The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आकाश चोप्राला मैदानावर जे मिळालं नाही, ते त्याने ‘कमेंट्री बॉक्स’मध्ये कमावलं

by द पोस्टमन टीम
30 September 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


क्रिकेटचा सामना मैदानात असो किंवा टिव्हीवर, बॅकग्राउंडला कॉमेंट्री नसेल तर एकदमच सुनसुनं वाटत नाही? कॉमेंट्री नसेल तर सामना कितीही रंजक असू तो पाहण्यासाठी मजा येत नाही. भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गज माजी खेळाडू कॉमेंट्रीबॉक्समध्ये बसून क्रिकेटचे सामने आणखी रंजक करण्याचं काम करत आहेत.

यामध्येच एक व्यक्ती अशी आहे, ज्याची कडक आवाज आणि गमतीशीर विनोदांमुळं क्रिकेटच्या सामन्यांमध्ये जिवंतपणा येतो. ‘आकाश चोप्रा’ असं या माजी भारतीय खेळाडूचं नाव आहे. देशांतर्गत क्रिकेटपासून सुरू झालेला आकाशचा प्रवास आता कॉमेंट्रीबॉक्सपर्यंत येऊन थांबला आहे. कॉमेंट्री करताना त्याला अनेकदा टीकेचा देखील सामना करावा लागला. क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर विविध भूमिका पार पाडणाऱ्या आकाश चोप्राबद्दल हा विशेष लेख..

एका बाजूनं वीरेंद्र सेहवागचा करिश्मा सुरू असताना दुसऱ्या टोकाला भारतीय संघाची सलामी संतुलित करण्यासाठी संघ व्यवस्थापनानं अनेक सलामीवीर तपासून पाहिले. आश्वासक आणि तंत्रशुद्ध पद्धतीनं फलंदाजी करणारा आकाश चोप्रा याच कारणामुळं भारतीय संघात आला होता. सेहवाग आणि आकाश चोप्राच्या जोडगोळीनं मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंचे कष्ट कमी करण्याचं काम केलं होतं.

मात्र, काही दुर्दैवी कारणांमुळं आकाशला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही आणि त्याची क्रिकेट कारकिर्द अनपेक्षितपणे शेवटाला गेली. गुडघ्याच्या दुखापतीमुळं २००२-२००३ या हंगामाच्या अखेरीस त्याला संघाबाहेर बसावं लागलं होतं. त्यानंतर चोप्रानं न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आपल्या खेळातून सर्वांना प्रभावित केलं. परिणामी २००३-२००४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक दौऱ्यासाठी त्याची निवड करण्यात आली.



भारताचा हा दौरा राहुल द्रविडच्या निर्णायक खेळींसाठी आणि सेहवागच्या आतिशबाजीसाठी लक्षात राहिला. आकाश चोप्रा या दौऱ्यातील एक ‘अनसंग हिरो’ बनून राहिला आहे. नंतर जवळपास ८ डावांमध्ये त्याला ५० चा पल्ला देखील गाठता आला नाही. मैदानावरील त्याची आकडेवारी दमदार नसली तरी त्याचं गुणात्मक कौशल्य नक्कीच वरचढ होतं. त्यानं सेहवागला साथ देण्याची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडली होती.

आपल्या ठोस तंत्राला, मोठी धावसंख्या आणि आक्र*मक फटक्यांची जोड आकाश चोप्राला देता आली नाही. त्याच वेळी युवराज सिंग आणि मोहम्मद कैफसारख्या आक्र*मक खेळाडूंचे पर्याय भारताकडं उपलब्ध होते. साहजिक त्यांचा अगोदर विचार करण्यात आला आणि आकाश चोप्रा भारतीय ड्रेसिंग रूममधील एक ‘क्रॉनिक फ्रिंज’ बनला. घरच्या मैदानांवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सुमार कामगिरी केल्यानंतर त्याला बळीचा बकरा बनवण्यात आलं आणि त्याच्या जागी गौतम गंभीरची निवड करण्यात आली.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

राष्ट्रीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर चोप्रा आपला खेळ सुधारण्यावर काम करत राहिला. तीन वर्षांनंतर त्याची भारत ‘अ’ संघात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली. तिथे त्यानं नाबाद द्विशतक झळकावलं होतं. मात्र, भारतीय संघाचे दरवाजे त्यासाठी पुन्हा खुले झालेच नाहीत.

