The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी या क्रांतीकारकाने देशासाठी प्राणांची आहुती दिलीय

by द पोस्टमन टीम
10 January 2026
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य हे अनेकांच्या बलिदानाचे फळ आहे. अगदी कोवळ्या वयातच जीवाची पर्वा न करता देशासाठी बलिदान देणाऱ्या तरुणांमुळेच स्वातंत्र्याचा अग्निकुंड धगधगत राहीला.

१९ वर्षाचे प्रद्योत कुमार भट्टाचार्य हे अशाच तरुणांपैकी एक होते ज्यांनी ऐन तारुण्यात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना फाशीच्या दोरालाच  हार समजून आनंदाने आपल्या गळ्यात घालून घेतला.

फक्त १९ वर्षांचे प्रद्योत भूमिगत राहणाऱ्या क्रांतिकारकांच्या संघटनेत राहून त्यांच्या कारवाईला साथ देत होते. त्याला ब्रिटीशांनी फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा त्यानी आपल्या आईला विनंती केली की,

“डोळ्यातील अश्रू गाळण्यापेक्षा माझे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी माझ्या भावांना प्रोत्साहित कर. माझ्यासाठी तीच खरी श्रद्धांजली ठरेल.”

समोर साक्षात मृत्यू उभा असतानाही या वीराला भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न सत्यात उतरणे जास्त महत्त्वाचे वाटत होते.



१२ जानेवारी, १९३३ रोजी या तरुण क्रांतीकारकाला फाशी देण्यात आली. फाशीच्या फक्त दोन महिन्यांपूर्वीच त्याने वयाची अठरा वर्षे पूर्ण करून एकोणिसाव्या वर्षात पाउल टाकले होते. इतक्या कमी वयात त्यानी क्रांतीकाराकांच्या गटात सामील होऊन त्यांच्यासोबत काम केले होते.

प्रद्योत कुमार भट्टाचार्य यांचा जन्म १९१३ सालच्या नोव्हेंबर महिन्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाबतरन भट्टाचार्य आणि आईचे नाव पंकजीनी देवी होते. बंगालच्या दास्पूर गावात राहणाऱ्या या भट्टाचार्य कुटुंबातील प्रद्योत एक अत्यंत तेजस्वी रत्न होते. अभ्यासात तल्लख असणाऱ्या प्रद्योतनी पहिल्या ग्रेडमध्ये मॅट्रिक्यूलेशन पूर्ण केले होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

प्रद्योतला घरी कोची या टोपणनावाने हाक मारली जायची. कोवळ्या वयातला निरागस आणि गोड चेहऱ्याचा कोची क्रांतिकारकांच्या गटात सामील झालाय याची भनक देखील त्याच्या घरच्यांना नव्हती. कोचीने ज्या गटात प्रवेश केला होता, तो काही भूमिगत क्रांतिकारकांचा गट होता.

बंगाल वॉलंटियर्स या नावाने हा गट १९२८ पासून कार्यरत होता. सुभाषचंद्र बोस या गटाचे प्रमुख होते. मेजर सत्य गुप्ता यांच्या सांगण्यावरून या गटाने हेमचंद्र घोष यांच्या मुक्ती संघ या सैन्यदलात प्रवेश केला. या दोन्ही संघटनांनी मिळून सशस्त्र क्रांतीची स्वप्ने पहिली.

या संघटनेच्या मिदनापोर या शाखेत प्रद्योत हा देखील एक गुप्त सदस्य होता. मार्शियल विंगचे प्रसिद्ध नेते ज्योतिष जोवारदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानी या संघटनेत प्रवेश केला. यात दिनेश गुप्ता देखील होते. दिनेश गुप्ता यांना रायटर्स बिल्डींग बॅटलमध्ये सहभागी होण्यावरून वयाच्या विसाव्या वर्षीच फासावर लटकवण्यात आले होते.

गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहानंतर सशस्त्र क्रांतीला तोंड फुटले. या पार्श्वभूमीवर मिदनापोरमध्ये १९३० पासूनच कठोर दडपशाही सुरु होती. या शहराचा मॅजिस्ट्रेट जेम्स हा अत्यंत निष्ठूर होता. सतत हिं*सक धमक्या देणे, निष्पाप विद्यार्थ्यांवर आणि सत्याग्रहींवर लाठीचार्ज करणे आणि तरुणांना खोट्यानाट्या केसेसमध्ये अडकवणे अशा अनेक क्रू*र कृत्यांची मालिका त्याच्या नावावर होती.

७ एप्रिल, १९३१ रोजी बिमल दासगुप्ता आणि ज्योतीजीबन घोष या दोन तरुणांनी त्याच्यावर गोळी*बार केला.

या अधिकाऱ्याच्या जागी आलेली व्यक्ती तर त्याहून वरताण निघाली. रॉबर्ट डग्लस हा अधिकारी तर त्याहून जास्त क्रू*र निघाला. त्याने हिल्जी डिटेंशन कॅम्पमधील कैद्यांवर अमानुष ह*ल्ला केला. या ह*ल्ल्यामुळे बंगाल वॉलंटियरच्या कार्यकर्त्यांमध्ये सुडाची भावना पेटून उठली.

