The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पायलटने फ्लाईट ऑटोपायलटवर टाकून आपल्या लहान मुलाच्या हातात दिली, आणि ७५ प्रवाशांचा बळी गेला

by द पोस्टमन टीम
28 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


केवळ लाडाचा लेक मागे लागला म्हणून लायसन्स मिळण्याच्या वयापेक्षाही कमी वयात त्याला बाईक घेऊन देणारे आईबाप आपल्याकडे कमी नाहीत. त्याचे किती गंभीर परिणाम होतात याची त्यांना एकतर कल्पना नसते किंवा असली तरी ‘चलता है’ हा घातक ॲटिट्यूड असतो. पण मुलांना विमानाच्या कंट्रोल्सशी खेळू द्यायच्या नादात एका वैमानिकामुळे चक्क विमानाचा अपघात घडला होता, आणि त्यात अनेकांचा जीव गेला होता. काय होते हे प्रकरण?

२३ मार्च १९९४ रोजी ‘एरोफ्लोट फ्लाइट ५९३’ ही फ्लाईट मॉस्कोहून हाँगकाँगला जात होती आणि त्यात ७५ प्रवासी होते. ते त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचण्याआधी काहीतरी बिघडले. विमान हवेत वरखाली हेलकावे खाऊ लागले. एका क्षणी तर ते इतक्या कमी उंचीवर आले की येथून मागे वळणे सर्वस्वी अशक्य होते. परिणाम व्हायचा तोच झाला.

एअरबस A310 हे विमान जमिनीवर आदळून विमानातील सर्व लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर तपासाचे वगैरे सोपस्कार पार पडले. त्यात असे दिसून आले की हा अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे झाला होता.

फ्लाइट 593 च्या केबिनमध्ये तीन लोक होते: विमानाचा पायलट ४० वर्षीय आंद्रे व्हिक्टोरोविच डॅनिलोव्ह, त्याचा प्रथम सहायक ३३ वर्षीय इगोर वासिलीविच पिस्करेव्ह. आणि बॅकअप पायलट ३९ वर्षीय यारोस्लाव व्लादिमिरोविच कुद्रिन्स्की. त्याचबरोबर एरोफ्लोट पायलट व्लादिमीर मकारोव हादेखील या विमानात होता, जो हाँगकाँगमध्ये कामावर निघाला होता आणि प्रवासी म्हणून प्रवास करत होता.

विमानाने सुरुवातीला पाहिजे तसे उड्डाण केले, त्यानंतर काही तासांनी कॅप्टन डॅनिलोव्हने बदली वैमानिक कुद्रिन्स्कीकडे विमानाचे नियंत्रण सोपवले. त्याने थोडा वेळ झोपायचे आणि नंतर हाँगकाँगमध्ये लँडिंग करण्यासाठी सुकाणू हातात घ्यायचे ठरवले होते. कुद्रिन्स्की हाही एक अनुभवी पायलट होता: त्याच्याकडे जवळजवळ ९००० तास उड्डाण करण्याचा अनुभव होता. शिवाय एअरबस A310 चाही जवळजवळ १००० तास उड्डाण करण्याचा अनुभव होता. त्याने एरोफ्लोटवर दोन वर्षे कोणत्याही अपघाताशिवाय काम केले होते.



फ्लाइटमध्ये कुद्रिन्स्कीची अनुक्रमे १५ आणि १२ वर्षांची मुले होती. मोठा मुलगा एल्डर आणि मुलगी याना हे प्रवास करत होते. त्यावेळी, विमानातून प्रवास करणाऱ्या मुलांचे कुतूहल शमवण्यासाठी त्यांना कॉकपिटमध्ये बोलावून विमानाचे नियंत्रण कसे केले जाते हे दाखवले जाई. ही अगदी सामान्य गोष्ट होती. कुद्रिन्स्की आपल्या मुलांना प्रभावित करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे गेला: त्याने आपल्या मुलांना आपली जागाच दिली आणि पायलट सीटवर बसून विमानाचे नियंत्रण करायला सांगितले. यानाने आधी नंबर लावला. कुद्रिन्स्कीने तिला बसलेली जागा ऍडजस्ट करून दिली.

त्या क्षणी विमान ऑटो पायलट प्रणालीद्वारे नियंत्रित केले जात होते. याना स्टीयरिंग व्हीलशी खेळत असताना, कुद्रिन्स्कीने ऑटोपायलटचा कोर्सही थोडा बदलला, जेणेकरून त्याच्या मुलीला ती खरोखरच विमान नियंत्रित करत असल्याचा फील यावा. बरे हे करत असताना त्याने अधिकृतपणे त्याच्या सह-वैमानिकाकडे नियंत्रणही सोपवले नाही. त्यावेळी तिथे जे कुणी हजर होते त्यांनीही त्याबद्दल काही हरकत घेतली नाही. उलट कॉकपीटमधील त्याचे सहकारी रेडिओवर बोलणे, हास्यविनोद, आणि कंट्रोल्सवर काम करतानाचे मुलांचे फोटो काढणे यातच मश्गुल होते.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

मग यानाने पायलटची जागा सोडली आणि एल्डरने तिची जागा घेतली. कॉकपीटमधील वातावरण छान, खेळीमेळीचे होते. कुद्रिन्स्कीने आताही ऑटोपायलटचा कोर्स थोडा बदलला जेणेकरून एल्डरला असे वाटेल की तो खरोखरच विमान उडवत आहे. दोन्ही मुलांना सारखीच ट्रीटमेंट द्यायला हवी ना!

