The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मध्यमवर्गीय स्त्रियांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या स्कुटरची गोष्ट

by द पोस्टमन टीम
12 February 2025
in मनोरंजन, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


नोकरी, कॉलेजच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्यांना स्वतःची गाडी असणे सोयीस्कर वाटते. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेपेक्षा आपापली गाडी असणे खूपच फायदेशीर असा विचार करणे साहजिकच आहे. आज घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक स्वतंत्र गाडी आहे. पण, काही वर्षांपूर्वी सगळ्यांनाच गाड्या घेण्याची चैन परवडत नव्हती. तेव्हा दुचाकी गाड्यांच्या किमतीदेखील सामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर होत्या. महिलांना दणकट मोटार सायकल चालवणे कठीण जायचे. नवशिक्या मुलामुलींनाही मोठी मोटार सायकल चालवायला शिकणे थोडे अवघडच वाटायचे.

अशातच, १९९७ साली बाजारात बजाजची सनी झिप आली आणि कित्येकांना दिलासा मिळाला. छोटीशी, वजनाने हलकी आणि हाताळायलाही सोपी असणारी ही गाडी लगेच शिकता येत होती.

बजाज सनी स्कूटरने त्या काळात अनेकांना खऱ्या अर्थाने “आत्मनिर्भर” बनवले.

याची जाहिरात आजही अनेकांना आठवत असेल. एक मुलगा एका मुलीला गाडी स्टार्ट कशी करायची ते शिकवतो. ती गाडी स्टार्ट करते आणि रस्त्यावरून दोन राउंड मारते. तिसऱ्या राउंडसाठी ती पुढे जाते आणि इतक्यात एक मुलगा तिला लिफ्ट मागतो. आणि ती त्या मुलाला आपल्या मागे बसवून लिफ्ट देते. तिला गाडी शिकवणारा मुलगा रागाने हात झिडकारत उभे असलेला दाखवला आहे. “Easy come, Easy go!” अशी या जाहिरातीची टॅगलाइनच होती.

फक्त गाडी स्टार्ट करायला आली की तुम्हाला गाडी आली. ही या जाहिरातीतील साधीसरळ कल्पना होती आणि ही गाडी चालवणे खरोखरच तितके सोपे होते. १९९० साली बजाजने बजाज सनी नावाने ६९सिसि इंजिनचे नवे मॉडेल आणले होते. त्याचीच सीक्वल म्हणजे बजाज सनी झिप. आर्थिक उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या या सुरुवातीच्या काळात या बजाजच्या सगळ्याच गाड्यांना बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला.



आपली गाडी असण्याचे सगळ्यांचेच स्वप्न यामुळे आवाक्यात आले होते. शिवाय, बजाजची प्रत्येक जाहिरात ग्राहकांच्या गरजा जाणून घेणारी होती. ग्राहकांना त्याच्या जाहिरातील अपील भिडायचेच. वजनाने हलक्या आणि ऑटोमेटिक गिअर असलेल्या या स्कूटरचा बॅलन्स सांभाळणे सोपे होते. शिवाय, याचे ॲव्हरेजही चांगले होते.

ज्यांनी ज्यांनी त्या काळात बजाज सनी झिप वापरली त्यांचा सगळ्यांचाच हा अनुभव होता, वजनाला हलकी आणि खिशाला परवडणारी.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

या गाडीवर फक्त बसले आणि स्टार्ट केली की लगेच चालवायला जमत असे. या गाडीने नोकरदार स्त्रियांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवले होते. त्याकाळच्या चेतक किंवा व्हेस्पापेक्षा ही गाडी चालवायला जास्त सोपी होती. त्यामुळे स्त्रिया आणि मुलींची तरी पहिली पसंती याच गाडीला होती.

बजाज सनी झिपच्या पेपर जाहिरीतीत सचिन तेंडुलकर या गाडीवर आनंदात बसलेला दाखवला होता. त्यामुळे फक्त महिलावर्गासाठी ही गाडी मर्यादित राहिली नाही. कॉलेजला जाणाऱ्या तरुणांमध्येही या गाडीची क्रेझ होती. ५० किमी प्रतीतास स्पीडने पळणाऱ्या या गाडीचे मायलेजही चांगले होते. लिटरभर पेट्रोल टाकले की किमान आठ दिवस बघायला नको. पेट्रोलच्या किंमतीही कमी असल्याने आठवड्याच्या प्रवासाचा खर्च पन्नास रुपयांपेक्षा कमीच असायचा.

