The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

20 हजार टन डिझेल नदीत मिसळल्यामुळे रशियात आणीबाणी लागू केली आहे.

by द पोस्टमन टीम
9 June 2020
in विश्लेषण
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


पर्यावरण आहे म्हणून आपण आहोत याची जाणीव मानवाला जेवढ्या लवकर होईल तेवढे बरे. नाहीतर आपल्या छोट्या चुकांचेही खुप मोठे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. अशीच एक चुक आत्ता रशियामधे झाली. 

पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या आर्क्टिक भागात झालेल्या मोठ्या तेलगळतीमुळे रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सायबेरियामध्ये राज्यपातळीवर आणीबाणी घोषित केली आहे. या चुकीसाठी त्यांनी सायबेरियामधील विभागीय अधिकाऱ्यांवर जाहीरपणे कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

नोरिल्स्क, जे की आर्क्टिक वर्तुळाच्या वरील भागात उत्तर-मध्य रशियामध्ये वसले आहे, तिथे असलेल्या उर्जाकेंद्रावर असलेल्या इंधनाच्या टाकीला तडा गेला. यामुळे जवळपास २०,००० टन डिझेल जवळ असलेल्या अंबरनया नदीत पसरले. उपग्रहांद्वारे मिळालेल्या छायाचित्रातून या तेलगळतीमुळे झालेले दूषित पाणी स्पष्ट दिसत आहे.

(Photo by – / Planet Labs Inc. / AFP)

 



या केंद्रावर कार्यरत असणारी मुळ कंपनी ‘नोरिल्स्क निकेल’ हिच्या मते सायबेरियामध्ये वितळत चाललेल्या बर्फामुळे या इंधनाच्या टाकीला तडे जाऊन ही गळती झाली असावी. वातावरण बदलाचा परिणाम म्हणुन वितळणाऱ्या या बर्फामुळे सायबेरियामध्ये खचलेले रस्ते, कोसळलेली घरे आणि पारंपरिक शेतीत होणारे अडथळे अशा अनेक समस्या उभ्या राहत आहेत.

रशियन पर्यावरणीय अभ्यासाचाच एक गट ‘ग्रीनपीस’ च्या मते, 

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

ही गळती म्हणजे रशियन आर्क्टिक इतिहासातील सगळ्यात मोठी गळती आहे. या गळतीची तुलना त्यांनी एग्झॉन वाल्डेज़ येथील १९८९ मध्ये झालेल्या कित्येक पटींनी मोठ्या असलेल्या इंधनगळतीशी केली आहे. या गळतीला साफ करण्यासाठी ८६ दशलक्ष अमेरिकी डॉलरचा खर्च येईल असा या गटाचा अंदाज आहे.

केंद्रातील कर्मचाऱ्यांनी गळती थांबवण्याचा प्रयत्न केला आणि आणीबाणी केंद्राकडे माहिती न पुरवताच त्यांनी हा प्रयत्न २ दिवस चालूच ठेवला असे आणीबाणी परिस्थिती मंत्री ‘येवगनी जिनीकेव’ यांनी माहिती देताना सांगितले. यावेळी पुतीनही उपस्थित होते.

“आपल्याला या अपघाताची माहिती समाजमाध्यमांच्या द्वारे मिळाली” अशी माहिती ‘क्रास्नोयास्क’ या विभागाचे राज्यपाल ‘अलेक्झांडर उस’ यांनी पुतीन यांना दिली. नंतर पुतीन यांनी या केंद्राचे अधिकारी असलेले ‘सर्जी लिपिन’ यांच्याकडे उत्तर मागताना “आता आम्हाला अशा अपघातांची माहिती समाजमाध्यमांद्वारेच मिळणार का?” असा प्रश्न केला.

१२ मैल अंतरावर असणाऱ्या विविध तळे आणि नाल्यांमध्ये या गळतीच्या इंधनाचे कण आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. लिपिन यांच्या मते “या अंदाजाने विविध केंद्रांना याबद्दलची माहिती दिली गेली होती. परंतु पुतीन यांनी परत असे असेल तर मग या माहितीनुसार ज्यांनी ज्यांनी काळजी घेऊन हे थांबवायला हवे होते अशा सगळ्यांची चौकशी करा.” असे आदेश दिले आहेत.

