The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या क्रिकेटरने दिवसा देशासाठी क्रिकेट खेळून रात्री कुटुंबासाठी विमा विकलाय

by द पोस्टमन टीम
25 February 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


काही दिवसांपूर्वी दोन गोष्टी वाचण्यात आल्या. पहिली गोष्ट होती इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज ॲलिस्टर कुकची. जवळपास एक तपभर क्रिकेटच्या माध्यमातून देशाची सेवा केल्यानंतर तो निवृत्त झाला आणि त्यानंतर त्यानं शेतीची वाट धरली. अनेकांना आश्चर्य वाटेल मात्र, ही गोष्ट खरी आहे. ॲलिस्टर कुक शेतकरी झाला आहे. इंग्लंडमधील लेघटन बझार्डजवळ त्याची शेती आहे. शेतीसोबत तो मेंढीपालनचा व्यवसाय देखील करतो!

दुसरी गोष्ट होती वेस्ट इंडिजचा अतरंगी गोलंदाज शेल्डन कॉट्रेलची. शेल्डन विकेट घेतल्यानंतर एकदम कडक सॅल्युट ठोकून सेलिब्रेशन करतो. कारण, कॉट्रेल जमैकन डिफेन्स फोर्समध्ये नोकरी करत होता. या दोन्ही क्रिकेटर्सपैकी एकानं क्रिकेट सोडल्यानंतर दुसरा व्यवसाय सुरू केला तर एकानं क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी नोकरी केली होती.

मात्र, मी तुम्हाला आज एका अशा क्रिकेटरची गोष्ट सांगणार आहे, जो आपली क्रिकेट कारकिर्द सांभाळून नोकरी करत आहे. विशेष म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) झालेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा खेळाडू आपल्या देशासाठी खेळला देखील आहे. हा खेळाडू कोण आहे? तो काय नोकरी करतो? या प्रश्नांची उत्तरं देणारा हा लेख…

‘नामिबिया’, कलहरी आणि नामिब वाळवंटाच्यामध्ये वसलेला एक गरीब देश. आफ्रिका खंडातील देशांपैकी सर्वात कमी पाऊस याठिकाणी पडतो. दूर-दूर पसरलेलं वाळवंट, सोनेरी-सोनेरी गवताची कुरणं आणि त्यामध्ये असणारी समृद्ध वन्यजीव संपदा यावर येथील पर्यटन व्यवसाय चालतो अन् पर्यायानं देशाची अर्थव्यवस्था देखील.



सॅन, डमारा, नामा आणि स्थलांतरित बंटू लोकांचं हे वास्तव्याचं ठिकाण असलेला नामिबिया गेल्या काही शतकांपासून आपल्या मागासपणाशी संघर्ष करत आहे. कुठल्यातरी कारणामुळं आपला देश जगभरात ओळखला जावा, यासाठी देखील लोकांचे प्रयत्न सुरू आहेत.

अशातच त्यांना ‘क्रिकेट’ हा एक पर्याय मिळाला आहे. क्रिकेट, एक असा पर्याय आहे, ज्यामध्ये जर त्यांनी आपली छाप सोडली तर नक्कीच नामिबियाला जगभर प्रसिद्धी मिळेल. त्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमध्ये आपल्या आजच्या गोष्टीचा हिरो योगदान देण्याचं काम करत आहे. ‘क्रेग विल्यम्स’ असं त्याचं नाव.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

३७ वर्षीय क्रेग हा नामिबियाच्या संघातील महत्त्वाचा खेळाडू. २०२० साली झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये तो दिवसा नामिबियासाठी टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करायचा. रात्री हॉटेल रूममध्ये जाऊन विमा कंपनीच्या ग्राहकांचे अहवाल लिहायचा! आता तुम्ही म्हणाल, हा काय प्रकार आहे? क्रेग विल्यम्सला हे काम करावंच लागत होतं. कारण, तो नामिबियातील एका विमा कंपनीत नोकरी करतो.

जेव्हा-जेव्हा दिवसा त्याला क्रिकेटच्या मॅचेस खेळाव्या लागतात तेव्हा तो आपलं दिवभरातील ऑफिस वर्क रात्री करतो. युएईमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये स्वत: क्रेगनं याबाबत माहिती दिली होती. त्यानं आतापर्यंत कंपनीसाठी शेकडो ग्राहकांचा विमा उतरवला आहे.

