The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रसिद्ध ‘३००’ चित्रपटाची कथा या खऱ्या लढाईवरून घेण्यात आली आहे

by Heramb
4 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


‘३०० स्पार्टन्स’च्या दंतकथा इतिहासात खूप प्रसिद्ध आहेत. या कथांमध्ये यु*द्धाच्या सर्व अवघड प्रसंगांमध्येही शत्रूविरुद्ध उभ्या ठाकणाऱ्या सैन्याचे वर्णन केलेले आहे. २००६ साली जेव्हा ‘300’ या अमेरिकन, इंग्रजी चित्रपटाने थर्मोपायलीच्या यु*द्धाची कथा सांगितली तेव्हा ही दंतकथा मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली. पण अनेक ऐतिहासिक चित्रपटांप्रमाणेच ‘चित्रपट आकर्षक आणि कथितरित्या लोकप्रिय’ बनवण्यासाठी चित्रपटकर्त्यांनी काही ऐतिहासिक तथ्ये बदलली.

खरं तर या लढाईत केवळ ३०० सैनिक नव्हते, तर सुमारे ४ हजार सैनिक होते. तरीही शत्रूंच्या भल्यामोठ्या सैन्याविरुद्ध लढणे हे अशा छोट्या सैन्यासाठी एक साहसी काम आहे. हे यु*द्ध समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम ग्रीक संस्कृती आणि इतिहासात लक्ष डोकावणे आवश्यक आहे.

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी, ८० लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले पर्शियन साम्राज्य आणि अनेक सिटी-स्टेट्समध्ये विभागलेले ग्रीस यांच्यात यु*द्धे झाली. मोठे संख्याबळ असलेले पर्शियन साम्राज्य ग्रीक साम्राज्याला त्याच्या संस्कृतीसकट नष्ट करू शकले असते. पण ‘क्वांटिटीपेक्षा क्वालिटी श्रेष्ठ असते’ याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी इतिहासातून येते आणि ग्रीक इतिहासातील थर्मोपायलीच्या लढाईने हे सिद्ध करून दाखवले.

राजा लिओनायडसच्या नेतृत्वाखालील ग्रीक लोकांच्या गटाने आणि त्याच्या स्पार्टन्सने (स्पार्टन्स म्हणजे ‘स्पार्टा’ या ग्रीक सिटी-स्टेटमध्ये राहणारे लढवय्ये) पुरातन काळातील सर्वांत मोठ्या सैन्याचा सामना केला. थर्मोपायलीची लढाई फक्त ग्रीक-पर्शियन यु*द्धांमधील निर्णायक लढाई नव्हती, तर आधुनिक स्वातंत्र्य क्रांतीच्या सुमारे २२०० वर्षांपूर्वी “स्वातंत्र्यासाठी” लढली गेलेली लढाई होती. हे ग्रीक नेमके कोण होते आणि ते या लढाईत इतक्या धैर्याने का लढले असावेत?



इसवी सनपूर्व ५४० पासून एक प्रथा ग्रीक राज्यांमध्ये पाळण्यात येत होती. सर्वच ‘स्पार्टन’ बालकांना जन्माला आल्यापासून अनेक दिव्यांना सामोरे जावे लागत असे. जन्माला आल्या आल्या नवजात बाळांची आई आपल्या नाजूक बाळांना दारूने गच्च भरलेल्या भांड्यात अंघोळ घालत असे. आयुष्यात येणाऱ्या संकटांमध्ये, सर्व प्रकारच्या संघर्षांमध्ये आणि क्रू*रतेमध्ये बाळ तग धरू शकेल की नाही हे तपासण्यासाठी असे केले जात.

