The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘ऐन जलूत’च्या लढाईमुळे मंगोल साम्राज्याचा अस्त होऊन इस्लामचा उदय झाला

by Heramb
14 October 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जगात अनादी कालापासून एक गोष्ट अविरतपणे वापरण्यात आली, ती म्हणजे ‘शस्त्र’. किंबहुना मानवाला सापडलेल्या प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाचे किंवा गोष्टींचे शस्त्रीकरणाचे (वेपनायजेशन) काम मानवाने केले. जगात शस्त्रबळावर अनेक लढाया झाल्या. त्यातील काही लढाया पानिपतच्या लढायांसारख्याच अत्यंत महत्वाच्या आणि इतिहास बदलून टाकणाऱ्या ठरल्या. इसवी सन १२६० साली लढल्या गेलेल्या अशाच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ‘ऐन जलूत’च्या लढाईचे महत्त्व समजून घेण्यासाठी प्रथम त्या काळाचा ऐतिहासिक संदर्भ समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

कुख्यात चंगेज खानच्या काळानंतर मंगोल हे जगातील सर्वांत भयानक आणि द*हश*त निर्माण करणाऱ्या अत्याधुनिक सत्तांपैकी एक होते. त्यांच्या घोडदळ, धनुर्धारी आणि वेगवान छाप्यांसह, त्यांनी त्यांच्या विरुद्ध उभ्या असलेल्या प्रत्येकाला नष्ट केले. चंगेज खानचे स्वप्न संपूर्ण जगाचा सम्राट बनणे हे होते. चंगेज खानचा नातू मोंगके खान १२५१ साली ग्रेट खान बनला आणि त्याने आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत जग जिंकण्याची योजना आखली.

मुंगके खानचा भाऊ हुलागु खानने पश्चिमेकडील राज्यांवर वर्चस्व प्रस्थापित केले. १२६० पर्यंत त्याने सिलिशियन, आर्मेनियन, अँटिओक आणि बगदादमधील ५०० वर्ष जुने पद ‘अब्बासीद खलीफा’ पूर्णपणे संपवले किंवा त्यावर वर्चस्व तरी स्थापन केले होते. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर – जेरुसलेममधून प्रवेश करण्याची आणि जगातील शेवटच्या प्रमुख इस्लामी शक्तीशी, मामलुक सल्तनतीशी यु*द्ध करण्याची त्याची योजना होती.

१२६० साली त्याने कैरोमधील कुतुझ-द-मामलुककडे विविध धमक्यांच्या पत्रांसह राजदूत पाठवले. त्या पत्रांचा मजकूर होता, “आम्ही विस्तीर्ण क्षेत्रे जिंकली आहेत, सर्व लोकांची ह*त्या केली आहे… कोणतेही किल्लेदार आम्हाला ताब्यात घेणार नाहीत, किंवा सैन्य आम्हाला रोखणार नाही.. आम्ही तुमच्या मशिदी तोडणार आहोत… तुमची मुले आणि म्हातारे एकत्र मारू…” कुतुझनेही राजदूतांचा शिर*च्छेद करून आणि कैरोच्या वेशीवर त्यांचे मुंडके टांगून या पत्राला प्रतिसाद दिला.

पण, ग्रेट खान चीनच्या मोहिमेत मरण पावला तेव्हा आक्र*मणाची दिशा बदलली गेली आणि पुढचा ग्रेट खान कोण असेल हे ठरवण्यासाठी हुलागुला मायदेशी परतावे लागले. जाताना त्या भागात मंगोल लोकांची उपस्थिती राहावी म्हणून त्याने फक्त एक छोटे सैन्य  ठेवले. संधी पाहून, कुतुझ मामलुकने पॅलेस्टाईनवर आक्र*मण केले. इस्लामचे रक्षण करण्यासाठी आणि मंगोलांच्या ताब्यातील दमास्कस आणि बिलाद अल-शामला मुक्त करण्यासाठी मामलुक नेता, बायबरसह युती केली.



मामलुकांची वाढती लष्करी ताकद पाहून, मंगोल लोकांनी फ्रँको-मंगोल युती तयार करण्याचा प्रयत्न केला पण ‘पोप अलेक्झांडर फोर्थ’ने त्यास मनाई केल्याने ते अयशस्वी झाले. जरी इस्लामविरूद्ध मामलुक आणि फ्रँक यांच्यात दीर्घकाळ ख्रिस्ती लढत असले तरी मंगोलियन सैन्य कोणालाही सोडणार नाही हे फ्रँक्सला समजले आणि त्याने मामलुक सैन्याला आपल्या भूमीतून जाऊ दिले. जेव्हा मंगोल लोकांनी जॉर्डन नदी ओलांडल्याची बातमी आली, तेव्हा कुतुझ त्यांना भिडण्यासाठी जेझरील खोऱ्यात ‘ऐन जलूत’च्या दिशेने निघाला.

