The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेंव्हा “बिल गेट्स” मैलापाण्यापासून रिसायकल केलेले पाणी पितात..

by द पोस्टमन टीम
11 September 2024
in विज्ञान तंत्रज्ञान, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


गेल्या काही वर्षांमध्ये विकसित झालेल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक ठिकाणी ‘फ्रॉम वेस्ट टू बेस्ट’ किंवा ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ असे अनेक उपक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारतात तर कचऱ्यापासून खत तयार करण्यासारखे प्रकल्प चालवले जातात. त्याशिवाय सरकारने सुरु केलेला ‘वेस्ट टू वेल्थ’ हा उपक्रमदेखील याचाच एक भाग आहे.

मानवी विष्ठा, सांडपाणी, मैला असा काही विषय समोर आला की आपली नाकं मुरडली जातात पण एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही ती म्हणजे, आपण निर्माण केलेल्या या गोष्टी नंतर जातात कुठे, त्याचं काय होतं? आपण आपला परिसर तर स्वच्छ ठेवतो पण कुठेतरी या गोष्टींचासुद्धा निचरा न होता त्या पडून राहिलेल्या असतील किंवा पर्यावरणामध्ये प्रदूषणाची भर घालत असतील असं आपल्या लक्षात येत नाही.

आपले म्हणावे तेवढे लक्ष न गेलेल्या या ‘मानवी वेस्टेज’मुळे सुद्धा अनेक देशांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मग हे ‘वेस्टेज’ पूर्णपणे नष्ट होऊ शकेल का? नक्कीच! जगप्रसिद्ध “बिल आणि मेलिंडा गेट्स” यांच्या फाऊंडेशनने यावर एक उपाय शोधून काढला आहे. खरंतर व्यवसायाने इंजिनियर असलेल्या एका व्यक्तीच्या सुपीक डोक्यातून आलेली ही कल्पना आहे. याद्वारे ‘मानवी वेस्टेज’ची सुयोग्य विल्हेवाट तर लावली जाऊच शकेल पण याशिवाय अधिकची वीजनिर्मिती व पिण्यायोग्य पाण्याचे निर्माणसुद्धा होऊ शकेल.

२०२३ साली ‘बिल गेट्स’ यांनी आपल्या ब्लॉगवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ते मानवी विष्ठेपासून निर्माण झालेले पाणी पित होते, पण हे शक्य आहे का? जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या व्यक्तींपैकी एक आणि त्याने असं पाणी प्यावं? म्हणजे हे प्रकरण नेमकं काय आहे की, ‘मानवी वेस्टेज’चा असा सुद्धा उपयोग त्यांनी केला असावा?! चला तर मग हे नक्की काय आहे हे जाणून घेऊ.



आज जगातील बहुतांश लोकांना स्वच्छतेच्या अभावाने निर्माण होणाऱ्या आजारांनी ग्रासले आहे. विशेषतः गरीब आणि अविकसित राष्ट्रांमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. तेथील सांडपाणी आणि मैला यांची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था अजून म्हणावी तेवढी विकसित झाली नाही, काही ठिकाणी तर अजूनही लोक उघड्यावरच कार्यक्रम करणे पसंत करतात. काही ठिकाणी अशुद्ध पाणी पिल्यामुळे लाखो लोकांना आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागते, याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असतो, जगभरामध्ये दरवर्षी सुमारे ७० हजार लहान मुलांचा मृत्यू अशा आजारांनी होतो आणि त्यापेक्षा जास्त संख्या ही अशा आजारांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असलेल्या मुलांची आहे.

म्हणूनच तर आपण आपल्या सांडपाण्याची सुयोग्य आणि परवडेल अशी विल्हेवाट लावू शकलो तर आपण अशा अनेक मुलांना एक उत्तम आरोग्य देऊ शकू व त्यांच्या वाढीसाठी सकारात्मक प्रयत्न करू शकू असे बिल गेट्स यांच्या मनामध्ये आले होते व त्यादृष्टीने त्यांनी जगभरातील संशोधकांना आवाहनसुद्धा केले होते.

