The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्या उपवास म्हणून स्वीडनच्या राजाने एवढं खाल्लं की जीव गेला..!

by द पोस्टमन टीम
21 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपल्या आवडीचा पदार्थ आपण कितीही खाऊ शकतो, असा दावा प्रत्येक खवय्याने एकदा तरी केलेला असतोच. आजकाल तर ‘बाहुबली थाळी’, ‘बाहुबली सँडविच’, ‘बाहुबली पिझ्झा’ असे बरेच पदार्थ खाल्ल्यावर लाखोंचं बक्षीसही दिलं जातं. कित्येक लोक हे बक्षीस जिंकतातही. मात्र, हे सगळे खवय्ये ज्याच्यासमोर काहीच नाहीत असा एक खवय्या सतराव्या शतकात होऊन गेला. तो होता स्वीडनचा राजा अ‌ॅडॉल्फ फ्रेड्रिक! फ्रेड्रिकच्या एकूण कारकिर्दीपेक्षा त्याचा मृत्यू हा लोकांमध्ये चर्चेचा विषय झाला होता. कारण त्याचा मृत्यू हा कोणत्या लढाईत नाही, तर अती खाण्यामुळे झाला होता.

सतराव्या शतकात झालेल्या रशिया-स्वीडन यु*द्धामध्ये रशियाची राणी एलिझाबेथ ही जिंकली होती. मात्र, तरीही फिनलँडचा तिने जिंकलेला बराचसा भाग स्वीडनला देण्यासाठी ती तयार झाली. मात्र, यासाठी तिने आपला भाचा अ‌ॅडॉल्फला राजा करण्यात यावं ही अट ठेवली. स्वीडनचा त्यापूर्वीचा राजा किंग फ्रेड्रिक पहिला कालवश झाल्यानंतर हे सगळं प्रकरण घडलं. खरंतर अ‌ॅडोल्फला राजा करण्यासाठी एलिझाबेथने स्वीडनला एकप्रकारे लाचच दिली होती. अशा प्रकारे अ‌ॅडॉल्फ हा स्वीडनचा राजा झाला होता.

स्वीडननेही त्याला काही विशेष असे अधिकार दिले नव्हते. त्यांनी अ‌ॅडॉल्फला केवळ नावाला राजा केलं होतं. महत्त्वाचे काही निर्णय घेण्याचा अधिकार मात्र पार्लमेंटकडे होते.

असं असलं तरी त्याच्या कारकीर्दीमध्ये स्वीडनमध्ये नागरी अधिकारांना चांगलाच वाव मिळाला होता. त्याच्या काळातच स्वीडिश पार्लमेंटने जगातील पहिला पत्रकार स्वातंत्र्य कायदा (प्रेस फ्रीडम अ‌ॅक्ट) मंजूर केला होता. मात्र, त्याच्या कारकीर्दीपेक्षा, त्याच्या साम्राज्याचा शेवट कसा झाला याचीच चर्चा अधिक होते. अ‌ॅडॉल्फच्या विचित्र मृत्यूसोबतच त्याच्या साम्राज्याचा, आणि स्विडिश पार्लमेंटचाही अंत झाला.

आपल्याकडे हिंदू लोक श्रावण महिन्यात लोक मांसाहार करणं सोडून देतात, मुस्लिम लोक रमजानमध्ये रोजे पाळतात. त्याचप्रमाणे काही ख्रिश्चन लोक इस्टरच्या पूर्वी चाळीस दिवस उपवास करतात. हा उपवास ‘अ‌ॅश वेन्सडे’ला सुरू होतो. या दरम्यान कित्येक जण मांसाहार, किंवा मग अगदी दुधाचे पदार्थही खाणे टाळतात. एकप्रकारे हा ‘व्हीगन’ उपवास असतो. स्वीडनमध्येही अशा प्रकारचे उपवास केले जात.



स्वीडनमध्ये त्याकाळी हा उपवास करणं ख्रिश्चन लोकांसाठी अनिवार्य करण्यात आलं होतं. पण मग यावर त्यांनी एक उपाय शोधून काढला होता. श्रावणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याकडे ‘गटारी’ दिवशी लोक मस्तपैकी चिकन-मटण खाऊन घेतात; अगदी त्याचप्रमाणे स्विडिश लोक ‘फेट्टीसडॅग’ किंवा ‘फॅट ट्यूस्डे’ असा दिवस साजरा करत होते. या मंगळवारी ते मस्त मेजवानी झोडत, आणि बुधवारपासून उपवासाला सुरुवात करत.

