The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेचा हरवलेला अ*णुबॉ*म्ब अजूनही सापडलेला नाही !

by द पोस्टमन टीम
20 December 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कधीकधी अनावधानाने आपण आपल्या काही महत्त्वाच्या गोष्टी हरवून बसतो. खूप प्रयत्न करूनही त्या सापडत नाहीत, मग शेवटी आपण त्याचा विषय सोडून देतो. कारण त्या वस्तू हरवल्यामुळे आपले किंवा इतर कोणाचे फारसे नुकसान होणार नसते. पण १९५८ साली अमेरिकेकडून असे काही हरवले, की ते ऐकल्यावरच धडकी भरेल!

अमेरिकेच्या एका यु*द्ध सरावादरम्यान चक्क एक भलामोठा अ*णुबॉ*म्ब समुद्रात हरवला आणि त्याचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. ५ फेब्रुवारी १९५८ रोजी अमेरिकेच्या हवाईदलाने ७६०० पाउंड वजनाचा अ*णुबॉ*म्ब जॉर्जियाच्या किनाऱ्यालगत समुद्रात टाकला. विशेष म्हणजे हा बॉ*म्ब काही चुकून टाकला नसून, B-47 या विमानाच्या वैमानिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी तो समुद्रात टाकून देण्याचा पर्याय निवडला होता.

१९५८ साली अमेरिकेने एक गुप्त यु*द्धसराव आयोजित केला होता. या मोहिमेसाठी B-47 हे बॉ*म्बर विमान निवडण्यात आले होते. या विमानाने फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळील होम स्टेट हवाई तळावरून उड्डाण केले होते. हा यु*द्धसराव जास्तीत जास्त वास्तविक व्हावा यासाठी या विमानात पंधरा थर्मो न्यू*क्लिअर बॉ*म्ब भरले गेले होते. त्या बॉ*म्बमध्ये युरेनियमसोबतच तब्बल चारशे पाऊंड वजनाचे विस्फो*टकसुद्धा होते.

प्लुटोनियम हा न्यू*क्लिअर रिएक्शन घडवून आणू शकतो म्हणून त्याऐवजी त्यात लिडचा बनावट गाभा बसवलेला होता. याच मोहिमेत F-86 फायटर विमानेसुद्धा वापरली गेली होती.

B-47 या बॉ*म्बर विमानांना अवरोध करण्याचे काम F-86 या लढाऊ विमानांना देण्यात आले होते. सगळी मोहीम व्यवस्थित आखली गेली असतानाही एक भयानक चूक झाली. एका लढाऊ विमानाला रडारवर बॉ*म्बर विमान दिसलेच नाही आणि हे लढाऊ विमान थेट, B-47 या बॉ*म्बर विमानावर जोरात जाऊन धडकले. ही धडक जमिनीपासून तब्बल ३८ हजार फूट उंचीवर झाली होती. या अपघातामुळे B-47च्या इंजिनला धक्का लागला आणि त्याच्या पंखांमध्येसुद्धा एक मोठं भगदाड पडलं. शिवाय F-86 विमानाचासुद्धा डाव्या बाजूचा पंख चांगलाच जायबंदी झाला.



कर्नल हावर्ड रीचर्डसन हा या बॉ*म्बर विमानाचा वैमानिक होता. त्याने त्याची कौशल्ये वापरून ते विमान २० हजार फुटांवर कसेबसे स्थिर केले. पण त्याला आता एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता, तो म्हणजे विमानाला सुरक्षितपणे जमिनीवर उतरवणे. शेवटी त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून एक सर्वोत्तम पर्याय शोधला. त्याने ठरवले की विमानातील वजन कुठेतरी खाली सोडून द्यायचे, त्यामुळे त्या आणीबाणीच्या परिस्थितीत विमानाला सुरक्षितपणे उतरवता येणार होते व स्फो*टाचा धोकाही टळणार होता.

