The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

CDS जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला २०१५ सालीही अपघात झाला होता..!

by Heramb
9 December 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


राष्ट्रीय सुरक्षा आणि त्या समोरील आव्हाने डोळ्यासमोर ठेऊन भारत सरकारने २०१९ साली ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ किंवा ‘संरक्षण दलप्रमुख’ हे पद स्थापन केले आणि त्या हे पद पहिल्यांदा भूषवलं ते इंडियन आर्मीच्या ‘वन ऑफ द मोस्ट डेकोरेटेड’ ऑफिसरने, माजी भूदल प्रमुखांनी अर्थात जनरल बिपीन रावत यांनी.

‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ पदाची मूळ शिफारस १९९९च्या कारगिल युद्धानंतर ‘कारगिल रिव्ह्यू कमिटी’ने केली होती. पण हे पद अस्तित्वात येण्यासाठी १५ ऑगस्ट २०१९ उजाडावे लागले. २०१९च्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून या पदाची अधिकृतपणे घोषणा केली आणि पहिल्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ बिपीन रावत यांनी १ जानेवारी २०२० पासून पदभार स्विकारला.  

भारतामध्ये अनेक ज्वलंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे आहेत. त्यातही काश्मीरचा मुद्दा हा जगातील सर्वांत ज्वलंत मुद्दा आहे कारण यामधील दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत. उत्तरेकडील संकटांची कल्पना जवळ जवळ सर्वांनाच आहे. पूर्वेकडे चीन तर पश्चिमेकडे पाकिस्तान. या दोन्ही देशांच्या सैन्याकडून प्रत्येक वेळी काही न काही कुरघोड्या सुरूच असतात.

याशिवाय नागालँडच्या भागात घडत असलेल्या घटनांवरून तुम्हाला ईशान्य भारतातील सुरक्षेचा मुद्दा समजलाच असेल. फक्त नागालँडच नाही तर अरुणाचल प्रदेश आणि आसाम याठिकाणीही राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा गंभीर आहे. ईशान्य भारतात एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी स्थिती आहे. कारण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बांग्लादेश आणि चीन भारताविरुद्ध कारवाया करताना दिसतात.



ईशान्य भारतातच युआरएमसीए, युएलएफए, एनएससीएन(आय. एम.), एनएससीएन(के), टीएनव्ही, युएलएफए अशा दहशतवादी आणि फुटीरतावादी संघटना कार्यरत आहेत. या संघटना सातत्याने भारतातील अंतर्गत शांतता भंग करण्याचा प्रयत्न चीनच्या मदतीने करत असतात.

इकडे मध्य भारतात, महाराष्ट्राचा गडचिरोली जिल्हा, मध्यप्रदेशातील बोकारो, धनबाद, दुमका, गिरिध, हजारीबाग आणि असे अनेक जिल्हे नक्षलवादग्रस्त आहेत. नक्षलवाद्यांनी पूर्व, मध्य आणि दक्षिण भारतात ‘रेड कॉरिडॉरच’ तयार केला आहे, यात समावेश असलेल्या जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाने मोठ्या प्रमाणात हात-पाय पसरले आहेत. याशिवाय शहरी नक्षलवादाचे आव्हानदेखील भारतासमोर आहेच.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

अशा अंतर्गत आणि बाह्य ताणतणावाच्या मुद्द्यांमुळे संघर्षाच्या प्रसंगांमध्ये ‘मल्टी-फ्रंट’वॉरला सामोरे जावे लागेल या शक्यतेमुळे आणि १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामाच्या घटनेमुळे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाच्या शिफारशीने जोर धरला. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदावरील व्यक्तीकडे भारताच्या तीनही दलांचे प्रमुखपद असेल. पण नेहमीप्रमाणे राष्ट्रपतींचं ‘सुप्रीम कमांडंट ऑफ आर्म्ड फोर्सेस’ हे पद अबाधित आहे. याआधी सांगितल्याप्रमाणे, मल्टी-फ्रंटवर लढण्याची आवश्यकता भासल्यास, किंबहुना अप्रत्यक्षपणे तशी गरज सध्या आहेच, त्यासाठी तीनही दलांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’वर असेल. 

याशिवाय शस्त्र-खरेदी प्रक्रियेची अंमलबजावणी करणे, लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे एकत्रित ऑपरेशन्स करणे, तिन्ही दलांमधील सुविधांचा सर्वोत्कृष्ट वापर सुनिश्चित करणे, गरज असेल तेव्हा थिएटर कमांड तयार करणे, ट्राय-सर्व्हिस एजन्सी, विविध सुरक्षा संस्था आणि आणि सायबर तसेच स्पेसशी संबंधित कमांडवर नियंत्रण ठेवणे, न्यूक्लियर कमांड अथॉरिटीचे लष्करी सल्लागारपद अशा मोठ्या जबाबदाऱ्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’कडे असतील. 

अशा पदासाठी पात्र असलेला माणूस शोधणे म्हणजे ताऱ्यावरची कसरत. पण भारताच्या लष्करातील ‘वन ऑफ द मोस्ट डेकोरेटेड’ ऑफिसरने आणि तत्कालीन लष्करप्रमुखांनी हे काम अतिशय सोपे केले. त्यांच्याकडे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ पदासाठी आवश्यक त्या सर्व क्षमता आहेत. याशिवाय २७वे लष्करप्रमुख म्हणून काम केलेले जनरल बिपीन रावत हे त्यावेळी लष्करातील सर्वोच्च पदावरील अधिकारी होते.

