The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या बौद्ध भिक्खूने म्यामनमारमध्ये मुस्लिमांचं जगणं मुश्किल करून टाकलंय

by द पोस्टमन टीम
1 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


१९४९ साली एक पतंगा नावाचा एक चित्रपट आला होता. त्यातील ‘मेरे पिया गये रंगून’, हे गाणं आजही अनेकजण अगदी सहजतेनं गुणगुणताना दिसतात. कदाचित त्या गाण्यामुळेच भारतातील कित्येक पिढ्यांना रंगून आणि म्यानमारची ओळख झाली आहे. म्यानमार, आपल्या पूर्व सीमेवर असणारा छोटासा देश. या देशाला निसर्गानं भरभरून दिलं आहे. मात्र, मानवी उठाठेवींमुळे गेल्या कित्येक दशकांपासून देशांत अस्थिरता आहे.

शांतीचा प्रसार करणारा बौद्ध हा राष्ट्रीय धर्म असूनही या देशात शांतता नांदत नाही, हा विरोधाभासच नाही का?, पण त्यालाही कारण आहे.. 

२०२१ च्या फेब्रुवारीमध्ये लष्करानं म्यानमार सरकारचा ताबा घेतल्याच्या काही दिवस अगोदर, ‘तातमाडा’ म्हणून ओळखल्या सशस्त्र सैन्याच्या समर्थनार्थ बौद्ध भिक्षूंनी निदर्शने केली. निवडणूकीत घोटाळे झाले आहेत, या दाव्याचं समर्थन करणारे बॅनर त्यांच्या हातात होते. सैन्यदलच देशाचं रक्षक आहे, अशा घोषणांसह या भिक्षूंनी रंगूनचे रस्ते दणाणून सोडले होते. अशा प्रकारची दृश्ये म्यानमारमध्ये विशेष वाटत नाहीत, कारण बौद्ध धर्म देशाच्या संस्कृतीशी अतिशय गंभीरपणे जोडलेला आहे.

लष्कराला पाठिंबा दर्शविणार्‍या बौद्ध राष्ट्रवादींना ही सत्ताबांधणी मुस्लिमांवर कुरघोडी करण्यासाठी कदाचित एक संधी वाटेल. परंतु, धार्मिक स्वातंत्र्यावर निर्बंध असल्यामुळे म्यानमारमधील बौद्ध धर्मासाठी लष्करी उठाव ही नक्कीच वाईट बातमी आहे.

बौद्ध भिक्षूंनी अशा प्रकारे गोंधळ घालण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. ब्रिटीश राजवटीचा शेवट झाल्यापासून म्यानमारच्या राजकीय पटलावर बौद्ध (संघ) समुदायाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आंग सान स्यू की यांची स्थानबद्धता संपुष्टात येऊन २०११ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही सरकारची स्थापना झाली. या सत्ताबदलामुळे म्यानमारमधील कट्टर देशभक्त संघटना आणि ९६९ सारख्या राष्ट्रवादी बौद्ध चळवळींना प्रेरणा मिळाली.



मात्र, एक व्यक्ती त्या अगोदरपासूनच म्यानमारमध्ये लष्करी राजवट आणि मुस्लिमविरोधी हिं*साचाराला खतपाणी देत होती. ‘विराथु’ असं या व्यक्तीचं नाव आहे. ‘अशिन विराथु’ या नावानं सध्या तो जागतिक राजकारणात ओळखला जातो. अशिनचा अर्थ ‘भीतीदायक’ असा होतो. कोण आहे हा ‘विराथु’ आणि म्यानमारच्या राजकारणात त्याची भूमिका काय हे पाहणं गरजेचं आहे.

विराथुचा जन्म १० जुलै १९६८ रोजी मंडालेजवळील मियान्सिंग गावात झाला होता. भिक्षु होण्यासाठी त्याने वयाच्या १४व्या वर्षीच शाळा सोडली. २००१मध्ये तो ‘९६९ चळवळीत’ सामील झाला. दोन वर्षांनंतर, २००३ मध्ये, त्याला प्रक्षोभक प्रवचनांसाठी २५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१२मध्ये इतर इतर अनेक राजकीय कैद्यांसह त्याची सुटका करण्यात आली. २०११ च्या सत्तापालटानंतर विराथु, यूट्यूब आणि सोशल मीडियावर सक्रिय आहे. फेसबुकने त्याच्या पेजवर बंदी घातली आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

सप्टेंबर २०१२ मध्ये बर्मिज रोहिंग्या मुस्लिमांना तिसर्‍या देशात पाठवण्याचा निर्णय अध्यक्ष थिन सीन यांनी घेतला होता. त्याला समर्थन म्हणून विराथुने मंडाले येथे भिक्षुंच्या मोर्चाचे नेतृत्व केले. त्यानंतर एका महिन्यानंतर राखीन प्रातांत अधिक हिं*साचार सुरू झाला. मात्र, या हिं*साचाराशी आपला संबंध नसल्याचा दावा विराथुनं केला. राखीनमधील हिं*साचार हा म्यानमार येथील एक मध्यवर्ती शहर मैक्तिला येथे झालेल्या हिं*साचारासाठी ठिणगी होती. तिथे सोन्याच्या दुकानात झालेल्या वादावरून लूटमार व जाळपोळ झाली होती. यात एक बौद्ध भिक्षु आणि एक मुस्लिम व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या हिं*साचारात मॉन्टेसरीज, दुकानं आणि घरांची जाळपोळ झाली व १४ पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला.