रशियन अन्वेषण समितीने प्रदुषण आणि दुर्लक्षित कारभार या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. केंद्राचे संचालक ‘व्याकेस्लाव स्टेरोस्टीन’ यांना ३१ जुलैपर्यंत ताब्यात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर अजुन खटला दाखल करण्यात आला नाही.

निकेल आणि पेलाडीयमच्या उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या या कंपनीत होणारी ही पहिली गळती नाहिये. २०१६ मध्ये अशाच एका अपघातात जवळच्या नदीत तेलगळतीची घटना घडली होती. या कंपनीच्या अखत्यारीत येणाऱ्या शहरास रशियामधील सगळ्यात जास्त प्रदूषीत शहर म्हणून ओळखले जाते.

तसेच सायबेरियामध्ये असलेल्या नेहमीपेक्षा उच्च तापमानामुळेसुध्दा परिस्थिती अजुनच बिकट झाली आहे. जानेवारीपासुन सरासरी तापमान हे नेहमीच्या तापमानापेक्षा ५.४ अंशांनी जास्त आहे असा निर्वाळा राष्ट्रीय सागर आणि हवामान खात्याने दिला आहे.

आर्क्टिकबरोबरच सायबेरियाची तापमानवाढ ही बाकीच्या भागापेक्षा जास्तच आहे. या गळतीचे कारण असलेल्या बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेत त्यामुळे आता वाढ झाली आहे.

सायबेरियामध्ये असलेल्या विविध यंत्रणा बनवत असताना हा बर्फ वितळणार नाही असे गृहित धरले गेले होते. या बर्फामुळे मोठमोठ्या यंत्रणा कोलमडून पडू शकतात. सायबेरियामध्ये तापमानवाढीमुळे या बर्फाच्या आच्छादनात अनेक मोठ मोठे छिद्र आता तयार होत आहेत.

२०१८ ला ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रसिध्द झालेल्या अभ्यासानुसार रशियामधील हायड्रोजन-कार्बनच्या संयुगांचे उत्पादन करणाऱ्या ४५ टक्के केंद्रांचे क्षेत्र हे या बर्फाच्या वितळण्याने मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊ शकणाऱ्या जागेत आहेत. या अभ्यासाच्या मते याचे मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम या शतकाच्या मध्यात होतील.

आत्ताच्या तेलगळतीची साफसफाई अवघड समजली जाते त्याचं कारण म्हणजे अंबरनया नदीचे दुर्गम स्थान. त्याभागात रस्तेच नाहीत म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. मोठमोठी सफाईची साधने वाहुन नेणे सुध्दा अगदी मोठे दिव्य असणार एवढं नक्की. 

‘ड्याचेंको’, यांच्या मते कंपनी प्रदुषित तेलास सफाईसाठी जवळ असणाऱ्या तात्पुरत्या केंद्रांवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे.

प्रदुषित तेलाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधक जाळी टाकण्यात आली आहेत. परंतु ‘ग्रीनपीस’च्या मते यामुळे जास्त काही परिणाम होणार नसुन सगळे डिझेल वातावरणातच राहील असे म्हणण्यास काही हरकत नाही.

‘उस’, प्रांताचे राज्यपाल, यांनी पुतीनला सांगताना म्हटले की सफाईसाठी किती वेळ लागेल हे नक्की सांगणे कठीण आहे. त्यावर “राज्यपाल तुम्हीच आहात, नेमके काय केले जाईल हे तुम्हीच ठरवा” असा शेरा पुतीन यांनी मारला.

काही चुका या टाळलेल्याच बऱ्या असतात. चर्नोबीलसारखे आत्मघातकी अपघाताचा अनुभव आपल्या गळ्यात घेऊन फिरणाऱ्या रशियाने आणि आपण सर्वांनीच निसर्गाचा आदर करायला सुरुवात करणे आज काळाची गरज आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

डार्क – नेटफ्लिक्सची प्रचंड गुंतागुंतीची आणि धरून ठेवणारी पाहायलाच हवी अशी सिरीज

Next Post

..म्हणून जागतिक आरोग्य संघटना चीनची पाठराखण करत असते.!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

..म्हणून जागतिक आरोग्य संघटना चीनची पाठराखण करत असते.!

१९१८च्या महामारीत व्हिस्कीचा वापर औषध म्हणून केला जात होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.