The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आकाशातून आगीचा लोळ घेऊन आलेली उल्का अंगावर पडूनसुद्धा ही महिला सुखरूप होती

by द पोस्टमन टीम
11 June 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


तुटता तारा बघून मनात इच्छा धरली तर ती पूर्ण होते अशी एक रम्य कल्पना आहे. मात्र हा तुटता तारा किंवा उल्का खरोखरच जेंव्हा जमिनीवर आदळते तेंव्हा ते अजिबात रम्य नसतं. अग्नीचा गोळा दाणकन जमिनीवर आदळणं हे रम्य तर नाहीच मात्र जीवघेणं ठरू शकतं. अशा जीवघेण्या उल्का मार्‍यातून सहीसलामत वाचलेली एकमेव व्यक्ती आजवरच्या इतिहासात नोंद आहे. ॲन हॉज असं या स्त्रीचं नाव आहे.

सिलिकागा येथील अलबेना गावातील ३० नोव्हेंबर १९५४ ची ती नेहमीचीच दुपार होती. घड्याळात पाऊण वाजला होता. दुपारच्या जेवणानंतरची सुस्ती घेऊन हे छोटं शहर निवांत पडलं होतं. ॲन एलिझाबेथ फ़्लोवर हॉज ही गृहिणी बरं वाटत नसल्यानं थोडावेळ विश्रांतीसाठी म्हणून लिव्हिंग रूममधल्या सोफ्यावर पांघरूण घेऊन शांतपणे पहुडली होती. मात्र तिला झोपेतून जाग आणणारी जी घटना घडली तिनं आधुनिक इतिहासात नोंद केली. झोपेपर्यंत एक सामान्य गृहिणी असणारी ॲन लवकरच जगभरात चर्चेचा आणि इतिहासात नोंद ठेवली जाणारी व्यक्ती बनणार आहे असं तिला कोणी सांगितलं असतं तर त्यावर विश्वास बसणं कठीणच होतं. मात्र ही घटना घडली आणि तिचं आयुष्य पालटलं.

ती घरात झोपली असतानाच बाहेर ते छोटं शहर एक अजब गोष्ट आकाशात बघत होतं. त्या दुपारी अचानक लोकांना आकाशात मातकट रंगाचा एक मोठा ढग आणि पाठोपाठ अग्नी लोळासारखं काहीतरी जमिनीकडे झेपावताना दिसत होतं. हे सगळं इतक्या झपाट्यानं घडत होतं की नेमकं काय घडत आहे हे समजणं कठीण होतं. अनेकांचा असा समज झाला, किंबहुना त्यांना खात्री पटली की आकाशातून जाणारं एखादं विमान दुर्घटनाग्रस्त होऊन त्याचा एखादा भाग जमिनीवर कोसळत आहे.

मात्र प्रत्यक्षात त्या वेळेस आकाशातून कोणतंही विमान चाललेलं नव्हतं की कोणत्याही विमानाचा अपघात झालेला नव्हता. मग ते काय होतं, जे जमिनीकडे वेगानं झेपावलं होतं?



थोड्या वेळाने त्यांना दिसलं की सोफ्यावर पहुडलेली ॲन जागी झाली होती मात्र वेदनेनं विव्हळत तशीच झोपून होती आणि जमिनीवर फ़णसाच्या आकाराचं काळ्या रंगाचं काहीतरी दगडासारखं दिसणारं होतं. हा दगड छप्पर फोडुन घरात कोसळताना जुन्या लाकडी रेडिओवर पडला होता आणि त्याची अक्षरश: शकलं झाली झाली होती.

आकाशातून नेमकं काय कोसळलं आहे हेच बघणार्‍यांना समजत नव्हतं. सर्वात आधी ॲननं पोलिसांना फ़ोन केला. ॲनच्या नवर्‍यानं तोपर्यंत हॉस्पिटलला फ़ोन करून ॲनसाठी मदत मागितली होती. सुदैवानं ॲनला फ़ारशी दुखापत झालेली नसली तरिही ती प्रचंड घाबरलेली होती.

घटना घडल्यानंतर काही मिनिटांत पोलिस, ॲम्ब्युलन्स आणि जवळच असणार्‍या जिऑलॉजी सेंटरमधून काही अधिकारी घटनस्थाळावर पोहोचले. त्यांनी हा उल्का कोसळण्याचा प्रकार असल्याचं सांगितलं. त्याची पुढील तपासणी करण्यासाठी ते तो दगड घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये ॲनची तपासणी केल्यावर तिला पोटाला भाजण्याखेरीज फ़ारशी गंभीर इजा झाली नसल्याचं तसेच तिच्या जीवाला कसलाही धोका नसल्याचं डॉक्टरनी सांगितलं. या घटनेनंतर ॲन रातोरात सेलिब्रेटी बनली कारण अशा प्रकारच्या घटनेतून वाचलेली ती एकमेव ज्ञात व्यक्ती होती.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

