The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खरं वाटणार नाही, पण एक देश ब्रिटिशांच्या तावडीतून आत्ताच मुक्त झालाय..!

by Heramb
7 December 2021
in विश्लेषण
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब    


बार्बाडोस या कॅरिबियन बेट-समूहातील राष्ट्राने स्वतःला प्रजासत्ताक घोषित करून इतिहासात नाव कोरले आहे. ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्याच्या ५५ वर्षांनंतर देशातील नेत्यांनी हा निर्णय घेतला. सुमारे ३ लाख नागरिकांचा हा देश आता कोणत्याही संवैधानिक राजेशाहीशी सम्बन्ध ठेवणार नाही, शिवाय नेहमीप्रमाणे ब्रिटनच्या राणीशीही कोणतीही निष्ठा ठेवणार नाही.

वसाहतवादाचे भीषण परिणाम आज अनेक आफ्रिकन आणि आशियाई देश भोगताहेत असं म्हटलं तर फारसं चुकीचं ठरणार नाही. किंबहुना उघड सत्य असून कोणीही अधिकृतपणे ते मान्य करीत नाही. वसाहतवादामुळे जीवित आणि वित्तीय हानी झाली पण त्याबरोबरच अनेक देशांची सामाजिक आणि सांस्कृतिक हानीसुद्धा होत राहिली. स्वतंत्र झालेला समाजही आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे आंधळेपणाने पालन करू लागला.



पण फक्त आशियाई आणि आफ्रिकन देशांनी वसाहतवादाचे आणि विस्तारवादाचे चटके सहन केले का? निश्चितच नाही! ‘आमच्या साम्राज्यावरील सूर्य कधीही अस्ताला जात नाही’ असे म्हणणाऱ्या ब्रिटिशांनी अमेरिका आणि आजूबाजूच्या लहान लहान बेटांवरील राष्ट्रांवरही आपली जुलमी सत्ता स्थापन केली होती. ब्रिटिशांचे वक्तव्य अतिशयोक्त नक्कीच नव्हते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरामध्ये देशांच्या स्वातंत्र्यावर अनेक चर्चा झाल्या. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी ‘जगातील प्रत्येक देशाला स्वनिर्णयाचा अधिकार हवा’ असा आग्रह धरला आणि यातच दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक राष्ट्रे स्वतंत्र झाली.

जगाच्या नकाशावर सहजासहजी दिसणारही नाही असा एक देश मात्र १९६६ पर्यन्त ब्रिटिशांच्या टाचेखाली राहिला. त्याचे नाव बार्बाडोस. हे एक बेट असून ब्रिटिशांनी सुमारे सोळाव्या शतकपासून इथं राज्य केलं. १९६६ मध्ये स्वातंत्र्य मिळूनही हा देश ‘प्रजासत्ताक’ नव्हता.

देशावर अधिकृत हुकूमत ब्रिटनच्या राणीचीच होती, ब्रिटनची राणी यापूर्वी बार्बाडोसची राष्ट्राध्यक्ष असे. सरकारी कामांमध्ये, कागदपत्रांमध्ये ‘रॉयल’ आणि ‘क्राऊन’ अशी ब्रिटिशधार्जिणे शब्द वापरले जात होते. इतकंच नाही तर देशाचं सर्वोच्च न्यायालय हे लंडनमध्ये होतं.

एकविसावं शतक सुरू झालं आणि या राष्ट्राने प्रजासत्ताक होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि अखेर ३० नोव्हेंबर २०२१ रोजी हे राष्ट्र प्रजासत्ताक म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आलं. बार्बाडोसचा प्रजासत्ताक होण्याचा खडतर प्रवास आणि त्या देशाबद्दल जाणून घेण्यासाठी हा प्रयत्न..

१९७० नंतर कॅरिबियन राज्य प्रजासत्ताक बनण्याची ही पहिलीच वेळ आहे. ब्रिजटाऊनने २००३ साली लंडनमधील प्रिव्ही कौन्सिलल हे सर्वोच्च न्यायालय रद्द करून त्रिनिदादमधील कॅरिबियन कोर्ट ऑफ जस्टिसला प्राधान्य दिले. हा बार्बाडोसच्या प्रजासत्ताक बनण्याच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा मानला जातो.

ब्रिटिश वसाहत बनल्यानंतर सुमारे ४०० वर्षांनी, बार्बाडोस हे जगातील सर्वात नवीन प्रजासत्ताक बनले आहे. प्रिन्स चार्ल्सच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात बार्बाडोसने राणी एलिझाबेथला राज्याच्या प्रमुखपदावरून हटवले. बार्बाडोसच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत, ‘हाऊस ऑफ असेंब्ली’चे अध्यक्ष ‘आर्थर होल्डर’ यांनी मेसन यांची देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्याची घोषणा केली.

नवख्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाबद्दल:

गेल्या महिन्यात बार्बाडोसच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेल्या ‘डेम सँड्रा प्रुनेला मेसन’ यांनी देशाच्या  राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे ३० नोव्हेंबर २०२१ रोजी हाती घेतली.

पंतप्रधान ‘मिया अमोर मोटली’ म्हणाले, मेसन यांची अध्यक्षपदी नियुक्ती हा देशाच्या प्रवासातील एक “सेमिनाल क्षण” आहे. ७२ वर्षीय मेसन २०१८ पासून या देशाच्या गव्हर्नर-जनरल राहिल्या आहेत. क्वीन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी लंडनमध्ये न्यायिक शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर कॅनडामध्ये न्यायिक फेलोशिप घेतली.

