The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका ऑम्लेटमुळे फ्रेंच सैन्याला यु*द्धाला जायलाच उशीर झाला होता..!

by द पोस्टमन टीम
10 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


यु*द्धात कधी कोणाचं पारडं जड होईल सांगता येत नाही. पहिल्या महायु*द्धात फ्रांसची सरशी झाली. जर्मनीला चार वर्षे ताटकळत ठेवण्यात फ्रांस यशस्वी झाला. पण, दुसऱ्या महायु*द्धात हि*टल*रच्या नेतृत्वाखालील जर्मनी चांगलीच शस्त्रसज्ज झाली होती. यावेळी जर्मनीपुढे फ्रांस नमते घेत होता.

जर्मनीच्या ह*ल्ल्यापासून बचाव करण्यासाठी फ्रांसने चारी बाजूंनी तटबंदी बांधली होती. पण, फ्रांसच्या आर्डेनिस फॉरेस्टच्या प्रदेशात गाड्या आणि इतर बांधकामाच्या कामामुळे जंगलाचे नुकसान होईल या हेतूने त्यांनी तटबंदी बांधली नाही. शिवाय, ब्रिटिशांनी जर्मनी विरोधात लढण्यासाठी सैन्य पाठवलेच होते. त्यामुळे जर्मनीशी टक्कर घेणे तितके अवघड जाणार नाही, असा फ्रांसचा समज होता.

जर्मन लष्कराचे जनरल मेनस्टेन यांनी फ्रांसच्या याच कमकुवत प्रदेशातून आत घुसण्याची कल्पना आखली. आर्डेनेसच्या जंगलात घुसून त्यांनी फ्रांस सैन्यावर ह*ल्ला करण्याचे आदेश आपल्या सैन्याला दिले. जर्मनीच्या पॅनझर तुकडीने या भागात मुसंडी मारली. या तुकडीचे जनरल एडविन यांनी शत्रूच्या इलाख्यात ५० किमी आतपर्यंत जाण्यात यश मिळवले.

जर्मन सैन्याच्या या ह*ल्ल्याने दोस्त राष्ट्रांच्या सैन्यात दुफळी माजली आली डन्कर्क परिसरात त्यातील काही सैनिकांना कैद करण्यात जर्मन सैन्याला यश देखील मिळाले.

दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने ठरवले की डन्कर्कमध्ये अडकून पडलेल्या सैन्याच्या मदतीसाठी जाऊ आणि तिथून जर्मन सैन्याला हुसकावून लावू. यावेळी फ्रेंच दलाचा कमांडर मॅक्झीम वेयगँड याला वाटले की, आपण सैन्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्यक्ष यु*द्धभूमीवर असायला हवे. त्याच्या या प्रयत्नामुळे प्रत्यक्ष यु*द्धात काही मदत होण्याऐवजी नुकसानच झाले. कारण, तो प्रत्यक्षात यु*द्धभूमीवर पोहोचेपर्यंत बराच उशीर झाला होता.



वेयगँड तेंव्हा ले बर्गेट येथे होता त्याने तिथून बेथ्यूनला जाण्यासाठी विमान पकडले. इथे तो फ्रांसच्या पहिल्या लष्करी अधिकाऱ्याला गॅस्टॉन बीलटला भेटणार होता. पण, तो जेंव्हा बेथ्यूनला पोहोचला तेंव्हा बिलट तिथे नव्हता. तिथल्या एका सैनिकाने वेयगँडला जवळच्या रेल्वे स्टेशनवर सोडले तिथून त्याने बिलटला कॅलेमध्ये भेटू असा निरोप देणारा फोन केला. कॅलेला निघण्यापूर्वी तो ऑम्लेट खाण्यासाठी एका धर्मशाळेत थांबला आणि इथेच सारा खोळंबा झाला.

