आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
इतिहासात अशी अनेक यु*द्धं होऊन गेली, ज्यांचा प्रेरणादायी इतिहास आपण पुस्तकांमध्ये वाचत असतो. पण अनेक यु*द्धं अशी देखील आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला शिकवण्यातच येत नाही. सारागढीचे यु*द्ध हे देखील अशाच काही यु*द्धांपैकी आहे, ज्याबद्दल कोणाला फारशी माहिती नसली तरी त्यातील पराक्रमाची गाथा वाचल्यावर एक भारतीय म्हणून उर अभिमानाने भरून येतो.
सारागढीच्या या यु*द्धात २१ शीख सैनिकांनी एक, दोन नव्हे तर तब्बल १० हजार अफगाण सैनिकांचा निडरपणे सामना केला होता.
हॉलिवूडच्या ‘300’ या चित्रपटात आपण ३०० ग्रीक स्पार्टन यो*द्धयांची कथा बघितली आहे. पण इथे यो*द्धयांची संख्या फक्त २१ होती. चला जाणून घेऊ या अद्भुत पराक्रमाविषयी..
१८९७चा काळ होता, भारतात ब्रिटिशांचे वर्चस्व वाढत चालले होते. ब्रिटिश भारताच्या वेगवेगळ्या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित करत होते. त्यांनी अफगाणिस्तानवर ह*ल्ले करायला सुरुवात केली होती.
भारत-अफगाणिस्तानच्या सीमेवर दोन किल्ले होते. एक होता गुलिस्तानचा किल्ला आणि दुसरा होता लॉकहार्टचा किल्ला. हे दोन्ही सीमारेषेच्या दोन टोकांना होते. लॉकहार्टचा किल्ला ब्रिटिश सेनेसाठी होता तर गुलिस्तानचा किल्ला हा केवळ गस्त घालण्यासाठी म्हणजेच पॅट्रोलिंगसाठी होता. हा किल्ला सारागढीच्या जवळ होता. त्यामुळे याला फार महत्व होते. या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी २१ शीख सैनिकांची तैनाती करण्यात आली होती. त्यांची संख्या कमी होती, पण त्यांच्या शौर्यावर इंग्रजांना पूर्ण विश्वास होता.
ब्रिटिशांच्या सततच्या ह*ल्ल्यांमुळे अफगाण त्यांच्यावर नाराज होते, दोघांमध्ये शत्रुत्व वाढत चालले होते. दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये संघर्षाच्या भावनेने पेट घेतला होता. ब्रिटिशांना पराभव मंजूर नव्हता आणि अफगाण भारतावर आक्र*मण करण्यास उतावीळ होते.
सारागढी किल्ल्यावर वातावरण तापले होते. सारागढी तत्कालीन ब्रिटीश साम्राज्याचा भाग होते, ज्यावर अफगाणी लोक वर्चस्व प्रस्थापित करू इच्छित होते. पण हे इतके सोपे नव्हते.
१२ सप्टेंबर १८९७ रोजी सकाळी तेथे तैनात असलेल्या शीख सैनिकांचे डोळे उघडले त्यावेळी नजारा बघून त्यांची बोलतीच बंद झाली. १० हजार अफगाणी सै*निक त्यांच्याकडे कूच करून येताना त्यांना दिसत होते. एवढ्या मोठ्या संख्येने मार्गक्रमण करणाऱ्या शत्रूला रोखायचे कसे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. २१ शीख सैनिकांसाठी हे मोठे आव्हान होते.
इतक्या कठीण प्रसंगी विचार करण्यात त्यांनी वेळा घालवला नाही. त्यांनी लगेचच मोर्चा सांभाळला. आपल्या बंदुका हाती घेतल्या खऱ्या पण एवढ्या मोठ्या सैन्याला नमवायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांनी इंग्रजांच्या सैन्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु केले.
