The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या यो*द्ध्यांमुळे ॲझटेक साम्राज्याची जगभर दह*शत होती..!

by Heramb
8 January 2026
in इतिहास
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एकेकाळी ॲझटेक हे मेक्सिकोमधील सर्वांत मोठे साम्राज्य होते. ॲझटेक साम्राज्यात लष्करी सेवा आणि सर्व पुरुषांना सैनिकी प्रशिक्षण घेणे अनिवार्य होते. ॲझटेक साम्राज्यात धार्मिक बलिदानांसाठी यु*द्धातील कैदी वापरले जात असत. ॲझटेक साम्राज्यात चार सामाजिक श्रेणी होत्या: थोर, सामान्य, दास आणि गुलाम. सामाजिक श्रेणीच्या या रेसमध्ये उच्च श्रेणीत जाण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे पराक्रमी यो*द्धा बनणे – जॅग्वार यो*द्धा किंवा इगल यो*द्धा. एक उच्चभ्रू यो*द्धा होण्यासाठी एका सामान्य माणसाला यु*द्धादरम्यान चार शत्रूंना कैद करावे लागत असे.

जॅग्वार आणि इगल यो*द्धे:

पूर्णवेळ यो*द्धा म्हणून काम केल्याने ॲझटेक लोक सतत यु*द्धात गुंतलेले असायचे. तर यो*द्ध्यांना ॲझटेक समाजात अनेक विशेषाधिकार मिळत होते. सामान्य माणूस यो*द्धा झाल्यानंतरच त्याला दारू पिण्याची, लग्न करण्याची आणि दागिने घालण्याची परवानगी मिळत असे.

जॅग्वार आणि इगल वॉरियर्समधील मुख्य फरक म्हणजे त्यांचे रूप. इगल वॉरियर्स गरुडाच्या पंखांनी तयार केलेले सूती चिलखत परिधान करत असत आणि त्यांच्या शिरस्त्राणांवर गरुडाचे मुंडके ठेवलेले असत. तर जॅग्वार यो*द्ध्यांचे चिलखत बिबट्याच्या कातडीपासून तयार केलेले होते आणि त्यांच्या शिरस्त्राणांवर बिबट्याचे मुंडके असायचे.

सर्वोत्कृष्ट यो*द्धे: ओटोमिन्स आणि कुहचिक्केह किंवा ‘द शॉर्न वन्स’:

सर्वोत्कृष्ट इगल आणि जॅग्वार यो*द्धे ओटोमिन्स आणि कुहचिक्केह किंवा द शॉर्न वन्स हे होते. ओटोमिन्स हे सर्वोत्तम छापेमारी सैन्य होते. हे सैन्य त्यांच्या लढाईतील पराक्रम आणि क्रू*रतेसाठी ओळखले जात असत. ते हिरवे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करून राजाच्या महालात राहत होते.



ऑटोमिन्सपेक्षाही सर्वोत्तम यो*द्धा-वर्ग कुआचिक्केह किंवा द शॉर्न वन्स होता. त्यांचे एकच ध्येय असायचे ते म्हणजे विजय, हे ध्येय साध्य न झाल्यास ते मृत्यूला जवळ करण्यातही कचरत नसत.  या यो*द्धा-वर्गात येण्यासाठी एका सामान्य यो*द्ध्याला किमान सहा कैदी आणून वीस शौर्याची कामे करावी लागत असत. ॲझटेक सैन्याचे सर्वोच्च दर्जाचे कमांडर कुआहचिक्केचे होते.

ॲझटेक यो*द्ध्यांचा मूळ उद्देश:

या सर्वोत्तम सैन्याचा मूळ उद्देश शत्रूंना मारून टाकणे नसून शत्रू कैद करणे हा होता. एखाद्या यो*द्ध्याने किती शत्रू पकडले आणि किती मारले याची मोजदाद ॲझटेकांनी ठेवली होती. याचे मुख्य कारण म्हणजे ॲझटेक साम्राज्याला धार्मिक विधींसाठी कैद्यांची गरज भासत होती. ॲझटेक यो*द्ध्यांनी त्यांची शस्त्रे प्रतिस्पर्ध्याला मारण्यासाठी नव्हे तर त्याची लढण्याची क्षमता संपवण्यासाठी वापरली.

