The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कॅलिफोर्नियातल्या हिंदूंनी एकत्र येऊन त्यांच्या धर्माविषयीच्या आक्षेपार्ह गोष्टी पाठ्यपुस्तकातून काढायला लावल्या

by द पोस्टमन टीम
31 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


कॅलिफोर्निया टेक्स्टबुक कॉंट्रोव्हर्सी हा २००५-२००६ मध्ये अमेरिकेत गाजलेला वाद. वादाचा मुद्दा अर्थातच खमंग चमचमीत असा, म्हणजे धर्मावरून निर्माण झालेला वाद.

नक्की काय आहे हे प्रकरण?

तर, अमेरिकेत इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदू धर्माच्या केलेल्या चित्रणावरून अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये वादाची ठिणगी पडली. सहाव्या इयत्तेच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये केलेले भारतीय इतिहास आणि हिंदू धर्माचे चित्रण हिंदू धर्माविरुद्ध आहे असा युक्तिवाद टेक्सास येथील वेदिक फाउंडेशन आणि हिंदू एज्युकेशन फाउंडेशन या संस्थांनी केला. पाठ्यपुस्तकातील जातिव्यवस्थेचे चित्रण, इंडो-आर्यन स्थलांतर सिद्धांत आणि भारतीय समाजातील स्त्रियांची स्थिती या मुद्द्यांना त्यांचा आक्षेप होता. याशिवाय इतरही काही बारीकसारीक मुद्दे होते.

त्यांची बाजू ऐकल्यावर कॅलिफोर्निया येथील डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन (CDE) ने सुरुवातीला या गटांनी सुचवलेल्या सुधारणांचा अभ्यास करण्यासाठी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी नॉर्थरिजच्या शिवा बाजपेयी या प्राध्यापकांची नेमणूक केली. आपल्या परीने वाद सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या बाजपेयींनी वेदिक फाऊंडेशनने सुचवलेल्या जवळपास सर्व बदलांना मान्यता दिली. नंतर ते या संस्थेशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले.

यात माशी शिंकली ती एका घटनेने.



हार्वर्ड विद्यापीठात संस्कृतचे प्राध्यापक असलेल्या मायकेल विट्झेल यांनी हिंदू गटांनी सुचवलेल्या सुधारणांना विरोध केला. आपले म्हणणे रेटण्यासाठी त्यांनी भारताचा अभ्यास करणाऱ्या काही अभ्यासकांना एकत्र केले. त्यांनी या बदलांचा निषेध केला.

त्यांनी सुचवले, की या प्रकरणावर सार्वजनिकपणे चर्चा केली जावी, आणि शिक्षण विभागाने योग्य व्यक्तींकडून सल्ला घ्यावा. एवढे करून न थांबता त्यांनी “धार्मिक-राजकीय स्वरूपाच्या” बदलांचा निषेध करणारे सह्यांचे एक पत्रच शिक्षण विभागाला पाठवले.

जगभरातील विद्यापीठांमधील ४७ व्यावसायिक दक्षिण आशियाई विद्वान आणि काही प्रमुख अमेरिकन दक्षिण आशियाई अभ्यास विभाग तसेच सुमारे १५० भारतीय अमेरिकन प्राध्यापकांनी दोन्ही फाउंडेशनच्या प्रस्तावांना विरोध करणाऱ्या मूळ पत्रावर स्वाक्षरी केली. कॅलिफोर्निया विधानमंडळाच्या सतरा सदस्यांनी विद्वानांना पाठिंबा देणारे पत्र लिहिले. शिवाय या प्राध्यापक महाशयांनी आपल्या आणखी दोन सहकाऱ्यांसह राज्य शिक्षण मंडळाच्या बाजूने प्रस्तावित बदलांचा आढावा घेतला आणि मंजूर केलेले काही बदल नाकारण्याची सूचना केली. यामुळे संतप्त होऊन २००६ च्या सुरुवातीस हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने राज्य शिक्षण मंडळावर दावा दाखल केला. पण हा खटला २००९ मध्ये निकाली काढण्यात आला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

कॅलिफोर्नियामध्ये पाठ्यपुस्तकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. सामाजिक आशयाच्या सामग्रीचे मूल्यांकन करण्यासाठी या तत्त्वांचा आधार घेतला जातो. त्यानुसार, युनायटेड स्टेट्स आणि कॅलिफोर्नियामध्ये तसेच इतर समाजांमध्ये असलेल्या धार्मिक श्रद्धांचे कोणताही पूर्वग्रह न ठेवता नि:पक्ष चित्रण केले जाते. ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम अशा सर्वच धर्मांच्या बाबतीत हीच प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

जेव्हा या पाठ्यपुस्तकाचा मसुदा प्रकाशित झाला, तेव्हा २००५ मध्ये ख्रिश्चन, ज्यू, इस्लामिक आणि दोन हिंदू गटांनी त्यावर त्यांच्या सुधारणा सादर केल्या. यावर बरीच गहन, अभ्यासपूर्ण चर्चा झाली. त्यानंतर ज्यू आणि ख्रिश्चन गटांनी प्रस्तावित केलेले ५०० हून अधिक बदल, तसेच मुस्लिमांनी सुचवलेले सुमारे १०० बदल शिक्षण विभागाने स्वीकारले. ०६ जानेवारी २००६ पर्यंत याच विषयावर मंथन सुरू होते.

