The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ही स्वमग्न व्यक्ती एका संपूर्ण शहराचं चित्र फक्त स्मरणशक्तीच्या बळावर तयार करू शकते

by द पोस्टमन टीम
8 March 2025
in विश्लेषण, आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


ऑटिझम किंवा स्वमग्नता हा आजार नसून ती एक मानसिक अवस्था आहे. स्वमग्नता किंवा ऑटिझम ही एक जन्मस्थ अवस्था आहे, हा कुठलाही मानसिक आजार नव्हे. ऑटिस्टिक व्यक्ती आपल्याच विश्वात रममाण असतात. त्यांना संवेदनांचे अर्थ लावण्यात अडचण येते त्यामुळे त्या व्यक्तींना प्रतिक्रिया देताना त्रास होतो किंवा अडचणी येतात.

स्वमग्न व्यक्तींना भाषा संप्रेषण आणि वैचारिक देवाणघेवाणीची समस्या असते. त्यामुळे त्यांचा प्रतिसाद देताना गोंधळ उडतो. म्हणूनच ही मुले भोवतालच्या जगाशी काहीही संपर्क नसल्यासारखे वागतात. आपले बोलणे त्यांच्या कानांवर पडून देखील ते नजरेला नजर देऊ शकत नाहीत. शाब्दिक प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्यावर मतिमंदत्वाचा शिक्का बसतो.

पण अनेक ऑटिस्टिक मुले हे मतिमंद नसतात. त्यांच्यात प्रचंड बौद्धिक क्षमता असते. एखादे मूल ऑटिस्टिक आहे म्हणजे सगळे संपले, त्याला आयुष्यात काहीच जमणार नाही असे नसते.

कित्येक ऑटिस्टिक मुले उत्तम कलाकार असतात. त्यांच्या भावना ते विविध कलेतून व्यक्त करतात. मोठ-मोठी आकडेमोड काही सेकंदात करतात. काहींची स्मरणशक्ती अगदी चमत्कारिक असते.

कित्येक जागतिक दर्जाचे यशस्वी खेळाडू सुद्धा ऑटिस्टिक स्पेक्ट्रममध्ये आहेत. कधी कधी ऑटिझम स्पेक्ट्रममध्ये असलेल्या मुलांना ADHD  म्हणजेच अटेन्शन डिफिसिट/हायपरऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असू शकतो. ह्या दोन्हींची लक्षणे एकमेकांच्या जवळ जाणारी आहेत. बरेचसे खेळाडू हे ADHD वर मात करून आज यशस्वी झालेले आहेत.



ऑस्ट्रेलियन जलतरणपटू मायकल फेल्प्स, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन, अमेरिकन खेळाडू ब्रूस जेनर, मॅजिक जॉन्सन, जॅकी स्टीवर्ट, टेरी ब्रॅडशॉ, ब्रूस जेनर, जेसन कीड, चार्ली हसल (पीट रोझ), द रायन एक्सप्रेस म्हणजेच नॉलन रायन, स्कॉट एयर अश्या अनेक खेळाडूंमध्ये ADHD चे निदान झाले आहे.

तरीही त्यांनी प्रचंड संघर्ष करीत आपल्या मानसिक अवस्थेवर मात करीत आपापल्या खेळात प्राविण्य मिळवून यश संपादन करत अनेकांना प्रेरणा दिली.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

ऑस्टीटिक मुलांच्या आईवडिलांनी असे खचून न जाता आपल्या अपत्याचा रस कशात आहे हे शोधून काढून आपल्या पाल्याला संधी आणि योग्य ते प्रशिक्षण मिळवून दिले तर ही मुले नक्कीच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात खूप पुढे जाऊ शकतात. त्यांच्यात ती क्षमता नक्कीच असते.

अशीच एक स्वमग्न व्यक्ती आहे जिची स्मरणशक्ती अचाट आहे. हि व्यक्ती तिच्या स्मरणशक्तीच्या बळावर संपूर्ण शहराचे चित्र काढू शकते. स्टीफन विल्टशायर असे ह्या माणसाचे नाव आहे. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत स्टीफन संवाद साधू शकत नसे. पण आता मात्र तो केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर एखाद्या शहराचे संपूर्ण चित्र काढू शकतो.

स्टीफनने हेलिकॉप्टरमधून सिंगापूर हे शहर फक्त एकदाच बघितले. त्यानंतरचे पाच दिवस त्याने चित्र काढण्यात घालवले. त्या चित्रात त्याने आकाशातून संपूर्ण सिंगापूर शहर कसे दिसते ह्याचे अगदी हुबेहूब तपशीलवार चित्र काढले होते. केवळ त्याच्या स्मरणशक्तीच्या जोरावर!