७८३ धावा करून चोप्रानं २००७-२००८ चा रणजी हंगाम गाजवला. त्यावर्षी त्याच्या संघानं (दिल्ली) विजेतेपदही पटकावलं. दुलीप ट्रॉफीमध्ये देखील त्यानं चमकदार कामगिरी केली. मात्र, तोपर्यंत सेहवाग आणि गौतम गंभीरच्या जोडीनं आपलं स्थान पक्क केलं होतं. २००८च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं आकाश चोप्राला खरेदी केलं होतं. मात्र, तरुणांचं वर्चस्व असलेल्या या लीगमध्ये चांगली कामगिरी करण्यात त्याला अपयश आलं. त्यानंतर मात्र, चोप्रानं क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती स्विकारली.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आकाश चोप्रानं मैदानाबाहेर विविध गोष्टी करण्यास सुरुवात केली. त्याच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या क्रिकेट चाहत्यांना माहिती नाहीत. १९ सप्टेंबर १९७७ रोजी जन्मलेल्या आकाशाला लिखाणाची आवड आहे. अगदी शाळेत असल्यापासून त्यानं आपली ही आवड जोपासलेली आहे. शाळेत असताना तो डायरी लिहायचा. जेव्हा त्यानं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली तेव्हा देखील तो सरावाच्या मैदानात डायरी घेऊन जात असे.

प्रशिक्षक जर काही टीप्स देत असतील तर तो लगेच आपल्या डायरीमध्ये लिहून काढत असे. त्यानं क्रिकेटची दोन पुस्तकं लिहिली. ‘Beyond the Blues: A First-Class Season Like No Other’ आणि ‘Out of the Blue: Rajasthan’s Road to the Ranji Trophy’ अशी या पुस्तकांची नावं आहेत. ही दोन पुस्तकं भारतीय क्रिकेटपटूंनी लिहिलेल्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी आहेत. याशिवाय त्यानं ‘द इनसाइडर’ नावाचं आणखी एक पुस्तक देखील प्रकाशित केलेलं आहे.

भारतातील फार कमी खेळाडूंकडं या माणसासारखी प्रगल्भ दृष्टी आहे. त्याला क्रिकेटबद्दल सखोल ज्ञान आहे. या बळावर त्यानं हिंदुस्तान टाइम्स आणि ईएसपीएम या क्रिकेट वेबसाईटसाठी अनेक क्रीडास्तंभही लिहिले आहेत. त्याला वाचकांमध्ये चांगली लोकप्रियता मिळाली होती. याशिवाय ‘राहुल द्रविड: टाइमलेस स्टील’ आणि ‘सचिन तेंडुलकर: द मॅन क्रिकेट लव्ह बॅक’ या पुस्तकामध्ये देखील आकाश चोप्राच्या लेखांचा समावेश आहे. सध्या आकाश स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विश्लेषक आणि समालोचक म्हणून काम करत आहे.

निवृत्त झालेल्या खेळाडूंपैकी काही मोजकेच खेळाडू सोशल मीडियावर सक्रीय दिसतात. त्यामध्ये आकाश चोप्राचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल. सामन्यांपूर्वी आणि नंतर विनोदी ट्विट टाकण्यासाठी आकाश चोप्रा प्रसिद्ध आहे. मात्र, त्याच्या या सवयीमुळं तो अनेकदा वादात सापडतो. एकदा त्यानं दक्षिण आफ्रिकन फलंदाज हाशिम आमलाच्या तंत्रांवर टीका केली होती. तेव्हा एक मोठा वाद निर्माण झाला होता.

आमलानं चोप्राच्या कारकीर्दीवरून त्याची खिल्ली उडवली होती. परंतु, नंतर माफी देखील मागितली. इंडियन प्रीमियर लीगमधील दिल्ली डेअरडेविलच्या कामगिरीबद्दल राहुल द्रविडवर टीका केल्यामुळं देखील चोप्रा वादात सापडला होता. नवोदित खेळाडूनं महेंद्रसिंह धोनीला बाद केल्यानंतर चोप्रानं धोनीवर टीका केली होती. त्यानंतर धोनीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चोप्राला ट्रोल केलं होतं. अशी लहान-मोठी प्रकरणं आहेत जेव्हा आकाश चोप्रा वादात सापडला आहे.

एक खेळाडू म्हणून त्याला आपली कारकीर्द प्रभावी करता आली नाही. मात्र, आपल्या क्रिकेटच्या ज्ञानामुळं त्यानं क्रिकेट रसिकांमध्ये नक्कीचं आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

१०० वेळा नकार मिळाला, परंतु या महिलेने जगासाठी ग्राफिक डिझायनिंग सोपं केलं

Next Post

इतिहासातील सर्वात शक्तिशाली यो*द्धे असलेले रोमन ग्लॅडिएटर्स शुद्ध शाकाहारी होते!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

इतिहासातील सर्वात शक्तिशाली यो*द्धे असलेले रोमन ग्लॅडिएटर्स शुद्ध शाकाहारी होते!

या आहेत जगातील १० सर्वांत महागड्या कार्स!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.