जनरल बिपिन रावत यांनी २७ सप्टेंबर २०१६ रोजी लष्करप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली आणि तीन वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करप्रमुख म्हणून सेवा केली. ३० डिसेंबर २०१९ रोजी त्यांच्या निवृत्तीच्या आधी एक दिवस त्यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे पद बहाल करण्यात आले. त्यांच्या धडाडीच्या कारकिर्दीबद्दल थोडक्यात जाणून घेऊ..

जनरल रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी उत्तराखंडमधील पौडी येथे झाला. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण सेंट एडवर्ड्स स्कूल, शिमला येथे पूर्ण केले त्यानंतर त्यांनी पुण्यातील एनडीए येथे लष्करी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी लष्कराचे पदव्युत्तर शिक्षण डेहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमी येथून पूर्ण केले. इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये त्यांना ‘स्वाॅर्ड ऑफ ऑनर’ने सन्मानित करण्यात आले. ‘स्वाॅर्ड ऑफ ऑनर’ हा इंडियन मिलिटरी अकॅडमीमधील सर्वोच्च सन्मान आहे. हा सन्मान अकॅडमीमध्ये विद्यार्थीदशेत असताना उत्तम कामगिरी केल्याबद्दल दिला जातो.

रावत यांना १६ डिसेंबर १९७८ रोजी ‘११ गोरखा रायफल्स’च्या पाचव्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले. याच सैन्यतुकडीत त्यांचे वडिलही होते. रावत यांना हाय-अल्टीट्युड वॉरफेअरचा दांडगा अनुभव आहे आणि त्यांनी तब्बल दहा वर्षे दहशतवादविरोधी कारवाया केल्या. आपल्या प्रगतिशील लष्करी कारकिर्दीत त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून भारतीय सैन्यात सर्वोच्च पद मिळवले. 

जनरल बिपिन रावत यांना मेरठ येथील ‘चौधरी चरण सिंग युनिव्हर्सिटी’ने ‘मिलिटरी मीडिया स्ट्रॅटेजिक स्टडीज’वरील संशोधनासाठी ‘डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ देऊन सन्मानित केले. जनरल रावत नेपाळ, भूतान, म्यानमार, रशिया आणि युनायटेड स्टेट्स यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय भेटींमध्ये सहभागी असतात. ते नेपाळी सैन्यात ऑनररी जनरलसुद्धा आहेत.

२०१५ साली नागालँडमधून एका हेलिकॉप्टरमधून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच त्यांचे सिंगल-इंजिन हेलिकॉप्टर क्रॅश झाले. पण या अपघातातून ते चमत्कारिकरीत्या वाचले. काल सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुनुर याठिकाणी क्रॅश झाले आणि त्यात जनरल रावत यांच्यासह त्यांच्या पत्नीचाही या अपघातात मृत्यू झाला.

जनरल रावत ज्या एमआयव्ही-५ या आधुनिक हेलिकॉप्टरमधून प्रवास करीत होते, ते हेलिकॉप्टर पंतप्रधानांसह अनेक सरकारी मान्यवरांच्या प्रवासासाठी वापरण्यात येतं. आधुनिक एव्हीओनिक्सने सुसज्ज हे हेलिकॉप्टर प्रतिकूल हवामानासह दिवस-रात्र कोणत्याही भौगोलिक आणि हवामानात काम करण्यास सक्षम आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये फक्त प्रोफेशनल आणि वेल-ट्रेन्ड पायलट्सच असतात. असे असले तरी गेले काही दिवस दक्षिण भारताचं हवामान फारच खराब असल्याने हवामानामुळे हा अपघात झाला असेल असे काही तज्ज्ञांचे मत आहे. आकाशातील उंचीच्या बाबतीत या हेलिकॉप्टरपेक्षा सर्वोत्तम हेलिकॉप्टर नसेल. त्यामुळे उंची कमी असल्याने अपघात होण्याची शक्यता नाही.

कदाचित लहानशा तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा असेही एक मत आहे. हेलिकॉप्टर्समध्ये सुरुवातीला  लहानसा वाटणारा तांत्रिक बिघाड वास्तविक उड्डाण सुरु झाल्यानंतर मोठा बिघाड होऊ शकतो, त्यामुळे तांत्रिक बिघाड आणि खराब हवामान या दोन कारणांमुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आता अंतिम चौकशीनंतरच तथ्य काय ते समोर येईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

स्वित्झर्लंडने आत्महत्या कायदेशीर केली आहे आणि त्यासाठी मशीनही आणलंय..!

Next Post

भारताच्या ICC ट्रॉफींचा दुष्काळ हिटमॅन रोहित शर्मा संपवणार का..?

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

भारताच्या ICC ट्रॉफींचा दुष्काळ हिटमॅन रोहित शर्मा संपवणार का..?

भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात बुद्धिबळाची क्रेज निर्माण झाली ती विश्वनाथन आनंद मुळेच

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.