पण या समस्येवर काय उपाय होता? विष्ठा नष्ट करण्यासाठी ज्या पद्धती पाश्चिमात्त्य देशांत सध्या वापरल्या जाणाऱ्या पद्धती तर इथे लागू होत नाहीत, त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठे असते. शिवाय कुठेही अशा मैलांना नष्ट करण्यासाठी एक तर शहरापासून दूर नेले जाते किंवा एखाद्या समुद्रात/ओसाड प्रदेशात टाकले जाते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

“मानवी मैला” नष्ट करणारे प्रगत देशामध्ये असणारे काही प्लांट्स् मात्र त्यांना जाळून टाकण्यास प्राधान्य देतात, परंतु त्यासाठी लागणाऱ्या इंधनामुळे व इतर गोष्टीमुळे हे प्लांट्स् अधिक खर्चिक आहेत. स्वच्छतेसारख्या मूलभूत समस्या ज्या अप्रगत देशामध्ये आहेत तिथे असे प्लांट्स् प्रत्येक ठिकाणी उभे करायचे म्हंटले तरी शक्य होत नाही, मग अशा देशांसाठी दुसरा पर्याय उपलब्ध होऊ शकेल का या विचारातच जगभरातील संशोधक होते.

थोडक्यात असा प्लांट किंवा असे तंत्रज्ञान, जे स्वतंत्रपणे चालू शकते व मैला नष्ट होण्यासोबतच अधिकचे फायदेसुद्धा उपलब्ध करून देऊ शकते. सरतेशेवटी बिल गेट्सना अपेक्षित अशा प्लांटचा शोध लागला आणि लगोलग त्यांनी या प्लांटला फंडिंग सुद्धा केलं आहे.

अमेरिकेतील ‘सिएटल’मध्ये “जॅनिकी बायोएनर्जी” यांचा हा मैला नष्ट करणारा प्लांट असून आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेचा मेळ घालून त्यांनी हा “ओम्नी प्रोसेसर” नावाचा प्रकल्प उभा केला आहे. मानवी मैला नष्ट करण्याची सुरक्षित व आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी ही व्यवस्था आहे.

आज सार्वजनिक हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन्स, औद्योगिक वसाहती आणि अशा बऱ्याच ठिकाणी, जिथे कुठे स्वच्छतागृहांचा वापर केला जातो तिथे निर्माण होणाऱ्या प्रचंड मैला-सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसते. मग हा जमा होणार मैला ट्रक्स किंवा अन्य वाहतुकीच्या माध्यमातून शहरापासून दूर अंतरावर किंवा नदी/समुद्रामध्ये डिस्पोज करतात किंवा एखाद्या अपुऱ्या व्यवस्थेचा वापर करतात ज्याने या मैलाची पूर्ण विल्हेवाट सुद्धा लागत नाही. ‘ओम्नी प्रोसेसर’ हा प्लांट मात्र मानवी मैला पूर्णपणे नष्ट करतो. प्लांटमध्ये  जमा होणार मैला हा अगदी १००० डिग्री सेल्सियस या अत्युच्च उष्णतेने पूर्णतः नष्ट केला जातो. शिवाय हा प्लांट अमेरिकन सरकारने ठरवून दिलेल्या उत्सर्जन मर्यादेत कार्य करतो, म्हणजेच हा प्लांट प्रदूषणमुक्तसुद्धा आहे.