नामिबियातील ओशाकाती प्रदेशात २५ जानेवारी १९८४ रोजी क्रेगचा जन्म झाला. २००७ मध्ये त्यानं नॉर्थ वेस्ट संघाविरुद्ध नामिबियन क्रिकेट संघासाठी प्रथम श्रेणी पदार्पण केलं. साऊथ आफ्रिकन प्रॉव्हिन्सियल चॅलेंज स्पर्धेतील या पहिल्या सामन्यात त्यानं चार षटके टाकत २३ धावा दिल्या आणि त्यानंतर अर्धशतक देखील झळकावलं. त्यानंतर तो सातत्यानं प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत राहिला.

मात्र नामिबियन क्रिकेट इतर देशांच्या तुलनेत कमी प्रगत आहे. फक्त क्रिकेट खेळून खेळाडू आपला उदरनिर्वाह करू शकत नाहीत. त्यामुळं ते इतर उद्योग-धंद्यांतून पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. क्रेग देखील याला अपवाद नाही. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यानं विमा कंपनीत नोकरी केली. सोबत तो क्रिकेट देखील खेळत राहिला.

नामिबिया ‘अ’ संघाकडून खेळताना क्रेग विल्यम्सनं आपल्या कॅनडाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावलं आहे. जानेवारी २०१८ मध्ये त्याला आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन टू स्पर्धेसाठी नामिबियाच्या संघात स्थान मिळालं. मात्र, त्यानंतर त्यानं अचानक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

त्यामुळं पहिल्यांदाच आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या नामिबिया संघाचा तो भागदेखील नव्हता. विल्यम्सनं आपली नोकरी आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित केलं होतं. मात्र, नामिबियाचे मुख्य प्रशिक्षक पियरे डी ब्रायन यांना ही गोष्ट मान्य नव्हती. विल्यम्सला असलेला अनुभव नामिबियाच्या संघासाठी किती महत्त्वाचा आहे, ही गोष्ट ब्रायन जाणून होते. म्हणून त्यांनी विल्यम्सला निवृत्ती मागे घेण्यासाठी गळ घातली.

नवख्या खेळाडूंचा भरणा असलेल्या नामिबियाच्या संघाला त्याची किती गरज आहे, ही गोष्ट प्रशिक्षक ब्रायन यांनी त्याला पटवून दिली. आपल्या देशासाठी आणि संघासाठी क्रेग विल्यम्सनं यु टर्न घेतला आणि २०१९मध्ये तो क्रिकेटमध्ये परत आला.

नोकरी करता-करता क्रिकेट खेळणारा क्रेग हा पहिलाच खेळाडू नाही. यापूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू रंगना हेराथसुद्धा क्रिकेट खेळता-खेळता नोकरी करत होता. हा दिग्गज लंकन गोलंदाज कोलंबोमधील संपत बँकेमध्ये मार्केटिंग क्लर्क आहे. त्याला सन्मान म्हणून वगैरे हे पद मिळालेलं नाही.

क्रिकेटचा सराव करत असताना अभ्यास करून त्यानं बँकेची नोकरी मिळवली. एखाद्या सर्वसामान्य क्लर्कप्रमाणं पडलेली सर्व काम त्याला करावी लागतात. क्रिकेट दौऱ्यांसाठी जेव्हा सुट्ट्यांची आवश्यकता असायची तेव्हा तो रितसर ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटकडं लाँग लीव्हसाठी अर्ज करायचा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ब्रिटनने हि*टल*रला ‘बाई’ बनवण्याचा सिक्रेट प्लॅन बनवला होता, जो फ्लॉप झाला

Next Post

आमच्या पिढीला इंग्रजी गाण्यांचं वेड लावलं ते एनरिक इग्लेसियसने

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

आमच्या पिढीला इंग्रजी गाण्यांचं वेड लावलं ते एनरिक इग्लेसियसने

२० लाख लोकांनी ६०० किलोमीटरची मानवी साखळी केली आणि आपलं अस्तित्व राखलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.