The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगाला हसवणारा चार्ली चॅप्लिन कोण होता ? : भाग ३

by द पोस्टमन टीम
9 June 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

लेखक : आदित्य कोरडे 

===

( चार्ली चॅप्लिनवर याआधी दोन लेख प्रसिद्ध झाले असून हा त्या लेखमालेचा तिसरा भाग आहे. आधीचे दोन लेख वाचाण्यासाठी येथे क्लिक करा भाग १ – भाग २ )



लवकरच जगभरातून लोकांनी त्याच्या ह्या लिटल ट्रॅम्पची नक्कल करणे सुरु केले. अगदी लॉरेल-हार्डी मधल्या लॉरेलला देखीलहा मोह आवरला नाही. वर दिलेले उजवीकडचे चित्र त्याचेच आहे.तर डावीकडे खराखुरा चार्ली आहे.

त्याचे सुरुवातीचे काही चित्रपट हे लघुपट असत- अर्ध्यातासाचे, “कि-स्टोन” कंपनी बरोबर केलेले पण लवकरच त्याला दुसऱ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करणे रुचेना,

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

 

little tramp postman

म्हणून त्याने कि स्टोन फिल्म कंपनी सोडून “एसने” (तीच ती पक्षाच्या पिसांचा टोप घातलेल्या रेड इंडिअनचे चित्र-लोगो असलेली) फिल्म कंपनीशी करार केला इथे त्याला त्याचे चित्रपट स्वत: दिग्दर्शितकरायला मिळणार होते.

त्याने स्वत:ची टीम बनवली त्याला नवी फ्रेश नायिका मिळाली एडना प्रोवायन्स.त्यांनी एकूण ३५ लघुपट केले. एडना स्वत: फार ग्रेट अभिनेत्री नव्हती पण तिची पडद्यावर चार्लीशी तार जुळली.

लवकरच त्यांची वाढती प्रसिद्धी आणि यश बघून त्याच्या कडे अनेक ऑफर्स चालून येऊ लागल्या. त्याने मग न्यूयॉर्कच्या म्युच्युअल फिल्म कोर्पोरेशनशी करार केला.

आठवड्याला १० हजार डॉलर पगार आणि एकरकमी दीड लाख रुपये मानधन. लक्षात घ्या हे साल होत १९१६. ज्या काळी सुखवस्तू माणूस आठवड्याला १२ डॉलर कमावून व्यवस्थित राहत असे.

 

MUTUAL FILM CORPORATION POSTMAN
Travalanche,com

म्युच्युअल फिल्म कोर्पोरेशनचे संचालक म्हटले सुद्धा कि युरोप मध्ये चालू असलेल्या पहिल्या महायुद्धानंतर सगळ्यात महाग चार्लीच आहे. हा करार घडवून आणण्यात त्याच्या भावाने-सिडनेने महत्वाची भूमिका बजावली.

खरेतर तो आधी भरपूर प्रसिद्धी पावला होता. त्याचे काम लोकना आवडतही असे, पण चार्लीची लोकप्रियता अफाटच होती आणि तो सिडनेशिवाय इतर कुणावर विश्वास ठेवत नसे.

त्यामुळे त्याचे इतर सर्व व्यवहार सिडनेच पाही आणि हे काम आता इतके वाढले कि स्वत:चा अभिनय बाजूला ठेवून तो पूर्ण वेळ चार्लीचे व्यवहार बघू लागला.

हे अगदी दिलीपकुमार आणि त्याचा भाऊ नसीर खान सारखेच आहे. खरेतर मोठा भाऊ नासीर खान दिलीपकुमार आधी चित्रपट क्षेत्रात आला आणि बर्यापैकी प्रसिद्धी ही पावला पण लवकरच दिलीपकुमारच्या यशापुढे त्याचे यश झाकोळून गेले. पण दोनही ठिकाणी भावाभावात वितुष्ट आले नाही.

 

dilip kumar postman
Twitter

म्युच्युअल फिल्म कोर्पोरेशनने त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन, बजेट, टीम, कथा, वेळापत्रक सगळे काही तो ठरवत असे.

चार्ली चित्रपट कसा बनवायचा आहे, काय प्रक्रिया असणार आहे, एवढेच काय कथा, पटकथा, दृश्य, सेट आजच्या दिवसाचे काम काही काही कुणाला सांगत नसे त्याची टीम ही फक्त त्याच्या सुचनाचे तंतोतंत पालन करण्यासठी असे.