स्टीफन तीन वर्षांचा असताना डॉक्टरांनी तो स्वमग्न आहे असे निदान केले होते आणि हा आयुष्यात फार काही करू शकेल याची आशा वाटत नसल्याचे सांगितले होते. पण आता वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी स्टीफनने कलाविश्वात त्याच्या खास कलेने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

स्टीफन तीन वर्षांचा झाला तरी बोलत नव्हता त्यामुळे त्याच्या आईवडिलांना असे वाटले की काही मुलं उशिराने बोलतात तसेच स्टीफनचेही झाले आहे. त्याचे स्पीच डेव्हलपमेंट उशिराने होत आहे असे त्यांना वाटले. त्याचे आईवडील हे मूळचे वेस्ट इंडिजचे  आणि नंतर युनायटेड किंगडममध्ये स्थायिक झाले होते.

१९७७ साली तो तीन वर्षांचा असताना तो स्वमग्न आहे असे डॉक्टरांनी निदान केले. त्याच वर्षी एका मोटारसायकल अपघातात त्याच्या वडिलांचे दुर्दैवी निधन झाले.

गेल्या काही वर्षांत स्वमग्नतेवर खूप अभ्यास झाला. पण १९७० च्या दशकात स्वमग्नतेबद्दल इतकी जागरूकता नव्हती. त्यामुळे इतर स्वमग्न व्यक्तींप्रमाणेच स्टीफनसुद्धा आयुष्यात फार काही करू शकणार नाही असेच सगळ्यांना आणि अगदी डॉक्टरांनाही वाटत होते.

पण स्टीफन जसा जसा मोठा होऊ लागला तशी तशी त्याने प्रगती करून दाखवली आणि त्याच्या क्षमतांवर शंका घेणाऱ्यांची तोंडे बंद केली. वयाच्या पाचव्या वर्षांपासून स्टीफनने स्वमग्न विद्यार्थ्यांसाठी असलेल्या क्वीन्समील स्कुल मध्ये जाण्यास सुरुवात केली. त्या शाळेत शिकत असतानाच त्याला चित्रकलेत रस निर्माण झाला.

सुरुवातीला तो प्राणी आणि गाड्यांची चित्रं काढत असे. त्यानंतर त्याने लंडनमधील प्रसिद्ध इमारतींची चित्रे काढू लागला. तसेच जेव्हा त्याला शाळेत भूकंपाबद्दल शिकवले गेले, तेव्हापासून त्याने भूकंपात उध्वस्त झालेल्या इमारतींची, शहरांची काल्पनिक हवाई दृश्ये त्याच्या चितारण्यास सुरुवात केली.

या आधी त्याला अमेरिकन गाड्यांमध्ये रस निर्माण झाला होता आणि त्याने अत्यंत गुंतागुंतीचे सिटीस्केप्स काढण्यास सुरुवात केली होती. पण तो वयाच्या सातव्या वर्षापर्यंत अजिबातच बोलत नव्हता.

तो बोलावा म्हणून त्याचे चित्रकलेचे सामानच त्याच्या शिक्षकांनी लपवून ठेवले. त्यामुळे तो त्याच्या शिक्षकांकडून बोलण्यास शिकला. त्या आधी त्याने “पेपर” एकच शब्द उच्चारला होता.  वयाच्या नवव्या वर्षी तो व्यवस्थित बोलायला शिकला.

वयाच्या आठव्या वर्षीच त्याला त्याचे पहिले काम मिळाले. त्याने तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर ह्यांच्यासाठी सॅलिसबरी कॅथेड्रलचे चित्र काढले होते. दोन वर्षांनी त्याने त्याचे पहिले प्रसिद्ध काम “द लंडन अल्फाबेट” पूर्ण केले. हा लंडनच्या इमारतींच्या चित्रांचा संग्रह आहे. प्रत्येक इमारत ही २६ इंग्रजी अक्षरांवरुन घेतली आहे.

वयाच्या अकराव्या वर्षी स्टीफन बीबीसीच्या प्रसिद्ध सायन्स डॉक्युमेंटरी टीव्ही सिरीज Q.E.D मध्ये दिसला होता. १९८७ साली आलेल्या ह्या टीव्ही सिरीज मध्ये स्वमग्न पण काहीतरी अचाट करून दाखवणाऱ्या लोकांबद्दल माहिती दिली जात असे. स्टीफनच्या स्किलची परीक्षा घेण्यासाठी त्याला शो मधील लोकांनी एका इमारतीमध्ये नेले.

ती इमारत त्याने त्याआधी कधीही बघितली नव्हती. ती इमारत म्हणजे अत्यंत जुनी आणि सुंदर बिल्डींग मध्य लंडनमधील सेंट पॅनक्रास  रेल्वे स्टेशन होती. नंतर त्याला त्या इमारतीचे चित्र काढण्यास सांगितले गेले.