त्याखेरीज दोन हिंदू संस्थांनी प्रस्तावित केलेली सुमारे १७० संपादनेही सुरुवातीला स्वीकारली गेली. यावेळी डॉ. शिवा बाजपेयी होते. परंतु त्यानंतरच्या हिंदू गटांनी प्रस्तावित केलेल्या ५८ संपादनांना मायकेल विट्झेल आणि यांच्यासारख्यांनी आव्हान दिले आणि हा वाद निर्माण झाला.

स्वीकारलेल्या सुधारणांमध्ये हनुमानाचा ‘वानरांचा राजा’ म्हणून असलेला उल्लेख काढणे, एका ठिकाणी असलेल्या मशिदीच्या फोटोऐवजी मंदिराचा फोटो टाकणे, क्लास या शब्दाऐवजी वर्ण असा शब्द वापरणे, इंडो आर्यन लोकांविषयी अधिक माहिती देणे, तसेच ब्राह्मण या शब्दाचे स्पेलिंग बदलणे अशा काही बदलांचा समावेश होता. तर पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत अधिक हक्क असणे, ऋग्वेद आणि चार वर्ण, जातीव्यवस्था, आर्यांनी उत्तर हिंदुस्थान जिंकून घेणे अशा काही उदाहरणांना घेतलेला आक्षेप हे बदल नाकारले गेले.

नंतर या वादात इतरही काही संघटना सहभागी झाल्या. त्यावेळी दलित फ्रीडम नेटवर्कचे अध्यक्ष असलेले डॉ. जोसेफ डिसोझा, जे अखिल भारतीय ख्रिश्चन परिषदेचेही अध्यक्ष होते, यांनी दलित फ्रीडम नेटवर्कच्या वतीने शिक्षण मंडळाला पत्र लिहिले. इतरही काही संस्थांकडून समर्थनाची पत्रे आली. यात मुख्यतः दलित मानवी हक्कांसाठी राष्ट्रीय मोहीम, दलित शक्ती केंद्र, आणि अमेरिकेतील दलित एकता मंच यांचा समावेश होता.

याचे परिणाम नंतर काही वर्षे दिसून येत राहिले. २०१४ मध्ये, कॅलिफोर्निया राज्याच्या सिनेटचे बहुसंख्याक नेते एलेन कॉर्बेट यांनी राज्य विधानसभेत एक विधेयक आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गटाचे नेतृत्व केले. (SB 1057) हे ते बिल. या विधेयकाच्या मसुद्यामध्ये हिंदू धर्म आणि इतर धर्मांचे अचूक चित्रण करण्यासाठी इतिहास आणि सामाजिक शास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये संपूर्ण फेरबदल करण्याची मागणी केली गेली. हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मंजूर झाले.

तथापि, गव्हर्नर जेरी ब्राउन यांनी या प्रक्रियेत नकाराधिकाराचा वापर करून विधेयक रोखले. त्यामुळे त्या वेळी हाती घेतलेल्या अभ्यासक्रम आवृत्ती प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन ती प्रक्रिया मंदावेल असे कारण त्यांनी यासाठी दिले. पुढे २०१६-१७ मध्येही दक्षिण आशियाशी संबंधित विषय कॅलिफोर्नियाच्या माध्यमिक अभ्यासक्रमात कसे मांडावेत यावरही बरीच वादचर्चा झाली.

एका संस्कृतीत अथवा धर्मात दुसऱ्या संस्कृतीचे चुकीचे किंवा अर्धवट माहितीवर आधारित चित्रण करणे यात काही नवीन नाही. आपण एक जागरूक नागरिक म्हणून या बाबतीत काय पवित्रा घेतो हे महत्त्वाचे आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘करमरकर अल्गोरिदम’ला आजही पर्याय नाही..!

Next Post

शीतयु*द्धात अमेरिकेने रशियाला मात दिली त्याचं बरंच श्रेय ना*झी शास्त्रज्ञांना जातं

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

शीतयु*द्धात अमेरिकेने रशियाला मात दिली त्याचं बरंच श्रेय ना*झी शास्त्रज्ञांना जातं

पायलटने फ्लाईट ऑटोपायलटवर टाकून आपल्या लहान मुलाच्या हातात दिली, आणि ७५ प्रवाशांचा बळी गेला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.