The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बेस्ट बॅट्समन, बॉलर सगळ्यांना माहित आहेत, ही आहे बेस्ट कमेंटेटर्सची यादी

by द पोस्टमन टीम
14 April 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


क्रिकेटमधील खेळाडू, एम्पायर, प्रशिक्षक यांच्याबद्दल तर नेहमीच चर्चा होते. पण, या सगळ्यांइतकाच क्रिकेटला गमतीशीर, मजेदार आणि कधी कधी गंभीर बनवणारा एक घटक म्हणजे समालोचक. या समालोचकांबद्दल मात्र फारशी चर्चा होत नाही किंवा यांच्याबद्दल लिहिलं, बोललं जात नाही. क्रिकेटचे समालोचन नेहमीच हिंदी किंवा इंग्लिशमधून केले जाते. यासाठी या दोन्ही भाषांवर चांगले प्रभुत्व असावे लागते. कारण, खेळाडू इतकाच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात समालोचकाचाही हात असतो. तर जाणून घेऊया अशाच काही पट्टीच्या समालोचाकांबद्दल ज्यांनी आपल्या शब्दांनी क्रिकेटला ‘इंटरेस्टींग’ बनवलंय.

रवी शास्त्री

रवी शास्त्री पूर्वी भारताच्या क्रिकेट टीममधे फलंदाज होते. आपल्या फलंदाजीने त्यांनी अनेकदा देशाचे आणि स्वतःचेही नाव उंचावले आहे. क्रिकेटमधील अनेक विक्रम त्यांच्या नावावर जमा आहेत. पण, जितकी प्रसिद्धी त्यांना समालोचानाने मिळाली तितकी फलंदाजीने मिळाली नाही.

इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व खरोखर वाखाणण्याजोगे आहे. विशेष म्हणजे आपल्या भाषेने ते क्रिकेटला असा काही तडका देतात की, तो सामना अगदी शानदार होऊन जातो.

इंग्रजी समालोचन ऐकणाऱ्या श्रोत्यांना रवी शास्त्रींचे समालोचन खूपच आवडते. त्यांचे समालोचन ऐकताना अंगावर काटे येतात इतकी त्यांची भाषा भारदस्त असते.

पण, मुख्य प्रशिक्षक पद स्वीकारल्यापासून त्यांनी समालोचन करणे बंद केले आहे.



नवज्योत सिंग सिद्धू

नवज्योत सिंग सिद्धूची भाषा आणि त्याचे पंचिंग सेन्स याचा अनेकांनी अनुभव घेतला. पूर्वी क्रिकेट टीममध्ये फलंदाज असलेल्या नवज्योत सिंग सिद्धूने समालोचक म्हणूनही काम केले आहे. सिद्धू आणि शायरीचा संबंध तर तुम्हाला माहिती आहेच. त्याने क्रिकेटच्या समालोचनातही शायरी आणली. समालोचानापेक्षाही काहीजणांना त्याची शायरीच खूप भावते. फक्त यासाठीही लोक त्याचे समालोचन ऐकतात.

राजकारण आणि टीव्ही शोमधे व्यस्त असणारा सिद्धू आजकाल क्रिकेटपासून थोडा दूर गेला आहे. पण, त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्याचे समालोचन ऐकायचे आहे. क्रिकेटपासून दूर गेलेला सिद्धू पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळावा अशी प्रत्येक क्रिकेटप्रेमीची इच्छा आहे.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

रमीज राजा

रमीज राजा हा पाकिस्तानचा क्रिकेटपटू. त्याच्या आवाजाची जादू आजही रसिकांना मंत्रमुग्ध करते.

दुबईत होणाऱ्या सामन्यांचे समालोचन रमीज राजाच करतो.

रमीज राजा इंग्रजीतून समालोचन करतो. पण, सामना जर भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा असेल तर त्याचे हिंदी मिश्रित उर्दू समालोचन ऐकायला मजा येते. रमीज राजा सोबत जर समालोचनाला कुणा भारतीय समालोचकाची साथ मिळालीच तर अगदी सोने पे सुहागा.

माइकल होल्डिंग

माइकल होल्डिंग हा वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू. मैदानातून निवृत्ती घेतली पण, क्रिकेटचे वेड डोक्यातून उतरत नव्हते. म्हणून समालोचक बनून पुन्हा एकदा क्रिकेटशी स्वतःला जोडून घेतले. आज तो एक उत्तम समालोचक म्हणून ओळखला जातो.

त्याचे समालोचन ऐकताना श्रोते क्रिकेटशी अगदी एकरूप होऊन जातात. वेस्ट इंडीज संघाचा खेळ असेल तेंव्हा तेंव्हा माइकल होल्डिंगचा आवाज आवर्जून ऐकू येतो.