जर ही चाचणी नवजात बालकाने यशस्वीरीत्या पार पडली तर त्याला नव्या चाचणीसाठी पाठवले जात. या चाचणीमध्ये ‘गॅरोसिया’ नावाच्या तीस सदस्यांच्या समितीसमोर बाळाला आणले जात असत. या समितीमध्ये प्रामुख्याने वयाची साठी ओलांडलेले वृद्ध असत. हे सदस्य बाळाच्या शरीराची चाचणी घेऊन शरीराचा कोणताही भाग अतिशय नाजूक किंवा बेडौल आहे का हे तपासत. जर बालक या अनुवांशिक चाचणीत अनुत्तीर्ण झाले तर मात्र त्याला टायगेटोस पर्वतावरील खोल तळ्यात फेकून दिले जात असत. पण ‘या’ कथेचा नायक सर्वंच बाबतीत भाग्यवान होता. जन्माला आल्यानंतर त्याने या चाचण्या उत्तीर्ण केल्या.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

या बाळाचे नाव होते ‘लिओनायडस’ . हे बाळ लष्करी सामर्थ्यावर प्रचंड विश्वास असलेल्या धार्मिक वातावरणात वाढले. लिओनायडस एका स्पार्टन राजाचा, दुसऱ्या अनेक्सान्ड्रियासचा पुत्र होता. लिओनायडस दुसऱ्या अनेक्सान्ड्रियासच्या द्वितीय पत्नीपासून झालेला मुलगा होता. लिओनायडसला राजगादी सांभाळण्याचा वारसा मिळणार नसल्याने त्याच्या वडिलांनी एक पराक्रमी यो*द्धा घडवण्याच्या दृष्टीने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षीच त्याचे सैनिकी प्रशिक्षण सुरु केले. लिओनायडसला हे प्रशिक्षण ग्रीकांच्या अगॉज (Agoge) पद्धतीने देण्यात आले. अगॉज पद्धतीचे प्रशिक्षण स्पार्टन मुलांमध्ये शिस्त, यु*द्धशास्त्रीय शिक्षण आणि शारीरिक दृढता वाढवण्यासाठी तयार करण्यात आले होते.

इतर स्पार्टन विद्यार्थ्यांप्रमाणेच लिओनायडससुद्धा कॉमन बरॅक्समध्ये राहिला, याठिकाणी त्याला लढवय्यांसाठी आवश्यक अन्न देण्यात आले. विद्यार्थ्यांना यु*द्धकला, चोरी, अन्न मिळवणे अशा ‘स्पार्टन्स’ला आवश्यक असलेल्या गोष्टी तर शिकवण्यात आल्याच पण त्याच बरोबर त्यांना लेखन, वाचन, गायन आणि नृत्य, इत्यादींचेसुद्धा प्रशिक्षण देण्यात आले. तोत्रं किंवा बोबडं बोलल्यास त्यांना शिक्षा होत असे.

प्रत्येक स्पार्टन विद्यार्थ्याला सैनिकी प्रशिक्षणामध्ये तीन खडतर पातळ्यांमधून जावे लागत असे. पैदेस (paides) ही पातळी ७ ते १७ वर्षांच्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी होती, पैदिस्कॉय (paidiskoi) ही पातळी १७ ते १९ वर्षांच्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी होती तर अंतिम आणि तिसरी पातळी हेबॉन्टेस (hebontes) ही पातळी २० ते २९ वर्षांच्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी होती.

प्रशिक्षणातील अनेक खडतर आव्हाने पेलत वयाच्या अठराव्या वर्षी लिओनायडस पैदिस्कॉय (paidiskoi) बनला आणि आता तो प्रत्यक्ष स्पार्टन सैन्यात काम करू शकणार होता. त्याला क्रिप्टिया-सिक्रेट पोलिसांमध्ये सामील व्हायची अनुमती देण्यात आली. इसवीसन पूर्व, ४६५ पासून तरुण आणि नवख्या स्पार्टन्सना हॅलो लोकांना मारण्यासाठी पाठवण्यात येत होते.

विशीमध्ये असताना लिओनायडस स्पार्टन नागरिक म्हणून, सीसीटिया क्लबचा सदस्य बनला. यामध्ये एकमेकांशी कसे संबंध ठेवायचे याबद्दल प्रशिक्षण दिले जात असत. तिशीत असतानाच लिओनायडसला राजकीय आयुष्यात सहभागी होण्याचा अधिकार प्राप्त झाला. स्पार्टान्सना मात्र अथेन्सची लोकशाही पद्धत अजिबात रुचत नव्हती.

