The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रिटिश आणि ना*झींची बोलणी घडवून आणणारी ‘ना*झी स्पाय प्रिन्सेस’ स्टेफनी

by द पोस्टमन टीम
22 October 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात यु*द्धाला वेगळे वळण देऊ शकेल इतकी क्षमता असलेली एक स्त्री होऊन गेली. तिचे नाव होते स्टेफनी व्हॉन होहेनलोहे. ब्रिटिश सरदार आणि उमराव यांच्याशी तसेच हि*टल*रशीसुद्धा तिचे मैत्रीपूर्ण संबंध होते. अमेरिकेची सिक्युरिटी एजन्सी असलेल्या ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ म्हणजे ‘एफबीआय’ने तिचे वर्णन करताना ती ‘दहा हजार पुरुषांच्या तोडीची होती असे म्हटले आहे.

इतकेच नाही तर जर तिचा योग्य प्रकारे वापर केला गेला असता तर दुसऱ्या महायु*द्धाला तिच्यामुळे वेगळे वळण लागले असते. हिट*लर तर तिला प्रिन्सेसच म्हणायचा. पण ती खरोखर राजकुमारी होती का? तर नाही. ती मुळात ज्यू होती. तेच ज्यू, ज्यांचा वंश नष्ट करण्यासाठी हिट*लरने कंबर कसली होती!

प्राग मधल्या एका ज्यू कुटुंबात स्टेफनीचा जन्म झाला. लहानपणापासूनच ती अत्यंत हुशार आणि चतुर होती. कुठेही लोक जमलेले असू देत, स्टेफनी त्यांच्यात मिसळली की त्या पार्टीला वेगळीच रंगत येत असे. स्टेफनी हाच त्या पार्टीचा आकर्षणबिंदू बनत असे. पुढे तिने तारुण्यात प्रवेश केला आणि राजकुमार असलेल्या फ्रेडरिच फ्रान्झ व्हॉन होहेनलोहे याच्याशी तिचे लग्न झाले.

या लग्नाने तिला प्रिन्सेस हा किताब मिळवून दिला. पुढे लवकरच त्यांचा घटस्फोट झाला, पण स्टेफनीने आपली प्रिन्सेस ही उपाधी कायम ठेवली आणि त्याच बरोबरीने आपली लाईफ स्टाईलही. अजूनही ती अमीर, उमरावांच्या उच्चभ्रू पार्ट्यांना नियमित हजेरी लावत असे. ब्रिटिश आणि जर्मन अशा दोन्ही उच्चवर्तुळांमध्ये तिचे मित्रं मैत्रिणी होते.

पहिल्या महायु*द्धाच्या काळात तिने ऑस्ट्रियन लष्करात ‘फिल्ड नर्स’ म्हणून काम केले. ती यु*द्धाची आघाडी जिथे जिथे असेल तिथे तिथे जात राहिली. यु*द्ध संपल्यावर तिचा संपर्क लॉर्ड रॉथरमेयर याच्याशी आला. हा मनुष्य ब्रिटनमधला अत्यंत श्रीमंत मनुष्य होता. डेली मेल या प्रख्यात वृत्तपत्राचा तो मालक होता. या दोघांची ओळख वाढली आणि त्यांचा एकमेकांवर चांगलाच प्रभाव पडला.



या रॉथरमेयरने स्टेफनीच्या सांगण्यावरून ‘व्हर्सायच्या तहात जर्मनीवर लादण्यात आलेल्या अपमानास्पद अटी’ या विषयावर डेली मेलमध्ये एक लेख लिहिला. तो स्वतः राजसत्ताक पद्धतीचा समर्थक होता. युरोपमध्ये कम्युनिझमचा प्रसार रोखण्यासाठी त्याला हंगेरीचं राज्य प्रस्थापित करायचं होतं. त्यासाठी काही समविचारी लोक त्याला आधीच येऊन भेटले होते आणि त्यांनी त्याच्याकडे या कारणासाठी निधीचीही मागणी केली होती. बदल्यात ते त्याला हंगेरियन राजघराण्याचा पुढचा वंशज म्हणून स्थान द्यायला तयार होते.

दरम्यान स्टेफनी हिने पहिल्या महायु*द्धादरम्यान फ्रान्सने जर्मनीकडून जिंकून घेतलेला प्रदेश परत द्यावा यासाठी मोहीम उघडली. रॉथरमेयरने या मोहिमेसाठी तिला तीन पाच लाख पाऊंड एवढी घसघशीत मदत देऊ केली. एम आय-६ या ब्रिटिश इंटेलिजन्स एजन्सीने याबद्दल फ्रेंच इंटेलिजन्सला कळवले आणि त्यांनी पुढे ही बातमी फ्रान्समधल्या प्रेसकडे फोडली.

