The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेरुसलेमच्या या सोळा वर्षीय राजाने अजिंक्य राहिलेल्या सलाउद्दीनला धूळ चारली होती!

by Heramb
25 October 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जगात अनेकविध धर्म, संस्कृती आणि परंपरा असल्याने प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपली परंपराच इतरांपेक्षा श्रेष्ठ वाटत असल्याने इतिहासात असेच अनेक संघर्ष घडले आहेत. या धार्मिक यु*द्धांमध्ये आणि संघर्षांमध्ये ज्यू आणि इस्लामच्या संघर्षाचा इतिहास मोठा आहे. जरी या दोन्ही धर्मांचे मूळ एकच असले तरी यांच्यात संघर्ष कसे होतात ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे.

ख्रिस्त धर्मीय लोक जेरुसलेमवर राज्य करत होते, तेव्हाच्या काळातील ही गोष्ट आहे. ज्यू, मुस्लिम आणि ख्रिश्चन जेरुसलेमच्या पवित्र भूमीमध्ये एकत्र राहत होते. इजिप्तपासून सीरियापर्यंत आपल्या पराक्रमाच्या जोरावर सुल्तान सलाउद्दीन या इस्लामी शासकाने आपली कीर्ती वाढवत नेली होती. त्याचा धोका जेरुसलेमला जाणवत होता. जेरुसलेमच्या रक्षणाची जबाबदारी तत्कालीन राजा अमलरिक-१ वर होती.

जेरुसलेमचा राजा अमलरिक-१ आणि त्याची पत्नी राणी अग्नेस यांच्या पोटी ११६१ साली बाल्डविन-४चा जन्म झाला. बाल्डविन हा एक अत्यंत चाणाक्ष तरुण मुलगा होता. आपला बहुतेक वेळ त्याने आपल्या वडिलांच्या दरबारात घालवला होता आणि त्याला आर्चबिशप, ‘विल्यम ऑफ टायरने’यांनी शिक्षण दिले होते. ‘उजव्या हातावर थाप मारली किंवा अक्षरशः चावले तरी संवेदना जाणवत नाहीत’ हे पाहून स्वतः आर्चबिशपनेच त्याची तपासणी केली आणि वयाच्या अवघ्या नवव्या वर्षीच त्याला कुष्ठरोग असल्याचे समजले. 

त्यावेळी समाजातील गैरसमजुती आणि अज्ञानामुळे कुष्ठरोग होणे हा एक प्रकारचा गुन्हाच होता आणि त्यासाठी थेट मृत्युदंडाची शिक्षा होती. या रोगाचे निदान झालेल्या लोकांना संपूर्ण सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत असे. पण बाल्डविन जेरुसलेमचा राजकुमार आणि एक चाणाक्ष मुलगा असल्याने त्याला यापासून संरक्षण मिळाले.

पहिल्या धर्मयु*द्धानंतर जेरुसलेमवर पुन्हा वर्चस्व स्थापन केलेल्या ख्रिश्चन लोकांच्या पाप आणि गुन्ह्यांसाठी बाल्डविनला झालेला कुष्ठरोग ही ईश्वराने दिलेली शिक्षा आहे असा इस्लामी लोकांचा विश्वास होता. बघता बघता काळ सरला, आजारपण असूनही, बाल्डविन त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जेरुसलेमवर राज्य करण्यास तयार झाला. बाल्डविन तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा एक उत्कृष्ट घोडेस्वार होता. त्याच्या दरबारातील चाणाक्ष आणि हुशार लोकांनाही त्याच्याबद्दल काहीही तक्रार नव्हती.



११७४ साली अमलरिक-१ मरण पावला आणि वडिलांच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी, वयाच्या तेराव्या वर्षी बाल्डविनला जेरुसलेममध्ये राज्याभिषेक झाला. विशेष म्हणजे जेरुसलेममध्ये फ्रेंच राजवटीचे हे अमृत महोत्सवी वर्ष होते. त्यावेळी सलाउद्दीनच्या आक्र*मणाचा धोका मोठा होता आणि बाल्डविनला या संभाव्य धोक्याची पुरेपूर जाणीव होती. त्याने सलाउद्दीनने आक्र*मण केल्यास त्याचा सामना करण्यासाठी बाल्डविनने पुरेपूर तयारी केली.

असं असलं तरी वस्तुस्थिती फारच वेगळी होती. बाल्डविन वयाने खूप लहान होता आणि कुष्ठरोगामुळे त्याची तब्येत खालावत चालली होती. त्यामुळे त्याला ११७६ पर्यंत राज्य चालवण्यासाठी अनेक राज्यपालांची मदत घ्यावी लागत होती. यांमध्ये त्याला त्रिपोलीच्या रेमंड-३ सह अनेक शासकांनीसुद्धा सहाय्य केले.

