The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बेंजामिन फ्रँकलिनने एवढे शोध लावले पण कधी स्वतःच्या नावावर पेटंट नाही केलं

by द पोस्टमन टीम
15 January 2026
in राजकीय, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कडाडणाऱ्या विजा आणि सोसाट्याचा वारा सुटलेला असताना कोणीही कधी एकदा घरात सुरक्षितरित्या पोहोचेन आणि खिडकीतून बाहेर पाहत मग पावसाचा आनंद घेईन असा विचार करेल. त्यादिवशीही असाच सोसाट्याचा वारा सुटला होता आणि आकाशात विजा कडाडत होत्या. अशा वातावरणात घरात बसण्याऐवजी तो इमारतीच्या छतावर गेला आणि पतंग उडवू लागला. तुम्ही म्हणाल कोण होता हा वेडा माणूस? तर तो होता बेंजामिन फ्रँकलिन!

अशा वातावरणात पतंग उडवून हे सिद्ध केले की आकाशात चमकणाऱ्या विजा विद्युतभरीत असतात. यातूनच पुढे अशा विजा इमारतींवर पडल्याने जे नुकसान होते ते टाळण्यासाठी त्याने लायटनिंग अरेस्टरचा शोध लावला.

बेंजामिन यांनी अनेक छोटे मोठे शोध लावले. जे सामान्य माणसाला रोजच्या जीवनात उपयोगी ठरतील. पण, त्यांनी कधीच या संशोधनांचे पेटंट बनवले नाही. त्यांच्या मते सामान्य लोकांना या संशोधनाचा लागलीच फायदा मिळायला हवा.

लायटनिंग अरेस्टर, बायफोकल ग्लास, फ्रँकलिन स्टोव्ह, वाहनाचे ऑडोमीटर, आणि ग्लास हर्मोनिका अशा कितीतरी साधनांचा शोध त्यांच्या नावावर जमा आहे.

फक्त संशोधकच नाही तर बेंजामिन फ्रँक्लीन लेखक, प्रकाशक, आणि राजकीय नेतेसुद्धा होते. बेंजामिन हे एक बहुमुखी प्रतिभावंत होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारा हा लेख.



बेंजामिन फ्रँकलिन यांचा जन्म बोस्टनमधील मिल्क स्ट्रीट येथे १७ जानेवारी १७०६ रोजी झाला. त्यांचे वडील जोंजिया, व्यापारी होते. ते मेणबत्ती आणि साबणाचा व्यापार करायचे. त्यांच्या वडिलांना दोन बायका होत्या आणि त्यांना एकूण पंधरा मुले होती. बेंजामिन यांनी बोस्टनच्या लॅटिन शाळेतून शिक्षण पूर्ण केले. बेंजामिन तल्लख बुद्धीचे होते.

व्यवहारातही ते खूप कुशल होते. खूप लहानवयापासूनच त्यांनी वडिलांच्या व्यापारात लक्ष घालायला सुरुवात केली. शाळेपेक्षाही त्यांना व्यापारातच जास्त रस होता. अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी आपल्या भावासोबत मिळून छपाईचा उद्योग सुरु केला. भावासोबत भागीदारी केली असली तरी त्यांचा भाऊ त्यांना पटवून घेत नसे. तो नेहमीच बेंजामिनवर अन्याय करी. भावाच्या किरकिरीकडे दुर्लक्ष करून बेंजामिन छपाई आणि प्रकाशन व्यवसायातील बारकावे शिकू लागले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पण भावाचा त्रास वाढतच गेल्यावर त्यांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. १७२३ साली ते मिल्क स्ट्रीट सोडून बोस्टनला निघून गेले. बोस्टनमधे जॉन रीड नावाच्या व्यक्तीच्या घरी ते भाड्याने राहू लागले. जॉन रीड यांची मुलगी देबरोहशी त्यांची ओळख झाली. पुढे दोघांची ओळख प्रेमात परावर्तीत झाली. त्यांनी देबरोहशी लग्न केले. पण, अवघ्या काही महिन्यांतच त्यांचा संसार विस्कटला.

देबरोह त्यांच्यापासून वेगळी राहू लागली. पण, १७३० साली ते दोघे पुन्हा एकत्र आले आणि दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांशी विवाह केला.