लिओनायडसने इसवीसन पूर्व, ४९० साली जोर्जो नावाच्या मुलीशी विवाह केला, आणि विवाहानंतर एकाच वर्षाने तो स्पार्टनचा राजा बनला. त्याचा थोरला भाऊ, क्लेओमेन्सला पुत्र नसल्याने त्याचा सिंहासन रिक्त होते, तर त्याचा दुसरा भाऊ, डोरियस सिसिलीमध्ये मारला गेला होता. स्पार्टा हे एक खानदानी राज्य होते, यावर अजियाद आणि युरिपॉन्टीड शाही कुटुंबांच्या राजांनी राज्य केले होते. ते ‘हर्क्युलस‘चे वंशज असल्याचा दावा करीत असत.

इसवीसन पूर्व ४८१ साली पर्शियाच्या दुतांनी संपूर्ण ग्रीस पिंजून काढला. हे दूत पर्शियन साम्राज्याच्या आज्ञाधारकतेचे प्रतीक म्हणून  “जमीन” आणि “पाणी” मागण्यासाठी ग्रीकमधील राज्यांमध्ये फिरत होते. परंतु अथेन्स आणि स्पार्टाने नकार दिला आणि युती करून, स्वतःचा बचाव केला पाहिजे हे ठरवले. 

याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इ.स.पू. ४८१ सालच्या शरद (हिवाळा आणि उन्हाळ्यादरम्यानचा ऋतू) ऋतूमध्ये ‘कॉरिंथियन परिषद’ आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संरक्षणात्मक भूभागांवर सैन्य पाठविण्यासाठी राज्यांची युती तयार करण्यात आली. पर्शियाच्या सैन्याने हेलेस्पॉन्ट ओलांडल्याच्या बातमीने संपूर्ण ग्रीकला धक्का बसला. या संकटातून बाहेर पाडण्यासाठी थेमिस्टकल्सने थर्मोपायली किनाऱ्यावरील अरुंद रस्ता पूर्णतः अडवण्याची योजना सुचवली. यामुळे ग्रीक सैन्य येणाऱ्या आक्र*मणाला थोपवू शकले.

याचवेळी अथेन्स आणि इतर ग्रीक राज्यांच्या जहाजांना आर्टेमिसियम समुद्रधुनीचे रक्षण करण्यासाठी पाठवण्यात आले. पण इकडे ग्रीक गुप्तहेरांनी वेगळीच बातमी आणली, पर्शियन सैन्य थ्रेस आणि मॅसिडोनियामधून येत असल्याचं ग्रीक गुप्तहेरांनी कळवलं. पर्शियन लोकांनी लांबच्या अंतरावरील, धनुष्यबाणाच्या लढाईचा अवलंब केला होता. पर्शियन सैन्याची १ हजारांची एकच तुकडी, एकाच मिनिटात  १ लाख बाणांचा मारा करू शकत होती. पर्शियन घोडदळाचा उपयोग गनिमी काव्यासारख्या यु*द्धांसाठी केला जात असे. यामध्ये बाणांचा आणि भाल्यांचा मारा यांचा समावेश होता.

पर्शियाची इममोर्टल रेजिमेंट ढाल, लहान भाले, मोठ्या तल*वारी, खं*जीर आणि धनुष्य-बाणाने सुसज्ज होती. दुसरीकडे स्पार्टन्सकडे पितळाचं आवरण असलेली लाकडी ढाल, भाला, क्सिफॉस (३०-४५ सेंटीमीटर लांबीची त*लवार) अशी शस्त्रे होती, तर त्यांना मुष्ठियु*द्धाचेही प्रशिक्षण होते. प्रत्येक सैनिकाचा बचाव करण्यासाठी यु*द्धात, त्यांच्यापुढे त्यांचे सहकारी असत.

लिओनायडसने एकत्रित केलेल्या सैन्यात १००० लेसेडेओमियन्स / पीरियड्स, ‘३०० स्पार्टन हॉपलाइट्स’, ५०० मँटिनास, ५०० टेगेन्स, १००० आर्केडियन्स, ४०० कोरिंथियन्स, २००८ मायसेनान्स होते. अशा प्रकारे सैन्याची संख्या ४००० झाली. इतर ग्रीक राज्यांतील सैन्य लिओनायडसच्या सैन्यात सामील होणार होते. यामध्ये ७०० थेस्पियन, १००० मालियन, ४०० थेबन्स, १००० फोनिशियन आणि १००० लोकरियन अशा सैन्याचा समावेश होता. हे सर्व सैनिक माघार घेण्याचा विचार न करता शेवटपर्यंत लढण्यास तयार होते. स्पार्टन सैनिकांच्या एका गटाला ‘फ्लँक्स’ म्हटले जात.