जगामध्ये आधीच असलेल्या इतर “सिवेज प्लांट्स्”पेक्षा हा वेगळा आहे, कारण काही प्लांट्स् हे मैला जाळून नष्ट करण्यासाठी डिझेल किंवा इतर ज्वलनशील इंधनाचा वापर करतात, साहजिकच या इंधनाचा खर्च सुद्धा अधिक असतो. त्यामुळेच अविकसित आणि गरीब राष्ट्रांमध्ये असे प्लांट्स् मोठ्या संख्येने तयार करणेसुद्धा परवडणारे नसते. या समस्येवर ‘ओम्नी प्रोसेसर’ हा प्रभावी उपाय ठरू शकेल. 

स्टीम इंजिन्सचा अत्यंत कुशलपणे वापर केलेल्या या प्लांटमध्ये मैलाचे ज्वलन होताना निर्माण होणारी उष्णताच इतकी प्रचंड असते की त्यायोगे अधिकची विद्युतऊर्जासुद्धा आपण निर्माण करू शकतो. या प्लांटमध्ये मैलाची नष्ट होणारी एक बॅच ही पुढची बॅच नष्ट करण्यासाठीची ऊर्जा आधीच निर्माण करून ठेवते म्हणजेच हा प्लांट एक प्रकारे स्वतःलाच ऊर्जा पुरवतो, आणि आपल्याला बाहेरून लागणाऱ्या ऊर्जेचा खर्च वाचतो. तसेच या प्लांटमध्ये निर्माण झालेल्या वाफेपासून अगदी पिण्यायोग्य पाण्याचे निर्माण सुद्धा केले जाते. किमान १ लाख लोकांच्या मैलापासून तब्बल ८६ हजार लीटर पाणी व २५० किलोवॅट वीज निर्मितीची क्षमता या “ओम्नी प्रोसेसर” प्लांटमध्ये आहे.

या प्लांटचे निर्माते व व्यवसायाने इंजिनियर असलेले पीटर जैनिकी, या “ओम्नी प्रोसेसर”ची क्षमता सांगताना असे म्हणतात, “हा प्लांट नक्कीच मागासलेल्या भागातील स्वच्छतेच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना अटकाव घालू शकेल व तेथील व्यक्तींना, मुख्यतः लहान मुलांना उत्तम आरोग्य देऊ शकेल.” शिवाय या प्लांटमध्ये अधिक संशोधन करून तो कमी खर्चिक व छोट्या उद्योजकांनासुद्धा निर्माण करता येईल असा बनवण्याचा त्यांचा मानस आहे. इतर शहरामध्येसुद्धा असे प्लांट्स् उभे करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी “सीसीटीव्ही कॅम व सेन्सर” यांच्या माध्यमातून इतर ठिकाणावरूनसुद्धा नियंत्रित करता येऊ शकतील असे प्लांट्स् निर्माण करण्याचे एक उद्दिष्ट त्यांच्यापुढे आहे.

आपल्या फक्त श्रीमंतीनेच नव्हे तर सामाजिक बांधिलकी व समाजोपयोगी कार्याने प्रसिद्ध असलेल्या बिल गेट्स यांनी हा प्रकल्प पुढे आणण्यास पाऊल उचलले आहे हे विशेष !

अविकसित आणि पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर नसलेल्या राष्ट्रांमध्ये हा “मानवी वेस्टेज” समूळ नष्ट करणारा व अधिकचे फायदे देणारे हे प्लांट्स् निर्माण झाले तर नक्कीच आपण स्वच्छतेच्या अभावाने निर्माण होणाऱ्या आजारांवर मात करू शकू व येणाऱ्या पिढ्यांसाठी एक आरोग्यदायी व्यवस्था निर्माण करू शकू.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

Next Post

युट्युब चॅनेलपासून सुरु झालेल्या ‘या’ कंपनीची नेट वर्थ आज कोट्यवधींमध्ये आहे!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

युट्युब चॅनेलपासून सुरु झालेल्या 'या' कंपनीची नेट वर्थ आज कोट्यवधींमध्ये आहे!

हिऱ्यांच्या किंमती अवाढव्य असण्यामागे एक मार्केटिंग टेक्निक आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.