The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काळी मांजर नेमकी कधीपासून अपशकुनी झाली..?

by द पोस्टमन टीम
25 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“संध्याकाळ झाली आहे आता झाडू नको, नखं कापू नकोस.”
“नवीन दुकान उघडतोयस? बाहेर आधी लिंबू-मिरची लाव”
“हात खाजवतोय. नक्की पैसे येणार.”
“बाहेर जाताना मागून असा आवाज देत नको जाऊ, काम होत नाही.”

ऐकल्यासारखं वाटतंय का? हे आणि असे कितीतरी वाक्य आपण रोज ऐकतो. अशा सगळ्या अंधश्रद्धा अजूनही पाळतो. असे कितीतरी लोक आहेत जे न चुकता या सगळ्या गोष्टी करतात.

कोणी टोकलं किंवा शिंकलं तर बाहेर जाणार नाहीत लगेच. मुलीचा पाय फ्लॅट असेल तर तिला नकार देणार कारण काय तर मुलाचं आयुष्य धोक्यात येईल. चप्पल उलटी असेल तर भांडण होणार म्हणून डोक्याला हात लावून बसणारे. एक ना अनेक.

पण यातसुद्धा सगळ्यात वरचा क्रमांक लागतो तो आपल्या लाडक्या काळ्या मांजरीचा.



काळी मांजर आडवी गेली तर सात पावलं मागे येणारे, दुसरं कोणी तिथून जाईपर्यंत आपल्या जागेवर थांबणारे कोणी कोणी तर थेट घरी परततात. कारण काळी मांजर आडवी गेली म्हणजे हमखास काहीतरी वाईट घडणार. त्यामुळे तिथून दुसरं कोणी गेलं की आपल्यावरचं संकट टळणार.

कोई सेन्स हैं इस बात की?

पण काळ्या मांजरीला इतकं घाबरण्यामागे कारण काय आहे याचा कधी विचार केला आहे का? हे सगळं कधीपासून सुरू झालं?
तर… मध्ययुगात युरोपात पोप नववा ग्रेगरी याने काळ्या मांजरी म्हणजे सैतानाचाच पुनर्जन्म मानले तेव्हापासून याची खरी सुरुवात झाली असावी असे वाटते. या काळातील बरीचशी गाणी, आख्यायिका काळ्या मांजरींना वाईट प्रवृत्तींचं प्रतिक म्हणून चित्रित करत. काही ठिकाणी त्यांना जादूटोणा करणाऱ्या लोकांशी जोडण्यात आले. आता त्या काळात जादूटोणा करणाऱ्यांना कशा नजरेने बघितले जायचे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

काळ्या मांजरी या चेटकीणी आणि तसा जादूटोणा करणाऱ्या लोकांसोबत मिळून काम करतात असा समज सगळीकडे हळूहळू पसरत गेला.

काळ्या मांजरीची सावलीसुद्धा लोकांना आता त्यांचे रोजचे व्यवहार बंद करण्यासाठी पुरेशी होती. १७व्या शतकात तर असे कितीतरी उदाहरणं आहेत ज्यात फक्त काळी मांजर आडवी गेली म्हणून खाणींमध्ये वगैरे कामाला असणारे मजूर कामावर न जाता भीतीने घरी येऊन स्वतःला बंद करून घेत.

काळी मांजर अपशकुनी असण्याच्या कहाण्यांनी आपल्याला इतकं आंधळं करून टाकलं की काळी मांजर कोणे एकेकाळी शुभ मानली जायची हेसुद्धा आपण विसरलो.

प्राचीन इजिप्तमध्ये सगळ्या मांजरींना दैवी मानले जायचे. तर, १९व्या शतकात युरोपच्या काही भागात काळी मांजर तुमच्याकडे चालत आली तर तो शुभशकून मानला जाई. आधीच काळ्या मांजरींच्या दंतकथा काय कमी होत्या की काय त्यात अधिकाधिक भर पडत गेली.

आता २१व्या शतकात मात्र जादूटोणा, चेटकीण या सगळ्या गोष्टींचे थोतांड कमी झाले आहे. त्याचबरोबर या आपल्या मैत्रिणींनी त्यांच्याबद्दल असणारी भीतीदेखील गमावली आहे. उलट आता काळ्या मांजरी अनेक लोक पाळतातसुद्धा. काळ्या मांजरी काय आणि इतर कुठला काळा प्राणी काय, बाकी रंगांच्या प्राण्यांपेक्षा यांना पाळणाऱ्यांची संख्या आता वाढते आहे.

ही होती काळ्या मांजरीच्या शकुनांची कथा. पुढच्या वेळी जर एखाद्या काळ्या मांजरींनी रस्ता अडवला तर घाबरून घरी परत न जाता तिला शुभशकून मानून आपले काम पूर्ण करा. आणि हो एकदा खात्री करून घ्या, न जाणो ती मांजर एखादं छानसं घर शोधत असेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

कुठल्याही गोष्टीकडे पाहण्यासाठी विचारधारेचा चष्मा का?

Next Post

पाताल लोक वेबसिरीज हिंदुविरोधी आहे काय..?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

पाताल लोक वेबसिरीज हिंदुविरोधी आहे काय..?

नरसिंह राव सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची पूर्ण तयारी केली होती...

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.