The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘पे-पाल’ने या माणसाच्या अकाउंटवर चुकून ९२ क्वाड्रिलिअन डॉलर्स टाकले होते..!

by द पोस्टमन टीम
28 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


पैसा ही आपल्या जगण्यासाठीची अत्यावश्यक गोष्ट आहे. पैसा कधीच कोणाला नको होत नाही, उलट कायम हवाच असतो. ‘मुझे मिल जाये थोडा पैसा, चाहे जैसा’ अशी बरीच पैसाविषयक गाणी आपल्याकडे अनेक चित्रपटांतून आली आहेत. संपूर्ण आयुष्यभर पैसा कमवण्यासाठी कष्ट करून नंतर उतारवयात त्याचा उपभोग घेणं हे प्रत्येकालाच शक्य होतं असं नाही, पण म्हणून पैशाच्या मागे लागायचं कोणीही सोडत नाही. कारण ज्याच्याकडे जास्त पैसा असतो, त्याला समाजात भरपूर मानसन्मान मिळत असतो. गरीबाकडे तसं कोणी आदराने पाहत नाहीच, उलट दयेने किंवा तुच्छतेनेच पाहिलं जातं.

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, पण त्या मिळवण्यासाठीही पैसाच लागतो. एक पैसा असला की, हवी ती गोष्ट विकत घेता येते. म्हणून अनेकजण वेगवेगळ्या मार्गाने पैसा कमवायचा प्रयत्न करत असतात, भले मग तो मार्ग चुकीचा का असो. आपल्याकडे हेराफेरी, मालामाल वीकली यासारखे अनेक चित्रपट पैसा या विषयावर बनले आहेत. त्यामधले अनेक प्रसंग आजही फार मनोरंजक वाटतात.

मात्र एक आहे, पैसा हा कधी कोणाला कशाप्रकारे मिळेल, याचा कधीकधी काही नेम नसतो. अचानकपणे लागलेली लॉटरी किंवा काही गुप्त खजिना वगैरे (पूर्वीच्या गोष्टींमध्ये सापडायचा तसा) अचानक सापडला असं काही झालं तर मग बघायलाच नको. अगदी “पाँचो उंगलियां घी में” म्हणतात, तसं त्या माणसाचं होऊन जातं, स्वर्ग जणू दोन बोटंच उरतो.

अशीच एका माणसाची अवस्था झाली होती. चुकून त्याच्या अकाऊंटला एवढी मोठी रक्कम जमा झाली होती की, जी मोजण्यात त्याचं अख्खं आयुष्य संपलं असतंच, वर त्याच्या पुढच्या कित्येक पिढ्या आरामात काहीही न करता जगू शकल्या असत्या. पण जेव्हा त्याला ही गोष्ट कळली, तेव्हा नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया.



पेन्सिलव्हानिया देशातले क्रिस रेनॉल्ड हे ५६ वर्षांचे गृहस्थ एका मीडिया फर्ममध्ये पी. आर. एक्सिक्युटिव्ह म्हणून काम करत होते, शिवाय ते ई-बे या ऑनलाईन शॉपिंग साईटवर जुन्या विंटेज कार्सचे पार्ट्स विकत असत. त्यासाठी पे-पाल या मनी ट्रान्सफर पोर्टलचाही ते वापर करीत. पे-पाल हे जगातल्या अग्रगण्य मनी ट्रान्सफर पोर्टल्सपैकी एक असून सुरक्षित व्यवहारांसाठी अनेकजण त्याचा वापर करतात.

दर महिन्याला या कंपनीकडून ग्राहकांना त्यांचे एकूण व्यवहार, त्यात खर्च झालेली व बाकी शिल्लक असलेली रक्कम यांचं एक मंथली स्टेटमेंट दिलं जातं.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

असंच मंथली स्टेटमेंट क्रिस रोनाल्ड यांना जून २०१३ मध्ये पे-पाल कंपनीकडून त्यांच्या ईमेलवरती मिळालं. ते त्यांनी जेव्हा पाहिलं, तेव्हा त्यांना विश्वासच बसेना. त्यांच्या खात्यात एक भलीमोठी रक्कम जमा झाली होती, जी मोजायलाही अतिशय अवघड होती.

$92,233,720,368,547,800/- (भारतीय चलनामध्ये ६८,८०,२४,८१,५७,८६,८१,२०,०००/-) एवढी भलीमोठी रक्कम पे-पाल कडून त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली होती. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीकडे असलेल्या संपूर्ण संपत्तीच्याही कितीतरी पटीने हा आकडा मोठा होता. क्रिस रेनॉल्ड यांनी त्यापूर्वी आपल्या खात्यात कोणत्याही प्रकारे रक्कम शिल्लक ठेवलेली नसताना एवढ्या प्रचंड अमाऊंटचं स्टेटमेंट पाहून त्यांना काहीच सुचेना. अगदी त्यांनी आपल्या बायकोलाही ते दाखवलं तर तिचाही विश्वास काही केल्या त्यावर बसेना.

