The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाछिमान गुरूंग – २०० सैनिकांना एकट्याने अंगावर घेतलेला गोरखा लेजेंड

by द पोस्टमन टीम
7 December 2024
in इतिहास, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


गुरखा रेजिमेंट हे भारतीय सैन्य दलाचा अभिमान आहे. आजवरच्या प्रत्येक यु*ध्दात या रेजिमेंटनं आपल्या शौर्याच्या अनेक कथा रचल्या आहेत. भिती हा शब्द या रेजिमेंटच्या शब्दकोशातच नाही.

या रेजिमेंटचा एक लढवैया सैनिक लाछिमान गुरूंग आणि ही त्याची शौर्यकथा-

माजी फ़िल्ड मार्शल माणकेश शॉ यांनी गोरखा रेजिमेंटविषयी बोलताना एके ठिकाणी म्हटलं आहे,

जर कोणी म्हणत असेल की तो मरणाला अजिबात घाबरत नाही. तर ती व्यक्ती एकतर धादांत खोटं बोलत असते किंवा ती गुरखा असते.

१८१४ साली ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीनं नेपाळमध्ये घुसखोरी करत कब्जा मिळविण्याचा प्रयत्न चालू केला. आकाराने इतक्या लहान असलेल्या नेपाळमध्ये हे अगदी सहज होईल असं त्यांना वाटत होतं मात्र प्रत्यक्षात त्यांचा हा अंदाज साफ़ चुकला. गुरख्यांनी ब्रिटिशांना अगदी नाकी नऊ आणले. सैन्याचं नुकसान तर झालंच शिवाय आर्थिक नुकसानही खूप झालं. १८१६ साली यु*ध्द संपेपर्यंत नेपाळींना कमी लेखून खूप मोठी चूक केल्याचं शहाणपण ब्रिटिश शिकले.



या यु*ध्दाचा दुसरा परिणाम असा झाला की हे कडवे लढवैय्या जगाच्या नजरेत आले आणि आपल्या सैन्यात गुरखांना प्राधान्य देऊ लागले.

सुरवातीला नेपाळच्या गुरखा प्रांतातून भरती होणारे हे सैनिक आता संपूर्ण देशातून होतात. ब्रिटिश सैन्याचा उल्लेखनीय भाग असलेल्या गुरखा रेजिमेंटनं इराकमध्येही यु*ध्द लढलं आहे.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

याच गुरखा रेजिमेंटशी ज्यांचं नाव अभिमानास्पद कामगिरीनं जोडलं गेलं आहे ते लाछिमान गुरुंग. नेपाळमधील चितवन जिल्ह्यातील दखानी गावात ३० डिसेंबर १९१७ रोजी त्यांचा जन्म झाला. इतर अनेक गुरख्यांप्रमाणेच त्यांच्याही घरी दारिद्र्य होतं. मात्र ही परिस्थिती इतकी भयानक होती की कुपोषणामुळे त्यांची शारिरीक वाढही नीट झालेली नव्हती.

त्यांची उंची साडे चार फ़ूट इतकीच वाढू शकली. तरीही ते अत्यंत काटक होते. गुरुंग यांनी ब्रिटिश आर्मीत भरती होण्याचे सातत्यानं प्रयत्न केले. मुळातच चणीनं छोट्या असणार्‍या नेपाळींच्या तुलनेतही ते खुजे होते या कारणानं त्यांना भरतीसाठी नाकारलं जात होतं.

सतत नाकारलं जात असूनही ते निराश झाले नाहीत उलट आता भरती व्हायचंच अशा जिद्दीला ते पेटले आणि अखेरीस ८ गुरखा रायफ़ल्स रेजिमेंटच्या चौथ्या बटालियनमधे रायफ़लमॅन म्हणून भरती झाले.

१९४५ च्या एप्रिल महिन्यात त्यांची बटालियन मोहिमेवर निघाली. बर्माच्या (आताचं म्यानमार) इरावदी (इरावती) नदीला पार करून जपानी सैन्यावर हल्लाबोल करण्याची त्यांची मोहिम होती. जपानी सैन्याला कल्पनाही नव्हती की त्यांच्यापुढे काय वाढून ठेवलेलं आहे. ९ मे रोजी जपानी सैन्यानं मघार घेण्यास सुरवात केली. या माघार घेणार्‍या जपानी सैन्याची वायव्य बर्मामधील तंगडॉ गावात लाछिमान यांची दबा धरून बसलेली बटालियन वाटच बघत होती.

१२ मे ची रात्र. ८ गुरखा रायफ़लच्या ४ थ्या बटालियनमधील बहुतेक सैनिक गाढ झोपेत होते. लाछिमान ड्युटीवर असल्यानं ते सख्त पहारा ठेवून होते. आपल्या छोट्याशा तुकडीसह ते गावाच्या काही अंतरावर असणार्‍या बंकरमध्ये होते, आपल्या इतर गुरखा पोझिशनपासून दूर होते आणि जपानी सैन्यानं ह*ल्ला केला. साधारण दोनशे जपानी सैनिकांनी ह*ल्ला केला होता. त्यांना तंगडॉमधे घुसायचं होतं मात्र हे करताना त्यांना आधी लाछिमानच्या गटाला पार करुन जावं लागणार होतं.