१ जुलै २०१३ रोजी जगप्रसिद्ध ‘टाइम्स मॅगझिन’ने विराखुवर कव्हर स्टोरी केली होती. त्यात त्याचा उल्लेख ‘द फेस ऑफ बुद्धिस्ट टेरर’, असा केला होता. त्यावर विराथुने आपली प्रतिक्रिया दिली होती-

‘तुम्ही कितीही प्रेमळ आणि दयाळू असा मात्र, एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या जवळ नक्कीच झोपू शकत नाहीत. जर बौद्ध लोक कमजोर पडले तर सर्व देश मुस्लिमांच्या अधिपत्याखाली येईल’.

टाइम्समध्ये स्टोरी आल्यानंतर स्थानिक विरोधकांनी देखील विराथुचा उल्लेख ‘बर्मिज बिन लादेन’, असा केला होता. ‘विरोधक माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी फक्त द*हश*तवादाला विरोध करत आहे,’ असेही तो म्हणाला. अध्यक्ष थिन सीनसुद्धा विराथुच्या समर्थनार्थ पुढे आले होते. विराथुवर टीका करून टाइम्स मासिक म्यानमारची आणि बौद्ध धर्माची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. विराथु शांतता प्रियव्यक्ती असून ‘बुद्धांचा पुत्र’ आहे, असे सीन म्हणाले होते.

२१ जुलै २०१३ ला एका बॉ*म्ब स्फो*टाचा तो प्रथमदर्शी टार्गेट होता, असे म्हटले जाते. त्या बॉ*म्ब स्फो*टात पाच लोक जखमी झाले होते. आपला आवाज बंद करण्यासाठी मुस्लिम कट्टरतावाद्यांनी हा स्फो*ट घडवून आणला होता, असा दावा विराथुने केला होता. त्यानंतर मुस्लिम आणि बौद्ध यांच्यातील आंतरधर्मीय विवाहावर बंदी घालण्यासाठी विराथुने प्रयत्न केले आणि मुस्लिमांची मालकी असलेल्या सर्व व्यवसायांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन बौद्ध धर्मियांना केले होते.

असे असले तरी बौद्ध धर्मातील काही लोक विराथुचे समर्थन करत नाहीत. मंडालेच्या म्यावाड्डी सयादो मठातील अरिया वुथ्था बेवुंथा यांनी विराथुचा निषेध केला आहे. अनेक महिलांनी देखील विराथुला विरोध केला आहे. बर्मा महिला लीगच्या सरचिटणीस टिन टिन नायो यांनी त्यावर टीका केली आहे.

विराथुनं आपल्या वर्तनातून देशाची आणि घातलेल्या वस्त्रांची प्रतिमा मलिन केली आहे. बौद्ध महिलांना आंतरधर्मिय विवाह करण्यास मनाई करण्याचा फतवा त्यानं काढला. हा महिलांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, असे नायो म्हणाल्या आहेत.

सप्टेंबर २०१३ मध्ये मुस्लिम लोकसंख्या मर्यादित करण्यासाठी नागरी हक्क कायदे तयार केल्यामुळे राज्य संघ महा नायक समितीने ‘९६९ चळवळी’वर बंदी घातली. जानेवारी २०१५मध्ये विराथुनं जाहिरपणे संयुक्त राष्ट्र संघाच्या राजदूत यांग ली यांच्याविषयी अश्लिल अपशब्द वापरले होते. त्यानंतर संघ महानायक समितीने विराथुवर बंदी घातली होती. त्यामुळे त्याला कोणतेही धार्मिक विधी करता येणार नव्हते.

मात्र, बंदी संपल्यानंतर त्याने आपल्या धार्मिक कारवाया सुरू ठेवल्या. त्याने आंग सान स्यू की यांची सत्ता उलथून टाकण्याचे देखील संकेत दिले होते. लोक जसे बुद्धाची उपासना करतात तशी त्यांनी लष्कराची केली पाहिजे, असे त्याचे म्हणणे आहे. मे २०१९ मध्ये मेयिक याठिकाणी त्याने स्यू की यांना ‘वेश्या’ म्हटले होते. त्यानंतर विराथुविरोधात अरेस्ट वॉरन्ट जारी करण्यात आले होते. २०२०मध्ये म्यानमारच्या सार्वत्रिक निवडणुंकांच्या अगोदर त्याने रंगुन (यंगुन) आत्मसमर्पण केले.

मध्यंतरी त्याने भारताबद्दल देखील हे वक्तव्य केले आहे: “भारत हे जगाचे सामर्थ्य आणि वैचारिक केंद्र आहे. इस्लामचे मुख्य लक्ष्य भारत असून भारतावर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी ते अनेक वर्षांपासून भारतावर प्रत्येक मार्गाने आक्र*मण करत आहेत, भारतीयांना ही समस्या मूळापासून उखडून काढावी लागेल. भारत हरला तर समजा जग हरले..”


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हा कार्यकर्ता लायब्ररीतून नुसती पुस्तकं चोरून करोडपती झाला होता..!

Next Post

दुसऱ्या महायु*द्धात डुप्लिकेट लाकडी रणगाड्यांनी हि*टल*रची झोप उडवली होती

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

दुसऱ्या महायु*द्धात डुप्लिकेट लाकडी रणगाड्यांनी हि*टल*रची झोप उडवली होती

सर रतन टाटांमुळे पाटलीपुत्रचा वैभवशाली इतिहास जगासमोर येऊ शकला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.