त्याचे ते सुंदर चित्र बघून प्रसिद्ध ब्रिटिश आर्किटेक्ट सर ह्यू कॅसन खूप प्रभावित झाले.  “He is a wonderful natural draftsman” असे त्यांनी उद्गार काढले. ते पुढे म्हणाले की, “असे नैसर्गिक आणि विलक्षण टॅलेंट मी आजवर कुणाकडेही बघितले नव्हते.

हा मुलगा खूप हुशार आहे. त्याला त्याच्यामधील टॅलेंटची जाणीव असेल अशी आशा मी करतो”. त्याच्या वयाच्या तेराव्या वर्षी त्याच्या चित्रांचे पहिले पुस्तक “ड्रॉइंग्स” प्रकाशित झाले. त्या पुस्तकाची प्रस्तावना ह्यू कॅसन ह्यांनी लिहिलेली होती, १९९८ साली तो सिटी अँड गिल्ड्स लंडन आर्ट स्कुल मधून तो ग्रॅज्युएट झाला.

 

stephen autistic artist 1 postman
Newsla

तोवर त्याची आणखी तीन पुस्तके प्रकाशित झाली होती. त्याचे १९९१ साली प्रकाशित झालेले “फ्लोटिंग सिटीज” हे पुस्तक संडे टाइम्सच्या बेस्टसेलर यादीत पहिल्या क्रमांकावर होते.

आज स्टीफन पूर्णवेळ सिटीस्केप्सचे स्केच करण्यात व्यतित करतो. त्याची चित्रे लंडनमध्ये कायमसाठी गॅलरीमध्ये ठेवण्यात आली आहेत. हजारो लोक ती चित्रे बघतात. त्याला ह्या शहराचे चित्र काढायचे असेल त्या शहरात तो हेलिकॉप्टरमधून चक्कर मारतो आणि त्यानंतर पुढचे आठ ते दहा दिवस तो ते शहर हुबेहूब एका मोठ्या कॅनव्हासवर चितारतो. कधीकधी तो प्रेक्षकांपुढे सुद्धा चित्र काढतो.

स्टीफनला २००६ साली त्याच्या कलेसाठी ‘मेम्बर ऑफ द मोस्ट एक्सेलण्ट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ हा पुरस्कार मिळाला आहे.

बहुतांश वेळेला स्टीफनला जे मानधन मिळते ते मानधन तो एखाद्या फाउंडेशनसाठी किंवा मुलांच्या कलाशिक्षणासाठी व्यतित करतो.

त्याने ऑटिष्म स्पेक्ट्रम ऑस्ट्रेलियासाठी सिडनीचे चित्र काढले. त्यासह त्याने सिंगापूर, हाँगकाँग, माद्रिद, दुबई, जेरुसलेम, लंडन आणि फ्रँकफर्ट ही शहरे चितारली आहेत.

न्यूयॉर्क शहरातील एलिस आयलंड, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, न्यू जर्सी मधील हडसन नदीचा किनारा, ब्रुकलिक ब्रिज ह्यांचीही चित्रे त्याने काढली आहेत. त्याच्या सर्वात प्रसिद्ध चित्रांपैकी एक म्हणजे रोमची स्कायलाईन होय. त्याने रोममधील पॅंथियन जेमतेम एखादा मिनिट बघितले असेल, तरी त्याने त्यातील खांब अगदी अचूक काढले आहेत.

स्टीफनची बहीण ऍनेट द गार्डियन ह्या वर्तमानपत्राशी संवाद साधताना म्हणाली की, “त्याच्या स्वमग्नतेमुळे नव्हे तर त्याच्यातील ह्या खास कलेमुळे तो आपल्यापेक्षा वेगळा ठरतो. त्याला स्वमग्नता म्हणजे काय हे काहीच ठाऊक नाही. त्याला फक्त टाके ठाऊक आहे की तो एक कलाकार, एक चित्रकार आहे आणि त्यामुळे त्याला फक्त एक चांगला चित्रकार म्हणून ओळखले जावे. स्वमग्न म्हणून नव्हे.”

खरेच आहे! स्टीफन विल्टशायर सारखे कलाकार हे दैवी देणगी लाभलेलेच आहेत. त्यामुळे ते त्यांच्या कलेमुळे आपल्यापेक्षा नक्कीच वेगळे आणि उजवे ठरतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Drawing
ShareTweet
Previous Post

इस्लामचा प्रवास विज्ञानवादाकडून धर्मांधतेकडे कसा झाला?

Next Post

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांची राष्ट्रपतीपदी निवडीमागची कथा

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांची राष्ट्रपतीपदी निवडीमागची कथा

नासाने बंद चालू करून हबल टेलिस्कोप दुरुस्त केला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.