The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेत लोकांनी मास्क विरोधी चळवळ उभी केली होती

by द पोस्टमन टीम
30 May 2020
in आरोग्य, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


१९१८ मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लुच्या साथीने जगभरात हाहाकार माजवला होता. तब्बल ५ कोटी लोकांचा जीव ह्या महामारीत गेला होता. एकट्या अमेरिकेत ही संख्या ६ लाख ७५ हजार इतकी होती. ही महामारी जेव्हा अमेरिकेत आली त्यावेळी काय नियम बनवण्यात आले आणि ते कसे मोडले गेले याचे अनेक किस्से नमूद करण्यात आले आहेत.

स्थानिक प्रशासनांनी अमेरिकेत ह्या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अनेक नियम घालून दिले होते. शाळा बंद होत्या, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे आणि कार्यक्रम घेणे यावर बंदी होती, सार्वजनिक ठिकाणी थुंकायला मनाई होती, रुमाल आणि टिशूचा वापर करणे गरजेचे होते. इतकंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे बंधनकारक होते.

ह्या फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांत मास्क घालण्याची सक्ती करण्यात आली होती. तो काळ होता पहिल्या महायुद्धाचा. तेव्हा मास्क घालणं हे देशभक्तीचे लक्षण समजले जात होते.

याच देशभक्तीच्या भावनेतून सॅन फ्रान्सिस्को, सिएटल, डेनवर आणि फिनिक्स या ठिकाणी लोक मास्क घालत तर होते पण मास्कबद्दल लोकांच्या तक्रारी पण वाढत चालल्या होत्या.



लोकांना मास्क आरामदायक वाटत नव्हते. त्याचा काही उपयोग होत नाही, अशी लोकांची धारणा होती. लोकांच्या मते मास्क लावले तर त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत होता.

मास्कबद्दल लोकांच्या मनात आधीपासूनच तक्रारी होत्या. काही सरकारी अधिकारी देखील मास्क न घालता फिरताना आढळून आले. सैनिकांच्या सुरक्षेसाठी म्हणून सरकारने मास्क घालायची सक्ती केली होती. आता युद्ध संपल्यानंतर ते मास्क घालायची गरज उरली नव्हती.

यातूनच मास्कच्या विरोधात एका ‘अँटी मास्क लीग’ची सुरुवात करण्यात आली.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

आज आपण कोरोनाचा सामना करतोय तर आपल्याकडे गुणवत्तापूर्ण N95 दर्जाचे मास्क आहेत. परंतु स्पॅनिश फ्लूच्या काळात १९१८ साली एवढी प्रगती झालेली नव्हती.

सर्जिकल मास्कच्या निर्मितीसाठी जो जाळीदार कपडा वापरला जात होता, त्याच कपड्याचा वापर करून सामान्य लोकांसाठी मास्क तयार करण्यात येत होते. रेडक्रॉस ह्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हे मास्क जनतेत वितरित केले होते. परंतु सर्वांना हे मास्क वापरणे सोयीचे नव्हते.

एकीकडे डॉक्टर जाळीदार कपडा वापरूनच अजून चांगले मास्क तयार करावे अशा विचारात होते तर दुसरीकडे मास्कशी निगडित निरनिराळ्या फॅशन बाजारात येत होत्या. काही लोक मास्क जाळीदार असल्याने त्यातील खड्डयात बोटं घालून फोटो काढून मास्कची खिल्ली उडवत होते.

आधी फार कमी प्रमाणात लोक बिना मास्कचे सार्वजनिक ठिकाणी जायचे, त्यात पण कुठल्याही वैद्यकीय सल्ला न घेता फक्त मास्कमुळे अडचण येते म्हणून लोक मास्क घरी ठेवायचे. लोकांना मास्क घातलं की ऊन आणि दमटपणामुळे त्रास होत होता.

आता लोकांना मास्क घालणे सक्तीचे करणे पोलिसांना त्रासदायक झाले होती. अनेक तज्ञांनी लोकांना गंभीर आजारपणापासून बचावासाठी मास्क महत्वाचे आहे असे सांगितले. तरीही लोक ऐकत नव्हते.

१९१८ च्या शेवटी ज्या शहरात कमी लोक होते आणि मास्कचा विरोध करत होते, त्यांच्यासाठी काही कडक नियम लागू करण्यात आले. त्यांना तुरुंगवास आणि वृत्तपत्रात बदनामीची शिक्षा देखील सुनावण्यात आली. इतकंच नाही सॅन फ्रान्सिस्कोच्या एका अधिकाऱ्याने मास्क घातला नाही म्हणून त्याला गोळी मारण्यात आली होती.

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये मास्क घालण्याच्या सक्तीचे उल्लंघन केल्याचे एका बॉक्सिंग मॅचमध्ये दिसून आले होते. तिथे सुपरवायजर, काँग्रेसचा सदस्य, एक सरन्यायाधीश, शहराचा वैद्यकीय अधिकारी इतकेच नाहीतर महापौर असे अनेक महत्त्वाचे लोक मास्क न घालता येऊन बसले होते.

हे प्रकरण बातम्यांमध्ये आल्यावर प्रचंड गदारोळ निर्माण झाला. आरोग्य अधिकारी आणि महापौर यांनी प्रत्येकी ५ आणि ५० डॉलरचा दंड देखील भरला. परंतु कोणालाच जेलमध्ये जावं लागलं नाही.

History.com या वेबसाईटनुसार १९१८ -१९ या काळात मास्क घालणे हे फारच कृतिशीलतेचे लक्षण समजले जाऊ लागले. याची माहिती इतिहासकारांकडे देखील नाही आहे.

परंतु ज्याठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे अशा ठिकाणी मास्क घातल्याने संसर्ग टळतो हे लक्षात आल्यावर बहुसंख्य लोकांनी मास्कचा वापर करायला सुरुवात केली. पुढे स्पॅनिश फ्लूचे संकट नाहीसे झाल्यावर मास्कचा वापर फारच कॉमन गोष्ट झाली होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: n95 masks
ShareTweet
Previous Post

सरकार मंदिरांची संपत्ती ताब्यात घेऊ शकतं का..?

Next Post

..आणि डॉक्टर आघारकरांमुळे होमी भाभांचं शिक्षण पूर्ण झालं!

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
Next Post

..आणि डॉक्टर आघारकरांमुळे होमी भाभांचं शिक्षण पूर्ण झालं!

कशी आहे सगळीकडे चर्चेत असलेली 'पाताल लोक' वेबसिरीज..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.