The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंदु*कीची एकही गोळी न चालवता या यु*द्धात हजारो सैनिकांचा बळी गेला होता

by Heramb
28 October 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


हायब्रीड वॉ*रफेअर, मॉडर्न वॉ*रफेअर असे शब्द तुम्ही ऐकलेच असतील. अनेकांनी यावर वाचन, लेखनही केलं असेल. याच हायब्रीड वॉ*रफेअरचा एक भाग म्हणजे ‘बायोलॉजिकल वॉ*रफेअर’. बदलत्या काळाबरोबर शस्त्रे, यु*द्धतंत्र आणि यु*द्धनीती बदलत गेली. उत्क्रांत होणे हा जसा मानवाचा गुण मानला जातो, त्याचप्रमाणे मानवाची शस्त्र-शक्तीसुद्धा उत्क्रांत होत गेली.

अतिशय प्राचीन अर्थात प्रागैतिहासिक काळात माणूस दगडी शस्त्रे वापरत होता, यालाच इतिहासकार अश्मयुग म्हणतात. मानवाच्या प्रगतीबरोबरच शस्त्राची प्रगती झाली आणि मानवाने प्रवेश केला ‘ताम्रयुगात’. या युगात मानव तांब्याने किंवा अन्य धातूंनी तयार केलेली शस्त्रे वापरू लागला. पुढे याच शस्त्रांमध्ये प्रगती होत होत धनुष्य-बाण, तलवार, भाले अशी शस्त्रे तयार होऊ लागली.

मध्ययुगापर्यंत अशा शस्त्रांचा सर्वत्र दबदबा होता. मध्ययुगातच मानवाने पहिल्यांदा ‘बंदू*क’ हाताळली आणि एकोणिसाव्या शतकाच्या वैज्ञानिक प्रगतीसह शस्त्रांची धार अजूनच तीक्ष्ण होत गेली. दुसऱ्या महायु*द्धाचा शेवट अत्यंत भीषण ‘अ*ण्वस्त्राने ‘ झाला. त्यानंतर ‘वेप*न्स ऑफ मास डि*स्ट्रक्शन’वर संशोधन वाढू लागलं.

मानवाने अणुऊर्जेचं वे*पना*यजेशन केलंच, पण त्याशिवाय केमिकल आणि बायोलॉजिकल वे*प*न्ससुद्धा मानवाने तयार केले. आता कोविड-१९ च्या महामारीमुळे ‘बायोलॉजिकल वॉ*रफेअर आणि वे*पन्सची’ चर्चा वाढत आहे. पण पहिल्या बायोवे*पनचा प्रयोग दुसऱ्या महायु*द्धाच्याही आधी, १९१३ साली झाला होता असे अनेकदा सांगण्यात येते, त्याबद्दलच हा विशेष लेख..



दुसऱ्या बाल्कन यु*द्धात रोमानियाने बल्गेरियावर केलेल्या आक्र*मणादरम्यान दोन्ही सैन्यांनी हजारो सैनिक गमावले. परंतु या दोन्ही सैन्यांदरम्यान एकही गो*ळी चालली नाही. एका ‘न दिसणाऱ्या’ शस्त्राने या लढाऊ सैन्याचा संपूर्णतः नाश केला. यामुळेच ही लढाई आधुनिक इतिहासातील बायोलॉजिकल वॉ*रफेअरवर आधारित असल्याचे मानले जाते.

१९१३ साली, दुसऱ्या बाल्कन यु*द्धाच्या पार्श्वभूमीवर, रोमानिया युरोपच्या संपूर्ण इतिहासातील सर्वात अवघड लष्करी मोहिमा सुरू करणार होतं. अनेक भूप्रदेशांसाठी बल्गेरियाचे ग्रीस आणि सर्बियाशी यु*द्ध सुरू असताना, रोमानियन सैन्याने बल्गेरियावर आक्र*मण केले.

खरं तर, रोमानियन सैन्याला बल्गेरियन लोकांशी डोब्रोगियाच्या दक्षिणेकडील प्रदेशांसाठी असलेला वाद मिटवायचा होता. पण बल्गेरियन सैनिकांची संख्या जास्त नसल्याने रोमानियन सैन्याने डोब्रोगियाच्या दक्षिणेकडील प्रदेशांसह बल्गेरियाचा मोठा भाग ताब्यात घेतला आणि यानंतर मात्र रोमानियन सैन्य बल्गेरियाची राजधानी सोफियापासून फार दूर नव्हते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

जरी या यु*द्धादरम्यान कोणताही रोमानियन किंवा बल्गेरियन सैनिक समोरासमोरच्या लढाईत किंवा शत्रूच्या गो*ळीने मारला गेला नसला तरी, संघर्षादरम्यान या दोन्ही सैन्यांना एका न दिसणाऱ्या शत्रूने नष्ट केले. तो शत्रू म्हणजे कॉलरा. त्याकाळात अनेक भीतीदायक विधाने, अफवा सगळीकडे पसरत असतानाही रोमानियन लोक ‘नायक’ ठरले. पण बल्गेरियन सैन्याने रोमानियन सैन्यावर गैरवर्तनाचा आरोप केला. खरं तर बल्गेरियातील रोमानियाची मोहीम एक मोठी आपत्तीच होती.