टोनी ग्रेग

टोनी ग्रेग इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा कर्णधार होता. मैदानातून निवृत्ती घेतल्यावर तो समालोचानाकडे वळला.

खेळाडू म्हणूनही तर त्याने अनेकदा उत्कृष्ट कामगिरी केलीच पण, क्रिकेटचे ज्ञान आणि बोलण्याची खुमासदार शैली यामुळे श्रोते त्याच्या समालोचनाचेही फॅन बनले होते.

एखादा अगदी कंटाळवाणा सामनादेखील त्याच्या नर्मविनोदामुळे थोडाफार रस वाटे. २०१२ साली त्याचे निधन झाले. एक उत्तम समालोचक म्हणून आजही रसिक श्रोते त्याची आठवण काढतात.

आकाश चोपडा

आकाश चोपडा कधी काळी भारतीय संघात फलंदाजी करायचा. पण आजही, त्याने हिंदीतून केलेले समालोचन ऐकण्यासाठी श्रोते उत्सुक असतात. आयपीएल किंवा भारतातील मैदानावर एखादा सामना असेल तेंव्हा आपल्याला आकाश चोपडाचा आवाज हमखास ऐकायला मिळतो. आकाश चोपडाचे समालोचन म्हणजे श्रोत्यांसाठी मेजवानीच. ज्याला क्रिकेटमधील ‘क’सुद्धा काळात नाही अशा व्यक्तीलासुद्धा आकाश चोपडाचे समालोचन ऐकूण क्रिकेटची आवड निर्माण होईल. ही किमया तोच करू जाणे.

इयान बिशप

इयान बिशप हा देखील वेस्ट इंडीज क्रिकेट संघातील एक खेळाडू. दहा वर्षे ते वेस्ट इंडीज क्रिकेट संघामधे खेळाडू म्हणून राहिले. २१ सामन्यात १०० विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे. आता तो क्रिकेट समालोचानाकडे वळले आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटमधे त्याला समालोचक म्हणून जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. अनेक एकदिवसीय सामन्याचे समालोचन करताना तो दिसला आहे.

इयान चॅपेल

ऑस्ट्रेलियातील एक प्रसिद्ध समालोचक. ऑस्ट्रेलियासाठी ते नेहमीच समालोचन करताना दिसतात. तिथल्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्यांच्या सामालोचानालाच जास्त पसंती दिली जाते. इयान आणि ग्रेग या दोन्ही भावांनी क्रिकेटच्या क्षेत्रात भरभरून योगदान दिले आहे. ग्रेग तर काही काळासाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक देखील होते.

इयान यांनी बॅटखाली ठेवली आणि माईक हातात घेतला. पण, माईकवरून ते ज्याप्रकारची फटकेबाजी करतात त्यालाही श्रोत्यांची तितकीच पसंती आहे. भारत-ऑस्ट्रेलियाच्या एखाद्या सामन्यात तुम्हीही त्यांचे समालोचन ऐकले असेलच!

हर्षा भोगले

हर्षा भोगले नाव जरी मराठी वाटत असले तरी याचे समालोचन मात्र इंग्रजीतून असते. हर्षा भोगलेचे समालोचन आणि क्रीडा पत्रकारिता भारतीयांसाठी तरी नवीन नाही. हर्षा भोगले हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर क्रिकेट उभे राहते, इतका तो क्रिकेटशी एकरूप झाला आहे.

हर्षा क्रिकेटच्या जगतातील आकड्यांची गंमत ज्यापद्धतीने सांगतो ती किमया क्वचितच इतर कुणाला साधली असेल. नुसते समालोचनच नाही तर क्रिकेटशी संबधित अनेकविध माहितीही तो आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून इतरांपर्यंत पोहोचवत असतो.

समालोचक आणि त्यांचे समालोचन यामुळेही अनेकदा सामन्यांची रंगत वाढते, हा अनुभव तुम्हीही घेतला असेलच. एखाद्या सामन्याचा आणि त्यातील समालोचकाचा काही विशिष्ट अनुभव जर यानिमित्ताने तुम्हाला आठवला असेल तर आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

बेंजामिन फ्रँकलिनने एवढे शोध लावले पण कधी स्वतःच्या नावावर पेटंट नाही केलं

Next Post

ही आहे जगाच्या इतिहासातील सगळ्यात विचित्र यु*द्धांची यादी

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

ही आहे जगाच्या इतिहासातील सगळ्यात विचित्र यु*द्धांची यादी

एकेकाळी बाजारात ज्यांची विक्री केली जायची त्या गुलामांनीच भारतावर राज्य केलं होतं!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.