मेसनने शिक्षिका म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि १९७८ पर्यंत बँकिंग क्षेत्रात काम केले. त्यानंतर त्यांनी बार्बाडोसमधील बाल आणि कौटुंबिक न्यायालयात दंडाधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

मेसन यांनी १९९१ ते १९९९ या कालावधीत ‘यूएन कमिटी ऑन द राईट्स ऑफ चाइल्ड’मध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी २००५ पर्यंत बार्बाडोसच्या सुप्रीम कोर्टच्या रजिस्ट्रारचे पद भूषवले. २००८ मध्ये, बार्बाडोसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कोर्ट ऑफ अपील न्यायाधीश’ म्हणून शपथ घेणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.

२०१४ साली, मेसन ‘कॉमनवेल्थ सेक्रेटरिएट आर्बिट्रल ट्रिब्युनल’ (CSAT) च्या सदस्या असणारी पहिल्या बार्बेडियन बनल्या आणि २०१७ साली त्या न्यायाधिकरणाची पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या.

बार्बाडोसचा इतिहास:

सन १६२५ साली ब्रिटिशांनी पहिल्यांदा या बेटावर पाऊल ठेवले. बार्बाडोसला ब्रिटिशांनी ‘गुलाम समाज’ बनवले होते असे म्हटले जाते. दरम्यानच्या काळात अनेक देशांची वासहतवादाच्या तावडीतून सुटका करण्यात आली. ३० नोव्हेंबर १९६६ रोजी बार्बाडोसलादेखील स्वातंत्र्य मिळाले.  पण त्यांच्या राष्ट्रप्रमुखपदी ब्रिटनची राणीच होती. त्यामुळे कोणत्याही सरकारी आदेशात “क्राऊन” किंवा “रॉयल” असे ब्रिटिशांना संबोधलेले शब्द येत होते. मग हे तर अर्ध-स्वातंत्र्य होतं असं म्हणावं लागेल.

ध्वज, कोट, राष्ट्र-प्रतिज्ञा किंवा राष्ट्रगीत बदलण्याची कोणतीही योजना नाही.  तथापि, “रॉयल” आणि “क्राऊन” हे शब्द सर्व अधिकृत संदर्भांमधून वगळले जातील.  त्यामुळे ‘रॉयल बार्बाडोस पोलीस दल’ आता बार्बाडोस पोलीस दल होईल आणि ‘लँड्स अंडर क्राऊन’ म्हणजेच ब्रिटिश राणीच्या जमिनी आता बार्बाडोस स्टेटच्या जमिनी बनतील.

हा देश ३० नोव्हेंबर रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करत राहील, परंतु फक्त राणी एलिझाबेथ II यांना राष्ट्रप्रमुख पदावरून काढून टाकण्याच्या स्मरणार्थ नाही, तर देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष एरोल वॉल्टन बॅरो यांच्या स्मरणार्थ देखील हा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल.

प्रजासत्ताक बनण्याचे प्रयत्न:

१९७९ साली, बार्बाडोसमधील प्रजासत्ताक व्यवस्थेसाठीचे जनमत जाणून घेण्यासाठी कॉक्स कमिशनची स्थापना करण्यात आली. तथापि, जनतेला घटनात्मक राजेशाहीच्या व्यवस्थेखाली राहण्याची इच्छा आहे असा निष्कर्ष आयोगाने काढला होता.

१९९८ साली घटना समितीने देशाने प्रजासत्ताक दर्जा स्वीकारावा आणि राजेशाही संपवावी अशी शिफारस केली होती. २००३ साली बार्बाडोसने लंडनमधील प्रिव्ही कौन्सिलचा सर्वोच्च न्यायालयीन दर्जा रद्द करून त्रिनिदादमधील कॅरिबियन कोर्ट ऑफ जस्टिसला प्राधान्य दिले.

२०१६ मध्ये बार्बाडोसच्या ५०व्या स्वातंत्र्यदिनी, तत्कालीन पंतप्रधान फ्रेंडेल स्टुअर्ट म्हटले होते “राजेशाही व्यवस्थेतून प्रजासत्ताक सरकारकडे जाण्याची वेळ आली आहे”. गेल्या महिन्यात, राज्याचे नवीन प्रमुख म्हणून मेसनची घोषणा करताना, बार्बाडोसचे पंतप्रधान मिया अमोर मोटली म्हणाले होते “देशाकडे आता सर्व अधिकार असण्याची वेळ आली आहे!”

मॅसनने एका भाषणात असेही म्हटले होते, “आपला वसाहतवादी भूतकाळ पूर्णपणे मागे टाकण्याची वेळ आली आहे,” ती पुढे म्हणाली, “बार्बेडियन लोकांना बार्बेडियन राष्ट्रप्रमुख हवे आहेत.”

याप्रकारे आणखी एक देश वासहतवादाच्या बेड्यांतून मुक्त झाला!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या कार्यकर्त्याने चंद्रावर स्वतःचा हक्क सांगून तिथले प्लॉट्स विकायला काढले होते..!

Next Post

या यो*द्ध्यांमुळे ॲझटेक साम्राज्याची जगभर दह*शत होती..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या यो*द्ध्यांमुळे ॲझटेक साम्राज्याची जगभर दह*शत होती..!

भारताकडून कसोटी पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचं रेकॉर्ड आजही गब्बरच्या नावावर आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.