The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

औरंगजेबाचे इस्लामी धर्मवेड आणि तथाकथित इतिहासकारांचा अप्रमाणिकपणा

by शंतनू परांजपे
7 September 2020
in विश्लेषण
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


बाराव्या शतकात महम्मद बिन कासीम याने भारतावर स्वारी केली आणि तिथून पुढे भारतावर इस्लामी आक्रमणाचे सवत सर्वत्र पसरले. बिन कासीमने पहिल्याच स्वारीत गुजरातच्या सोमनाथ मंदिराची नासधूस केली. यानंतर आलेल्या अनेक इस्कामी आक्रमकांनी हिंदूंच्या धर्मास्थळाच्या बाबतीत हेच धोरण ठेवले. पण भारतात झालेल्या इस्लामी आक्रमणांच्या बाबतीत अनेक मतमतांतरे आहेत. काहींच्या मते हा धार्मिक विध्वंस होता तर काहींच्या मते राजकीय!

मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यांनी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासनसुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत).

पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्यांचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे.

माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –



“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने विध्वंस केला. हिंदू तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या यात्रा भरत त्याला त्याने बंदी घातली. सर्वसाधारण जीवनात हिंदूंचे स्थान हे अतिशय कमी प्रतीचे आहे हे दर्शविणारी निशाणी त्याना आपल्या अंगावर बाळगावी लागत असे आणि त्याशिवाय राज्यातील हिंदू प्रजेवर एक तर्हेचा खास आर्थिक बोजा लावण्यात येई. याशिवाय औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदुना फक्त एकाच तर्हेने जगण्याचा अधिकार होता. जोपर्यंत एखादा माणूस हिंदू म्हणून जीवन जगत होता तोपर्यंत त्यांना स्वर्ग व पृथ्वी ही सारख्याच तर्हेने बंद होती.”

– संदर्भ- औरंगजेबाचा इतिहास (A Short History Of Aurangjeb) – सर जदुनाथ सरकार, अनुवाद भ. ग. कुंटे. (पृ. क्रमांक. ९६१)    

याच ग्रंथात आणखी अनेक वाक्ये आहेत, ती अशी

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

“त्याच्या अंगातील हे सारे गुण पक्षपाती होते. त्याचे मन हिंदूंच्या द्वेषाने भरलेले असे” – पृ. क्रमांक. ५

“कालांतराने प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यावर त्याने हिंदुंवर जिझीया कर लावून त्याचा मनसुबा दाखवला. इतकेच नव्हे तर कशी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यात आणि छत्रपती संभाजी यांना कैद केल्यावर ‘राजकीय विरोधक’ नव्हे तर हिंदूधर्मीय म्हणून हाल हाल करून मानण्यात औरंगजेबाने धन्यता मानली.”
(पृ. क्रमांक. १७)

“औरंगजेबाच्या पालमाऊ मोहिमेत त्याने पाठवलेल्या पत्रात तो असे म्हणतो की, “राजा मुसलमान होत नसल्यास त्याचा नाश करावा.” – पृ. क्रमांक. २२५

याउपर औरंगजेबाने केलेल्या हिंदू मंदिरांच्या नाशाची उदाहरणे पाहू –

  1. १६४४मध्ये गुजरातच्या सुभादारीवर असताना औरंगजेबाने अहमदाबाद येथील चिंतामणीचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी त्यानी गुजरातमधली अनेक देवालये पाडली.
  1. ओरिसा प्रांतातील कटकपासून मेदिनीपुरच्या दरम्यान असणाऱ्या प्रत्येक खेड्यातील अधिकाऱ्यांना त्याने निरोप पाठवला की मागील १०-१२ वर्षात बांधण्यात आलेले प्रत्येक देऊळ पाडून टाका.
  1. ९ एप्रिल १६६९ रोजी त्याने एक सर्वसाधारण फतवा काढला त्यानुसार ‘काफरांच्या सर्व शाळा व देवालये’ पाडून टाकण्यात यावी.
  1. दारा शुकोहने मथुरेच्या मंदिराला एक दगडी कठडा बांधला आहे असे जेव्हा याला कळले तेव्हा त्याने तो कठडा पाडून टाकण्याचा हुकुम काढला.
  1. याउपर त्याने १६७० च्या जानेवारीत ते देऊळ साफ पाडून टाकण्यात यावे आणि मथुरेचे नामकरण इस्लामाबाद असे ठेवण्यात यावे असा हुकुम पाठवला.
  1. १६८० मध्ये जयपूर या राज्याची राजधानी असलेल्या अंबर येथील देवळांचा विध्वंस केला. लक्षात घ्या जयपूर हे मांडलिक होते मुघलांचे.
  1. १६७४ मध्ये गुजरातच्या सुभ्यातील धार्मिक सनदांच्या रूपाने हिंदूंच्या ताब्यातील सर्व जमिनी जप्त करण्याचा हुकुम याने दिला.