पर्शियन आक्र*मण रोखण्यासाठी दोन मार्गांचे रक्षण करण्यात येणार होते. थर्मोपायली या भूभागाचे रक्षण ७ हजार ग्रीक लोकांनी केले. तर आर्टेमिशिअमचे रक्षण २७१ ग्रीक जहाजांनी केले. थर्मोपायली हे ठिकाण कठीण डोंगरी भूभाग असल्याने पर्शियन सैन्याच्या मोठ्या संख्येने ग्रीकांना काहीच फरक पडला नाही.

ग्रीक फ्लँक्सला शत्रूच्या घोडदळाने वेढल्या जाण्याची कोणतीही जोखीम नसल्याने ते पर्शियन आक्र*मण रोखण्यात यशस्वी झाले. पण फ्लँक्ससुद्धा पर्शियन सैन्यावर ह*ल्ला करू शकले नाहीत. ग्रीकांचा वीक-पॉईंट म्हणजे याच डोंगरांतून जाणारा थर्मोपायलीला समांतर असलेला रस्ता. या रस्त्यामधून ग्रीकांना वेढले जाऊ शकत होते.

पर्शियन सैन्य ग्रीकमध्ये आल्यानन्तर पाचव्या दिवशी, पर्शियाच्या राजाने ग्रीकांना कैद करण्यासाठी सैनिकांसह एक दूत थर्मोपायलीला समांतर असलेल्या रस्त्यातून पाठवला. पण त्याच रस्त्यावर ग्रीकांनी बांधलेल्या ‘फोशियन’ भिंतीमुळे तो रस्ता आणखीनच रुंद झाला होता आणि त्याठिकाणी अगदी अरुंद जागेत, खांद्याला खांदा लागत आणि लढाई झाली. यावेळी पर्शियन घोडेस्वारांनी ग्रीकांवर ह*ल्ला करण्याची घाई केली आणि ते स्पार्टन्सच्या तीक्ष्ण भा*ल्यांना बळी पडले.

पर्शियन तिरंदाजांनी स्पार्टन्सवर बाणांचा वर्षाव केला, तरीही ते स्पार्टन्सच्या अभेद्य ढालींमुळे अपयशी ठरले. याचवेळी स्पार्टन्सनी लहान भाले वापरणाऱ्या ‘इममोर्टल’ पर्शियन सैनिकांचा उत्कृष्ट लढाई तंत्राने पराभव केला. मोठ्या संख्येने ‘इममोर्टल’ सैनिक मृत्युमुखी पडले. संध्याकाळच्या सुमारास पर्शियन सैन्याने माघार घेतली. ग्रीक सैन्य जवळ जवळ अजेय होते.

परंतु फितुरीने अजेय ठरलेल्या ग्रीकांचीही पाठ सोडली नाही. एके दिवशी पर्शियन राजाच्या तंबूत दोन सैनिकांनी ‘एफियेल्ट्स’ नावाच्या एका मेंढपाळ किंवा व्यापारी असलेल्या इसमाला आणले. त्याला या डोगरी रस्त्यांमधील एक चोरवाट माहिती होती, पण त्याबदल्यात त्याने पर्शियन राजाकडे “बक्षिसाची” मागणी केली. त्याने राजाला विजय मिळवून देणारा गुप्त मार्ग प्रकट केला.

त्याने सांगितलेला मार्ग हा खिंडीचे रक्षण करणार्‍या खडकांच्या मागे, एनोपिया डोंगराच्या कड्याच्या बाजूने, पर्शियन छावणीच्या पूर्वेकडून जात होता. त्याच मार्गावरील एका टप्प्यावर एक फाटा आहे. एक रस्ता फोसिसकडे आणि दुसरा रस्ता मालिस खाडीकडे जाणारा आहे. या दुसऱ्या रस्त्यावरच ग्रीस लोकरियामधील पहिले शहर, अलपेन्स लागते.

