The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रिटनने बर्फापासून विमानवाहू युद्धनौका बनवण्याचा प्लॅन केला होता

by द पोस्टमन टीम
1 October 2025
in विश्लेषण, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


१९४०च्या दशकाच्या सुरुवातीला जर्मन पाणबुड्या (यू-बोट्स) अटलांटिक महासागरात ‘दोस्त राष्ट्रां’च्या सैन्यात धुमाकूळ घालत होत्या. जर्मनीनं ब्रिटन आणि अमेरिकेची कित्येक जहाजं बुडवली होती. दोस्त राष्ट्रांच्या नौदलाच्या अपयशामुळं महायु*द्धाची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती. जर्मन पाणबुड्यांना रोखण्यासाठी काही तरी उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. मात्र, नेमकं करावं काय? असा प्रश्न दोस्त राष्ट्रांपुढे होता.

ब्रिटीश कंबाइंड ऑपरेशन्ससाठी (वॉ*र ऑफिसचा एक विभाग) काम करणारा एक व्यक्ती या गहन प्रश्नाचं उत्तर घेऊन समोर आला. त्याची कल्पना ऐकून सर्वजण थक्क झाले. कारण जर्मन नौदलाला फसवण्यासाठी त्यानं बर्फ आणि लाकडाचा भूसा वापरून एक जहाज बांधण्याची योजना मांडली होती! ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्णत्वास नेण्याचा विचार करण्यात आला आणि सुरू झालं प्रोजेक्ट हबक्कूक!

जेफ्री पाइक नावाचा ब्रिटिश माणूस प्रोजेक्ट हबक्कूकच्या जन्मास कारणीभूत होता. त्यानं विन्स्टन चर्चिलला १९४२ च्या उत्तरार्धात उत्तर अटलांटिकमध्ये ना*झी यू-बोटींविरोधात तोड मिळवून देण्यासाठी काम केलं. त्याची काम करण्याची पद्धत विचित्र होती म्हणून त्याचे बहुतेक सहकारी त्याला घाबरूनच राहत. त्याचा फक्त एक सहकारी म्हणजे माउंटबॅटन कायम त्याच्या सोबत असे.

पाइक वयाच्या ४१व्या वर्षी ब्रिटीश लष्करातील सर्वांत तरुण चीफ ऑफ स्टाफ बनला होता. नंतर त्याची कंबाइंड ऑपरेशन्समध्ये वर्णी लागली. तिथे त्याची भेट मॅक्स एफ. पेरुट्झ नावाच्या संशोधकाशी झाली. पेरुट्झ अल्पाइन हिमनद्यांचा अभ्यास करत होता. पाण्यापासून बर्फ तयार होताना त्यात लाकडाच्या कणांसारखी सामग्री प्रवाहात आल्यावर बर्फाचं स्वरूप बदलत असल्याचं निरीक्षण त्यानं नोंदवलं होतं.



त्यानं ही गोष्ट जेफ्री पाइकच्या कानावर घातली. लाकडाच्या कणांना पाण्यात मिसळून त्याचा बर्फ केल्यास त्यात मॉलिक्युलर बदल होत असल्याचं समोर आल्यानंतर पाइकच्या डोक्यात एक कल्पना शिजू लागली होती. १५ टक्के लाकडाचा लगदा आणि ८५ टक्के पाणी यांचं योग्य मिश्रण कोणत्याही साच्यात ओतलं जाऊ शकतं. त्यापासून कोणताही इच्छित आकार तयार करता येणार होता. लाकडाच्या लगद्यानं बर्फाला आणखी बळकटपणा दिला होता, शिवाय ते पाण्यावर अगदी एखाद्या हिमनगाप्रमाणे आरामात तरंगू शकत होतं. काँक्रीटपेक्षा मजबूत अशा या मिश्रणाला ‘पायक्रेट’ असं नाव देण्यात आलं.

जेव्हा अटलांटिकमध्ये दोस्त राष्ट्र संकटात सापडले होते, तेव्हा माउंटबॅटननं चर्चिलच्या कानावर ‘पायक्रेट’ची माहिती घातली. एक दिवस त्यानं चर्चिलला प्रात्यक्षिक देखील दाखवलं. त्यानं गरम पाण्यानं भरलेल्या बाथटबमध्ये पायक्रेट टाकलं आणि ते वितळण्यास किती वेळ लागतो हे पाहिलं. पायक्रेट कितीतरी तास आहे त्याच आकारात पाण्यावर तरंगत असल्याचं पाहून चर्चिल देखील चकित झाला.

