The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रशिया आजही चेर्नोबिल दुर्घटनेचे दुष्परिणाम भोगत आहे

by नंदकुमार कारभारी
25 April 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आपत्ती मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, तिचे परिणाम भयावहच असतात.

विशेषतः मानवनिर्मित आपत्ती जी माणसाने स्वतःच्या कर्माने स्वतःवर ओढवलेली असते आणि उत्तरोत्तर जसं तंत्रज्ञान प्रगत होत चाललंय तसं कृत्रिम आपत्तीचे परिणामही भीषण आणि हानिकारक ठरत आहेत. भूतकाळात घडलेल्या कृत्रिम आपत्तीचे परिणाम हे मानवाच्या भावी पिढ्यांना भोगावे लागतील असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?

पण असं झालंय…

दिनांक २६ एप्रिल १९८६ च्या मध्यरात्री ‘चेर्नोबील अणुविद्युत केंद्राच्या’ (Chernobyl Nuclear Power Plant) अणुभट्टी क्रमांक ४ मध्ये असं काही घडलं की ज्याने मानवनिर्मित आपत्तीचा एक नवीन चेहरा समोर आणला जो की भयावह तर आहेच पण त्याचे दुष्परिणामही मानव जातीच्या हाताळण्याच्या क्षमतेपलीकडे आहेत.



या घटनेनं झालेली जीवित आणि वित्त हानी एवढी होती की तिला दुर्घटनेला ७ व्या श्रेणीत (जास्तीत जास्त नुकसान करणारी श्रेणी) ठेवलं गेलं.

दुर्घटनेला कारणीभूत ठरलं अणूभट्टीच (Nuclear Reactor) सदोष डिजाईन, निष्काळजीपणा आणि आपत्कालीन परिस्थिती सांभाळण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुभवी आणि कुशल कामगारांचा अभाव.

दुर्घटनेच्या दिवशी अणुभट्टीच्या विविध आपत्कालीन चाचण्या घेतल्या जात होत्या. उदा. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास अणुभट्टीतील युरेनियम इंधनाचं होणार ‘केंद्रीकीय विभाजन’ (Nuclear Fission) नियंत्रित करणारी प्रणाली कार्यरत ठेवण्या संदर्भात.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

या प्रकारच्या चाचण्या आधीही घेण्यात आल्या होत्या पण डिजाईनमध्ये असलेली ही खोट उघडकीस आली नव्हती. दुर्घटनेच्या दिवशी ‘या’ दोषाने उचल खाल्ली आणि युरेनियम इंधनाचं अनियंत्रितरित्या विभाजन होऊ लागलं. त्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित होऊ लागली. त्यामुळे भट्टीच तापमान धोक्याच्या पातळीपेक्षा वाढलं अणुभट्टीला थंड ठेवणारी प्रणाली (Cooling System) निकामी झाली आणि त्यांनतर झालेल्या स्फो*टांच्या मालिकांनी चेर्नोबिल हादरून गेलं.

Chernobyl

केंद्राच्या आत भट्टीच्या परिसरात काम करणारे लोक तत्काळ गतप्राण झाले. स्फो*टामुळे अणुभट्टीत वापरलेलं किरणोत्सर्गी (Radioactive) विषारी इंधन इतस्ततः विखुरलं. स्फो*टानंतर अणुभट्टीला लागलेली आग विजवण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या अग्निशामक दलालाही धोकादायक किरणोत्सर्गाची (Radiation) कल्पना देण्यात आली नव्हती आणि अशा दुर्घटनासाठी त्यांना प्रशिक्षिणही देण्यात आलं नव्हतं. या बेजबाबदारपणामुळे बहुतांश अग्निशामक कर्मचाऱ्यांना किरणोत्सर्गाची बाधा झाली आणि त्यांचा हकनाक बळी गेला.

अणुभट्टीला लागलेली आग जवळ जवळ ८ दिवस धुमसत होती आणि तिच्या राखेच्या रुपात किरणोत्सारी संयुगं हजारो किलोमीटर्सपर्यंत पसरली.

दुर्घटनेत ४२ लोकांचा मृत्यू झाल्याचा सरकारी आकडा आहे. परंतु हे नुकसान तर फक्त हिमनगाचं टोक होतं. कारण या अदृश्यरुपी किरणोत्सारी संकटाने येत्या काळात हजारो नागरिकांचे बळी घेतले. सरकारी आकडेवारीनुसार दुर्घटनेपासून आतापर्यंत ९००० ते १६००० लोकांचा कर्क रोग व इतर व्याधींमुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे.

एका अंदाजानुसार इसवी सन २०६५ (दुर्घटनेच्या जवळपास ७० वर्षांनी) पर्यंत अजून हजारो लोकांना या किरणोत्सर्गाची किंमत मोजावी लागेल असा अंदाज आहे.

चेर्नोबिल

दुघटनेनंतर त्वरित 30 किमी परिघातील परिसर पुर्णतः रिकामा करण्यात आला व परिसरातील ६५००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.

एका भुताच्या शहरासारखं ते शहर आजही सुमारे ३४ वर्षानंतर ओस पडलेले आहे. दुर्घटनेनंतर ५,००,००० मनुष्यबळ वापरून तब्बल २० वर्षे तेथील आ*ण्विक किरणोत्सारी कचरा उचलायचं काम सुरू होतं, ज्याच्यामध्ये अंदाजे १८ अब्ज डॉलर एवढा प्रचंड खर्च झाला.

या घटनेनंतर जगामध्ये अणूऊर्जेच्या वापरासंबंधी व तिच्या सुरक्षेसंबंधी दोन मत प्रवाह तयार झाले. अणूऊर्जेचा वापर योग्य की अयोग्य हा एक वादाचा भाग आहे परंतु अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. परंतु अशा दुर्घटना घडल्याच तर त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जाऊ शकू एवढी क्षमता मानव जातीत नाही आणि त्याची किंमत पिढ्यांपिढ्या मानवाला चुकवावी लागेल हे मात्र खरं….!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: chernobyl
ShareTweet
Previous Post

गंडभेरुंड – किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर कोरलेला एक गूढ पौराणिक पक्षी

Next Post

सीरिअल किलरवरचे सिनेमे आवडत असतील तर ही यादी खास तुमच्यासाठी

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

सीरिअल किलरवरचे सिनेमे आवडत असतील तर ही यादी खास तुमच्यासाठी

जगभरातील सरकारांना धडकी भरवणारा 'द ग्रेट हॅकर' जुलिअन असांज

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.