वेयगँड कॅले’मध्ये पोहोचेपर्यंत बिलट तिथून येप्रेसकडे निघाला होता. येप्रेसला जाऊन तो बेल्जियमचा राजा लिओपोल्ड तिसरा याची भेट घेणार होता. वेयगँड मग येप्रेसच्या दिशेने निघाला. जर्मनीच्या हल्ल्याला घाबरून घर सोडून बाहेर पडणारे नागरिक रस्त्यावरून चालले होते. मोठ्या संख्येने लोकं बेघर होऊन रस्त्यावरून चालली होती. त्यामुळे या रस्त्यावरून गाडी जोरात चालवणेही मुश्कील होते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

कसाबसा तो येप्रेसला पोहोचला. तिथे त्याने बेल्जियमच्या राजाची भेट घेतली आणि सैन्याला मदत करण्याची विनंती केली. पुढे तो बिलटला भेटला आणि त्यालाही पुढील हल्ल्याची माहिती दिली. ब्रिटीश सैन्यदलाचा अधिकारी जॉन वेरेकलाही भेटून तो त्याच्याशीही चर्चा करणार होता. पण वेरेकची बेल्जियमच्या राजाशी आधीच भेट ठरली होती. त्यामुळे तो वेयगँडला भेटू शकला नाही. तरीही आपल्या ठरलेल्या नियोजनानुसार सारे काही पार पडेल असे समजून वेयगँड पॅरीसला निघून गेला.

बेल्जियमच्या राजाने वेरेकला फ्रेंच सैन्याला मदत करण्याचे सुचवले पण वेरेकने ही कल्पना पटली नाही. सध्या तरी ब्रिटीश सैन्य कोणत्याही प्रकारच्या लढाईसाठी सज्ज नसल्याचे त्याने सांगितले. वेरेकने वेयगँडला भेटण्याचेही रद्द केले. त्याला वाटले ब्रिटीश सैन्य कधीच हल्ल्यासाठी तयार होणार नाही.

दोनच दिवसात बिलटचा अपघाती मृत्यू झाला. फ्रेंच सैन्यात कित्येक दिवस कमांडरचे पद रिक्तच राहिले. फ्रेंच सैन्यात सगळी अशी गोंधळाची अवस्था असताना तिकडे जर्मन सैन्य मात्र फ्रांसमध्ये घुसत होते. अगदी इंच इंच लढून त्यांनी फ्रेंच सैन्याची पीछेहाट केली होती.

जर्मन सैन्यात संवाद साधण्याची यंत्रणा अतिशय सक्षम होती. त्यामुळे सैनिकांच्या तुकड्यांना कधी कोणता आदेश द्यायचा याबाबत त्यांची जराही गफलत होत नव्हती.

पुढे फ्रेंच सैन्याचा पाडाव झाला आणि जर्मनीने फ्रांसवर कब्जा मिळवला. परंतु वेयगँड जर्मनीच्या हाताखालील फ्रांस सैन्याचा मंत्री झाला. उत्तर आफ्रिकेचे जनरल पद मिळाले. व्हीची फ्रांसमध्ये असताना त्याची भूमिका जर्मन आणि नाझीवादाचे समर्थन करणारीच होती. जर्मनी विरोधात बंड करणाऱ्यांना त्याने चिरडून टाकले.

परंतु जेंव्हा दोस्त राष्ट्रांची सरशी झाली आणि त्यांनी उत्तर आफ्रिकेवर पुन्हा कब्जा मिळवला तेव्हा हि*टल*रने वेयगँडला पुन्हा अटक केली. दोस्त राष्ट्रांमुळे दक्षिणी फ्रांसही जर्मनीच्या ताब्यातून निसटला होता. शेवटी जर्मनीचा पराभव झाला आणि दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. तेंव्हा दोस्त राष्ट्रांनी वेयगँडला अटक केली. १९४६ पर्यंत म्हणजे एक वर्ष तरी तो तुरुंगातच राहिला. त्यानंतर त्याला सोडण्यात आले. तो पॅरीसला परत गेला आणि तिथेच राहिला. वयाच्या ९८व्या वर्षी पॅरीस मध्येच त्याचे निधन झाले.

वेयगँडच्या योजना योग्य वेळी अमलात आल्या असत्या किंवा त्याने चर्चा आणि निरोप पोचवण्यात वेळ घालवण्याऐवजी थेट कृती केली असती तरी त्याची झालेली ससेहोलपट थांबली असती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या माणसाने भारतात अर्थसंकल्प म्हणजेच बजेट मांडायची सुरुवात केली

Next Post

शास्त्रज्ञांनी माणसावरच केलेले हे प्रयोग वाचून कोणाच्याही अंगावर काटा येईल !

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

शास्त्रज्ञांनी माणसावरच केलेले हे प्रयोग वाचून कोणाच्याही अंगावर काटा येईल !

एकेकाळी ऑस्कर मिळवणाऱ्या अभिनेत्यावर कंगाल होण्याची वेळ आली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.