रोमानियाने बल्गेरियन राज्याला ऑटोमन्स साम्राज्याकडून स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. यामुळेच १८७८ साली रोमानिया आणि बल्गेरिया यांच्यात काही प्रमाणात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले होते, असं म्हणायला वाव आहे. पण काही वर्षांतच त्यांचे संबंध बिघडायला सुरुवात झाली. इसवी १९०० च्या आधीपासूनच बल्गेरियन राज्यकर्त्यांनी ‘डॉब्रागीया’ हा बल्गेरियाचा अविभाज्य भाग असल्याचे जाहीर केले. इतकेच नाही तर त्यांनी  डॉब्रागीयाची ८० टक्के लोकसंख्या बल्गेरियन असल्याचा दावा केला.

या दाव्यामुळे आगीत तेल ओतले गेले आणि रोमानियातील ङाम्बोविटा येथील राज्यकर्त्यांच्या तळपायातील आग मस्तकात गेली. अनेक अभ्यासकांच्या मते, खरंतर डॉब्रागीया भाग हा पाच शतकांसाठी ऑटोमन साम्राज्याचा भाग होता. पण याचवेळी दक्षिण डॉब्रागीयावर रशियाचे नियंत्रण रोमानियाचे राज्य कायदेशीर मानले जाऊ लागले. कारण रशियाने १८७७-७८ च्या यु*द्धात दक्षिण बेसर्बियाच्या राज्याबरोबर वाटाघाटी करून दक्षिण डॉब्रागीयाचा प्रदेश जिंकून घेतला होता. या सौद्यामुळे दक्षिण डॉब्रागीयाचा प्रदेश वॉलाशियाचा भाग बनला.

१९१० नंतर मात्र बल्गेरिया आपला डॉब्रागीयावर दावा तीव्र करू लागला. दुसरे बाल्कन यु*द्ध हे रोमानियासाठी बल्गेरियाविरुद्ध संघर्ष सुरु करण्यासाठी उत्तम निमित्त ठरले. त्यांचा हा संघर्ष मुख्यत्वे आपला डॉब्रागीयाचा प्रदेश परत मिळवण्याचा प्रयत्न होता असं म्हटलं तर अतिशयोक्त वाटायला नको. अपेक्षेप्रमाणे रोमानियन सैन्याने १९१३ साली डाव साधला.

बल्गेरियाचे सैन्य ग्रीक आणि सर्बियन सैन्याशी मोठ्या संघर्षात असताना रोमानियन सैन्याने युरोपातील दुसरी सर्वांत मोठी ‘दनुबा’ नदी ओलांडून बल्गेरियाचे चार प्रांत, व्राता, प्लेव्हना, विदिन आणि तारनोवो काबीज केले. पण हा विजय मिळवणं काही विशेष नव्हतं, कारण बल्गेरियाच्या स्थानिक सैनिकी चौक्यांनी अतिशय सहजपणे माघार घेतली. या स्थानिक सैनिकी चौक्यांच्या सैनिकांना नैऋत्य दिशेस अतिरिक्त बल्गेरियन सैन्य असण्याची अपेक्षा होती. अर्थातच ही अपेक्षा विफल ठरली.

हा विजय प्राप्त केल्यानंतर रोमानियन साम्राज्याच्या सैनिकांची प्रतिमा युरोपमध्ये खरे ‘नायक’ म्हणून उदयास आली. पण बल्गेरियाच्या राजकीय नेतृत्वाने मात्र या ह*ल्ल्याला ‘खोडसाळपणाचे’ लेबल लावले. पण रोमानियन्सच्या अपेक्षेनुसार हा विजय त्यांना फायदेशीर ठरला नव्हता. पुढच्या तीनच वर्षांत त्यांना पुन्हा माघार घ्यावी लागली. टर्टुकैयाच्या लढाईत रोमानियन सैन्याचा इतिहासातील सर्वांत मोठा पराभव होऊन त्यांना हा प्रदेश कायमचा सोडावा लागला.

या पराभवात रोमानियाचे तब्बल ३ हजार सैनिक मृत्युमुखी पडले. कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल पण त्यांनी यावेळी कोणत्याही शत्रूचा सामना केला नाही. त्यांच्यावर कॉलराने ह*ल्ला केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. १९१३ च्या ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान फक्त २ ते ३ हजार सैनिकच मारले नाहीत तर तब्बल १० हजार निष्पाप नागरिकांचाही या महामारीत जीव गेला.

या सगळ्या यु*द्ध आणि संबंधित घटनांचा विशेष भाग म्हणजे, बल्गेरियन सैन्याने रोमानियन साम्राज्यावर आरोप केला होता.. “कॉलराची महामारी शस्त्र म्हणून वापरण्याचा.” तत्कालीन अनेक वृत्तपत्रांनी या बल्गेरियावर आक्र*मण केलेल्या रोमानियन सैन्यावर प्रचंड आरोप केले. ‘महामारीने पीडित लोकसंख्येवर सहजतेने नियंत्रण मिळवण्यातही मागे न हटलेले बेईमान साम्राज्यवादी’ असे वर्णन अनेक युरोपीय वृत्तपत्रांनी केले. सदर हेडलाईन नोव्हेम्बर १९१३ मधील ‘बल्गेरिया’ वृत्तपत्रातील आहे.