लग्नानंतर ते फिलाडेल्फियामध्ये स्थायिक झाले. इथे त्यांनी एका प्रिंटींग प्रेसमध्ये काम सुरु केले. यानंतर बराच खटाटोप करून त्यांनी स्वतःची प्रिंटींग प्रेस सुरु केली.

पेनसिल्वेनिया येथून त्यांनी ‘दि पेनसिल्वेनिया गॅजेट’चे प्रकाशन सुरू केले. पुढे त्यांनी पुअर रिचर्डस अल्मानेकचे प्रकाशन केले. या दोन्ही पुस्तकांनी बेंजामिन यांना अमाप प्रसिद्धी आणि पैसा मिळवून दिला.

बेंजामिन एक यशस्वी व्यापारी होते, तसेच ते एक प्रयोगशील आणि यशस्वी वैज्ञानिकही होते. आकाशातील ढग विद्युतभरीत असतात, हे माहित होते. पण, त्यांच्या झटक्यापासून होणारे नुकसान कसे टाळावे याची फारशी माहिती कुणाला नव्हती. यासाठी बेंजामिन यांनी स्वतः अशाच कडाडणाऱ्या वातावरणात पतंग उडवण्याचा प्रयोग केला. यातूनच त्यांनी लायटनिंग अरेस्ट रॉडचा शोध लावला. फ्रीजिंगचा शोधही त्यांनीच लावला. त्यांच्याच शोधाचा वापर करून पुढे फ्रीज आणि एसी यांसारखी उपकरणे बनवण्यात आली.

याशिवाय त्यांना संगीतातही भरपूर रुची होती. त्यांनी स्वतः ग्लास हर्मोनिका नावाचे एक वाद्य तयार केले. त्यांच्या इतर संशोधनापेक्षाही त्यांनी बनवलेला ग्लास हार्मोनियम त्यांच्या खूपच आवडीचे होते. हे वाद्य निर्माण केल्याबद्दल त्यांना स्वतःचा खूप अभिमान वाटायचा.

बेंजामिन एक उत्कृष्ट बुद्धिबळपटू होते. अमेरिकेच्या ‘चेस हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांच्या नावाचा समावेश केलेला आढळतो. या यादीत अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटूंचा समावेश आहे.

बेंजामिन सुधारणावादी आणि पुरोगामी विचारसरणीचे होते. अमेरिकेला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळावा यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

बेंजामिन यांच्याकडे एकदा एका इसमाने वीस डॉलर उधार घेतले. बेंजामिन यांनी त्याला पैसे दिले. काही दिवसांनी तो माणूस पैसे परत देण्यासाठी बेंजामिन यांच्याकडे आला तेव्हा त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. ते म्हणाले,

“जसे मी तुला तुझ्या कामासाठी हे पैसे दिले तसेच तू देखील हे पैसे एखाद्या गरजवंताला दे. देताना त्याला अशी अट घाल की त्याने हे पैसे तुला परत न देता पुढे दुसऱ्या गरजवंताला द्यावेत आणि देताना त्यानेही त्याला अशीच अट घालावी.”

बेंजामिन यांनी सुरु केलेली ही वीस डॉलरची चेन आज देखील सुरु आहे.

त्यांनी स्वतःच्या घरातील गुलामांना स्वतंत्र केले. आपल्या मुलालाही त्यांनी तीच अट घातली. जर त्याने आपल्याकडील गुलाम स्वतंत्र केले तर आणि तरच त्याचा बेंजामिन यांच्या संपत्तीवर हक्क राहणार होता.

प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली आणि इतरांनाही तोच सल्ला दिला. बेंजामिन यांच्या सुधारणावादाची अनेक उदाहरणे त्यांच्या चरित्रातून मिळतील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

रोज एका पेगच्या बदल्यात हे वानर तब्बल ९ वर्षे रेल्वेगाड्यांना सिग्नल देत होतं !

Next Post

बेस्ट बॅट्समन, बॉलर सगळ्यांना माहित आहेत, ही आहे बेस्ट कमेंटेटर्सची यादी

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

बेस्ट बॅट्समन, बॉलर सगळ्यांना माहित आहेत, ही आहे बेस्ट कमेंटेटर्सची यादी

ही आहे जगाच्या इतिहासातील सगळ्यात विचित्र यु*द्धांची यादी

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.