The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुख्यात गुंड ‘अल कपोन’मुळे दुधाच्या पॅकेटवर एक्स्पायरी डेट छापायला सुरु झाली

by द पोस्टमन टीम
28 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


ही कहाणी आहे अठराव्या शतकाच्या शेवटी इटलीमध्ये जन्म झालेल्या अल कॅपोनची, ज्याने त्याच्या तारुण्यात गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकलं आणि काही काळातच त्या दुनियेवर अधिराज्य गाजवलं. अमेरिकेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी अल कॅपोन हे नाव तसं नवीन नाही पण बऱ्याच लोकांसाठी मात्र हे नाव कदाचित अनोळखी असू शकतं.

तर, एकोणिसाव्या शतकातल्या पहिल्या दशकातच कॅपोनच्या पालकांनी अमेरिकेत स्थलांतर केलं. इयत्ता सहावीपर्यंत शाळा शिकून झाल्यावर वैतागून शाळा सोडून दिलेला एक मुलगा कुख्यात गुंडांच्या टोळीत सामील होतो आणि तिथूनच सुरु होतो त्याचा गुन्हेगारी विश्वातला प्रवास! 

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी, जॉनी टोरियो नावाच्या एका कुख्यात गुन्हेगाराच्या टोळीत सामील होऊन त्याने या विश्वातली त्याची जागा अजून प्रबळ केली. काही वर्षांतच टोरियोचा उत्तराधिकारी बनून त्यांच्या टोळीचं नेतृत्व स्वीकारलं आणि केवळ हिंसेच्या जोरावर त्याने शिकागोमध्ये त्याची दहशत निर्माण केली. अनेक हिं*सक कृतींमध्ये अग्रेसर असणाऱ्या कॅपोनला एकदा एका क्लबमध्ये एका व्यक्तीने चांगलीच अद्दल घडवली. त्यादिवशी क्लबमध्ये उपस्थित असलेल्या लोकांकडून असे समजले की त्या व्यक्तीच्या बहिणीकडे कॅपोनने चुकीच्या नजरेने पाहिले आणि तिच्याकडे बघून त्याने अश्लील शेरेबाजी करत तिची छेड काढण्याचा देखील प्रयत्न केला.

त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या त्या मुलीच्या भावाचा संताप अनावर झाला आणि समोर दिसेल त्या धारदार शस्त्राने कॅपोनवर ह*ल्ला केला ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली आणि नंतर कितीतरी वर्षे त्या ह*ल्ल्याचे व्रण त्याच्या गालावर ठळक दिसत होते.



या घटनेची वाच्यता वाऱ्यासारखी पसरली आणि त्या जखमेमुळे त्याला लोक नंतर ‘स्कारफेस’ या टोपणनावाने ओळखायला लागले.

दरोडे, खंडणी, खू*न यांसारखे भयावह गुन्हे करूनही अनेकदा त्यातून निर्दोष मुक्तता झाल्यामुळे त्याची बेकायदेशीर मद्य विक्री, वेश्या व्यवसाय, सट्टेबाजी यांसारखे अवैध व्यवसाय वाढवण्यासाठी हिंमत अजून वाढली. प्रचंड पैसा आणि लोकांमध्ये आपल्याबद्दल असलेली द*हश*त बघून त्याने आपल्या वाटेतल्या अनेक प्रतिस्पर्धींना चलाखीने संपवले आणि त्याच्या अवैध व्यवसायांचे जाळे अल्पावधीतच विणायला सुरुवात केली.

गुन्हेगारी विश्वाच्या माध्यमातून कॅपोन अनेक उद्योग धंद्यांशी जोडला गेला होता. तो डेअरी उत्पादनाशी देखील जोडला गेला होता. कर चोरीच्या गुन्ह्याखाली त्याला काही वर्षे कारावासाची शिक्षा झाली पण त्यानंतर देखील आपला दबदबा तसाच रहावा या उद्देशाने तो डेअरी व्यवसायात उतरला. एकीकडे कुख्यात गुंड अशी ओळख निर्माण झालेला कॅपोन, डेअरी व्यवसायाच्या निमित्ताने आपली प्रतिमा लोकांमध्ये चांगली करण्यासाठी प्रयत्नशील होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

त्याकाळी दुध संघाच्या परवानगी शिवाय या व्यवसायात उतरणं निव्वळ अशक्य मानलं जायचं. त्यांचं वर्चस्व मोडून स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कॅपोनने धडपड सुरु केली आणि त्यासाठी त्याने त्याच्या गुन्हेगारी क्षेत्रातल्या सहकाऱ्यांची मदत घेतली.

त्याच दरम्यान त्याच्या जवळच्या व्यक्तीला दुधातून विषबाधा झाली. त्या घटनेची आपल्या सूत्रांच्या माध्यमातून त्याने कसून चौकशी केली तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की भेसळ करणाऱ्या माफियांनी खराब प्रतीचं दुध बाजारात आणलं होतं.

त्याकाळी दुध किंवा तत्सम नाशवंत पदार्थ कधीपर्यंत वापरण्यात यावे यासाठी पदार्थांवर तारीख असण्याची कुठलीही नियमावली नव्हती. याचाच गैरफायदा घेत त्या माफियांनी भेसळयुक्त पदार्थ बाजारात उपलब्ध करून लोकांची फसवणूक करून त्यांचा जीव धोक्यात घातला होता. ही गोष्ट लक्षात येताच दुधाच्या बाटल्यांवर प्रमाणित संस्थेच्या माध्यमातून तारीख टाकण्यात यावी आणि त्यासाठी कडक नियमावली असावी यासाठी त्याने  लढा उभारला आणि तो यशस्वी देखील करून दाखवला.

ही घटना वाऱ्यासारखी जगभर पसरली आणि त्यातून अनेक देशांनी अश्या प्रकारे तारीख टाकूनच दुध वितरीत करावे यासाठी कठोर नियम बनवले. त्यामुळे आज आपण दुध घेतल्यावर पटकन जी तारीख वाचतो, त्याचं श्रेय अल कॅपोन नावाच्या कुख्यात गुन्हेगाराच्या नावावर आहे हे एक नवलच!

अर्थात काही लोक असंही सांगतात की केवळ चांगली प्रतिमा निर्माण व्हावी या उद्देशाने त्याने ही कथा रचली आणि त्या ऐवजी घडलं असं होतं की विविध वस्तूंवरील मजकूर छापण्यासाठी जो छापखाना असतो तो अल कॅपोनचा होता. जर दुधाच्या बाटल्यांवर तारखा छापता आल्या तर व्यवसाय अजून वृद्धिंगत होईल आणि एका चांगल्या उद्देशासाठी लढल्याने लोकांमध्ये आपल्याबद्दलचा आदर वाढेल या उद्देशाने त्याने तो लढा उभा केला असंही म्हटलं जातं.

नक्की काय घडलं याचे ठोस प्रमाण उपलब्ध नाहीत पण शेवटी फायदा ग्राहकाचाच झाला ही गोष्ट महत्वाची!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

कॅल्क्युलेटर्समुळे आपले पाढे, पावकी, निमकी, दिडकी पाठ करायचे कष्ट वाचत आहेत

Next Post

या राणीच्या योगदानामुळे कोरिया आणि तामिळ संस्कृतीमध्ये एवढं साधर्म्य दिसून येतं

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या राणीच्या योगदानामुळे कोरिया आणि तामिळ संस्कृतीमध्ये एवढं साधर्म्य दिसून येतं

जगातलं पहिलं एक्स्पेरिमेंटल व्हिलेज 'ऑरोविल' आपल्या स्वागतासाठी तयार आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.