१२ फेब्रुवारी १७७१ रोजी असणाऱ्या फॅट ट्यूस्डेला खाण्याचा शौकीन असलेल्या अ‌ॅडॉल्फने राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली होती. या दिवशी दुपारी त्यानं खाण्यावर चांगलाच ताव मारला. त्याच्या जेवणामध्ये लॉब्स्टर, कॅव्हियार, किपर्स, साउरक्राऊट, उकडलेलं मांस, ट्युर्निप्स अशा पदार्थांचा समावेश होता. अ‌ॅडॉल्फचं जेवण नेहमीच जरा जास्त असायचं. सामान्य माणसाच्या दुप्पट तर तो आरामात खायचा.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

मात्र, ‘उद्यापासून हे सर्व मिळणार नाही’ या दडपणाखाली, आणि पार्टीच्या वातावरणामुळं त्या मंगळवारी त्यानं आपले आधीचे सर्व रेकॉर्ड मोडून काढले. बाकी कोणत्या बाबतीत तो सगळ्यांपेक्षा महान नसला, तरी खाण्याच्या बाबतीत मात्र तो नक्कीच खवय्यांचा ‘राजा’ होता. 

खाऊन झाल्यानंतर त्यानं मनसोक्त शॅम्पेनही पिली. यानंतर त्याचं ‘झालं’ असं तुम्हाला वाटत असेल, तर थांबा! अजून ‘खाने के बाद कुछ मीठा हो जाए’ हे नव्हतं झालं. जेवणानंतर डिसर्ट म्हणून त्यानं, त्याचे आवडते ‘सेम्ला’ (किंवा सेम्लोर) मागवले.

सेम्ला ही स्वीडनमधील प्रसिद्ध स्वीट डिश. गोड बनपाव, आणि त्यामध्ये टाकलेली क्रीम अशा स्वरुपाची ही डिश होती. १५४१मध्ये ही डिश पहिल्यांदा बनवण्यात आली, आणि त्यानंतर प्रत्येक फॅट ट्यूस्डेला हे खाणं स्वीडनच्या राजघराण्याची परंपराच झाली होती. अ‌ॅडॉल्फ फ्रेड्रिकचीही ही आवडती डिश होती.

आपल्याकडे कोणत्याही इराणी हॉटेलमध्ये जो मस्का-पाव मिळतो, त्याचंच हे एक रुप. अ‌ॅडॉल्फ राजा असल्यामुळे त्याला देण्यात आलेले सेल्मोर हे अर्थातच मस्का-पावप्रमाणे साधे नव्हते. गरमा-गरम फ्लेवर्ड मिल्कच्या बाऊलमध्ये एक-एक सेम्ला अशा शाही थाटात ते राजासमोर मांडले गेले. सेल्मोरचा आकार एवढा असतो, की एक साधारण माणूस एकाच वेळी जास्तीत जास्त पाच किंवा सहा सेल्मोर खाऊ शकेल; तेही रिकाम्या पोटी. 

पण, अ‌ॅडॉल्फने आपल्या शाही मेजवानीनंतर तुडुंब पोट भरुनही तब्बल १४ सेल्मोर फस्त केले! यानंतर त्याला श्वास घेणंही जड जात होतं; त्यामुळे कदाचित त्यानं आवरतं घेतलं. याच दिवशी दुपारी पचनसंस्थेमध्ये झालेल्या बिघाडामुळे त्याचा मृत्यू झाला.

अ‌ॅडॉल्फच्या मृत्यूमुळे स्वीडनमधील पार्लमेंटचा, लोकशाहीचा आणि नागरी अधिकारांचाही मृत्यू झाला. कारण, अ‌ॅडॉल्फनंतर त्याचा मुलगा गुस्ताव तिसरा हा स्वीडनचा राजा झाला. त्याने राज्यातील लोकशाही संपुष्टात आणली, आणि हुकूमशाही लागू केली. यासोबतच त्याने रशियासोबत यु*द्धही सुरू केलं, ज्यामध्ये तो हरला. यात स्वीडनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

अ‌ॅडॉल्फच्या कारकिर्दीमध्ये स्वीडनने जे काही कमावलं होतं, ते सगळं त्याच्या मुलाच्या कारकीर्दीमध्ये गमवालं. त्याच्या या कृत्यांमुळेच एक दिवस एका मारेकऱ्याने गोळी घालून त्याची ह*त्या केली. एका अर्थानं पाहिलं, तर अ‌ॅडॉल्फ आणि गुस्ताव हे दोघंही आपल्या कर्मानेच गेले. मात्र, अ‌ॅडॉल्फ किमान मरताना सेल्मोर खाऊन तृप्त तरी झाला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अटलजींनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रतिस्पर्धी गोविन्दाचार्यांचं करिअर संपलं

Next Post

‘प्रोजेक्ट अ‍ॅझोरियन’ – अमेरिकेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं कोव्हर्ट ऑपरेशन

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

'प्रोजेक्ट अ‍ॅझोरियन' - अमेरिकेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं कोव्हर्ट ऑपरेशन

...म्हणून बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र व्हायचंय...!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.