विमानाने जॉर्जियाजवळील टायबीच्या समुद्रात बॉ*म्ब टाकला आणि हंटर एयरफोर्स बेसवर विमान सुरक्षितपणे उतरले. धडक बसलेले दुसरे विमान म्हणजे, F86. या लढाऊ विमानाचा वैमानिक होता, कलारोन स्टुअर्ट. तोदेखील पॅराशुटच्या मदतीने विमानातून बाहेर पडला आणि एका दलदलीच्या प्रदेशात सुरक्षितपणे उतरला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

मोहीम फत्ते झाली आणि बॉ*म्बर विमानाचा वैमानिक रिचर्डसन याला अमेरिकेतील मानाच्या, डिस्टिंग्विष फ्लाईंग क्रॉस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या अपघातात कोणाचा जीव गेला नसला तरीही, त्या समुद्रात टाकलेल्या बॉ*म्बमुळे नजीकच्या प्रदेशांना आणखी धोका निर्माण झाला. अमेरिकेच्या नौदलाने समुद्रात दोन महिने या बॉ*म्बचा शोध घेतला. पण त्यांना तो सापडला नाही. समुद्राच्या तळाशी साचलेल्या चिखलात हा बॉ*म्ब १० ते १५ फूट खोल गाडला गेला असावा असा अंदाज बांधण्यात आला. त्यानंतरही न्यू*क्लिअर बॉ*म्ब ट्रेसरच्या मदतीने त्याचा शोध घेतला गेला, तरीही त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. शिवाय या अपघाताला आणखी जास्तीचे विवाद चिकटल्याशिवाय राहिले नाहीत!

या घटनेनंतर अमेरिकेचा डिफेन्स सेक्रेटरी असलेला, डब्ल्यू जे हावर्ड याने १९६६ साली अणुऊर्जा समितीला एक पत्र लिहिले. त्याने कळवले की यासारखे आणखी चार बॉ*म्ब समुद्रात हरवले आहेत आणि ते कधीच सापडलेले नाहीत.

आणि टायबीजवळ हरवलेला बॉ*म्ब हा तर न्यू*क्लियर कॅप्सूल असलेला एक जिवंत बॉ*म्ब होता. शिवाय आणखी दुसरा बॉ*म्ब  १९६५ साली पश्चिम पॅसिफिकमध्ये हरवला होता आणि तोसुद्धा कधीच सापडला नाही.

डब्ल्यू जे हवर्ड याने पत्रात एवढ्या बॉ*म्बचा उल्लेख केलेला असला तरीही, २००१ साली अमेरिकेच्या हवाई दलाच्या अभ्यासाने ही माहिती खोटी ठरवली आहे. शिवाय त्यांनी हेही स्पष्ट केले की, जर त्या अणुबॉ*म्बला धक्का लावला गेला नाही, तर पर्यावरणाला त्यापासून कोणताही प्रकारचा धोका नाही. आणि अणुस्फो*ट होण्याचीसुद्धा शक्यता नाही.

खरे तर आजही तो अ*णुबॉ*म्ब टायबीच्या समुद्रात कुठेतरी तळाशी गाडला गेला आहे आणि तो पूर्णतः सौम्य आहे असेही म्हणता येणार नाही. कारण त्यात आजही चारशे पाऊंड वजनाची स्फो*टकं आहेत, शिवाय त्यासोबत मोठ्या प्रमाणात युरेनियमसुद्धा आहे. असे असले तरीही काही तज्ञांच्या मतानुसार बॉ*म्ब खोलवर गाडला गेल्यामुळे त्यापासून सध्या तरी काहीही धोका नाही.

समुद्राचा तळ संथ आहे तोपर्यंत हे वाक्य खरंही ठरेल. पण जेव्हा त्या जागी ज्वालामुखीचा उद्रेक होईल तेव्हा बरेच किरणोत्सारी पदार्थ वातावरणात पसरू शकतात. हिरोशिमा-नागासाकीच्या भयानक वि*ध्वंसानंतर जगाने धडा घेतला असला तरी आणीबाणीतुन उद्भवलेल्या अशा अपघातांमुळे सतत आपल्या डोक्यावर न्यू*क्लिअर रेडिएशन्सची टांगती तलवार आहे असेच म्हणावे लागेल!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

नेहरूंच्या इच्छेखातर गोदरेजने आशिया खंडातील पहिला टाइपरायटर बनवला होता !

Next Post

रोज एका पेगच्या बदल्यात हे वानर तब्बल ९ वर्षे रेल्वेगाड्यांना सिग्नल देत होतं !

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

रोज एका पेगच्या बदल्यात हे वानर तब्बल ९ वर्षे रेल्वेगाड्यांना सिग्नल देत होतं !

बेंजामिन फ्रँकलिनने एवढे शोध लावले पण कधी स्वतःच्या नावावर पेटंट नाही केलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.