एकूण परिस्थिती पाहता, बल्गेरियन लोकांनी व्यक्त केलेली शंका अतिशयोक्त नव्हती. एकूण मृतांपैकी केवळ २०% मृत रोमानियन सैनिक होते, म्हणूनच बायोलॉजिकल ह*ल्ल्याचा प्रकार असल्याचं अनेक विश्लेषकांचं मत आहे. म्हणजेच बल्गेरियाच्या म्हणण्यानुसार, रोमानियन सैन्याने बायोलॉजिकल ह*ल्ला केला, पण तो ह*ल्ला वाटू नये यासाठी आपल्या सैन्यातील काही सैनिकांनासुद्धा त्याची लागण होईल याची व्यवस्था केली.

याचवेळी बल्गेरियन डॉक्टर रोसेफने रोमानियाच्या सैन्याच्या आरोग्यविषयक स्वच्छतेबद्दल एक अहवाल तयार केला. डॉक्टर रोसेफ हा सर्वसामान्य डॉक्टर नसून तो बल्गेरियाच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेचा मुख्याधिकारी होता. या अहवालात डॉक्टर रोसेफने रोमानियन सैनिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे मत नोंदवले आहे.

आपल्या अहवालात डॉक्टर रोसेफ लिहितो, “रोमानियन सैनिक खूप गलिच्छ असून ते कोणतेही अन्न न निवडता खातात, न शिजवलेले पोलेंटा, कच्ची फळे, कच्च्या हिरव्या भाज्या आणि अशुद्ध पाणी अशांचे सेवन केल्याने त्यांच्यात रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.’ प्रस्तुत अहवालात डॉक्टर रोसेफने अनेक तथ्यांचा खुलासा केला आहे. अहवालावरून, रोमानियन सैन्याकडे अंघोळीची कोणतीही व्यवस्था नसल्याचे दिसून येते. रोमानियन सैनिक नद्या, तलाव आणि अगदी काही शहरांच्या गटारांमध्येही अंघोळ करीत असत.

या अहवालाच्या सत्यासत्यतेची पडताळणी करणे आज कठीण आहे. पण एकूण ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे स्वच्छतेच्या बाबतीत पूर्व युरोपियन सैन्य जागरूक नव्हते असं म्हणायला निश्चितच वाव आहे. विशेषतः परदेशी मोहिमांवर असताना स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केले जात असत. सैन्यातील सैनिकांची स्वच्छता ही समस्या आहे, पण कॉलरच्या उद्रेकाचे कारण निश्चितच नाही. जर अहवाल खरा असता तर बल्गेरियात प्रवेश करण्याआधीच रोमानियन सैनिकांचा मृत्यू झाला असता. 

बल्गेरियन सेनेटरी सर्व्हिसच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट ते नोव्हेंबर १९१३ दरम्यान, १६ हजार २६३ लोकांचा कॉलरामुळे मृत्यू झाला. तर रोमानियन सैन्याच्या नियंत्रणाखालील प्रदेशात ६ हजार ७०० लोकांचा कॉलरामुळे मृत्यू झाला आणि बल्गेरियन राजवटीत ९ हजार २५६ लोकांचा कॉलरामुळे मृत्यू झाला, असे डॉक्टर रौसेफच्या अहवालात असे दिसून आले आहे.

नागरिकांमध्ये कॉलराचा प्रसार रोखण्यासाठी रोमानियन सैन्याने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत असा या अहवालाचा निष्कर्ष आहे. म्हणजेच, रोमानियन लोकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अस्वच्छतेद्वारे शक्य तितके रोग पसरवण्याचा प्रयत्न केला होता.

रोमानियाने खरोखरच आधुनिक बायोलॉजिकल वॉ*रफेअर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला होता की हा केवळ योगायोग होता हे अद्याप अज्ञात आहे. कारण बल्गेरियामध्ये कॉलराचा उद्रेक झाला तेव्हा रोमानियन सैन्याने ह*ल्ला केला होता. पण जर हा खरंच बायोलॉजिकल ह*ल्ला असता तर रोमानियन सैन्याने आपले तब्बल ३ हजार सैनिक एका ‘लढाईच्या’ प्रसंगात गमावले नसते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जहाज अपघातातून वाचलेल्या दर्यावर्दींनी वसवलेला देश म्हणजे बर्मुडा..!

Next Post

माउंट एव्हरेस्टची उंची नेहमी बदलत का राहते..? हे घ्या उत्तर..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

माउंट एव्हरेस्टची उंची नेहमी बदलत का राहते..? हे घ्या उत्तर..!

कॅम्पिंगला गेलेल्या माणसांना मार*हाण केली म्हणून एका अस्वलाला जेलमध्ये टाकलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.