The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय संघातील खेळाडूंना BCCIने ‘हलाल’ मांस कंपल्सरी केलंय..!

by Heramb
22 November 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


काल रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियमवर सात गडी राखून भारताने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-ट्वेन्टी इंटरनॅशनल मालिकेत अजेय आघाडी घेतली आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले मुख्य कोच राहुल द्रविड तसेच नवनियुक्त टी-ट्वेन्टी इंटरनॅशनल कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नियुक्तीनंतर भारताने जिंकलेले हे पहिले सामने आहेत.

काही दिवसांपूर्वी कर्णधारपदाच्या बाबतीत बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट विश्वात वाद-विवाद आणि मतांतरे निर्माण झाली होती. आता पुन्हा बीसीसीआयमुळे नवीन वाद सुरु झाला आहे. भारतीय खेळाडूंच्या आहारमधील गोमांस आणि डुकराचे मांस वगळल्यामुळे एका नवीन, कठोर आहाराचे पालन करावे लागणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन आहार योजनेनुसार, खेळाडूंना स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी डुकराचे मांस आणि गोमांस कोणत्याही प्रकारात खाण्याची परवानगी नाही. जर कोणाला मांस खायचे असेल तर ते फक्त “हलाल” स्वरूपात असावे, खेळाडू इतर कोणतेही मांस खाऊ शकत नाहीत. असे कठोर नियम तयार करण्यात आले आहेत. 

सध्या सुरु असलेल्या मोठ्या मालिका आणि आगामी आयसीसी स्पर्धांसाठी खेळाडूंनी तंदुरुस्त राहावे यासाठी नव्या आहार योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. या नवीन आहार योजनेमुळे कोणत्याही महत्त्वाच्या मालिकेपूर्वी खेळाडूंचे वजन अनावश्यकरित्या वाढणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. काही खेळाडू कठोर बायो-बबल प्रोटोकॉलमध्ये खेळत असल्याने त्यांना हे नियम पाळणे कठीण जात आहे. ज्या खेळाडूंना दररोज मांस असलेले पदार्थ खाण्याची आवड आहे त्यांना अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

मटण तयार होण्यासाठी प्राण्याचा मृत्यू होणे आवश्यक असते. पण काही “मूलतत्त्ववादी” लोकांसाठी प्राण्यांना दोन प्रकारे मारता येतं, एक म्हणजे तुम्ही सरळ धारदार शस्त्र घेऊन एका झटक्यात प्राणी मारता, या पद्धतीला म्हणतात ‘झटका’ आणि दुसरा प्रकार म्हणजे प्राण्याच्या शरीरावर एकच घाव घालून, त्या जखमेतून प्राण्याच्या शरीरातील पूर्ण रक्त वाहून जाईपर्यंत वाट पाहायची, जेणेकरून शरीरातील रक्त संपल्यावर तो प्राणी मरेल. याच पद्धतीला म्हणतात ‘हलाल’.



हलाल केलेले मांस खाणे हे हिंदू आणि शीख धर्मात निषिद्ध आहे तर मुस्लिम फक्त हलाल मांस खातात आणि त्यांच्यावर इतर कोणत्याही प्रकारचे मांस खाण्याची कठोरपणे बंदी आहे. भारतीय संघातील बहुसंख्य खेळाडू हिंदू आहेत आणि त्यांच्या धर्मानुसार ‘हलाल’ मांस खाण्यास सक्त मनाई असताना, बीसीसीआय किंवा भारतीय संघ व्यवस्थापनाने त्यांच्या धर्माच्या विरोधात जाऊन वर्तन करण्यास खेळाडूंना भाग का पाडले असा प्रश्न उद्भवत आहे. 

भारतीय व्यवस्थापनाने किंवा बीसीसीआयने घोषणा केलेल्या नवीनतम आहार योजनेमुळे निश्चितच मोठा वाद निर्माण होईल आणि तो वाद टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आहार योजना रद्द करून खेळाडूंना कोणत्या प्रकारचे मांस खावे हे स्वतः ठरवण्याचा पर्याय देणे.

अन्न उत्पादनांचे “धार्मिक प्रमाणीकरण” हा देशात एक मोठा मुद्दा बनला आहे, कारण धर्मांध मुस्लिम “हलाल सर्टिफिकेशन”द्वारे मांसाहार तसेच शाकाहारी अन्नाच्या नियमनाची मक्तेदारी घेताना दिसत आहेत. आता तर पतंजलीसारख्या कंपन्यांनाही विविध मुस्लिम “अन्न प्रमाणन संस्थां”कडून “हलाल प्रमाणपत्र” घेण्याची सक्ती केली जाते. या संस्था सर्टिफिकेशनसाठी ५०० रुपये ते ५००० रुपये प्रति खाद्यपदार्थ इतका दर आकारतात.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम आणि भारतासह जगभरातील देशांमध्ये, मुस्लिम अल्पसंख्याक बहुसंख्य समुदायाला हलालच्या माध्यमातून त्यांच्या पद्धती आणि प्रथांचे पालन करण्यास भाग पाडत आहे. यापूर्वी, आंतरराष्ट्रीय फास्ट-फूड चेन मॅकडोनाल्ड्सने भारतामध्ये फक्त “इस्लामिक हलाल-प्रमाणित खाद्यपदार्थ” देतात असे कंपनीने घोषित केल्यानंतर ती अडचणीत सापडली होती.

मुस्लिम समाजाने आधीच मांसाहारी खाद्य उद्योगाची मक्तेदारी घेतली आहे आणि हिंदूंच्या मागासवर्गीय जाती आणि मागासवर्गीय वर्गाला बेरोजगार होण्यास भाग पाडले आहे. आता, शाकाहारी खाद्यपदार्थांच्या युनिट्सना सुरळीत चालवायचे असेल तर “हलाल प्रमाणपत्र” मिळावे असे सांगितले जात आहे.

कट्टरतावाद आणि धर्मांध मुस्लिमांच्या ऐक्यामुळे ज्या देशात बहुसंख्य ग्राहक गैर-मुस्लिम आहेत, तेथे हलाल अन्न त्यांच्या घशात बळजबरीने टाकले जात आहे. बीसीसीआय सारख्या संस्था हलालच्या धार्मिक संकल्पनेला पाठिंबा देऊन मांसाहारी खाद्यपदार्थांच्या बाजारपेठेची मक्तेदारी करण्यासाठी मुस्लिम समुदायाला मदत करत आहेत. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात एकेरी बाजूने असा धर्मभेद का केला जात आहे याचे उत्तर भारताच्या “धर्मनिरपेक्ष” प्रतिमेवर डाग लागण्याआधी मिळणे आवश्यक आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

क्रिप्टो करन्सी जुन्या झाल्या, मार्केटमध्ये नवीन गोष्ट आलीये ती म्हणजे NFT..!

Next Post

…म्हणून ‘किम जोंग’ सारखा नेता कुठल्याच देशाला मिळू नये..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

...म्हणून 'किम जोंग' सारखा नेता कुठल्याच देशाला मिळू नये..!

आपल्याकडे बिटकॉइनला अजून मान्यता नाही, आणि तिकडे बिटकॉइन सिटी तयार होतेय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.