३ सप्टेंबर १२६० रोजी ‘ऐन जलूत’मध्ये दोन्ही बाजूंनी प्रत्येकी वीस हजार सैनिकांची लढाई झाली. मंगोल लोकांनी पहिला ह*ल्ला केला. मामलुकांना मोठा फायदा होता कारण त्यांना त्या भूप्रदेशाची अत्यंत अचूक माहिती होती आणि कुतुझने याच गोष्टीचा उपयोग आपल्या विजयासाठी केला. ही रणनीती खरेतर बायबरने मांडली होती कारण त्याने या प्रदेशात सर्वाधिक वेळ घालवला होता. कुतुझने आपले बहुतेक सैन्य डोंगराळ प्रदेशात ठेवले आणि बायबरने खुल्या मैदानात मंगोल लोकांशी लढण्याचा प्रयत्न केला.

ही लढाई अनेक तास सुरु होती, पण दोन्ही बाजूंपैकी कोणालाही फायदा झाला नाही. बायबरने शेवटी यु*द्धातून माघार घेण्याचे नाटक केले. संतप्त झालेल्या मंगोल कमांडरने मात्र बेसावधपणे मागे हटणाऱ्या सैन्याचा पाठलाग केला. जेव्हा हे सैन्य डोंगराळ प्रदेशात पोहचले, तेव्हा कुतुझच्या सैन्याने मंगोलनांना वेढा घातला आणि मंगोल आपसूकच मामलुक सैन्याच्या वेढ्यात अडकले. मंगोलांना मात्र निःशस्त्रपणे लढाई करता आली नाही. या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी ते आपल्या जीवाची बाजी लावून लढले. काही ठिकाणी मंगोल यशस्वी झाले सुद्धा.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

मंगोल लोक डाव्या फळीतून बाहेर पडत आहेत हे पाहिल्यावर कुतुझने आणखी सैन्याला यु*द्धात उतरवले आणि तेथे असलेल्या मंगोल सैन्याला चिर*डले. जरी मंगोल सैन्य पलटवार करण्यात यशस्वी झाले तरी त्यांच्याकडे पुरेशी संख्या नव्हती आणि लवकरच त्यांच्या कमांडरसह संपूर्ण मंगोल सैन्य नष्ट झाले. समोरासमोरच्या प्रत्यक्ष लढाईत मंगोल सैन्याला पहिल्यांदाच एका सैन्याने पराभूत केले होते.

या ऐतिहासिक विजयाच्या नंतर मात्र, कुतुझची ह*त्या बायबरच्याच काही गुप्तहेरांनी केली. बायबर एकमेव मामलुक शासक बनल्यानंतर त्याने पुन्हा मंगोल लोकांविरुद्ध यु*द्ध पुकारले आणि त्यात त्यांना पराभूत केले. तसेच बायबरने उर्वरित क्रुसेडर साम्राज्यांवरही सत्ता मिळवली आणि एकछत्री सामर्थ्यशाली साम्राज्य उभे केले.

उत्तराधिकारांच्या मुद्यांमुळे, हुलागुकडे मामलुकांच्या हातून पराभवाचा बदला घेण्याइतपत शक्ती उरली नाही. शिवाय, मंगोल लोकांमध्ये अंतर्गत भांडणे चालू होती, कारण किपचक खानतेचा खान मुस्लिम झाला होता आणि हुलागूने अब्बासींचे काय केले हे ऐकल्यावर त्याने हुलागुला हा संदेश पाठवला, “त्याने (हुलागुने) मुस्लिमांची सर्व शहरे उ*ध्वस्त केली आहेत आणि खलिफाची ह*त्या घडवून आणली आहे. ईश्वराच्या मदतीने मी त्याला अनेक निष्पाप लोकांच्या ह*त्येचा हिशोब देईन. ”

अखेरीस मामलुकांच्या हातून झालेल्या पराभवामुळे मंगोल साम्राज्याचा अंत झाला. कुबलाई खान साम्राज्याचा शेवटचा ग्रेट खान होता. मंगोल किपचकांविरूद्ध लढत होते आणि १२६३ साली कॉकसच्या ह*ल्ल्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

जरी मामलुकांशी लढण्यासाठी पुढील सैन्य पाठवले गेले असले तरी ते देखील ते सैन्य मामलुकांच्या प्रदेशाला इस्लामिक साम्राज्याखाली आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये अपयशी ठरले. यामुळे शेवटी मंगोल लोकांमुळे जगात पसरलेल्या व्यापक दह*शतीचा अंत झाला आणि पुन्हा एकदा जगात स्थिरता निर्माण झाली. म्हणूनच ऐन जलूतची लढाई जगाच्या इतिहासातील एक महत्वाची घटना होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

खिशात रुपया नसताना BCCIने १९८७ चा विश्वकप भारतात आणला आणि जुगाड करून यशस्वी देखील केला

Next Post

नोकरी सोडून कोचिंग सुरु केलं आणि श्रीमंतांच्या यादीत झुनझुनवालांनाही मागे टाकलं होतं

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

नोकरी सोडून कोचिंग सुरु केलं आणि श्रीमंतांच्या यादीत झुनझुनवालांनाही मागे टाकलं होतं

अटलांटात वांशिक दं*गल उसळण्याला एका वर्तमानपत्राचं उथळ वार्तांकन कारणीभूत होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.