एफियेल्ट्सने सांगितलेल्या रस्त्याने पर्शियन सैन्य गेले. पहाटे, पर्शियन सैन्याने खिंडीचे रक्षण करणाऱ्या फोशियन्सना गुप्तपणे घेरले. परंतु ओक झाडाच्या गळालेल्या पानांच्या आवाजामुळे फोसिसच्या लोकांना पर्शियन सैन्याने आपल्याला वेढा दिल्याचे कळले. पर्शियन लोकांनी त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला आणि फोशियन्सनी पर्वताकडे धाव घेतली. आणखी उशीर करणे योग्य नाही हे पर्शियन सैन्याच्या लक्षात आले होते आणि म्हणूनच त्यांनी वेळ न दवडता थर्मोपायली येथील ग्रीकांना वेढा घातला.

लिओनायडसला हेरांकडून ही बातमी मिळाली आणि त्याने यु*द्ध परिषद घेण्याचे ठरवले. काही अधिकाऱ्यांनी माघार घेण्याचे समर्थन केले, तर काहींनी लढत राहण्याची मागणी केली. स्वत: लिओनायडसने इतर सैन्याला माघार घेण्यास मार्ग करून देण्यासाठी आगाऊ दल तयार करण्याचे आदेश दिले. शेवटच्या श्वासापर्यंत लढून लिओनायडसने ३ हजार सैनिकांना वाचवण्यास प्राधान्य दिले.

पुढच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी, पर्शियन राजाने सैन्याला एका बाजूने पर्वतावर जाण्याचा आणि खाली उतरून ग्रीकांवर ह*ल्ला करण्याचा आदेश दिला. लिओनिदासच्या नेतृत्वाखाली ग्रीक लोक माघार घेण्याच्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी यु*द्धभूमीत उतरले होते. पर्शियन सैन्य जमले तसेच लिओनिदासचे सैन्यही त्या मार्गाच्या एका सोप्या भागात जमले. घाटात अंतिम लढत झाली.

फ्लँक्सनी अनेक पर्शियन सैनिकांना मारले. स्पार्टन्सने त्यांचे भा*ले आणि तल*वारी तुटेपर्यंत धैर्याने प्रतिकार केला नंतर हाताने लढण्यास सुरुवात केली. लिओनायडस रणभूमीत धारातीर्थी पडला. त्याचे साथीदार त्याचा मृतदेह परत मिळवण्यासाठी पर्शियन लोकांशी लढले. हा रक्तरंजित लढा होता आणि त्यात अनेकांचा बळी गेला. तीन दिवसांच्या लढाईत २० हजार पर्शियन लोक मारले गेले. पर्शियन तिरंदाजांनी बाणांचा वर्षाव केल्याने उरले-सुरले ग्रीकसुद्धा मारले गेले.

ग्रीक लोक एक लढाई हरले होते, यु*द्ध नाही. एका वर्षानंतर, लिओनायडसचा पुतण्या, पॉसॅनियसच्या नेतृत्वाखालील ८० हजार स्पार्टन्सने, १ लाख २० हजार पर्शियन सैनिकांचा प्लॅटिया येथे पराभव केला. थर्मोपायलीची लढाई स्पार्टन्ससाठी एक पराभव होता, परंतु, स्वातंत्र्ययो*द्ध्यांसाठी एक प्रेरणा होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जोकोविकच्याही आधी दोन कार्यकर्त्यांनी विमानाच्या पंखांवर टेनिस मॅच खेळली होती

Next Post

आदिवासींचा अभ्यास करायला गेलेला रॉकफेलर घराण्याचा वारस न*रभ*क्षक टोळीचं भक्ष्य बनला होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

आदिवासींचा अभ्यास करायला गेलेला रॉकफेलर घराण्याचा वारस न*रभ*क्षक टोळीचं भक्ष्य बनला होता

शिवनारायण चंदरपॉल आपल्या पिढीच्या लक्षात राहिला तो त्याच्या डोळ्याखालील काळ्या पट्ट्यांमुळे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.