The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या तरुण मराठी प्रकाशकाने लॉकडाऊनमध्ये आश्रमशाळेला अनोखी मदत केलीये

by द पोस्टमन टीम
9 July 2020
in विश्लेषण, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


मार्च महिन्यापासून भारतात कोविड१९च्या रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली. त्याला आळा घालण्यासाठी म्हणून सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं. सुरुवातीला आठ दिवस नंतर १४ मग २१ असं वाढवत आता तीन महिने उलटून गेले पण लॉकडाऊन संपलं नाहीये.

साहजिकच, यामुळे सगळ्यांचीच आर्थिक कोंडी झालीये. चार-चार महिने घरात बसून घर चालवणं कठीणच. त्यातही सगळ्यात जास्ती त्रास होतो तो हातावर पोट असणाऱ्या लोकांना, स्वयंसेवी संस्थांचा. अनाथालय, वृद्धाश्रमे अशा संस्थांना येणाऱ्या मदतीचा ओघ हळूहळू आटत गेला, इतका की अनेकांच्या एकवेळच्या खाण्याचे वांधे सुरु झालेत.

परंतु अशा बिकट परिस्थितीतही आपल्या सभोवती असे काही लोक आहेत ज्यांच्यातील माणुसकीचा झरा कधीच आटत नाही. कुणालाही, कधीही, कुठलीही मदत लागली तरी ते सगळ्यात पुढे असतात.

याचाच प्रत्यक्ष अनुभव आला पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात वसलेल्या “श्रावणबाळ आश्रमशाळा” चालवणाऱ्या ह. भ. प. राजीव करडे यांना.



सहा वर्षांपूर्वी करडे यांनी इंदापूरला एका श्रावणबाळ आश्रमशाळेची स्थापना केली. या शाळेमध्ये राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले बेघर आणि अनाथ मुलं-मुली राहतात. त्यांचा संपूर्ण सांभाळ करण्याची जबाबदारी करडे यांनी उचलली आहे. परंतु, यासाठी त्यांनी कधी कुठल्याही प्रकारची सरकारी किंवा वैयक्तिक स्वरुपाची मदत स्वीकारली नाहीये.

ते स्वतः संगीताचे क्लासेस घेतात. तसेच, कापडी पिशव्या शिवून त्यांची विक्री करतात. यातून जे काही उत्पन्न मिळते त्यातून ते ही शाळा चालवतात.

लॉकडाऊनमुळे लोक घरातूनच बाहेर पडणं जवळजवळ बंद झालंय. परिणामी, त्यांचे संगीत क्लासेस बंद आहेत. तर, बाजार बंद असल्याने पिशव्या बनवण्यासाठी लागणारा कच्चा मालही मिळणं कठीण झालं आहे. अशात सगळ्यांची जबाबदारी अंगावर.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

शेवटी त्यांच्या मदतीला धावून गेले चपराक प्रकाशनाचे संपादक घनश्याम पाटील. 

करडेंनी घनश्याम पाटील यांना फोनवर आपली सगळी अडचण सांगितली. त्यांनी सांगितले की, “आम्ही कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत स्वीकारत नाही. पण तुम्ही आम्हाला तुमच्या प्रकाशनाची काही पुस्तकं प्रिंटींग कॉस्टच्या किमतीत द्याल का? त्यांची विक्री करून आम्ही आमचा खर्च भागवू.”

वैविध्यपूर्ण विषयांवर पुस्तक प्रकाशन करणाऱ्या “चपराक”ने आपली सामाजिक बांधिलकी कायमच जोपासली आहे. घनश्याम पाटील यांनी करडेंची अडचण लक्षात आल्याबरोबर त्यांच्या स्वाभिमानाचा मान ठेवत आर्थिक मदत न करता त्यांना पुस्तकांची देणगी देण्याचा निर्णय घेतला.

थोडीथोडकी नव्हे तर तब्बल सव्वा लाख रुपयांची पुस्तकं श्रावणबाळ आश्रमशाळेला पोहचवण्यात आली.

सगळीकडे लॉकडाऊन असतानाही योग्य व्यवस्था करुण गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जेष्ठ लेखक, इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांच्या हस्ते ही पुस्तकं इंदापूरला रवाना करण्यात आली.

घनश्याम पाटील यांचे नुकतंच प्रकाशित झालेल्या “दरवळ”सोबतच संजय सोनवणी, भाऊ तोरसेकर, सदानंद भणगे, रवींद्र कामठे, कृपेश महाजन इत्यादी अनेक दिग्गज लेखकांची दर्जेदार पुस्तकं आश्रमाकडे सोपवण्यात आली.

“तळागाळातील अशा स्वाभिमानी संस्थांना जमेल तेवढी मदत करणं ही आम्ही आमची नैतिक जबाबदारी समजतो. त्यामुळेच आम्ही ही पुस्तकरुपी मदत केली आहे. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ही पुस्तकं नक्की विकत घ्या जेणेकरून या आश्रमाला थोडा हातभार लागेल”, असे चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांनी सांगितले.

गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ही पुस्तकं इंदापूरला पोहोचली. दुसऱ्या दिवशी तिथल्या चिमुरड्यांनी या पुस्तकांची विधिवत पूजाही केली.

“चपराकने, घनश्याम पाटीलांनी दिलेल्या पुस्तकांच्या विक्रीतून आश्रमास मोठा हातभार मिळेल”, अशा शब्दात ह. भ. प. राजीव करडे (आश्रमशाळा प्रमुख), आपली कृतज्ञता व्यक्त करतात.

इतक्या बिकट परिस्थितीतही, जिथे लोकांची जमापुंजी संपुष्टात येते आहे, अशावेळी चपराकने या चिमुरड्यांना केलेली मदत खरच वाखाणण्याजोगी आहे.

ज्यांना शक्य आहे त्यांनी राजीव करडे यांच्याकडून ही पुस्तकं जरूर मागवावीत. त्यातून त्यांना थोडाफार हातभार लागला तर ती मोठी गोष्ट असेल. श्री. करडे यांचा संपर्क क्रमांक – 9595930992
घनश्याम पाटील यांचा
संपर्क क्रमांक- 7057292092


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मक्केत जन्मलेल्या मौलानांनी भारताच्या शिक्षणक्षेत्रात मुलभूत भर घातलीये

Next Post

मुंबई पुणे महामार्गाला इंग्रज-मराठा यु*द्धाचा इतिहास आहे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

मुंबई पुणे महामार्गाला इंग्रज-मराठा यु*द्धाचा इतिहास आहे

या अवलियाने छत्रपती शिवाजी महाराजांचं ११०० पानांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.