डग्लस साहेबाच्या या अमा*नुष ह*ल्ल्यात २५ कैदी गंभीररीत्या जखमी झाले होते. संतोष कुमार मित्रा आणि तारकेश्वर सेनगुप्ता या दोन स्वातंत्र्यसैनिकांचा मृत्यू झाला होता. सुभाषचंद्र बोस यांनी या स्वातंत्र्यसैनिकांवर अंत्यसंस्कार केले. रवींद्रनाथ टागोर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत म्हटले होते की, “ही घटना तर निषेध नोंदवण्याच्याही पलीकडची आहे.”

युरोपियन मर्चंट्स असोसिएशनच्या मिस्टर विलीयरनी या ह*त्याकांडाचे समर्थन केल्याच्या कारणावरून बिमल दासगुप्तांनी त्याची ह*त्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, बिमल यात अपयशी ठरले. विलीयरने आपला व्यापार बंद केला आणि तो इंग्लंडला निघून गेला.

मग बंगाल वॉलिंटियरने आता डग्लसवरच आपला निशाणा धरला. या कामासाठी त्यांनी प्रभांषु शेखर पाल आणि प्रद्योत कुमार भट्टाचार्य या दोघांची निवड केली. डग्लसवर नेम धरणे तितके सोपे नव्हते. त्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्याच्याभोवती नेहमीच सुरक्षा रक्षकांचा कडेकोट बंदोबस्त असे. परंतु, कितीही अवघड कामगिरी असली तरी, ती तडीस न्यायचीच असा चंगच या क्रांतिकारकांनी बांधला होता.

३० एप्रिल, १९३२ रोजी डग्लस एका जिल्हा मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून उपस्थित होता. दोन तरुण हातात बंदुका घेऊन जबरदस्तीने या बैठकीच्या खोलीत घुसले. त्याच्या छातीवर जवळून निशाणा साधत त्यांनी काही सेकंदांतच डग्लसला यमसदनी धाडले.

या धाडसी तरुणांच्या ह*ल्ल्याने जखमी झालेला जिल्ह्याचा मॅजिस्ट्रेट रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. बैठकीसाठी उपस्थित असलेले इतर सदस्य घाईने त्या खोलीबाहेर पळत ह*ल्लेखोरांचा पाठलाग करू लागले. प्रभांशुनी पाठीमागून येणाऱ्या जमावाकडे बंदूक रोखून मग हवेत गोळीबार केला. या गोळीबाराच्या धास्तीने जमाव पांगला आणि त्याचा फायदा घेत प्रभांशु पळून जाण्यात यशस्वी ठरले.

प्रद्योतकडे असलेल्या पिस्तुलातून मात्र गोळीबारच झाला नाही. त्यामुळे ते एका इमारतीच्या आडोशाला दडून बसले. शेवटी, गर्दीने त्याला पकडून ताब्यात घेतलेच. त्याच्या खिशात एक चिठ्ठी होती ज्यात लिहिले होते, “हिल्जी ह*त्याकांडाचा बदला म्हणून डग्लसचा खू*न करण्यात आला आहे, या मृत्यूमुळे भारतीयांना जाग येईल अशी अपेक्षा आहे.”

या मुलाकडून सगळी माहिती उकळून घेण्यासाठी नाना प्रकारच्या यातना दिल्या गेल्या. पोलिसांना प्रद्योतनी खरी माहिती दिली नाही. आपल्या सहकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या कामाबाबत त्यांनी एक खोटीनाटी कथा रचली.

त्यानी पोलिसांना यामागील खरे सूत्रधार कोण याचा थांगपत्ता देखील लागू दिला नाही. आपल्या संघटनेबद्दलही त्यांनी चकार शब्दही उच्चारला नाही. त्याचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी त्याच्या काही निष्पाप मित्रांना त्याच्यासमोर मारहाण केली. त्याच्या मोठ्या भावाला तर इतकं मारलं की तो कायमचा पंगु झाला. पोलिसांनी या प्रकरणात ३३ तरुणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. पुराव्याअभावी सगळ्यांना सोडून देण्यात आले आणि फक्त प्रद्योतवरच केस दाखल करण्यात आली.

आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात देशासाठी प्राण त्यागण्याची संधी मिळाल्याबद्दल मला अभिमान वाटतो आहे असेही त्याने लिहिले होते.

“आम्ही हिं*सा करत नाही तर हिं*सेला संपवण्यासाठी आणि दुर्बलांच्या रक्षणासाठी हिं*सेच्या मार्गाचा अवलंब करतो असे त्यांचे मत होते. अहिं*सावादी आमची थट्टा करत असले तरी ते अगदीच भोळसट विचारांचे असल्याने आमचा हेतू समजून घेणे त्यांच्या आवाक्या बाहेरचे काम आहे.”

प्रद्योतच्या मनातील अन्यायाचा प्रतिशोध घेण्याची इच्छा किती ज्वलंत होती याची प्रचीती त्याच्या या विचारातून येते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

बिनधास्त बोल्ड लिरील गर्ल आणि सर्फच्या सोज्वळ ललिताजी एकाच डोक्यातून आल्या होत्या

Next Post

मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा ‘या’ डॉक्टरांनी रुग्णसेवा सोडली नाही

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा 'या' डॉक्टरांनी रुग्णसेवा सोडली नाही

एकसंध भारताच्या निर्मितीत सरदार पटेलांइतकंच योगदान या व्यक्तीचं देखील आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.