ॲझटेक साम्राज्यातील तलवार – मॅकुआहुइटल:

मॅकुआहुइटल लाकडी तलवार ‘ओब्सिडियन’ या लाकडी ब्लेड्सच्या सहाय्याने तयार केलेली सर्वोत्तम तलवार होती. या तलवारीच्या वाराने घोड्याचाही शिरच्छेद सहजपणे होऊ शकतो अशी एक वदंता होती. परंतु ओब्सिडियन ब्लेड्स तीक्ष्ण असूनही ते फार ठिसूळ असतात आणि पोलाद अथवा लोखंडाच्या वाराने तुटून पडू शकतात. मॅकुआहुइटल तलवार वापरण्यासाठी विशेष कौशल्याची गरज असते. ॲझटेक यो*द्धा त्याच्या शत्रूला बेशुद्ध करण्यासाठी शस्त्राचा वापर करीत असत.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

धार्मिक विधिनुसार होणारी ग्लॅडिएटोरियल फाईट:

ॲझटेक लोकांमधील रात्र आणि अंधाराची देवता टेझकॅटलीपोका यांना सन्मानित करण्यासाठी धार्मिक विधिनुसार ग्लॅडिएटोरियल यु*द्ध आयोजित करण्यात येत असत.  ॲझटेक लोक यु*द्धकैद्याचा एक पाय पवित्र दगडाला बांधत असत आणि त्याला एक उपहासात्मक शस्त्र दिले जात. अशा कैद्याला चार सशस्त्र जॅग्वार किंवा इगल यो*द्ध्यांशी लढावे लागत असे. जर कैद्याने या सर्वांचा पराभव केला तर तो मुक्त होत असे. पण ते केवळ अशक्य होते.

ॲझटेक साम्राज्यातील नर*भक्षण:

ॲझटेक लोकांमध्ये ह्युत्झिलोपोचट्ली ही सूर्याची देवता होती. ॲझटेक लोक ह्युत्झिलोपोचट्लीला खूश करण्यासाठी मानवी हृदय अर्पण करत असत. तर ॲझटेक यो*द्ध्ये बली दिलेले यु*द्धकैद्यांचे शरीर खात असत. धार्मिक विधीत नर*भक्षण करणे हा एक मोठा सन्मान मानला जात होता. तसेच, असे भयंकर धार्मिक विधी आणि नर*भक्षणाच्या विधीने ॲझटेकांच्या शत्रूंमध्ये दह*शत निर्माण केली होती.

स्पॅनिश आक्रमण:

मध्ययुगीन काळात विजयी झालेले स्पॅनिश लोकंही जॅग्वार आणि इगल यो*द्ध्यांच्या पराक्रमाचा आदर करीत असत. ॲझटेक यो*द्धे मजबूत, वेगवान आणि एकाच वेळी अनेक प्रतिस्पर्ध्यांचा किंवा शत्रूंचा सामना करण्यास सक्षम होते. ॲझटेक यो*द्धे सशस्त्र स्पॅनिश सरदाराला देखील जीवे मारू शकत होते. ३० जून १५२० रोजी, हर्नन कॉर्टेस आणि त्याच्या सैन्याने, सोन्याने भरलेल्या पोत्यांसह टेनोचिट्लान येथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.  त्यावेळी इगल यो*द्ध्यांनीच इतर ॲझटेक यो*द्ध्यांना सावध केले आणि स्पॅनिश सैन्याला मोठी हानी झाली. ॲझटेक साम्राज्याच्या राजधानीतील स्पॅनिश पराभवाला ‘नाईट ऑफ सॉरोज’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

ॲझटेक हे क्रू*र, कुशल आणि बलवान यो*द्धे होते.  त्यांनी मेक्सिकोवर वर्चस्व गाजवले आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या मनात प्रचंड दह*शत निर्माण केली. अखेरीस स्पॅनिश लोकांनी १५२१ मध्ये ॲझटेक साम्राज्याचा नाश केला. ॲझटेक यो*द्ध्यांच्या पराभवाची अनेक कारणे आहेत.  स्पॅनिश आक्र*मकांनी घोडे, गनपावडर आणि स्टीलची शस्त्रे वापरली. याशिवाय ॲझटेक लोकांमध्ये स्मॉलपॉक्सचा उद्रेक झाला त्यामुळे त्यांची लोकसंख्या वेगाने नष्ट झाली. तसेच, त्यांच्या इतर शत्रू जमातीही विजयी स्पॅनिश लोकांच्या बाजूने उभ्या राहिल्या.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

खरं वाटणार नाही, पण एक देश ब्रिटिशांच्या तावडीतून आत्ताच मुक्त झालाय..!

Next Post

भारताकडून कसोटी पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचं रेकॉर्ड आजही गब्बरच्या नावावर आहे..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

भारताकडून कसोटी पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचं रेकॉर्ड आजही गब्बरच्या नावावर आहे..!

एजाज पटेलने जे स्वप्नातही पाहिलं नव्हतं ते त्याच्यासाठी आज सत्यात उतरलंय..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.