पण पायलटच्या सीटवर असताना याना कंट्रोल्स जितके काळजीपूर्वक हाताळत होती, तसे एल्डरचे नव्हते. त्याने ३० सेकंदांपेक्षा जास्त काळ स्टीयरिंग व्हील ओढून धरले, त्यामुळे सिस्टीमच्या डिझाइननुसार ऑटोपायलट मोड अंशतः डिसेबल झाला. त्यामुळे वास्तविक वॉर्निंग लाईटही लागला, पण तिकडे कोणाचेही लक्ष नव्हते.

एव्हाना एल्डरने चाक एकाच बाजूला हलवत राहिल्याने विमान एका बाजूला कलू लागले. एल्डरने त्याच्या वडिलांना विमान तिरके का होत आहे असे विचारले. आता मात्र सर्वांच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली. विमान एका बाजूला का झुकले हे कुद्रिन्स्कीलाही सांगता येईना. काही सेकंदातच विमान इतके कलले की केबिनमध्ये घबराट पसरली. सगळीकडे नुसता गोंधळ आणि भीती. काय होत आहे हे एकाही पायलटला समजेना.

विमानाच्या त्या विशिष्ट स्थितीमुळे गुरुत्वाकर्षणात अचानक वाढ होऊन कुद्रिन्स्की केबिनच्या मागील बाजूस अडकून पडला, त्याला पुढे त्याच्या सीटकडे येताच येईना. अजून एक साथीदारही जेमतेम एका हाताने लीव्हरपर्यंत पोहोचू शकला. दोघेही एल्डरला सूचना देऊ लागले. पण शेवटी एल्डर पडला लहान, शिवाय अप्रशिक्षित. त्याला विमान नियंत्रित करता येईना.

विमान ज्या तीव्र कोनात होते त्या कोनामुळे त्याची उंची कमी झाली. ऑटोपायलट मोडवर विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु याचा काही फायदा झाला नाही आणि ऑटोपायलट पूर्णपणे बंद झाला. त्यानंतर विमान वाचवण्यासाठी दुसरी स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

कॉकपिटमध्ये तर अभूतपूर्व गोंधळ होता: ओरडणे, किंकाळ्या, पायलटकडून येणारे आदेश असा सगळा माहोल होता. कसाबसा कुद्रिन्स्की आपल्या जागेवर परत येण्यात यशस्वी झाला आणि त्याने पुन्हा विमानाचा ताबा घेतला. त्याने आणि पिस्कारेव्ह नावाच्या त्याच्या सहकाऱ्याने मिळून विमान वर चढवण्याचा प्रयत्न केला. पण आता उशीर झाला होता.

परिस्थिती इतकी बिकट होती की वैमानिकांना डिस्ट्रेस कॉल द्यायलाही वेळ मिळाला नाही. दोन मिनिटे ते विमानाच्या नियंत्रणासाठी धडपडत होते, गोंधळलेले आणि घाबरलेले होते, त्यांचा आवाजही नीटसा ऐकू येत नव्हता. शेवटी शेवटच्या डाईव्हमधून बाहेर पडण्यात आणि लेव्हल ऑफ करण्यात ते यशस्वी झाले, तेव्हा त्यांनी खूप खालची उंची गाठली होती. त्यामुळे विमानाचे आणि सर्व प्रवाशांचे भवितव्य निश्चित झाले होते. झालेही तसेच. काही क्षणांतच, विमान पर्वतराजीच्या बाजूला कोसळले आणि त्यात बसलेल्या सर्वांचा मृत्यू झाला.

अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे. निष्कर्ष निःसंदिग्ध होते: हा अपघात प्रामुख्याने मानवी चुकीमुळे झाला होता. एअरबसच्या डिझाइनवरही ठपका ठेवला गेला. उदाहरणार्थ, ऑटोपायलट बंद झाल्याचे दर्शविणारा अलार्म आवाजाच्या स्वरूपात सूचना देत नव्हता. तसे असते तर आवाज कानावर पडून लवकर विमान नियंत्रणात आणता आले असते आणि अपघात टळला असता. विमानाचा पायलट असणे ही किती जबाबदारीची गोष्ट आहे याचा हा एक कठोर धडा होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

शीतयु*द्धात अमेरिकेने रशियाला मात दिली त्याचं बरंच श्रेय ना*झी शास्त्रज्ञांना जातं

Next Post

ब्रिटनची सर्वात प्रसिद्ध ‘द ब्ल्यू बॉय’ पेंटिंग शंभर वर्षांनी अमेरिकेहून परत लंडनला येतेय

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

ब्रिटनची सर्वात प्रसिद्ध 'द ब्ल्यू बॉय' पेंटिंग शंभर वर्षांनी अमेरिकेहून परत लंडनला येतेय

Explainer - कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आंदोलकांना घाबरून लपून का बसलेत..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.