत्तम कामगिरी होणं अद्याप बाकी होतं. २००० साली, तेहरानमध्ये FIDEनं वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप आयोजित केली होती. त्या स्पर्धेत आनंदनं दिग्गज अलेक्सी शिरोव्हचा पराभव करून जगज्जेतेपद आपल्या नावे केलं. यानिमित्त पहिल्यांदाच एका भारतीयाचं नाव विजेतेपदावर कोरलं गेलं होतं.

१९८० सालच्या मध्यापासून आनंदनं बुद्धिबळाच्या जगात आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली होती. त्यांनं वेळोवेळी आपली क्षमता सिद्ध करून दाखवली. याचीच परिणीती म्हणून एप्रिल २००७ मध्ये तो FIDE Elo रेटिंगच्या सिंहासनावर विराजमान झाला. आनंदनं २००७ ते २०१३ पर्यंत जागतिक बुद्धिबळावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि पाचवेळा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.

आनंद हा एकमेव खेळाडू आहे ज्याला आतापर्यंत सहावेळा ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे! खेळाडूला कुठं ऑस्कर मिळतो का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, ही गोष्ट एकदम खरी आहे. चेसमध्ये देखील ‘ऑस्कर’ नावाचा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. जो दरवर्षी जगातील सर्वोत्तम चेस प्लेयरला दिला जातो. आतापर्यंत आनंदनं सहावेळा हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. १९९७, १९९८, २००३, २००४, २००७ आणि २००८ यावर्षी आनंदला ऑस्करला मिळाला.

जागतिक स्तरावर आपल्या देशाची मान अभिमानानं उंचावणाऱ्या आनंदसारख्या हुशार बुद्धिबळपटूचा सन्मान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्यच आहे. आनंदला वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी प्रतिष्ठित ‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. १९८८ मध्ये सापडलेल्या एका लघुग्रहाला ‘विषयानंद’ असं नाव देण्यात आलं आहे. हे नाव विश्वनाथन आनंदच्या नावापासून तयार करण्यात आलं आहे.

२००७ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळवणारा विश्वनाथन आनंद हा इतिहासातील पहिला क्रीडापटू ठरला. इतकंच नाही तर १९९१-९२ मध्ये देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेला ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ मिळवणारा देखील तो पहिलाच व्यक्ती ठरला. या पुरस्कारांशिवाय इतर ठिकाणी देखील आनंदला प्रचंड आदर दिला जातो.

७ नोव्हेंबर २०१० रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी तत्कालीन भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीसाठी आनंदला विशेष निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. आनंद हा त्या डिनरसाठी निमंत्रित असलेला एकमेव खेळाडू होता.

एक निष्णात चेस प्लेयर, अशी सर्वांना आनंदची ओळख आहे. मात्र, चेसखेरीज इतर अनेक गोष्टींची त्याला आवड आहे. त्याला खगोलशास्त्रातही प्रचंड रस आहे. अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगननं लिहिलेली खगोलशास्त्रावरील पुस्तकं त्याला आवडतात. याशिवाय त्याला इतिहास आणि आकडेवारीमध्येही रस आहे.

आनंदची आणखी एक खासियत म्हणजे त्याला पाच भाषा बोलता येतात. तामिळ, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिश या पाच भाषांवर त्याचं प्रभुत्व आहे. आनंदला लिखाणाची देखील आवड आहे. आनंदनं आपल्या चेस कारकीर्दीचा प्रवास सांगण्यासाठी ‘माय बेस्ट गेम्स ऑफ चेस’ हे पुस्तक लिहिलं आहे. १९९८ मध्ये त्याच्या या पुस्तकाला ब्रिटीश चेस फेडरेशनचा ‘बुक ऑफ द इयर’ हा पुरस्कारही मिळाला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भारताच्या ICC ट्रॉफींचा दुष्काळ हिटमॅन रोहित शर्मा संपवणार का..?

Next Post

म्हणून रतन टाटांनी सायरस मिस्त्रींची टाटा ग्रुपच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी केली होती..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

म्हणून रतन टाटांनी सायरस मिस्त्रींची टाटा ग्रुपच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी केली होती..!

पाकिस्तानच्या कॅप्टननेच गुंडप्पा विश्वनाथ यांना मॅच फिक्सिंगची ऑफर दिली होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.