The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या कॉमिक्सने भारताचा गौरवशाली इतिहास पहिल्यांदा मुलांपर्यंत पोहोचवला होता

by द पोस्टमन टीम
21 January 2026
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


अमर चित्रकथा हे ७० च्या दशकापासून प्रचंड लोकप्रिय असलेले कॉमिक बुक होते. यामधल्या समग्र कथा या भारतीय पुराण आणि भारतीय इतिहासात होऊन गेलेले शूर यो*द्धे आणि त्यांचा जीवन प्रवास यांच्यावर आधारित असायच्या.

तसं बघायला गेलं तर राम-कृष्ण, कौरव-पांडव इथपर्यंतच भारतीय पुराणांची ओळख आपल्या इथल्या मुलांना होती. परंतु भारताचा इतिहास हा काही फक्त रामायण आणि महाभारत त्यांच्यापुरता मर्यादित नव्हता. याव्यतिरिक्त भारताच्या इतिहासात घडून गेलेल्या महत्त्वपूर्ण घटना आणि गोष्टी सांगण्याची जबाबदारी त्या वेळी फक्त अमर चित्रकथाने उचलली होती.

या कॉमिक बुकच्या जन्माची कथा देखील तितकीच रोचक आहे.

या कॉमिक बुकचे संस्थापक होते कार्टूनिस्ट अनंत पै. अनंत पै हे टाइम्स ऑफ इंडियाचे कॉमिक डिपार्टमेंट सांभाळायचे. 1967 साली दूरदर्शनवर एक टीव्ही शो घेण्यात येत होता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शहरातील शाळकरी मुले सहभागी होत असत.



अशाच एका शो मध्ये स्पर्धकांना एक प्रश्न विचारला गेला, रामायणामध्ये रामाच्या आईचे नाव काय होते या प्रश्नावर सगळ्याच स्पर्धकांची दांडी गुल झाली. कुणालाही या प्रश्नाचे उत्तर सांगता आले नाही. मात्र पै हा सगळा प्रकार बघून तळमळून उठले.

आपण ज्या देशात जन्म घेतला, आपण ज्या मातीत राहतो ज्या मातीचे अन्न खातो त्या मातीत घडून गेलेल्या इतिहासाची आजच्या पिढीला काहीही खबर नसावी याचे त्यांना वैषम्य वाटले. या विचारातून त्यांनी पुढे टाइम्स ऑफ इंडियाचा राजीनामा दिला.

राजीनाम्यानंतर काय करायचे याची रुपरेखा तशी त्यांच्या डोक्यात नव्हती परंतु भारतीय मुलांना भारतीय संस्कृतीची आणि खर्‍या भारतीय हिरोंची ओळख मात्र करून दिली पाहिजे हा प्रगाढ विचार त्यांच्या मनामध्ये होता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

भारतातल्या मुलांना त्यांचा ऐतिहासिक वारसा आणि इतिहासात होऊन गेलेले महान यो*द्धे यांच्या कार्याचा परिचय व्हावा या विचारातूनच पुढे अमर चित्रकथाचा जन्म झाला.

तोपर्यंत भारतामध्ये कॉमिक बुक्स आणि कॉमिक हिरो म्हणजे एक तर जापानी हिरो असायचे नाहीतर अमेरिकन कॉमिक्समधले सुपरमॅन, बॅटमॅन, आयर्नमॅन असले हिरो असायचे. स्वतःचा असा कुठलाही देशी हिरो मुलांच्या त्यावेळी माहितीत नसायचा. ही कसर तेव्हा अनंत पै यांनी भरून काढायचे ठरवले.

अनंत पै यांनी स्वतःची इंडियन बुक्स हाउस नावाची पब्लिकेशन कंपनी स्थापन केली आणि १९६७ सालापासून पूर्णपणे भारतीय अवतारातले पहिले कॉमिक बुक बाजारामध्ये आले.

अमर चित्रकथामध्ये प्रामुख्याने भारतातील प्राचीन इतिहास, भारताच्या प्राचीन लोककथा, निरनिराळ्या प्रदेशात होऊन गेलेले शूर योद्धे, निरनिराळ्या प्रदेशात होऊन गेलेल्या लढाया, भारतीय संस्कृतीची ओळख दर्शवणाऱ्या कथा पेंटिंग यांचा समावेश असायचा.