सनी झिप आणि कायनेटीक लुना यांचीच त्याकाळात चलती होती. दोन्ही गाड्यांमध्ये बाजारात स्पर्धा चालायची. कायनेटिक लुनाला पुढे जागा नव्हती त्यामुळे काही सामान असेल तर ते ठेवायचे कुठे असा प्रश्न होता. पण झिप स्कूटरला पुढे पायात थोडी जागा असल्याने तिथे थोडे समान बसत होते. रोजचा बाजारहाट, किंवा इतर काही साहित्य असेल तर ते पायात ठेवता येते. कायनेटिक लुनाच्या तुलनेत सनी झिपचा हा एक मोठा फायदा होता. शिवाय, लुनाच्या तुलनेत स्कूटर थोडी मॉडर्न वाटायची. त्यामुळे लुना किंवा मोपेडपेक्षा स्कूटर वापरण्यालाच प्राधान्य दिले जायचे.

जागतिकीकरणाच्या रेट्यात सनी झिपलाही अनेक स्पर्धक निर्माण झाले. तंत्रज्ञान बदलत गेले.

लोकांच्या हातात पैसा खेळू लागला .गाडीवर थोडे जास्ती पैसे मोजण्याचीही लोकांची मानसिकता बनली. त्यामुळे सनी झिपची मागणी हळूहळू कमी होत गेली. शेवटी, २०००मध्ये बजाजने या मॉडेलचे उत्पादन बंद केले.

पण, १९९० च्या काळातील तरुण आणि तरुणींना आजही या गाडीबद्दल आकर्षण आहे. त्यांच्या ऐन जवानीत या गाडीने त्यांना साथ दिली. त्यामुळे या गाडीच्या आठवणी कधीच पुसल्या जाणार नाहीत असे अनेकांचे म्हणणे आहे.

गाडी हाताळायला आणि तिचा तोल सावरायला वेळ हा लागतोच. आजही नव्या लोकांना गाडी शिकायचे म्हटले की शिकण्यातच दहा पंधरा दिवस घालवावे लागतात. पण, चटकन सुरु केली आणि पटकन चालवली अशी गाडी जर आज उपलब्ध झाली तर अनेक जण आत्मनिर्भर बनू शकतात.

बजाजने ऑटोमोबाइल क्षेत्रात बरेच मॉडेल्स आणले. प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या प्रत्येक बाईकला मोठा ग्राहक वर्ग मिळाला. ग्राहकांचे वय, गरजा, कामाची पद्धत, त्यांना हव्या असणाऱ्या सोयी अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन आजवर बजाजने बाइक्सचे नवनवे मॉडेल्स बाजारात आणले.

बजाजची सनी झिप केवळ झटपट शिकता येणारी गाडी म्हणूनच लक्षात राहिली असं नाही. तिची जाहिरातसुद्धा लोकांच्या अजूनही आठवणीत आहे. ज्यात ती मुलगी गाडी शिकते आणि एका मुलाला लिफ्ट देते. या जाहिरातीतून भलेही त्यांना ही गाडी शिकणे किती सोपे आहे हे दाखवायचे असेल. पण त्यांनी मुली स्वावलंबी झाल्या तर त्या इतरांनाही कशी मदत करू शकतात हेही दाखवून दिले. कुणी त्यांना मदत केली म्हणून त्यांना गृहीत धरण्याची गरज नाही, हाही एक छुपा संदेश या जाहिरातीने दिला.

ज्या काळात महिलांनी घराबाहेरच्या जगात पाउल ठेवले त्याच काळात त्यांना सनी झिपसारख्या गाड्यांनी वेग दिला. त्यांना आत्मविश्वास दिला, स्वावलंबी बनवले. महिलांच्या जिद्दीला खतपाणी मिळाले. म्हणून त्याकाळात नोकरी करून आपले करिअर आणि कौटुंबिक आयुष्य यशस्वी केलेल्या महिलांचेही या गाडीशी एक अनोखे नाते जुळलेले आहे. बजाज झिपला त्याच्या आठवणीत एक वेगळे आणि अढळ स्थान आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

फ्रेंच फ्राईजचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?

Next Post

ग्लोबल वार्मिंगचा सामना करण्यासाठी या देशातील लोकांनी बनवले शेवाळापासून छप्पर

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

ग्लोबल वार्मिंगचा सामना करण्यासाठी या देशातील लोकांनी बनवले शेवाळापासून छप्पर

ना*झी सैन्याच्या जाचाला कंटाळून पळालेल्या ज्यू संशोधकामुळे झाला होता हि*टल*रचा पराभव !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.