The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या एसपीजी गार्ड्सची नेमणूक कशी करण्यात येते ?

by द पोस्टमन टीम
19 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारतीय संविधानिक पदांमध्ये महत्त्वपूर्ण पदांपैकी सर्वांत महत्त्वाचे पद आहे पंतप्रधानपद!

देशाच्या पंतप्रधानांवर संपूर्ण देशाची जबाबदारी असते. शेजारील राष्ट्रांशी असलेल्या संबंधांपासून देशहिताच्या निर्णय घेण्यापर्यंतची जबाबदारी पंतप्रधानांवर असते. इतक्या मोठ्या माणसाची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची असते.

या इतक्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेचा भार ज्या एसपीजी कमांडोज्-वर असतो, त्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप अर्थात एसपीजीबद्दल आज जाणून घेऊया..

एसपीजी युनिट १९८८ साली पार्लमेंट ॲक्टअंतर्गत अस्तित्वात आली. एसपीजीवर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली. १९८१ पर्यंत हे काम दिल्ली पोलिसांच्या स्पेशल डिस्ट्रिक्ट फोर्सवर होते. या फोर्सचे संचलन पोलीस महासंचालक करत असत. पुढे यात बदल  करण्यात आले. १९८१ साली गुप्तचर संघटनेने यात बदल करत स्पेशल टास्क फोर्सची पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नेमणूक केली.



ही टीम चोवीस तास पंतप्रधानांच्या भोवती घेराव घालून मार्गक्रमण करत असे. परंतु इंदिरा गांधींच्या ह*त्येनंतर या टीमच्या कार्यशैलीवर प्रशचिन्ह उपस्थित राहिले.

१९८४ साली इंदिरा गांधींच्या ह*त्येनंतर गृह आणि संरक्षण मंत्रालयाचे धाबे दणाणले होते. पंतप्रधानांची सुरक्षा अजून मजबूत कशी करता येईल यावर चर्चा सुरु झाल्या. यानंतर १५ फेब्रुवारी १९८५ रोजी भारतीय गृहमंत्रालयाने पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि एक प्रस्ताव संसदेसमोर ठेवला.

भारतीय सुरक्षा एजन्सीवर पंतप्रधानांच्या सुरक्षेला अजून मजबूत करण्यासाठी मोठा दबाव होता. १९८५ साली बिरबल नाथ समितीने पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी स्पेशल प्रोटेक्शन युनिट बनवण्याची तयारी सुरु केली. ३० मार्च १९८५ रोजी भारतीय कॅबिनेटने हे बिल पारित केले. यानंतर एसपीयु सुरक्षा रक्षकांचे एक वेगळे पद निर्माण करण्यात आले. पुढे याचे एसपीजी असे नामकरण करण्यात आले.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले कर्मचारी साधारणपणे काळा कोट नाहीतर राखाडी रंगाचा सूट परिधान करत असतात, पंतप्रधानांच्या बरोबरीने चालणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा एकच ड्रेसकोड असतो, त्यामुळे गर्दीत देखील ते एकमेकांना ओळखू शकतात. इतकेच नाही तर त्यांचे डोळे देखील पूर्णपणे झाकलेले असतात.

गार्ड्सची नजर एकाच वेळी चारी दिशांवर असते, ती कुठे फिरते हे शत्रूचा लक्षात येऊ नये म्हणून असे करण्यात आले आहे. एसपीजी गार्ड्सच्या पदासाठी भारतीय सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येते. याचे कारण असे असते की हे अधिकारी प्रशिक्षित असतात. त्यांना ऐन वेळेवर काय करावे याचे प्रशिक्षण देण्यात आलेले असते. एसपीजी गार्ड्स भारतीय सैन्यदलाच्या बरोबरच बीएसएफ, आयटीबीपी, एनएसजीमधून देखील निवडण्यात येतात.