ज्या वर्षी बाल्डविन राजा बनला त्याच वर्षी, म्हणजेच ११७४ साली अलेप्पोपासून सलाउद्दीनच्या सैन्याला दूर ठेवण्याच्या उद्दिष्टाने बाल्डविनने दमास्कसवर स्वारी केली. बाल्डविनची पहिली लढाई असल्याने त्याच्यासाठी ही लढाई अत्यंत मोलाची आणि राजकीयदृष्ट्या देखील महत्त्वाची होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

बाल्डविनने या यु*द्धात सर्वोकृष्ट कामगिरी करून राज्य करण्यासाठी आपण सक्षम असल्याचे पुन्हा सिद्ध केले. आपल्या रोगाने निर्माण केलेल्या अडचणींना त्याने आपल्या राज-कर्तव्यात आडवे येऊ दिले नाही. पुढील दोन वर्षांत, बाल्डविनने अलेप्पोपासून सलाउद्दीनला दूर ठेवण्यासाठी त्याच्यावर अनेक ह*ल्ले केले. या छोट्या ह*ल्ल्यांनी सलाउद्दीनच्या तळपायातली आग मस्तकात गेली. 

नोव्हेंबर ११७७ मध्ये, सुल्तान सलाउद्दीनने एस्केलोनवर ह*ल्ला करण्यासाठी इजिप्तहून प्रयाण केले. तिकडे बाल्डविनची तब्येत बरीच खालावली होती, तो घोड्यावर स्वार होण्यासाठी फक्त एकच हात वापरू शकत होता. सोळा वर्षीय बाल्डविनने फ्रँकिश सैन्याचे नेतृत्व केले आणि शहराचे रक्षण करण्यासाठी अस्कालोनच्या दिशेने कूच केले.

सुल्तान सलाउद्दीनच्या मुस्लिम सैन्याच्या तुलनेत फ्रँकिश सैन्याची संख्या खूपच कमी होती. (३०००-४५०० फ्रँकिश सैन्य विरुद्ध २० ते २६ हजार मुस्लिम सैन्य) रॅमला जवळील मोंटगिसर्डजवळ ही दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली. बाल्डविनच्या सैन्याचा सलाउद्दीनच्या सैन्याने पुरता पराभव केला. अखेर मुस्लिम सैन्याने माघार घेतली आणि फ्रँकिश सैन्याने त्यांचा जवळजवळ बारा मैल पाठलाग केला. सुल्तान सलाउद्दीन मृत्यूच्या दाढेतून परतला होता. त्याच्या एकूण सैन्यापैकी केवळ दहा टक्केच शिल्लक राहिलेले सैन्य घेऊन तो कैरोच्या दिशेने पळून गेला.

सलाउद्दीनसाठी हा सगळ्यांत मोठा धक्का होता आणि त्यातून सावरायला त्याला बराच वेळ लागला. सोळा वर्षांच्या कुष्ठरोग-पीडित राजाचे हे सर्वांत मोठे यश होते. त्याच्या विजयामुळे तो नायक बनला. कुष्ठरोगामुळे बाल्डविनला मूल नव्हते. त्याने ‘बाल्डविन ऑफ मॉन्टफेरेट’ किंवा ‘बाल्डविन-५’ या त्याच्या पाच वर्षांच्या पुतण्याला त्याचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. २० नोव्हेंबर ११८३ रोजी, ‘बाल्डविन-५’चा ‘बाल्डविन-४’सह ‘को-किंग’ किंवा ‘सह-राजा’ म्हणून राज्याभिषेक झाला.

१६ मार्च ११८५ रोजी, वयाच्या तेविसाव्या वर्षी, बाल्डविन-४चे निधन झाले. त्याच्यावर ‘चर्च ऑफ होली सेपल्चर’मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याने जवळजवळ अकरा वर्षे जेरुसलेमवर राज्य केले. एवढ्या दीर्घकाळासाठी तो जेरुसलेमवर राज्य करेल याची कोणाला कल्पनाही नव्हती, पण तो सर्व अडचणींचा सामना करण्यास सक्षम होता. तसेच शारीरिकदृष्ट्या कमजोर असूनही बाल्डविन-४ जेरुसलेमच्या सर्वात यशस्वी राजांपैकी एक असल्याचे म्हटले जाते.

अमेरिकन अभिनेता एडवर्ड नॉर्टनने २००५ साली ‘रिडले स्कॉट’ आणि ‘विल्यम मोनाहन’ दिग्दर्शित ‘किंगडम ऑफ हेवन’ या चित्रपटात बाल्डविन-४चे काल्पनिक पात्र साकारले होते. बाल्डविन-४च्या शिक्षकांपैकी एक असलेल्या ‘विल्यम ऑफ टायर’च्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट होता. पण या चित्रपटावर अनेक इतिहासकारांनी टीका केली होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

पोर्तुगीजांच्या समुद्र सफारीच्या कौशल्यामुळे तंत्रज्ञानाची देवाणघेवाण जागतिक पातळीवर झाली

Next Post

कांगारूंना वाटलं मॅच हातात आली, परंतु कुंबळे आणि श्रीनाथने सामना खेचून आणला

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

कांगारूंना वाटलं मॅच हातात आली, परंतु कुंबळे आणि श्रीनाथने सामना खेचून आणला

डॅनियल क्रेगला रॉयल नेव्हीमध्ये रियल लाईफ ००७ जेम्स बॉण्डचा किताब बहाल केलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.