अमर चित्रकथा अगदी झपाट्याने भारतात लोकप्रिय झाले. जवळजवळ वीस भारतीय भाषांमधून प्रकाशित होण्याचा मान अमर चित्रकथाला मिळाला. याशिवाय दहा वेगवेगळ्या प्रकारच्या परदेशी भाषांमधून देखील अमर चित्रकथाचे प्रकाशन झालेले आहे. इतकी लोकप्रियता क्वचितच कुठल्या कॉमिक बुकला मिळाली असेल.

पण, जेव्हा अनंत पै यांनी हे कॉमिक काढायचे ठरवले तेव्हा त्यांच्याकडे ना मनुष्यबळ होते, ना पैसा. या कॉमिक बुकमध्ये लागणारी सगळी चित्रे तेव्हा स्वतः अनंत पै काढत असत. सुरुवातीला छापाई करताना देखील या कॉमिकमध्ये फक्त निळा किंवा हिरवा किंवा पिवळा रंग वापरला जायचा. अर्थात रंगीत कॉमिक्सची मजा त्याला त्यावेळी येत नव्हती परंतु तरीही अनंत पै यांनी हिंमत न हारता आपले काम चालू ठेवले.

अमर कथांमधून पहिल्यांदा रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या गेल्या. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या जातक कथा, वेताळ पंचविशी, सिंहासन बत्तीशी, पंचतंत्र, असा भारतीय लोककथांचा संपूर्ण खजिनाच अमर कथाने आपल्या कॉमिक्समधून जिवंत केला.

त्यानंतर मात्र या कॉमिक बुकने मागे वळून पाहिले नाही. जगभरात ३० करोडपेक्षा जास्त प्रति खपवण्याचा विक्रम अमर चित्रकथाच्या नावावर आहे यावरून या कॉमिक बुकची लोकप्रियता लक्षात यावी.

अमर चित्रकथाने त्यापुढे स्वतःची ‘टिंकल ‘नावाची स्पेशल कॉमिक सीरिज सुरु केली. या सीरिजमध्ये आजच्या जमान्यातील दिसणारे परंतु काल्पनिक असे कॅरेक्टर्स त्यांनी पुढे आणले. यामधले सुप्पांडी, शिकारी शंभू, तंत्रा असे विनोदी कॅरेक्टर्स खूप गाजले.

2014 साली अमर चित्रकथाने डिजिटल मीडियामध्ये पदार्पण केले. त्यांनी आपल्या कॉमिक्सचे ऑनलाईन सबस्क्रिप्शन देखील सुरू केले. त्याच्यामुळे अँड्रॉइड, आयफोन आणि टॅबलेट युजर्सना आज आरामात त्यांच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसवर अमर चित्रकथा वाचायला मिळू शकतात.

अमरचित्र कथानंतर अनेक प्रकारचे कॉमिक्स भारतामध्ये सुरू झाले. राज कॉमिक्ससारख्या मोठ्या प्रकाशन कंपनीने आपले पाय नंतर कॉमिक बुकच्या क्षेत्रात रोवले. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॉमिक्स आणि आपले भारतीय देशी सुपरहिरो पुढे बाजारात येत गेले परंतु या सगळ्याची सुरुवात मात्र १९६७ साली अनंत पै यांनी आपल्या अमर कथेद्वारे केलेली होती.

या अमर चित्रकथा नावाप्रमाणेच अजरामर आहेत आणि राहतील आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिथे अनेक नामवंत जुनी प्रकाशने बंद झाली तिथे आजही हे कॉमिक सुरू आहे. डिजिटल क्रांतीचा कुठलाही परिणाम या कॉमिक्सच्या खपावर झालेला नाही. आजही लोक अमर चित्रकथा तितक्याच आवडीने वाचतात ही नव्या पिढीसाठी दिलासादायक गोष्ट आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारतातील एकमेव मंत्री ज्याने ४२ विद्यापीठांमधून तब्बल २० पदव्या मिळवल्या होत्या..

Next Post

‘हम लोग’ : अशी होती दूरदर्शनची पहिलीवहिली टीव्ही मालिका

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

'हम लोग' : अशी होती दूरदर्शनची पहिलीवहिली टीव्ही मालिका

डॉ. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती असतानासुद्धा फक्त २५०० रुपयेच पगार घ्यायचे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.