The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डिसइन्फेक्शन टनेल कोरोनापासून बचावासाठी खरंच उपयुक्त आहेत काय..?

by द पोस्टमन टीम
4 June 2020
in आरोग्य, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


सध्या कोरोनाच्या जीवघेण्या आजाराने जगभरात जे थैमान घातलं आहे ते तर आपण पाहतोच आहेत. आजाराबरोबर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी असणाऱ्या उपाययोजना सुद्धा आल्याच. मग त्यात मास्कस् असतील सॅनिटायझर असेल किंवा मग डिसइन्फेक्शन टनेल्स असतील.

भारताच्या कित्येक राज्यांत सुरक्षा उपाययोजनांमध्ये समावेश असणाऱ्या डिसइन्फेक्शन टनेल्सचा सार्वजनिक ठिकाणी वापर होतो आहे. 

आता काही दिवसांत ताळेबंदी उठल्यावर सगळं सुरळीत चालू होईल, कोरोनाची साथ जरी कमी झाली तरी हा रोग पूर्णपणे लवकर संपेलच असं नाही. तेव्हा सर्वांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी डिसइन्फेक्शन टनेल्स बसवण्यात येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या डिसइन्फेक्शन टनेल्समधून जावं लागणार आहे. काही ठिकाणी तर याचा वापर फार आधीपासूनच चालु सुद्धा झाला आहे.

पण प्रश्न हा आहे की हे टनेल्स खरंच किटाणूला मारतात? या टनेल्सच्या वापरामुळे मानवी शरीरावर काही दुष्परिणाम होतो का?



तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, काश्मीर, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश, दिल्ली यांसारख्या राज्यात वापरले जाणारे डिसइन्फेक्शन टनेल्स शेतीबाजार, पोलीस ठाणे तसेच अजूनही सार्वजनिक ठिकाणी वापरले जात आहेत.

जेव्हा व्यक्ती या टनेलमधे प्रवेश करतो तेव्हा त्याच्यावर सोडियम हायपोक्लोराईडचा स्प्रे मारला जातो. हायपोक्लोराईड हे जंतूंच्या प्रतिबंधासाठी उपयोगी केमिकल असून ते संपूर्ण किटाणूंना नष्ट करतं असे दावे करण्यात आले आहेत. हे एक कमर्शिअल केमिकल आहे जे ब्लिचिंग, क्लीनिंग यासाठी वापरण्यात येतं.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

जलतरण तलावात किंवा सांडपाणी शुध्दीकरणकेंद्रात या केमिकलचा प्रामुख्याने वापर केला जातो. ०.५% w/v या प्रमाणात हे केमिकल जखमेवर जंतुनाशक म्हणून वापरलं जातं. बऱ्याच देशात १ ते ५% w/v या प्रमाणात वापर करण्यात येतो पण भारतात तरी अजून एवढ्या प्रमाणात वापर केल्याची माहिती प्राप्त नाही.

हे डिसइन्फेक्शन टनेल्स वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. आकारानुसार त्यांच्या किमती ठरत जातात.

अगदी बेसिक टनेलची किंमत दहा हजार इतकी आहे तर इतर सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेले डिसइन्फेक्शन टनेल्स पंचवीस लाखांपर्यंत सुद्धा उपलब्ध आहेत.

आउटलुक या नियतकालिकाचा रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की आपल्या महाराष्ट्रात भुसावळ इथे बसवण्यात आलेले डिसइन्फेक्शन टनेल हे दहा हजार रुपये इतक्या किमतीचे असून त्याची ५०० लिटरची साठवण क्षमता आहे. हे टनेल न थांबता १५ तासांपर्यंत फवारा मारू शकतं.

या डिसइन्फेक्शन टनेल्सबाबत संशयित स्थिती पाहायला मिळत आहे. द हिंदूने दिलेल्या एका रिपोर्टमध्ये असं वाचायला मिळतं की मेडिकल रिसर्च संस्था असलेल्या पीजीआईएमईआर या संस्थेचे कोविड १९ बचाव विभाग प्रमुख डॉ. जे येस ठाकूर यांनी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली माहिती सांगितली. त्यात ते म्हणतात हे केमिकल जंतुनाशक पृष्ठभाग साफ करण्यासाठी आहेत, मानवी शरीर स्वच्छ करण्यासाठी नाही, तसेच या केमिकलमुळे लोकांना त्रास होऊ शकतो.

पंजाबच्या आरोग्य विभागाने या टनेल्सचा राज्यात वापर न करण्याचा सूचना राज्यात दिल्या आहेत.

डायव्हर्सि या स्वच्छतेच्याबाबतीत जगात अग्रगण्य असणाऱ्या संस्थेने असं म्हटलं आहे की आपल्या कपड्यांवर किंवा शरीरावर जर एखादा विषाणू असेल तर तो या टनेल्समधून केल्या जाणाऱ्या फवाऱ्याने नष्ट होईलच असे नाही. तसेच एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाचा विषाणू असेल तर तिथे या टनेलचा काहीच उपयोग होणार नाही. त्याचं कारण विषाणू हा शरीराच्या आत असणार आणि तिथे स्प्रे होत नाही. तर हा जंतू त्या व्यक्तीच्या थुंकीत/लाळेत नक्कीच राहीलं.

या केमिकलच्या फवाऱ्याने श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ शकतो तसेच डोळे, त्वचा यासारख्या अवयवांना खाजेचा त्रास होऊ शकतो. त्याबरोबरच या केमिकलमुळे फुफ्फुसांना सुद्धा त्रास होऊन श्वसनचा गंभीर आजार होऊ शकतो.

दुसरीकडे पाहायचं झालं तर असंही होऊ शकतं की या टनेलमधून एखादा निरोगी व्यक्ती गेल्यानंतर टनेलच्या दुष्परिणामामुळे निरोगी व्यक्तीमध्ये सुद्धा खोकला, शिंका यांसारखे कोरोनाचे लक्षणं दिसू शकतात.

या डिसइन्फेक्शन टनेलचा वापर आपल्याला सुरक्षित ठेवणार की नाही हे तर येणारा काळच सांगेल!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

काय आहे चीनच्या मदतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये होऊ घातलेल्या धरणाचा वाद?

Next Post

मुंडे साहेबांनी मुंबईतून अंडरवर्ल्डची दहशत कायमची संपवली होती..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

मुंडे साहेबांनी मुंबईतून अंडरवर्ल्डची दहशत कायमची संपवली होती..!

ती मुकी हिरकणी माणसाला माफ करेल का?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.