लॉकहार्टच्या किल्ल्यावर इंग्रज अधिकारी होते, शीख सैनिकांनी त्यांच्यापर्यंत निरोप पोहचवला की मोठ्या संख्येने अफगाणी सैनिक आक्रमण करत आहेत, सैन्याची मदत पाठवावी. पण सैन्य पाठवता येणार नाही असे ऑफिसरने सांगितले. त्याने शीख सैनिकांना मोर्चा सांभाळायला सांगितला.
खरंतर शीख सैनिकांनी ठरवले असते तर त्यांना माघार घेता आली असती पण त्यांनी शत्रूचा सामना करायचे ठरवले. वाहे गुरूंच्या नावाचा गजर करून ते अफगाणांचा सामना करण्यासाठी तयार झाले. अफगाण त्यांच्या दिशेने पुढे सरकत होते. शीख सैनिक त्यांच्या दिशेने बंदूका ताणून उभे राहिले. सर्वत्र वादळापूर्वीची भयाण शांतता पसरली होतो. अफगाणी सैनिकांना घोड्यांचा आवाज आला, काही वेळाने बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकू आला.
दोन्ही बाजूने अंधाधुंदपणे गोळीबार सुरु होता. काही क्षणांत अफगाण सैनिकांना लक्षात आले होते की हे यु*द्ध जिंकणे तितके सोपे नाही. ते शीख सैन्याचा प्रतीकार करू शकत नाहीत. त्यांनी एकत्रितपणे शीख सैनिकांवर ह*ल्ला चढवला पण शीख सैनिकांनी मागे न हटता तो ह*ल्ला परतवून लावला.
अफगाणांच्या एका टोळीने किल्ल्याच्या दरवाज्यांवर ह*ल्ला केला, पण यात देखील ते अपयशी ठरले. अफगाण यानंतर फारच चिडले. त्यांनी भिंतीला भगदाड पाडण्याचे प्रयत्न सुरू केले.
अफगाण सगळी ताकद लावून किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. अखेरीस किल्ल्यात घुसण्यात ते यशस्वी ठरलेच.
आता मात्र अफगाणी सैनिकांचा सामना करणे अवघड होते, असं असूनही शीख सैनिक त्यांच्याशी लढत होते. हळूहळू अफगाण त्यांच्यावर भारी पडू लागले. शीख सैनिकांना यात फार गंभीर जखमा झाल्या. २१ सैनिकांत सगळेच काही सैनिक देखील नव्हते काही काही किल्ल्यावर काम करणारे कर्मचारी होते. ते देखील प्राण पणाला लावून लढले.
अखेरीस शिखांचे मनोबल तुटण्यास सुरवात झाली. अफगाणी सैनिकांनी त्यांच्यावर आक्र*मण केले. शीख सैनिक “जो बोले सो निहाल”चा नारा देऊन त्यांच्यावर तुटून पडले. त्यांनी अफगाणी सैनिकांना चरा*चरा का*पले.
ज्यावेळी लॉकहार्टवर इंग्रजांना शीखांच्या आरोळ्यांचा आवाज येऊ लागला, त्यावेळी इंग्रजांना यु*द्धाची स्थिती समजली. पण त्यांना माहिती होते की हा आवाज काही वेळात शांत होईल.
अखेरीस तेच घडले. सर्व शीख मारले गेले. पण त्यांनी मृत्यूपूर्वी ६०० अफगाण मारले होते. काही वेळाने इंग्रज अधिकारी तिथे येऊन पोहचले आणि मोठे सैन्य घेऊन अफगाणांना पळवून लावले. २१ शीख सैनिकांनी तब्बल ६ तास हा किल्ला लढवला होता. इंग्रजांना देखील त्यांच्या पराक्रमाने तोंडात बोटे घालायला लावली होती.
सारागढीच्या यु*द्धात शीखांचा पराक्रम इतिहासाच्या पुस्तकात जागा मिळवू शकला नव्हता. पण बॉलिवूडने यावर चित्रपट तयार केला. अक्षय कुमारच्या ‘केसरी’ व रणदीप हुड्डाच्या ‘बॅटल ऑफ सारागढी’ या चित्रपटात या शीख वीरांची पराक्रमगाथा दाखवण्यात आली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