मग त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भात एक पोस्ट लिहिली. त्यात या स्टेटमेंटचा स्क्रीनशॉट जोडला होता. तो पाहून त्यांच्या फ्रेंडलिस्टमधल्या अनेकांनी त्यांना ही अमाऊंट डेबिट नाही तर क्रेडिट असल्याचं सांगितलं. अखेर खात्री करून घ्यायला जेव्हा त्यांनी लॉगिन करून आपलं पे-पालचं ऑनलाईन अकाऊंट चेक केलं, तेव्हा त्यात 0/- बॅलन्सच होता. तेव्हा जाऊन कुठे त्यांना जरासा धीर आला.

जेव्हा त्यांनी पे-पालकडे यासंदर्भात चौकशी केली, तेव्हा कंपनीने लगेच आपली चूक मान्य करून क्रिस यांची माफी मागितलीच, शिवाय त्यांना एखाद्या सामाजिक संस्थेला देणगी देण्याचीही मुभा त्या रकमेतूनच दिली. त्यावेळी क्रिस यांनी एवढ्या मोठ्या रकमेचं काय केलं असतं, हा प्रश्न येणं साहजिकच आहे. एखाद्याने महागड्या गाडी, बंगल्यावर ती रक्कम खर्च केली असती किंवा आपल्या भावी आयुष्याची सोय करून ठेवलीच असती. पण क्रिस यांनी काय केलं?

“मी अमेरिकेकडून माझ्या देशाने घेतलेल्या कर्जाची रक्कम फेडू इच्छितो” असं ते म्हणाले.

क्रिस हे आपलं पी.आर.एक्सिक्युटिव्हचं काम सांभाळून फावल्या वेळातच त्यांचा ‘ई-बे’वरील गाड्यांच्या पार्ट्सच्या विक्रीचा व्यवसाय चालवत होते. यामधून महिन्याकाठी त्यांची फारतर १०० डॉलर्सची उलाढाल होत असे. त्यांचा सगळ्यात मोठा व्यवहार हा BMW च्या टायर्सच्या जोडीचा होता, ज्यातून त्यांना सुमारे १००० डॉलर्सची कमाई झाली होती. असा माणूस जेव्हा जगामधील सगळ्यात जास्त श्रीमंत माणसापेक्षाही अधिक श्रीमंत होतो, तेव्हा ती गोष्ट निश्चितच आश्चर्यास्पद असते. यात पे-पाल कंपनीनेही आपली चूक तातडीने मान्य करून वर क्रिस रेनॉल्ड यांचंही कौतुक केलं की, त्यांनीदेखील झालेला प्रकार हा अत्यंत समंजसपणे कंपनीच्या निदर्शनास आणून दिला.

आपल्याकडे मराठी भाषेत एक म्हण आहे, ‘असतील शिते तर जमतील भुते’. नाही म्हणायला या अजब प्रसंगातसुद्धा एक चांगली गोष्ट झाली. पे-पालच्या या चुकीमुळे क्रिस यांचे कितीतरी जुने, बराचसा काळ कोणत्याही प्रकारे संपर्कातही नसलेले अनेक मित्र त्यांना परत भेटले कारण क्रिस रेनॉल्ड त्या घटनेमुळे अचानकच प्रकाशझोतात आले. आपल्याकडे जसा अनिल कपूरच्या नायक चित्रपटात तो एक दिवसाचा मुख्यमंत्री बनलेला असतो, अगदी त्याच प्रकारे क्रिस रेनॉल्ड हे भलेही एकाच दिवसाकरता का होईना, पण जगामधले सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्ती बनले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

१९५२च्या ग्रेट स्मॉगमुळे ब्रिटनला पर्यावरणाचं महत्त्व पटलं आणि स्वच्छ हवेसाठी कायदे केले

Next Post

या गावाच्या कुंभकर्णी झोपेच्या आजाराचा शास्त्रज्ञांना अखेर उलगडा झालाय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या गावाच्या कुंभकर्णी झोपेच्या आजाराचा शास्त्रज्ञांना अखेर उलगडा झालाय

कॅल्क्युलेटर्समुळे आपले पाढे, पावकी, निमकी, दिडकी पाठ करायचे कष्ट वाचत आहेत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.