याच पायक्रेटचा वापर करून एक विमानवाहू यु*द्धनौका निर्माण करण्याचा निर्णय चिर्चिलने घेतला. कोणत्याही परिस्थितीत २ हजार फूट लांब, ३०० फूट रुंद आणि २०० फूट खोलीची विमानवाहू नौका तयार झालीच पाहिजे, या विचारासह चर्चिलनं सर्व सुरक्षा अधिकाऱ्यांना झपाटून सोडलं. या जहाजाच्या तळाशी पायक्रेटचा ४० फूट थर दिला गेला तर जहाज शेल आणि टॉरपीडोचा मारा सहन करून पण स्तब्ध होऊ शकेल असा त्याचा अंदाज होता.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

याशिवाय त्याच्यात उत्तर अटलांटिकमधील ५० फूट उंचीच्या लाटांचा सामना करण्याचीही क्षमता असेल. २०० सिंगल इंजिन ब्रिटिश लढाऊ विमानं तसेच १०० ब्रिटिश ट्विन इंजिन बॉ*म्बर्स वाहून नेण्याची धमक या पायक्रेट जहाजात असावी, अशी अपेक्षा चर्चिलची होती. प्रश्न फक्त हा होता की, ही कल्पना दोस्त राष्ट्रांच्या गळी कशी उतरवायची? या कामासाठी देखील माऊंटबॅटन धाऊन आला.

१९ ऑगस्ट १९४४ रोजी, ना*झी-व्याप्त युरोपवरील मित्रराष्ट्रांच्या ह*ल्ल्याच्या नियोजनादरम्यान, माउंटबॅटनने जनरल सर ॲलन ब्रूकच्या संमतीनं प्रोजेक्ट हबक्कूक आणि पायक्रेटचा चमत्कार सादर केला. माउंटबॅटननं पायक्रेटची निर्मिती आणि २२ लाख टन वजनाच्या विमानवाहू नौकेची कल्पना स्पष्ट केली. माउंटबॅटन आपल्या प्रत्येक कामात अतिशय चोख होता. आपल्या मनातील गोष्टी समोरच्या व्यक्तीच्या गळी उतरवण्यासाठी तो काहीही करत असे.

यावेळी देखील तो पूर्ण तयारीनिशी आला होता. त्यानं साधा बर्फ आणि पायक्रेटवर गोळ्यांचा मारा करून बैठकीला उपस्थित असलेल्या लोकांना प्रात्यक्षिक करून दाखवलं. अमेरिकन्स या कल्पनेमुळं प्रभावित झाले. परिणामी पुढील संशोधन आणि विकासासाठी प्रोजेक्ट हबक्कूक कॅनडामध्ये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला. १९४३ च्या उत्तरार्धात कॅनडातील अल्बर्टाच्यापेट्रीसिया तलावावर एक वर्कशॉप उभारण्यात आलं.

इच्छित विमानवाहू नौका तयार करण्यासाठी ३ लाख टन लाकडाचा लगदा, २५ हजार टन फायरबोर्ड इन्सुलेशन आणि किमान १० हजार टन स्टील लागेल, असा निष्कर्ष संशोधनाअंती काढण्यात आला. प्रत्यक्षात मोठ्या जहाजावर काम सुरू करण्याअगोदर त्याची एक लहान प्रतिकृती तयार करण्यात आली. ही प्रतिकृती ६० फूट लांब आणि ३० फूट रुंद आणि एक हजार टन वजनाची होती. ती पाण्यावर यशस्वीपणे तरंगली.

सुरुवातीच्या प्रयत्नाला यश मिळूनही प्रोजेक्ट हबक्कूक कधीच सत्यात उतरलं नाही. अटलांटिकच्या अथांग क्षितिजावर बर्फाच्या जहाजानं कधीच प्रवास केला नाही. ब्रिटीश आणि अमेरिकेतील अनेक बुद्धीजीवी लोकांनी मात्र या प्रकल्पाला सतत आव्हान दिलं. प्रकल्पाच्या संशोधन आणि विकासाच्या टप्प्यात खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शेवटी अमेरिकेनं पारंपारिक विमान वाहकांच्या निर्मितीवर भर देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय तिकडे युरोपात दोस्त राष्ट्रांना नॉर्मंडीच्या आक्र*मणात मोठं यश मिळालं.

परिणामी प्रोजेक्ट हबक्कूक ‘विरघळून’ नाहीसा झाला! सप्टेंबर २०१० मध्ये बीबीसीच्या ‘बँग गोज द थ्योरी’ या कार्यक्रमात पायक्रेट बोट पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. ५ हजार किलो फायबर पायक्रेट वापरून तयार केलेली बोट शीतगृहात गोठवली गेली. नंतर पोर्ट्समाउथ हार्बरमधून सोलेंट ते काउज या नियोजित प्रवासासाठी लाँच केली गेली. आऊटबोर्ड मोटर लावण्यासाठी त्याच्या मागील बाजूस केलेल्या छिद्रांमुळे तिच्यात पाणी शिरलं आणि ती बुडाली.

प्रोजेक्ट हबक्कुक प्रत्यक्षात साकार झाला असता तर महायु*द्ध नक्कीच जमिनीवरून महासागरात जास्त प्रमाणात लढलं गेलं असतं, हे नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

स्टॅलिनच्या या मुलीला सगळं आयुष्य रशियापासून दूर पळत वनवासात काढावं लागलं

Next Post

चक दे इंडियातील कोच ‘कबीर खान’ म्हणजे खऱ्या आयुष्यातील मीर रंजन नेगी

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

चक दे इंडियातील कोच 'कबीर खान' म्हणजे खऱ्या आयुष्यातील मीर रंजन नेगी

कोरावर सर्वांत लोकप्रिय असलेले बालाजी विश्वनाथन रोबोटिक्समधले एलोन मस्क आहेत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.