स्टेफनीला बराच विरोध झाला. त्यामुळे ती लंडनला परतली आणि तिथे दर महिन्याला पाच हजार पौंड एवढ्या पगारावर रॉथरमेयरकडे काम करू लागली. तिच्या मित्रमैत्रिणींच्या यादीत पुढे अजून दोन महत्त्वाची नावे जोडली गेली. त्यापैकी एक म्हणजे जोआशिम व्हॉन रिबेनट्रॉप हा ब्रिटनमधला जर्मन राजदूत, आणि दुसरा म्हणजे इंग्लंडचा भावी राजा प्रिन्स एडवर्ड. यातच अजून एका महत्त्वाच्या व्यक्तीचा उल्लेख करावा लागेल, ती म्हणजे खुद्द ॲडॉल्फ हि*टलर.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

१९३० च्या दशकात ना*झी पक्ष जसजसा विस्तारू लागला तसे रॉथरमेयरने स्टेफनीला हि*टलरशी संपर्क प्रस्थापित करायला सांगितले. स्टेफनीने हिट*लरचा स्वीय सहाय्यक असलेल्या कॅप्टन फ्रिट्झ वाईडमन याच्याशी मैत्री केली. त्याच्या माध्यमातून ती हिट*लरशी संपर्क साधू शकली. रॉथरमेयर हा ना*झी पक्षाला मदत करू इच्छितो असे तिने हिट*लरला सुचवले. तिकडून रॉथरमेयर देखील स्टेफनीद्वारे हिट*लरचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याला मोठमोठ्या भेटवस्तू पाठवत होता.

रॉथरमेयर आणि हिट*लर यांच्यामध्ये स्टेफनीने एक डिनर मीटिंग आयोजित केली. त्याला हिट*लरतर्फे त्याचे काही सहकारी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. पुढे रॉथरमेयर आणि स्टेफनी हे हिट*लरला त्याच्या ईगल्स नेस्ट येथे भेटले. एखाद्या ब्रिटिश नागरिकाच्या दृष्टीने हा मोठा बहुमानाचा प्रसंग होता. या बैठकीत हिट*लरला स्टेफनीने चांगलेच प्रभावित केले.

त्यांच्यातली जवळीक इतकी वाढली, की पुढे अमेरिकन माध्यमांनी ती ना*झींसाठी काम करणारी गुप्तहेर आहे असा दावा केला. ही घटना १९३७ सालातील. तिनेही ना*झींचा अमेरिकेतील उजवा हात मानला गेलेल्या बंड यांची भेट घेतली आणि काही महिन्यातच सुरू होणाऱ्या यु*द्धासाठी त्यांचे सहकार्य मागितले.

पुढे ती युरोपात परतली. युरोपात आल्यावर तिने ब्रिटनचा परराष्ट्र सचिव लॉर्ड हॅलिफॅक्स आणि हिट*लरचा सहकारी फ्रिट्झ वाईडमन यांच्यामध्ये एक गुप्त बैठक घडवून आणली. पण ही बैठक तितकीशी गुप्त राहिली नाही. लोकांना याबद्दल समजले आणि फार मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ उसळून आला. सगळ्यात जास्त संताप फ्रान्सचा झाला.

त्यांचा असा समज झाला की त्यांच्या पाठीमागे ब्रिटन जर्मनीशी शांततेचे आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करत आहे. मात्र स्टेफनीचे हिट*लरबरोबरचे संबंध कालांतराने संपुष्टात आले. ती ज्यू आहे हे हिट*लरला समजल्याबरोबर त्याने आपल्या आतल्या वर्तुळातून तिची हकालपट्टी केली.

त्याच वेळी जर्मनी आणि झेक यांच्यातले संबंध तणावपूर्ण बनले होते. स्टेफनी आणि वाईडमन यांनी झेकवर आक्र*मण करण्याच्या हिट*लरच्या निर्णयाला विरोध दर्शवला. यामुळे संबंध अजूनच बिघडले. वाईडमनची अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथे बदली करण्यात आली. स्टेफनी लंडनला परतली. पण आता मात्र रॉथरमेयरने तिचा भत्ता बंद केला, मात्र काही घसघशीत रक्कम देऊ केली. त्यानंतर ती अमेरिकेला गेली. अमेरिकेत ती वाईडमनला भेटली. पण आता दोघेही एफबीआयच्या रडारवर होते.

पुढे जपानने महायु*द्धादरम्यान पर्ल हार्बरवर ह*ल्ला केला आणि स्टेफनीची रवानगी एका कॅम्पमध्ये झाली. तिचा एफबीआयने हिट*लरच्या मनाचे विश्लेषण म्हणजेच सायको ऍनालिसिस करण्यासाठी वापर केला. त्यादरम्यान असे आढळून आले की जर्मनी हरल्यास हिट*लर आत्मह*त्या करेल. मधल्या काळात स्टेफनीने अमेरिकेत पत्रकार म्हणून काम करणे सुरूच ठेवले. दुसरे महायु*द्ध संपल्यानंतर ती युरोपमध्ये परतली आणि वाईडमनशी तिने पुन्हा संपर्क प्रस्थापित केला. तिने त्याच्यावर पुस्तकही लिहिले आहे. जिनेव्हा येथे १९७२ साली तिचा मृत्यू झाला.

जन्मतःच बुद्धिमान असलेल्या या ज्यू स्त्रीने दस्तरखुद्द हिट*लरला प्रभावित केले, हे तिचे मोठेच कर्तृत्व म्हणावे लागेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भटकंती – गुप्त काळातील सोन्याचा साठा असलेल्या रहस्यमयी सोनभांडार गुहा

Next Post

अल्बर्ट आईन्स्टाईनने इस्रायलच्या राष्ट्रपतीपदाची चालून आलेली संधी नाकारली होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

अल्बर्ट आईन्स्टाईनने इस्रायलच्या राष्ट्रपतीपदाची चालून आलेली संधी नाकारली होती

रंगना हेराथने श्रीलंकन क्रिकेट टीमला मुथैय्या मुरलीधरनची कमी भासू दिली नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.