The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साऊथ आफ्रिकेचा ‘बेबी एबीडी’ आता आयपीलमध्ये धुमाकूळ घालताना दिसणार आहे

by द पोस्टमन टीम
12 February 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


गेल्या कित्येक दशकांपासून जगाच्या विविध कोपऱ्यांमध्ये क्रिकेट खेळलं जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर हजारो खेळाडू आले अन् गेले. त्यातील काहींनी चाहत्यांच्या मनात एक अमीट छाप पाडली. जोपर्यंत क्रिकेट खेळलं जाईल तोपर्यंत त्यांची आठवण काढली जाईल, अशी काही खेळाडूंची कामगिरी आहे. आपल्या भारतात तर क्रिकेटचं प्रचंड वेड आहे. क्रिकेटला धर्म समजणाऱ्या भारतीयांच्या मनात क्रिकेटर्सला अक्षरश: देवाचं स्थान मिळतं.

आपल्या देशासाठी खेळणाऱ्या क्रिकेटर्सकडे तर सर्वजण आदराच्या भावनेनं पाहतात. त्यांना मान- सन्मान, प्रेम देतात. मात्र, जेव्हा प्रतिस्पर्धी खेळाडूंचा किंवा परदेशी खेळाडूंचा विचार येतो तेव्हा या सर्व गोष्टी आपोआप गळून पडतात. परदेशी खेळाडूंना आपोआपच असूयेच्या नजरेनं पाहिलं जातं. मात्र, आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांना जगभरात फक्त प्रेमच मिळालं आहे. ठरवूनसुद्धा त्यांचा द्वेष करता येत नाही. अशाच खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मिस्टर ‘३६० डिग्री’चा म्हणजेच एबी डिव्हिलियर्सचा समावेश होतो.

२०२१ साली एबीडीनं क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्समधून निवृत्ती घेतली आणि लाखो चाहत्यांना धक्का बसला. आपल्या लाडक्या खेळाडूला पुन्हा खेळताना पाहता येणार नाही, अशी खंत वाटली. एबीडीची खेळण्याची स्टाईल पुन्हा एकदा स्टेडियममध्ये दिसली तर..? हे कसं शक्य आहे? एबीडीनं रिटायरमेंट मागे घेतली की काय? असे प्रश्न अनेकांच्या मनात आले असतील.

जरी एबीडी स्वत: क्रिकेटमध्ये परत येत नसला तरी दक्षिण आफ्रिकेला त्याचं एक स्मॉलर व्हर्जन सापडलं आहे! डेवाल्ड ब्रेविस असं या स्मॉलर व्हर्जनचं नाव आहे. १८ वर्षीय डेवाल्ड सध्या ‘बेबी एबी डिव्हिलियर्स’ म्हणून प्रसिद्ध होत आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये हुबेहुब एबी डिव्हिलियर्सप्रमाणं खेळणाऱ्या डेवाल्ड ब्रेव्हिस या दक्षिण आफ्रिकन बॅटस्मनने सगळ्या जगाचं आपल्याकडं लक्ष वेधून घेतलं. त्यानं आपल्या खेळानं जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. अनेकांना त्यांच्या बॅटिंगमध्ये अनुभवी प्लेयर एबी डिव्हिलियर्सची झलक पहायला मिळाली. त्यामुळं लोकांनी त्याला डिव्हिलियर्स क्लोन, एबीडी 2.0, बेबी डीव्हिलियर्स, ज्युनियर एबी डिव्हिलियर्स अशा नावांनी संबोधण्यास सुरुवात केली.



एबी डिव्हिलियर्स हा आपल्या स्फोटक बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याला स्टेडियममध्ये चौफेर फटकेबाजी करताना पाहून चाहत्यांच्या डोळ्यांची पारणं फिटायची. स्टेडियमचा असा एकही कोपरा नव्हता ज्या ठिकाणी एबीडी फटके मारत नसे. डेवाल्ड ब्रेव्हिसमध्ये नेमकी हिच आक्रमता दिसते. ब्रेव्हिसनं यावर्षीच्या अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी केली. त्यानं चार मॅचमध्ये ६५, १०४, ९६ आणि ९७ धावा केल्या. ९०.५० च्या सरासरीनं आणि ८६.३९ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटसह त्यानं ३६२ धावा केल्या. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत स्पर्धेत ३०० हून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज होता. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. सलग चार डावात ५०हून अधिक धावा करणारा तो एकमेव खेळाडू होता. मैदानात चौफेर फटकेबाजी करत त्यानं ३३ फोर आणि ११ सिक्स मारले होते.

