The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारताच्या पूर्व रशियातील गुंतवणुकीचा अन्वयार्थ

by Pratik Koske
9 June 2020
in विश्लेषण, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

भारत आणि रशियाचे संबंध हे फार जुने आहेत. रशिया हा भारताचा फार पूर्वीपासूनचा मित्रदेश राहिला आहे. पंडित जवाहरलाल नेहरुंनी शीतयुद्धाच्या काळात जरी अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारलेले असले तरी अमेरिकेच्या तुलनेत तत्कालीन भारतीय राज्यकर्त्यांनी रशियाला झुकते माप दिले होते.

 

india russia postman
Sputnik International

१९७१ च्या युद्धावेळी पाकिस्तानला अमेरिकेची मदत प्राप्त झाली असतांना भारताच्या मदतीला सोव्हिएत रशिया धावून आला होता. तेव्हापासून रशिया व भारताचे संबंध अजून बळकट व्हायला सुरुवात झाली. भारताला आजतागायत रशियाने संरक्षण, अंतराळ, आण्विक उर्जा  आणि कृषी क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर मदत केली आहे.



सोव्हिएत साम्राज्याचा विघटनानंतर देखील रशियन फेडरेशनसोबत भारताचे अगदी घनिष्ठ राहिले. भारत देखील रशियात गुंतवणूक करत आला आहे.

खासकरून रशियाच्या ‘तेलसाठ्या’ संबंधित अनेक करार भारत आणि रशियामध्ये झाले आहे. आता नुकताच एक करार रशिया आणि भारतामध्ये रशियाच्या पूर्वेकडील व्ह्लोदिवोस्तक शहरात झाला.

 

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

vladivostok oil refinery postman
Clipper Oil

रशियाच्या पूर्वेकडील भागात इन्व्हेस्टमेंट भारताने सर्वात आधी २००१ साली केली होती. आजपर्यंत भारतीय इनव्हेस्टर्सने ७ बिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट रशियाच्या पूर्वेकडील ऑइल फिल्ड्स मध्ये केली आहे. ( आउटपुट किती प्रमाणात मिळाला यावर नंतर कधीतरी)

आज भारताने रशियाला १ बिलियन कर्ज दिलं आहे, जेणेकरून रशिया तेथील पूर्वेकडील भागाचा विकास करू शकेल. भारताने ‘ऍक्ट ईस्ट’ पॉलिसीला घेऊन रशियाशी द्विपक्षीय करार केले आहेत.

बैठकी दरम्यान नरेंद्र मोदींनी  २०२४ पर्यंत भारत 5 ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमी असेल असा पुनरुच्चार केला, कदाचित त्याला दृष्टीक्षेपात ठेवून रशियाला कर्ज दिलं असावं.

जर रशियाच्या ‘ऍक्ट फार ईस्ट’ पॉलिसीनुसार जर विकास झाला तर भारताला पूर्व रशियातून फायदा होईल पण तो किती प्रमाणात असेल याची मी काही वाच्यता करत नाही. पण सध्या अरबी देशात चालू असलेल्या ऑइल क्रायसीसला बघता हे फायद्याचे ठरू ही शकेल.

आज भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे ( किती ही नाकारलं तरी), अश्यपरिस्थितीत रशियाला लोन देणं हे आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून जरी बघितलं तरी प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे.

 

modi putin postman
Mint

नरेंद्र मोदी म्हणतात तशी 5 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत होण्यासाठी १० टक्के जीडीपी अत्यावश्यक आहे, असं स्वतः भाजपाचे नेते आणि अर्थतज्ञ सुब्रमण्यम स्वामी म्हणत आहे.

सध्या आपला जीडीपी नव्या मानांकन पद्धतीनुसार ५ टक्के आहे आणि जुन्या मानांकन पद्धतीनुसार 4.3 टक्के आहे.