अजून काही औरंगजेबाची ‘राजकीय कृत्ये’

  1. ९ मे  १६६७ रोजी मुसलमान विक्रेत्यांना द्यावी लागणारी जकात त्याने पूर्णपणे रद्द केली पण हिंदुना ती कायम ठेवण्यात आली.
  2. एखादा हिंदू मुसलमान झाल्यास त्यांना मोठ्या मोठ्या बक्षीसा तो देत असे तसेच सरकारी नोकरीत मोठ्या मोठ्या जागा देत असे.
  3. हिंदूंचा सण दिवाळी आणि होळी हे सण गावाबाहेर साजरे करण्यात यावेत असा हुकुम त्याने काढला.
  4. सरकारी नोकरीत मुसलमान असले पाहिजेत असा नियम त्याने काढला.

उदाहरणे देऊन हात थकतील पण उदाहारणे संपणार नाहीत. एवढी सारी उदाहरणे देऊन सुद्धा काही जण औरंजेबाच्या दरबारातील एका फारसी फर्मानाचा उल्लेख करतात ज्यात ‘औरंगजेबाने पैसे घेऊन मंदीर पाडले नाही’ असा उल्लेख असतो आणि त्यावरून औरंगजेबाचा राज्य विस्तार हा फक्त राजकीय होता आणि धर्माची जोड नव्हती असे प्रतिपादन करतात तेव्हा खरेच वाईट वाटते.

एक उदाहरण तेही लाचखोरीचे आणि त्याविरुद्ध ही इतकी सारी. श्री. गजानन मेहेंदळे सरांच्यामते असे कोणतेही फर्मान नाही हे विशेष.

मला औरंगजेबाबद्दल वैयक्तिक वाद मुळीच नाही. तो किती साधा होता, त्याला खर्च करायला आवडत नसे, फलाण-बिलाण जरूर असेल. औरंगजेब इतिहास आहे आणि इतिहास म्हणूनच वाचला गेला पाहिजे हे खरे आहे.

पण मजसारख्या सामान्य वाचकाला इतक्या स्वच्छपणे जे दिसू शकते ते शिवाजी राजांचा अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना कळू नये यात दुर्दैव आहे. यापेक्षा सर जदुनाथ सरकारांचे पुस्तक एकदा वाचले असते तर कदाचित औरंगजेब नकीच कळला असता.

औरंगजेबाचे स्वधर्मवेड लपवून पुढच्या पिढीला सांगून काय हाशील?? अनेक जण म्हणतात शिवाजी कळण्यासाठी औरंगजेब कळायला हवा, अगदी खरे आहे ते. औरंगजेबाचे धर्मवेड पाहून राजांना समर्थांनी दिलेले विशेषण लागू पडते ते म्हणजे ‘या भूमंडळाचे स्थायी धर्मरक्षी ऐसा नाही’!


सदर लेख SP’s travel stories वर पूर्वप्रकाशित.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जाणून घ्या, भारतामध्ये “स्त्री”ची शक्तीरुपात पूजा का केली जाते..?

Next Post

महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचे ब्रिटीशांनी काढलेले हे पेंटिंग्ज तुम्ही पाहिलेत का…?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचे ब्रिटीशांनी काढलेले हे पेंटिंग्ज तुम्ही पाहिलेत का...?

भटकंती: छ. संभाजीनगरची नहर-ए-पाणचक्की

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.