गंमत म्हणजे डेवाल्ड ब्रेव्हिस आणि एबी डिव्हिलियर्सचा जर्सी नंबर एकच आहे. ब्रेव्हिसलासुद्धा डिव्हिलियर्सप्रमाणं १७ नंबरची जर्सी घालून खेळायला आवडतं. सुरुवातीला तो एबीडीसारखीच पण आपल्या आईनं तयार केलेली जर्सी घालून खेळायचा. पण, जेव्हा तो एबी डिव्हिलियर्सला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्यानं त्याच्याकडे १७ नंबरची जर्सी घालण्याची रितसर परवानगी मागितली. एबीडीनंही त्याला सहज होकार दिला.

२००५ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर, डिव्हिलियर्स शेवटपर्यंत याच क्रमांकाची जर्सी घालून खेळला होता. त्याचा जर्सी नंबर आणि त्याच्या स्फोटक खेळाची परंपरा पुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी आता डेव्हिसनं आपल्या कोवळ्या खांद्यांवर घेतली आहे.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

ब्रेव्हिस आणि एबीडीची खेळण्याची स्टाईल सारखीचं आहे. याबद्दल ब्रेव्हिसला अनेकदा प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तो अगदी प्रांजळपणे आपली प्रतिक्रिया देतो. ‘एबीडी एक वर्ल्डक्लास प्लेयर आहे. जर मला त्याच्यासारखा १० टक्के जरी खेळ करता आला तरी माझ्यासाठी ही मोठी गोष्ट असेल. मला लहानपणापासूनच त्याच्यासारखं व्हायचं होतं. डिव्हिलियर्सची मानसिकता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची होती आणि मलाही तेच करायचं आहे. मला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी तेच केलं आणि भविष्यातदेखील तेच करण्याची इच्छा आहे’, असं ब्रेव्हिस म्हणतो.

ब्रेव्हिसचा सध्याचा फॉर्म पाहता लवकरच तो दक्षिण आफ्रिकन क्रिकेटसाठी मोठा ॲसेट ठरू शकतो, अशा प्रतिक्रिया तर यापूर्वीच क्रिकेट तज्ज्ञांनी दिल्या आहेत.

एबी डिव्हिलियर्सनं आयपीएलमध्ये सहभागी होऊन भारतीयांसोबत एक वेगळं नातं निर्माण केलेलं आहे. त्याचं अष्टपैलू असणं ही देखील सकारात्मक बाब आहे. फलंदाजीसोबतच तो उत्कृष्ट लेगस्पिन गोलंदाजीही करतो. २०२२ साली झालेल्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये या बेबी एबीडीला मुंबई इंडियन्स संघाने तब्बल ३ करोड रुपयांमध्ये विकत घेतले. 

ब्रेव्हिस एबी डिव्हिलियर्सला लहानपणापासूनच आपला आदर्श मानतो. एबीडीसारख्या महान खेळाडूंसोबत त्याची तुलना होते याबाबत त्याला आनंद वाटतो. पण, ब्रेव्हिसला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करण्याची त्याची इच्छा असून त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये आपल्या देशासाठी खेळायचं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हिजाब, बुरखा, नकाब यामध्ये काय फरक आहे जाणून घ्या…!

Next Post

राहुल बजाज यांनी स्वदेशी स्कुटरसाठी थेट इंदिरा गांधींशी पंगा घेतला होता…!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

राहुल बजाज यांनी स्वदेशी स्कुटरसाठी थेट इंदिरा गांधींशी पंगा घेतला होता...!

क्रिप्टोकरन्सीवर सरकारने कर लावला म्हणजे क्रिप्टोकरन्सीला मान्यता मिळाली का..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.