भारत रशिया संबंधांचा इतिहास जुना आहे. तरी भारताने रशियात एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट बऱ्याच काळानंतर केली आहे. रशियात आपल्या आधी चीनने देखील खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे.

तर एकंदरीत परिस्थितीत बघता भारताचे रशिया धोरण चीनच्या दृष्टीक्षेपातून बनवलेले वाटते. ‘ऍक्ट ईस्ट’ पॉलिसी त्याचच द्योतक आहे. पण चीनच्या ओबीओआर या महत्वकांक्षी मेरिटाईम सिल्क रूटला काउंटर करण्याचा प्रयोग म्हणून जरी या कडे बघितलं तरी आपली तयारी तोडकी आहे.

चीनचा ओबीओआर आणि चीन जगभरातील इन्व्हेस्टमेंट ही आपल्या तुलनेने एक स्टेप नाहीतर खुप पुढची आहे. आर्थिक स्तरावर चीनने केलेली इन्व्हेस्टमेंट ही आपल्या तुलनेत खूप आहे, शिवाय चीनचं उद्योजक विश्व अमेरिकेला आव्हानात्मक ठरलं आहे.

 

xi putin postman
Al Zajeera

त्यामानाने भारतीय उद्योजक विश्व बरंच पिछाडीवर आहे, सध्या उद्योगविकास आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग हे समाजवादी अंगाने आपला देश चालावतो आहे.

क्रोनी कॅपिटालिस्ट सोसायटीची निर्मिती होत आहे. समान आर्थिक विकासाच्या संध्या दिवसेंदिवस कमी होत असून, आपली प्रगती कासवगतीने सुरू आहे.

अश्या परिस्थितीत आपण चीनला शह तर देऊ शकणार नाही पण दक्षिण चिनी समुद्रात आपलं अस्तित्व दाखवू शकतो, अमेरिका – जपान- दक्षिण कोरिया – भारत अशी युती दक्षिण चिनी समुद्रात उतरल्यामुळे चीनवर वचक बसू शकेल.

तसेच दिवसेंदिवस चीनच्या आर्थिक साम्राज्यविस्तार वादी भूमिकेविरोधात अनेक देशात असंतुष्टी आहे, त्यामुळे चीनविरोधात एक ऍक्टिव्ह फोर्स क्रियेट देखील होऊ शकतो पण सध्या चीनची घोडदौड बघता हे वाटतं तितकं सोपं नाही.

चीन हा भौगोलिक नव्हे तर आर्थिक स्तरावर ही वाऱ्याचा वेगाने निघाला आहे. आफ्रिकेतील निम्म्या देशात चिनी कंपन्यांनी त्यांचे करार गळी उतरवून उद्योग उभे केले आहे.

 

china economic empire postman
Bloomberg

एकप्रकारे साम्राज्यवादी पकड चीनने या देशांवर बसवली आहे. शिवाय पाकिस्तानसारखे अनेक प्यादे वापरून ड्रॅगन फुत्कार मारतो आहे.

भारत रशिया करार हा जरी महत्वपुर्ण असला तरी तो चीनविरोधी जालीम अस्त्रासारखा आहे, हा निव्वळ दुर्दम्य आशावाद आहे, क्टिकली ही लॉंग रन आहे. या रशिया दौऱ्याचं फलित किती होतं हे येणारा काळ सांगेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

 

Tags: ChinaIndiaRussiaSoviet Union
ShareTweet
Previous Post

देशभरातून दोन जागा मिळवणाऱ्या पक्षाला सत्तेच्या तख्तापर्यंत पोहोचवणारा तत्वनिष्ठ राजकारणी

Next Post

दुर्गा भाभी – भगत सिंहाच्या बरोबरीने स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेली क्रांतिकारक

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

दुर्गा भाभी - भगत सिंहाच्या बरोबरीने स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेली क्रांतिकारक

दीड लाख वृक्षांची लागवड करणारा अवलिया...

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.