जपानी सैनिकांनी लाछिमान लपून बसलेल्या ठिकाणाकडे एक हॅण्डग्रेनेड भिरकावला. क्षणाचाही विलंब न करता लाछिमाननं तोच हॅण्डग्रेनेड पुन्हा जपानी सैनिकांकडे भिरकावला आणि सेकंदात त्याचा स्फो*टही झाला. दुसरा बॉ*म्ब त्याच्यापासून जवळच पडला तर तिसरा अगदी समोरच पडला.

पहिल्यासारखाच हाही उचलून पलिकडे टाकण्याच्या इराद्यानं लाछिमाननं उचलला मात्र यावेळेस नशिबानं साथ दिली नाही आणि तो टाकण्यासाधीच फ़ुटला.

या बॉ*म्बनं त्यांना गंभीररित्या जखमी केलं. डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली. त्याही परिस्थितीत त्यांनी,”जय महाकाली! आयो महाकाली” या गुरखांच्या बॅटल क्रायची जोशात आरोळी ठोकली. मात्र त्यांना साथ द्यायला आजूबाजूला त्यांच्या पलटणीतलं कोणी शिल्लक उरलंच नव्हतं. काहीजण जागीच मृत्यूमुखी पडले होते तर काही जायबंद झालेले होते.

लाछिमाननी एकदा आजूबाजूला पाहिलं. आता इथून पुढची लढाई आपल्याला एकट्यालाच करावी लागणार आहे हे त्यांनी जाणलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचं ठरवत डाव्या हातात रायफ़ल धरली. उजवा हात निकामी झालेला, रक्त वहात होतं, चेहर्‍यालाही जबरी मार बसलेला होता मात्र तरिही शत्रूवर तुटून पडण्याची जिद्द कायम होती. अशा अवस्थेत रायफ़लनं नेम साधणं दूरच ती उचलणंही कठीण होतं मात्र आता लाछिमान यांच्या अंगात विरश्री संचारली होती.

जपानींच्या प्रत्येक ह*ल्ल्याला त्यांनी अचूक नेम साधत गोळीबार करायला सुरवात केली. त्यांनी एकट्यानीच थोडी थोडकी नाही तर तब्बल चार तास दोनशे शत्रू सैनिकांना टक्कर दिली. आता डोळ्यासमोरची अंधारी वाढत चालली होती. जखमांमधून वहाणारं रक्त शक्तीपात करत होतं. तरिही न जुमानता ते आपल्या पोझिशनवर टिकून होते. याच वेळेस सुदैवानं त्यांना ताजी कुमक येऊन मिळाली आणि त्यांची या पोझिशनवरून सुटका करण्यात आली.

लाछिमान यांनी राखलेली आघाडी नविन कुमकही राखून होते. पुढच्या तीन दिवस आणि दोन रात्री ही घमासान यु*द्ध चालू होतं. ही चकमक संपल्यानंतर लक्षात आलं की बंकरसमोरच ८७ जपानी सैनिकांच्या मृतदेहांचा खच पडला होता, जे एकट्या लाछिमान यांनी गारद केले होते.

जखमी लाछिमान यांच्यावर डॉक्टरनी शर्थीचे प्रयत्न करत त्यांचा जीव तर वाचवला मात्र त्यांचा उजवा डोळा आणि उजवा हात ते वाचवू शकले नाहीत. १९ डिसेंबर १९४५ रोजी त्यांच्या या शौर्याची दखल घेऊन लॉर्ड माऊंटबॅटनने लाछिमान यांचा व्हिक्टोरिया क्रॉस देऊन सन्मान केला.

त्यांच्या या शररिक हानीसहित त्यांनी १९४७ पर्यंत सैन्यात काम केलंच. नंतरच्या आयुष्यात ते ब्रिटनमधे स्थायिक झाले आणि तिथेच २०१० साली त्यांचा मृत्यू झाला. मात्र आजही गुरखा रेजिमेंटमधे लाछिमान यांची शौर्यगाथा सैनिकांत नवचैतन्य निर्माण करते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

गव्हाचे भाव कमी करण्यासाठी अमेरिकेत ‘स्लाइस ब्रेड’वर बंदी घालण्यात आली होती!

Next Post

कर्णन – असा चित्रपट बनवायला बॉलिवूडला अजून किती वर्ष लागतील माहित नाही

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

कर्णन - असा चित्रपट बनवायला बॉलिवूडला अजून किती वर्ष लागतील माहित नाही

...म्हणून जपानने बिल्डिंगच्या मधूनच हायवे बांधलाय..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.