एसपीजीमध्ये समाविष्ट झाल्यावर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी स्पेशल ट्रेनिंग देण्यात येते. एसपीजी पंतप्रधानच नाहीतर पूर्व पंतप्रधान आणि पंतप्रधानांच्या परिवाराचे देखील संरक्षण करते. एसपीजीसाठी एका स्पेशल डायरेक्टरची नेमणूक करण्यात येते. सरकार त्यांची नेमणूक करते.

एसपीजी कमांडोज्-कडे अत्यंत घातक शस्त्रांचा साठा असतो. त्यांना भारतीय गुप्तचर संस्थेकडून ह*त्यारांचा पुरवठा करण्यात येतो. एफ एन हेस्टर्ल, पी ९० आणि ग्नोक पिस्टलचा या ह*त्यारांमध्ये समावेश आहे. हे ह*त्यार गार्ड्सच्या सूटमध्ये लपवलेले असतात. ज्यावेळी संकट येईल तेव्हा त्या ह*त्यारांचा वापर करण्याची गार्डसला परवानगी देण्यात आली आहे.

बऱ्याचदा पंतप्रधान प्रोटोकॉल मोडून सामान्य नागरिकांची भेट घेण्यासाठी पुढे सरसावतात, त्यावेळी एसपीजी गार्ड्स अलर्ट असतात. कोणत्या नेत्याला कुठली सुरक्षा प्रदान करायची याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालय, गृह सचिव आणि गृह विभागाचे अधिकारी घेत असतात. एक्स, वाय, झेड आणि झेड प्लस अशा श्रेणीत सुरक्षा रचनेची विभागणी करण्यात आली आहे. झेड श्रेणीत २२ सुरक्षा रक्षकांचे कवच असते. यात सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांचा गार्ड्सचा समावेश करण्यात आलेला असतो. झेड प्लस सुरक्षेसाठी ३६ गार्ड्सची नेमणूक करण्यात येते.

हे कमांडोज् आपल्या कर्तव्याप्रती शंभर टक्के प्रामाणिक असतात म्हणून त्यांची अधिक काळासाठी नेमणूक करण्यात येत नाही. २०१६-१७ साली एसपीजी गार्ड्ससाठी हजार कोटींचा बजेट देण्यात आलं. एसपीजी गार्ड्सच्या कपड्यांचा खर्च देखील सरकार करते. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजी गार्ड्सची सेवा जास्त काळासाठी नसते. काही काळाने त्यांना त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये परत पाठवण्यात येते.

एसपीजीमध्ये जीवन हे सुखदायी असते असा एका अनुभव एका अधिकाऱ्याने मागे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. व्हीव्हीआयपी लोकांच्या सुरक्षेमुळे त्यांना अनेक फायदे मिळतात. त्यांच्यासोबत परदेशात दौरे करण्याची संधी देखील मिळते. याबरोबरच उत्तम पगार देखील मिळतो.

एसपीजी कमांडोज्-च्या मुलांचे शालेय शिक्षण मोफत असते. त्यांच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता सरकार करते. त्यांना जास्त काळ सर्व्हिस नसते. फक्त काही काळ त्यांच्या मूळ विभागात उच्च पदावर कार्य करावे लागते.

एसपीजीचे काम सोपं वाटतंय पण वेळप्रसंगी त्यांना जिवावर उदार होऊन या नेत्यांची सुरक्षा करावी लागते. जितक्या सोयीसुविधा त्यांना सरकारकडून मिळतात, तेवढीच जोखीमही त्यांना उचलावी लागते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हा कसोटी सामना भारताच्या खिलाडूवृत्तीसाठी नेहमीच स्मरणात राहील

Next Post

स्विस बँकेत अकाउंट कसं उघडायचं..?

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

स्विस बँकेत अकाउंट कसं उघडायचं..?

पाकिस्तानचे चार रणगाडे उ*द्ध्वस्त करत २१व्या वर्षी हौतात्म्य पत्करणारे अरुण खेत्रपाल

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.