The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…आणि त्या दिवसानंतर ब्रॅड हॉगला सचिनची विकेट कधीच मिळाली नाही

by द पोस्टमन टीम
22 March 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपल्या सगळ्यांचा आवडता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा जगातला सर्वात महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. या मागचं कारण फक्त त्याने केलेले रेकॉर्ड नाहीत तर त्याचा स्वभाव हे देखील आहे. आज त्याच्या रेकॉर्डस्-बरोबरच त्याच्या स्वभावावर प्रेम करणारे अनेकजण आपल्या आजूबाजूला आहेत.

त्याचा चेहरा आपल्याला नेहमी प्रसन्न दिसतो. बोलताना देखील त्याच्या बोलण्यातील नम्रता आपल्याला जाणवते. कोणत्याही परिस्थितीत न डळमळता शांत आणि संयमी खेळी खेळणे ही तर सचिन तेंडुलकरची खासियत. त्याचा स्वतःवर असलेला पूर्ण आत्मविश्वास आपल्या सगळ्यांना पदोपदी जाणवतो. याच आत्मविश्वासाची सचिन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रॅड हॉग यांच्यामध्ये घडलेली ही गोष्ट!

धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्या ट्वेन्टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपवर भारताने नाव कोरले होते. त्यानंतर लगेच ऑस्ट्रेलिया टीम भारत दौऱ्यावर आली, कारण होते ते वनडे सिरीजचे! या सिरीजमध्ये पहिल्यांदा धोनीने कर्णधारपद भूषवले होते.

५ ऑक्टोबर २००७ रोजी हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही वन-डे मालिका सुरू होती. या मालिकेचा तिसरा सामना होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॉटींगने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. क्लार्क, हेडन, सायमंडस यांच्या जोरदार इनिंगमुळे आपल्या भारताला तेव्हा त्यांनी जिंकण्यासाठी २९१ धावांचे लक्ष्य ठेवले. घरच्या मैदानावर एवढ्या धावा काढणे भारताला अगदी सोप्पे होते.



पण तो दिवस वाईट होता असं म्हणा किंवा भारताचे नशीब वाईट होते, फक्त १३ धावा आणि गंभीर, उथ्थपा, द्रविड हे तीन खेळाडू बाद झाले होते. सचिन आणि युवराजने अतिशय संयमी खेळी खेळण्यास सुरुवात केली. हळूहळू का होईना वीस ओव्हरमध्ये त्यांनी जवळपास १०० धावा काढल्या. आता पॉटींगला मात्र हे दोघेही डाव फिरवतील अशी शंका वाटू लागली.

पॉटींगने विचारपूर्वक ऑस्ट्रेलियाचा स्पिनर ब्रॅड हॉगकडे बॉलिंग दिली. पॉटींगने थोडीफार फिल्डींग देखील बदलली. हळूहळू सामन्याचे वातावरण तंग व्हायला सुरुवात झाली होती. पहिले दोन बॉल सचिनने खेळून काढले. तेव्हा हॉगच्या लक्षात आले, की आपली खेळी यशस्वी होत आहे, सचिनला आपल्या बॉलवर खेळणे अवघड जात आहे.

मग परत पॉटींगच्या मदतीने त्याने शेवटच्या बॉलसाठी फिल्डींग बदलली. क्रिकेटच्या करियरमधला सगळा अनुभव पणाला लावून त्याने बॉल टाकला आणि हॉगने सचिनला आऊट केले. सगळ्यांना खूप वाईट वाटत होते. तेव्हा सचिनच्या फक्त ४४ धावा काढून झाल्या होत्या. 

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

२७वी ओव्हर चालू होती, त्यात सचिनला हॉगने बोल्ड आऊट केलं. तेव्हा संपूर्ण मैदान एकदम शांत झाले होते. सचिन मैदानावरून परतत असताना ऑस्ट्रेलियन टीम मात्र जल्लोष करत होती. स्टेडियममधील अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. क्रिकेट आणि सचिनबद्दलचे प्रेम, आदर त्यातून दिसत होते. युवराज सिंगने शतक काढूनही त्या सामन्यात भारताला ४७ धावांनी पराभव पत्करावा लागला.

दुसरीकडे मात्र ब्रॅड हॉगची ही सर्वांत महत्त्वाची विकेट ठरली, कारण त्याने सचिनला आऊट केले होते. त्याच मॅचमध्ये हॉगने अजून ३ विकेट घेतल्यामुळे त्याचे प्रचंड कौतुक झाले होते. ब्रॅड हॉगला अतिशय आनंद झाला होता. त्याचा तो आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या मॅचमधील सचिन परतताना आणि ऑस्ट्रेलिया टीम जल्लोष करत असतानाचे चित्र प्रेक्षकांना बघवत नव्हते.

चौथी मॅच मोहालीला होती. भारतीय टीम तयारी करत असतानाच, म्हणजे ती मॅच सुरू होण्यापूर्वी ब्रॅड हॉग भारतीय ड्रेसिंग रूममध्ये गेला. तेव्हा त्याला सचिन तेंडुलकर स्टेडियममधून परतत आहे आणि ऑस्ट्रेलिया टीमसोबत ब्रॅड हॉग विकेट मिळवल्याचा आनंद साजरा करत आहे असा फोटो त्याच्या जवळ होता. त्याला त्या फोटोवर सचिनचा ऑटोग्राफ हवा होता म्हणून त्याने सचिनसमोर तो फोटो धरत त्यावर त्याचा ऑटोग्राफ मागितला.

सचिन नेहमीप्रमाणे शांत होता. चेहऱ्यावर त्याने कोणतेही भाव न येऊ देता ऑटोग्राफ दिला. पण तो देत असताना त्याच्या मनात संघर्ष चालू झाला होता. त्याने ऑटोग्राफ लगेच केला पण त्याने “हे परत होणे नाही’ असे वाक्य लिहिले. तेव्हा सचिनने ते वाक्य आत्मविश्वासाने त्या फोटोवर ऑटोग्राफच्या खाली लिहिले होते.

ब्रॅड हॉगने तो फोटो हातात घेतला. त्याला ते वाचून हसू आले. त्याने ‘सचिनची परत मी विकेट काढणार’ हे मनाशी पक्के केले. पुढच्या अनेक मॅचमध्ये ब्रॅड हॉगने अनेकदा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. तो प्रयत्न करत राहिला आणि सचिनच्या आत्मविश्वासामुळे तो अयशस्वी होता राहिला. सचिनला आऊट करणे इतके सोप्पे नाही हे त्याच्या हळूहळू लक्षात आले. तो दिवस त्याचा होता, त्यामुळे अनावधानाने ती विकेट त्याला मिळाली होती.

हॉग नेहमी म्हणतो, सचिनने त्या दिवशी ते लिहिले ते माझ्या मनात कोरले गेले आहे. मी ते आयुष्यभर विसरू शकत नाही. आता दोघेही रिटायर्ड झाले असून हॉगचे सचिनला परत आऊट करण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. यातून सचिनचा आत्मविश्वास आणि संकल्पपूर्तीचा स्वभाव दिसून येतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या अभिनेत्रीने एक नाही दोन नाही तब्बल ४ ऑस्कर जिंकले आहेत!

Next Post

कपिल देवने सलग चार सिक्स मारले आणि भारताला फॉलोऑनपासून वाचवलं

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

कपिल देवने सलग चार सिक्स मारले आणि भारताला फॉलोऑनपासून वाचवलं

अमेरिकेत या मायबापांनी आपल्या पोटचा गोळा अवघ्या २ डॉलरला का विकला?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.