एडनासारख्या अभिनय फारसा न जमणाऱ्या लोकांनी त्याच्या कडे इतका काळ काढला कारण ते स्वत:चे डोके वापरत नसत. चार्ली त्यांना कुठे बसायचे कसे बसायचे हे बारीक सारीक तपशीलही सांगत असे.

हा एक खांबी तंबू होता. आणि त्यात स्वतंत्र वृत्तीच्या माणसाना फारसा वाव नव्हता.इथे अभावित पाने दादा कोंडके ह्यांची आठवण होते.

निळू फुले ह्यांनी एका मुलाखतीत दादांच्या ह्या अशाच स्वभावाचे वर्णन केलेले आहे त्यामुळेच ते फार काळ दादांच्या बरोबर राहिले नाहीत.

चार्लीच्या मृत्युनंतर त्याच्या बायकोने त्याचा सगळा फिल्म रोलचा संग्रह त्याच्यावर माहितीपट बनवायला आलेल्या लोकाना दिला त्यातून त्याचे फिल्म बनवण्याचे अफलातून पण हुकुमशाही तंत्र उघड झाले.

 

shoulder arms postman
TV Tropes

तो स्वत: देखील पटकथा लिहित नसे. कॅमेरातून दृश्य बघूनच त्याला चित्रीकरण बरोबर त्याला हवे तसे झाले आहे कि नाही काळात असे आणि पुढे कथा कशी घेऊन जायची हे समजत असे.

त्यामुळे ओ नेहमी प्रेक्षकाना कसे दिसतेय आणि आपण काय दाखवू इच्छितो हे पाहत असे आणि पुढे काय करायचे ठरवत असे.

त्यामुळे कधी कधी एका साध्या साध्या दृश्याचे ५०-६० रिटेक होत असत. दिवसभराच्या शुटिंग नंतर तो स्वत:ला एका खोलीत कोंडून घेत असे आणि आपण दिवसभर शूट केलेल्या फिल्म्स वर काम करत असे.

त्या खोलीत फक्त प्रोजेक्टर दिवा टेबल आणि खुर्ची एवढेच असायचे. तेथेच तो पुढे काय करायचे हे ठरवत असे . दिवस भराच्या कामाचा शिणवटा, भूक, झोप कशाचीही तमा तो बाळगत नसे.

दिवसभर मेहनत केल्यावर संध्याकाळ आरामात, मजा करत खात पीत घालवणे त्याला आवडत नसे.

 

charlie chaplin 14 postman
The Atlantic

तो तितका सोशलही नव्हता, असे कष्ट करणारा चार्ली त्याकाळात आठवड्याला साधारण दीड लाख डॉलर इतकी कमाई करत होता. पण त्याचा वैयक्तिक खर्च ५०० डॉलर ही नव्हता.

त्या काळात पहिले महायुद्ध जोरावर होते पण चार्ली ह्या युद्धप्रयत्नांपासून दूरच होता. त्याबद्दल मायदेशातून इंग्लंडमधून त्याच्यावर टीकाही होत असे.

पण त्याने इंग्लंड मधील गरीब मुलाना युद्धामुळे सर्वत्र अन्नाचे दुर्भिक्ष्य झालेले असताना उत्तम खायला मिळावे म्हणून सार्वजनिक शाळातून पैसा पुरवला होता अर्थात ही गोष्ट त्याने अप्रसिद्धत ठेवली.

टीकेचा रोष वाढला तसा त्याने युद्ध प्रयत्नासाठी निधी उभाकाराण्यासाठी सरकारने काढलेल्या लिबर्टी बॉंडची जाहिरात करणारी शॉर्ट फिल्म केली तसेच शोल्डर आर्म्स ही विनोदी शॉर्ट फिल्म बनवली.

 

shoulder arms postman
TV Tropes

ज्यात लिटल ट्रॅम्प खंदकात लढाई करायला जातो आणि धमाल उडवून देतो.हा चित्रपट त्याने सर्व जगभरात फुकट दाखवला- म्हणजे त्याचे पैसे त्याने न घेता युद्ध प्रयत्नांना दान केले.