ॲनच्या मुलाखती घ्यायला अक्षरश: जगभरातून माध्यमांचे प्रतिनिधी येऊ लागले होते. तिच्या मुलाखती आणि तिचे फ़ोटो यांनी वृत्तपत्रं, मासिकं भरून चालली होती. मात्र या एकाही फ़ोटोत ॲनचा हसरा चेहरा नव्हता. शांत आयुष्य जगणार्‍या ॲनचं घर अचानक अनोळखी लोकांनी गजबजून गेलं होतं. रस्त्यावरून चालताना एरवी कोणाच्या खिजगणीतही नसणारी ॲन आता प्रत्येकाचं लक्ष वेधून घेऊ लागली होती. हे तिला अजिबातच आवडत नव्हतं. या प्रकारच्या प्रसिध्दीची तिनं कधी कल्पनाच केली नव्हती आणि आता मिळत असणारी प्रसिध्दी तिला नकोशी झालेली होती.

पन्नासच्या दशकात जगात इतरत्र होती तशीच अलबेनामध्येही पुरुषी जग होतं. स्त्रियांना चारचौघात उगाचंच वावरायला आवडायचंही नाही आणि तशी त्यांना परवानगीही नव्हती. सततच्या मुलाखातींमुळे हैराण झालेल्या ॲनची आता चिडचिड होऊ लागली होती.

इकडे जिऑलॉजिस्टनी हा दगड सैन्याकडे सुपूर्द केला होता कारण काहींना शंका होती की हा एखादा हवाई ह*ल्ला असावा. सैन्यानंही या दगडाची कसून तपासणी केली आणि त्यांनी जिऑलॉजिस्टसच्या मताला दुजोरा दिला. हे कोणतंही शस्त्र नसून तो एक दगड असल्याचं आता खात्रीशीर सांगितलं गेलं. मात्र अचानक प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या या दगडाचं काय करायचं? हा प्रश्न होताच.

ॲनच्या मते तिच्या घरात पडलेला आणि तिला इजा केलेला त दगड असल्यानं तो तिच्याच मालकीचा होता तर अनेकांच्या मते तो राष्ट्रीय संपत्ती होता. माध्यमांनी मात्र ॲनची बाजू लावून धरत या दगडावर तिची मालकी असावी असं मत दिलं. अखेर घटना घडून काही वर्ष झाल्यानंतर हा दगड स्वगृही म्हणजे ॲनच्या घरी परतला. ॲनला तो दगड विकायचा होता मात्र त्याच्यातल रस संपलेला असल्यानं त्याला कोणी विकत घेणं शक्य नव्हतं. अखेरीस ॲननं हा दगड अलबेना वस्तूसंग्रहालयाला फ़ुकट देऊन टाकला. आजही हा दगड त्याठिकाणी आहे.

एव्हाना या विषयाचा चावून चोथा झाला असल्यानं माध्यमांनी त्यातून लक्ष काढून घेतलं आणि जसा अचानक आला तसा अचानकच हा प्रसिध्दीचा झोत निघून गेल्यानं ॲनचा नर्व्हस ब्रेकडाऊन झाला आणि तिला उपचारांसाठी न्यावं लागलं.

ती बरी होऊन घरी परतली मात्र नवर्‍याशी (इजिन) खटके उडतच राहिले. अखेर १९६४ साली त्यांचा घटस्फ़ोट झाला. ॲन तिचं पूर्वीचं साधं आयुष्य जगू लागली हे तिच्यासाठी घातक ठरलं. तिचं मनस्वास्थ्य पूर्ववत झालं नाहीच पण आता किडन्याही निकामी झाल्या. अखेरची काही वर्षं तिनं नर्सिंग होममध्येच काढली आणि वयाच्या ५२ व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला.

ॲनच्या मते देवानं तिच्याकडे पाठविलेली ही वस्तु होती मात्र दुर्दैवानं देवानं पाठविलेल्या या वस्तूनंच तिच्या आयुष्याचा अंतही केला. एका छोट्या शहरातली अपघाताने सेलिब्रेटी बनलेली ॲन इतिहासाचा भाग बनली मात्र तिचा वर्तमान आणि भविष्यकाळ या एका घटनेनं बदलला.

“लकी लेडी” म्हणून जिला संबोधलं गेलं तिचं ‘लक’ या घटनेनं काळोखलं हे मात्र खरं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जगात कोणी उपाशी राहू नये म्हणून आयुष्यभर झटला पण अन्नासाठीच तडफडून मेला..!

Next Post

ऑस्ट्रेलियातल्या प्रत्येक पिनकोडमध्ये सर डॉन ब्रॅडमनची आठवण दडली आहे..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

ऑस्ट्रेलियातल्या प्रत्येक पिनकोडमध्ये सर डॉन ब्रॅडमनची आठवण दडली आहे..!

हा होता हि*टल*रचा एकमेव फेव्हरेट 'ज्यू' ज्याला हि*टल*रने अभय दिलं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.