तेव्हा अमेरिकेत मोठ- मोठ्या स्टुडिओंचा  बोलबाला असे आणि अनेक नट -नट्या त्यांच्याकडे पगारावर काम करत.

प्रसिद्ध नटांना जास्त मोबदला देऊन पळवले जात असे ह्याचा फायदा त्या नट-नट्या ही घेत आणि सध्याच्या मालकाची अडवणूक करत म्हणून सर्व बड्या स्टुडिओनी आणि वितरकांनी एकत्र येऊन पगार, मानधन कामाच्याशर्ती ह्याबाबत आचारसंहिता लागू करायचे ठरवले.

अर्थात ह्यात नटांचा तोटा होणार होता. म्हणून मग डग्लस फेअर बँक्स, मेरी पिकफोर्ड, चार्ली, ग्रिफिथ अशा बड्या नटलोकांनी एकत्र येऊन आपली युनायटेड आर्टिस्ट नावाची कंपनी स्थापन केली.

 

united artists postman
Variety

ते स्वत:च निर्मिती दिग्दर्शन ते वितरण सगळे करणार होते. इतर कुणाचीही गरजच नाही. हा त्याकाळी एक क्रांतिकारक निर्णय होता आणि यशस्वीही.

ह्याचवेळी चार्ली मिल्ग्रेड हरीस ह्या षोडशवर्षीय नटीच्या प्रेमात पडला आणि ती गर्भवती झाली. दोघांना घाई घाई ने लग्न करावे लागले (लहान वयाच्या मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून नाहीतर तो आत गेला असता.)

७ जुलै १९१८ला त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव ठेवले नॉर्मन पण तो १० दिवसातच वारला.चारली त्यावेळी लहान मुलासारखा धाय मोकलून रडला अशी आठवण मिल्ग्रेड हरीसनेच नंतर सांगितली.

ह्यानंतरच त्याने ‘द किड’ हा अत्यंत गाजलेला चित्रपट करायला घेतला.ही शोर्ट फिल्म नव्हती एक पूर्ण लांबीचा चित्रपट होता आणि त्याचे पूर्ण लाम्बीचे असणे हे एक आव्हान होते.

विनोदी मूकपट अर्ध्यातासाचे असत, त्यात विनोदी घटनांची अव्याहत मालिका असे लोक पोट धरून हसत पण ही गोष्ट २ – २.५ तास सतत चालत नाही.ते प्रकार कंटाळवाणे होऊ लागतात.

 

तेथे मग कथा. करुणा, प्रेम, राग, संशय, समज-गैरसमज अशा इतर भावना, घटना ह्यांचे महत्व वाढू लागते. हे शिवाधनुष्यही चार्लीने सहज पेलले.

हा चित्रपट आपल्या पैकी अनेकांनी पहिला असेल आणि नसला पहिला तरी ब्रह्मचारी( शम्मी कपूरचा ) ड्रीम गर्ल. कुंवारा बाप (मेहमूद) हे चित्रपट तरी पहिले असतीलच.

हे गाजलेले चित्रपट ह्या द किड वरच बेतलेले होते. नव्हे त्यातले अनेक प्रसंगही द किड मधील प्रसंगांवरून सही सही उचलले होते.

रस्त्यावरच्या टाकून दिलेल्या अनाथ मुलाला भणंग ट्रंप वाढवतो दोघात बाप मुलाचे नाते तयार होते, पुढे अनाथाश्रामावले सत्य कळल्यावर त्या मुलाला जबरदस्तीने ट्रंप पासून काढून घेऊन जातात.

 

the kid 1 postman
Movie

हे दृश्य फक्त हृदय द्रावक नाही तर त्याला स्वत: चार्ली लहान असताना आईला वेडाचे झटके येतात म्हणून त्याच्यापासून तोडून मनोरुग्णालयात दाखल केलले गेले होते त्याची खरी पार्श्वभूमी आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Charlie ChaplinComedian
ShareTweet
Previous Post

जगाला हसवणारा चार्ली चॅप्लिन कोण होता ? : भाग २

Next Post

केप्लरने सांगितलं की सूर्य पृथ्वीभोवती नाही, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

केप्लरने सांगितलं की सूर्य पृथ्वीभोवती नाही, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते

आपल्या सुरक्षेसाठी 'सीट बेल्ट' पेटंट मुक्त करून 'वोल्वो'ने करोडोंवर पाणी सोडलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.